Wednesday, 13 August 2014

ब्राह्मण तुकोबांवर का चवताळले? भाग- २

तुकोबांनी ब्राह्मणांच्या भोंदुगिरीचा पर्दाफाश केला

हिंदू धर्मातील परंपरेने ब्राह्मणांना कोणतेही काम न करता बसून खाण्याची व्यवस्था करून ठेवली आहे. ही व्यवस्था पूर्णतः भोंदूगिरीवर आधारलेली होती. तुकोबांनी या भोंदूगिरीला तीव्र विरोध केला. तुकोबांनी केलेला हा विरोध जनमानसाला पटला. तुकोबांना मोठा अनुयायी वर्ग मिळाला. ब्राह्मणांच्या भोंदूगिरीचे पितळ उघडे पाडणारे अभंग लोकांच्या तोंडी खेळू लागले. या पाश्र्वभूमीवर ब्राह्मणांच्या पोटापाण्याचा उद्योग धोक्यात आला. तसेच त्यांच्या अस्तित्वालाही धोका निर्माण झाला. त्यामुळे ब्राह्मण तुकोबांविरुद्ध चवताळून उठले. 
ब्राह्मणांचा पोटापाण्याचा उद्योग त्यांच्या भोंदूगिरीवर अवलंबून होता. आजही काही प्रमाणात आहे. तुकोबांनी बाह्य देखाव्याला नेहमीच विरोध केला. ब्राह्मणी कर्मकांडात बाह्य देखाव्यालाच महत्त्व होते. इतकेच काय ब्राह्मणांचा शेंडी, जानवे आणि कमरेचे सोवळे हा वेशही दिखाऊच होता. या वेशानुसा येणा-या आंतरिक शुद्धता ब्राह्मण पाळत नव्हते. या वेशाचा वापर केवळ दक्षिणा उकळण्यासाठी केला जात होता. बाह्य वेशाला पाहूनच लोक भूलतात आणि भोंदुगिरीचे शिकार होतात. उदा. रावण संन्याशाचा वेश परिधान करून आला, त्यामुळेच सीता लक्ष्मण रेषा ओलांडून त्याच्या तावडीत येऊ शकली. ब्राह्मणांचा शेंडी, जानवे आणि सोवळे हा वेशही याच प्रकारचा होता. त्यामुळे तुकोबांनी "शिखा सूत्र याचा तोडी तूं संबंध । मग तुज बाध नाही काही ।।" अशाा शब्दात शेंडी आणि जानवे तोडून फेकण्याचा सल्ला ब्राह्मणांना दिला. 

ब्राह्मणांच्या पैसे कमावण्याच्या उद्योगात पुराणे आणि पोथ्यांतील कथा सांगणे याचा मुख्यत्वाने समावेश होता. नुसती पुराणे सांगून आणि ऐकून काहीच होत नाही. माणसात आंतरिक बदल झाला पाहिजे, हे ओळखून तुकोबानी पुराण कथनावर प्रहार केला.  तुकोबा म्हणतात : 
जालासी पंडीत पुराण सांगसी । परी तू नेणसी मी हे कोण ।।
गाढवभरी पोथ्या उलथिसी पाने । परी गुरुगम्य खुणे नेणशी बापा ।।
अशा पोथ्या-पुराणे सांगण्याच्या या उद्योगाला तुकोबांनी थेट "गाढव ओझ्या"ची उपमा दिली आहे. हा आघात प्रचंड मोठा होता. 

तीर्थस्थाने हा ब्राह्मणांच्या कमाईचा आणखी एक भाग. तीर्थावर विविध प्रकारची व्रते आणि विधि करायला सांगून ब्राह्मण गोरगरिब आणि अज्ञानी लोकांकडून पैसे उकळित असत. त्यावर तुकोबांनी प्रहार केला. तीर्थस्थानांवर जाऊ नका. तेथे दगडधोंड्यांशिवाय काहीच नाही. तीर्थांवर तुम्हाला देव भेटणारच नाही. देव हा संत-सज्जनांमध्ये आहे. संतसज्जनांच्या सहवासात राहा, तुम्हाला देवाचा साक्षात्कार आपोआप होईल, असा उपदेश तुकोबांनी केला. "तीर्थी धोंड पाणी । देव रोकडा सज्जनी ।।" हा तुकोबांचा अभंग जिज्ञासूंनी जरूर पाहावा. 

ब्राह्मण स्वतः श्रेष्ठ समजत. इतर जातीतील कोणाही व्यक्तीचा स्पर्शही त्यांना वज्र्य होता. त्यासाठी ब्राह्मणांनी सोवळ्या-ओवळ्याची चाल लोकांत लावून दिली. ब्राह्मणांच्या या कथित श्रेष्ठत्वास तुकोबांनी "सोवळा तो जाला । अंगिकार देवे केला ।।" या शब्दांत सुरुंग लावला. देवाचा अंगिकार जेणे केला, तो प्रत्येक जण सोवळा म्हणजेच पवित्र आहे, अशी घोषणा तुकोबांनी केली. ब्राह्मणांचे जाती श्रेष्ठत्व तुकोबांनी अशा प्रकारे एका फटक्यात नष्ट करून टाकले. 

तुकोबांच्या या उपदेशामुळे ब्राह्मणांचे पोटापाण्याचे खोटारडे उद्योग बंद पडू लागले. त्यांचे जाती श्रेष्ठत्व धोक्यात आले. एक प्रकारे त्यांच्या अस्तित्वालाच धोका निर्माण झाला. त्यामुळे ब्राह्मण तुकोबांवर चवताळून उठले. 

या लेखांतील विवेचनात आलेले मूळ अभंग खाली देत आहोत. हे अभंग देहू संस्थानने प्रसिद्ध केलेल्या गाथ्यातून घेतले आहेत. मूळ गाथ्यात हे अभंग जिज्ञासूंना पाहता यावेत यासाठी त्यांचा गाथ्यातील क्रमांक अभंगाच्या शेवटी दिला आहे. 

शिखा सूत्र तुझा गुंतला जमान । तंववरी तू जाण श्रुतिदास ।।१।।
त्याची तूज काही चुकता चि नीत । होशील पतित नरकवासी ।।ध्रु।। 
बहु जालासी चतुर शाहणा । शुद्ध आचरणा चुको नको ।।२।।
शिखा सूत्र याचा तोडी तूं संबंध । मग तुज बाध नाही काही ।।३।।
तुका म्हणे तरी वत्र्तुनि निराळा । उमटती कळा ब्रह्मीचिया ।।४।। 
(अभंग क्रमांक  ३९१०) 
अर्थ -  शेंडी (शिखा) आणि जाणवे (सूत्र) यात तुझा जीव अडकलेला आहे, तोपर्यंत तू श्रुतींचा म्हणजेच वेदांचा दासच राहशील. तुला यातून काहीच लाभ होणार नाही. तू नक्कीच नरकात जाशील. तू खूप चतूर, शहाणा असशील, पण ते निरुपयोगी असून शुद्ध आचरणच महत्वाचे आहे. त्यामुळे आचरण शुद्ध ठेवण्यास चुकू नको. शेंडी आणि जाणवे तू तोडून टाक, मगच तुला काही बाधा येणार नाही. तुकोबा म्हणतात, अशा प्रकारे शेंडी आणि जाणव्याच्या बाह्य उपचारांपेक्षा आतून वृत्तीने तू निराळा हो, तेव्हाच तुझ्यात ब्रह्मकळा उमटतील.  

जालासी पंडीत पुराण सांगसी । परी तू नेणसी मी हे कोण ।।१।।
गाढवभरी पोथ्या उलथिसी पाने । परी गुरुगम्य खुणे नेणशी बापा ।।ध्रु।।
तुका कुणबियाचा नेणे शास्त्रमत । एक पंढरीनाथ विसंबेना ।।३।। 
(अभंग क्रमांक  ४३६९) 
अर्थ - तू पंडीत होऊन पुराण सांगतो आहेस, पण आपण कोण आहोत याचीच ओळख तुला नाही. गाढवाचे ओझे असलेल्या पोथ्यांची पाने तू उलटत राहतोस, पण गुरुला माहिती असलेली कोणतीही खूण (आत्मज्ञान) तू जाणत नाहीस. कुणब्याचे तुकोबा कोणतेही शास्त्रमत जाणत नाहीत, पण ते पंढरीनाथास विसरत नाहीत. (विठोबाला शरण जाणे हीच खरी आत्मखुण आहे. )

तीर्थी धोंडा पाणी । देव रोकडा सज्जनी ।।१।।
मिळालिया संत संग । समर्पिता भले अंग ।।ध्रु।।
तीर्थी भाव फळे । येथे अनाड ते वळे ।।२।।
तुका म्हणे पाप । गेले गेल्या कळे ताप ।।३।।
(अभंग क्रमांक  ११४) 
अर्थ - तीर्थ स्थळावर केवळ दगड आणि पाणी आहे. खरा देव सज्जन माणसांमध्येच आहे. तीर्थावर स्नान करून कोणाचेही अंग भले म्हणजे पवित्र होणार नाही. संतांची संगतीत समर्पित झाल्यानेच ते भले होईल. तीर्थावर भाव फळतो, म्हणजे तीर्थावरील ब्राह्मणाला दक्षिणेच्या रूपाने फळ मिळते. संतांच्या सहवासात मात्र अडाणीही योग्य वळणावर येतात. तुकोबा सांगतात की, संत संगतीने पाप आणि ताप जातो. याची प्रचितीही लगेच येते. 

सोवळा तो जाला । अंगिकार देवे केला ।।१।।
येर करिती भोजन । पोट पोसाया दुर्जन ।।ध्रु।।
चुकला हा भार । तयाचिच येर झार ।।२।।
तुका म्हणे दास । जाला तया नाही नास ।।३।। 
(अभंग क्रमांक  ४२२७) 
अर्थ - सोवळ्या ओवळ्याचे ढोंग पसरवू नकोस, कारण ज्याने देवाचा अंगिकार केला आहे, तो सोवळा झालेला आहे. इतरेजण (जे देवाचा अंगिकार करीत नाहीत असे) दुर्जन असून केवळ पोट पोसण्यासाठी भोजन करतात. जो देवाचा अंगिकार करीत नाही त्याला जन्ममृत्यूची येरझार अटळ आहे. तुकोबा म्हणतात की, जो विठ्ठलाचा दास होतो, त्याचा कधीही नाश होत नाही. 


संबंधित लेख


11 comments:

  1. तुकाराम महाराजांचा खून हा रामेश्वर भट, मंबाजी भट व सालोपालो या तीन कर्मठांनी मोठ्या शिताजफीने करून पचवला, व त्यातील रामेश्वर भटाने वैकुंठगमनाची एक सुरस कथा बनवून आजही लोकांना अंधारात ठेवले आहे. याचा पुरावा म्हणजे त्यांचे सर्व लिखित वाङमय व पुरावे यांच्या आधारे तथाकथित वैकुंठ गमनावेळी केवळ रामेश्वरंच कसा हजर होता, महाराजांची सावली असलेले टाळकरी हे तेव्हा का नव्हते..?? कारण ते उपस्थित असल्याचा एकही मान्य पुरावा इतिहासात नाही.

    मधुकर माने

    ReplyDelete
  2. शिवरायांवर ज्यांच्या शिकवणूकीचा प्रभाव पडला ते संत तुकाराम यांना मात्र आध्यात्मिक मुक्तीसाठी अमानुष छळ भोगावा लागला. ' बरे झाले देवा कुणबी झालो ', असे म्हणणारे तुकाराम स्वत:ची आध्यात्मिक मुक्ती मिळवता मिळवता आजुबाजूच्या सामाजिक रुढींवरही शेलक्या भाषेत तुटून पडत असले पाहिजेत. त्या शिवाय त्यांच्या विरोधात मंबाजींसारखे धर्ममार्तंड उभे ठाकलेच नसते. संत तुकारामांचा धर्ममार्तंडांनी खून केला. तुकोबांनी घेतलेली सर्वसामान्य जनतेच्या हिताची भूमिका व या भूमिकेशी शतकानुशतके उभा दावा मांडलेले धर्मरुढी परंपरेचे ठेकेदार यांचा इतिहास पाहता प्रतिपादनात सत्य असल्याचे जाणवते.

    ReplyDelete
  3. Saint Tukaram was killed due to terrorism. This was not physical terrorism, but in the words of Tukaram, “I will not be so sad if I lose my life, but if my abhangas, literature is destroyed then it will be my real death. And I am seeing my death daily”. This type of terrorism where one can see his death daily, is the most fearful terrorism. If any person is killed due to attack on him, the terrorism ends there itself. But looking at one’s own death daily when he is alive is the worst kind of terrorism and not bearable. For thousands of years our people are suffering from this type of terrorism.

    ReplyDelete
  4. During his 41 years, Tukaram composed over 5,000 abhangs. Many of them speak of events in his life, which make them somewhat autobiographical. Yet, they are focused on God, Pandurang, and not Tukaram. His abhangs became very popular with the masses of common people. It was this very popularity that caused the religious establishment (the high caste Brahmins) to hate and persecute Tukaram. as, he was causing them to lose their power over the people. There are many miracles attributed to Tukaram. ..
    Though these yester year saints would have choosen other means to make changes in societies, it probably would not have made any sense at that time, when just speaking out aginst hindu varnashrama would have made them killed by the hindu terrorists, so they might have wisely choosen "In the Name of God" pathway, but would have completely involved in what they were doing. Neverthless, it is their great talents and power over the ordinary, mundane people that make them saints, not the godly worshiping or craps like that. Many of the listed saints here took that path as the hindu's were barbarians and kill at sight if any lower caste people trying to come up, but the god worshiping pathway probably saved all these saints, but eventually Tukaram was got killed, Nandanar was god killed by Brahmins and the list goes on and on.....!

    ReplyDelete
  5. वारकरी तत्वज्ञान समाजात रुजविण्यासाठी संत रविदास, संत कबीर, संत सज्जन कसाई, संत सेना न्हावी, संत कान्होपात्रा, संत मुक्ताबाई, संत तुकाराम, संत बहिणाबाई इत्यादी संतांनी पुढे सतराव्या शतकापर्यंत कार्य केले. या सर्व संतांचे तत्वज्ञान नाथ, दत्त, महानुभाव विचारधारांचे मिश्रण होते. मुळातच ते ब्राम्हणशाही नाकारणारेच होते. वारकरी कीर्तनातून गावोगाव सामाजिक सुधारणा होऊ लागल्या. वर्णभेद, जातीभेद कमी होऊ लागला. त्यामुळे वैदिक ब्राम्हण या वारकरी संताविरोधात एकत्रित व संघटीत होवू लागले. त्यासाठी धर्मसत्ता व राजसत्ता यांचा गैरवापर करून प्रमुख नेत्याविरोधात घातपातांची कृत्ये करू लागले. महात्मा बसवेश्वर व चक्रधर स्वामींची हत्या करण्यात आली होती. निवृत्तीनाथ, ज्ञानेश्वर, सोपानदेव, व मुक्ताबाई या चार भावंडांना ब्राम्हणांनी अतोनात छळले. तरुणपणीच एकाच वर्षात या चारही भावंडांचा घातपाती मृत्यू झाला. सन १३३८ मध्ये मंगळवेढ्यास संत चोखोबा व त्यांच्या कुटुंबातील नऊ जणांचा अअसाच घातपाती मृत्यू झाला. त्यावेळी संत नामदेव महाराज पंजाबात होते. त्यांनी परतताच संत चोखोबांची समाधी श्री विठ्ठल मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ बांधली भारतभर या संतांना वैदिक ब्राम्हणांचा त्रास सहन करावा लागला.त्यातून पुढे संत नामदेव महाराजांचाही त्यांच्या सोळा कुटुंबियासह घातपाती मृत्यू झाला. संत रविदास, संत कबीर यांनाही हेच सोसावे लागले. तर जगतगुरू संत तुकाराम महाराजांना सन १६५० मध्ये अवघ्या बेचाळीसाव्या वर्षी विज्ञानाचा स्फोट होत असतांना पुष्पक विमानातून वैकुंठी जावे लागले. वास्तवात त्यांचीही हत्या करण्यात आली आणि वैकुंठाची अफवा पसरविली.

    ReplyDelete
  6. तुकोबारायांचा खून केल्यावर भटांनी लोक देह कुठे असे विचारतील म्हणून सदेह वैकुंठी जात आहेत/ गेले असे सांगितले..त्यादिवशी धुलवलीचा (रंगपंचमी) दिवस असल्यामुळे लोक उत्सवात होते..पण ग्रेट तुकोबारायांना मुकले होते...काही लोकांनी विचारले की "तुकोबाराय वैकुंठी जाताना आम्हाला कसे दिसले नाहीत" यावर भटांनी कावा करून सांगितले की "ज्यांना दिसले नाहीत ते दोन बापाचे आहेत"
    बहुजन समाज गुलामीत राहावा म्हणून मनुवादी अश्या पद्धतीने धार्मिक दह्शदवादाचा वापर करतात...

    -अजय जगताप

    ReplyDelete
  7. कोणी सदेह वैकुंठाला पोहोचविले, कोणी काशी यात्रेला पाठविले, कोणी अचानक कीर्तनातून अदृश्य केले, कोणी तुकडे-तुकडे करून मारले, कोणी गळ्यात दगड बांधून इंद्रायणीत फेकून दिले, किती तरी कारणे फक्त हत्या लपविण्यासाठी? एकाच व्यक्तीला इतक्या प्रकारे मारून टाकल्याचे जगाच्या इतिहासातील हे एकमेव प्रकरण असावे, नाही काय?

    विजय मोहिते.

    ReplyDelete
  8. या ब्लॉगच्या सर्व वाचकांना, लेखकांना ६८ व्या स्वतंत्र दिना निमित्त खूप खूप शुभेच्छा!
    भारतीय स्वातंत्रदिन चिरायु होवो!
    १५ ऑगस्ट २०१४.
    जय भारत!

    ReplyDelete
  9. संत तुकाराम आणि चमत्कार...

    आमचे प्राचीन धर्मग्रंथ हे चमत्कारांनी खचाखच भरलेले आहेत. मुळात माणूस हा धर्मवेडा आहे, आणि जेव्हा धर्मग्रंथच चमत्कारांचे समर्थन करताना दिसतात तेव्हा तो साहजिकच डोळे झाकून विश्वास ठेवतो. पिढ्यानपिढ्या हे चालत आले असल्याने ह्या विज्ञान युगात तरी वेगळे काय पाहायला आणि ऐकायला मिळणार? आणि म्हणूनच घरात बसवलेला शाडूचा गणपती भक्ताच्या वाटीतले दुध पितो!

    चमत्कार म्हणजे तरी काय? तर 'जे अशक्य ते शक्य करून दाखवणे' म्हणजे चमत्कार! ज्याला दैवी शक्ती प्राप्त झालेली असते अशी व्यक्ती चमत्कार करू शकते, अशा प्रकारची लोकसमजूत आहे; आणि त्यामुळेच भोंदू बुवा, बाबा काही तरी चिल्लर स्वरूपाची हातचलाखी करून हवेत मोकळा हात फिरवून सोन्याची साखळी काढून दाखवतात. तर काही विज्ञानाचे एखादे तत्त्व वापरून पाण्याचा दिवा पेटवून दाखवितात. पण हे खऱ्या अर्थाने चमत्कार नसतात.

    'चमत्काराशिवाय नमस्कार नसतो' हे भोंदुगिरी करणाऱ्या बुवा, बाबांनाही माहित असल्याने प्रत्येक भोंदूबाबा वरील प्रकारचा एक चमत्कार करून दाखवत असतो. बुवाबाजी करण्याचे चमत्कार हे एक प्रमुख साधन आहे.

    चमत्कार म्हणजे फक्त कार्य. त्यात कारणाचा पत्ताच नसतो.वास्तविक कुठलेही कार्य कारणाशिवाय घडत नाही; परंतु 'चमत्कार' या प्रकारात हा कार्यकारणभाव शोधूनही सापडत नाही.

    साधू, संत, महंत, महात्मे ह्यांचा मोठेपणा आणि महत्व वाढविण्यासाठी त्यांचे भक्त वा अनुयायी त्यांच्या चरित्राला हरतऱ्हेचे चमत्कार चिटकवतात. अश्या वेड्या, आंधळ्या भक्तांनी "मी चमत्कार जाणत नाही" म्हणणाऱ्या तुकारामानाही सोडले नाही. 'सदेह वैकुंठगमना' चा चमत्कार त्यांच्या बारा बंदीला ठिगळासारखा का होईना पण जोडलाच! अशी आहे आमची 'चमत्कार' या अंधश्रद्धेविषयीची मानसिकता!

    चमत्काराविषयी तुकाराम म्हणतात :-

    कपट काही एक | नेणे भुलवायाचे लोक ||१||
    तुमचे करितो कीर्तन | गातो उत्तम गुण ||२||
    दाऊ नेणे जडीबुटी | चमत्कार उठाउठी ||३||
    नाही शिष्यशाखा | सांगो अयाचित लोका ||४||
    नव्हे मठ-पती | नाही चाहुरांची वृत्ति ||५||
    नाही देवार्चन | असे मांडिले दुकान ||६||
    नाही वेताळ प्रसन्न | काही सांगे खाण खुण ||७||
    नव्हे पुराणिक | करणे सांगणे आणिक ||८||
    नेणे वाद घटा पटा | करिता पंडित करंटा ||९||
    नाही जाळीत भणदी | उदो म्हणोनि आनंदी ||१०||
    नाही हालवीत माळ | भोंवते मेलवुनि गाबाळ ||११||
    आगमीचे नेणे | स्तंभन मोहन उच्चाटणे ||१२||
    नव्हे यांच्या ऐसा | तुका निरयवासी पिसा ||१३|| (१३७)

    वरील आत्मकथनातून आपण कोण आहोत? आणि कोण नाही आहोत? याविषयी तुकाराम अतिशय प्रांजळपणे आपली भूमिका स्पष्ट करतात. आपण कोण नाही, हे सांगताना त्यांनी अप्रत्यक्षरीत्या पुढील प्रकाराचा निषेधच केला आहे. लोकांच्या फसवणुकीसाठी कपट कारस्थान करणे, लोकांना जडीबुटी देणे, चमत्कार दाखवणे, शिष्य करून घेणे, मालकीचा मठ असणे, मालकीची जमीन असणे, देव्हाऱ्ह्यात पुजेची उपकरणे, पूजा द्रव्यांचा पसारा असणे, वेताळ प्रसन्न असणे, आचार विचारात विसंगती असणारा पुरोहित असणे, भंदे खेळणारा देवी भक्त असणे, घटाकाश, पटतंतू विधी करणारा वैदिक असणे, करंटा विद्वान असणे, माळ ओढणारा जपी असणे, जारण मारण, उच्चाटन, मोहन करणारा मांत्रिक, तांत्रिक असणे.

    वरील सर्व प्रकार हे तद्दन खोटे असल्याने कर्मकांडी स्वरुपातल्या त्या अंधश्रद्धाच आहेत. त्यांचा धिक्कार करणारे तुकाराम खरोखर पारदर्शी व्यक्तिमत्वाचे आहेत. एवढा एक अभंग अनिष्ट प्रथा, परंपरा, रूढी, चालीरीती, कर्मकांडे ह्या सर्व प्रकारच्या अंधश्रद्धांना मूठमाती देण्यास पुरेसा आहे. आपल्या घणाघाती प्रहाराने तुकारामांनी त्याचा चक्काचूर केला आहे.

    पण यातली गम्मत अशी की, जे तुकाराम 'मला चमत्कार दाखवता येत नाही' असे प्रांजळपणे सांगतात. त्यांच्याच नावावर 'सदेह वैकुंठगमना' चा चमत्कार लोकांनी खपावावा, हा हास्यास्पद प्रकार असून धक्कादायकही आहे, तसाच तो तुकारामांवर अन्याय करणाराही आहे; पण चमत्कार वेड्यांना त्याचे काय?

    ReplyDelete
  10. मित्रहो आपल्या तुकोबांचा खून झाला हेच सिद्ध होत असेल तर मग हे पोटभरू भट जगण्याच्या लायकीचेच नाहीत अरे सर्व सामान्य लोक पोट भरण्यासाठी मेहनत करतात आणि हे पिढ्यानपिढ्या खून करत आहे …. अरे असला कसला हिंदू धर्म जागवतात हे बामन अरे अक्खे जग शेन घालील ह्यांच्या तोंडात ( स्तलांतरित झाले तरी ) तोपर्यंत आपण घालुयात ह्यांच्या तोंडात शेन

    ReplyDelete
  11. जसे संत होऊन गेले तसे या ब्राम्हण समाजात एक पण गुण नाही आहे हे फक्त पाखंड वाद करू शकतात दुसर काही नाही.... देव श्रद्धा केल्यानं पावतो असतो ब्राह्मण च्या पाया पडल्यानं नाही..... हर हर महादेव 🙇

    ReplyDelete