सप्टेंबर २०११ मध्ये हा ब्लॉग मी सुरू केला. ऑगस्ट २०१२ मध्ये मला अमेरिकेला जावे लागले. त्यामुळे ब्लॉग लेखन अशक्य झाले. या पाश्र्वभूमीवर ब्लॉग कायम स्वरूपी बंद करण्याचा माझा विचार होता. तथापि, पुरोगामी चळवळीतील मान्यवर कार्यकर्ते आणि वाचक यांनी ब्लॉग सुरूच ठेवावा, असा आग्रहाचा सल्ला दिला. त्यामुळे ब्लॉगची जबाबदारी संपादक मंडळावर सोपविण्यात आली आहे. प्रा. रविन्द्र तहकीक उपाख्य दादाहरी यांनी मुख्य संपादक म्हणून जबाबदारी स्वीकारली आहे. ब्लॉगवर आजघडीला १५० लेख आहेत. ब्लॉगला जगातील जवळपास ६० देशांतील वाचक वर्ग लाभला आहे. ऑनलाईन ज्ञानकोश असलेल्या विकिपिडियानेसुद्धा या ब्लॉगची दखल घेतली आहे. गुगलवर अनिता पाटील असा सर्च दिल्यास विकिपीडियावरील ब्लॉगविषयीचे पान उघडते.
जय जिजाऊ, जय शिवराय
आपली लाडकी बहीण
अनिता पाटील