Friday 13 December 2013

नेताजी पालकरांच्या धर्म प्रवेशास विरोध, गंगाधर कुलकर्णीच्या धर्म प्रवेशास मात्र समर्थन

-श्रीमंत कोकाटे (शिवचरित्र अभ्यासक, संशोधक)


नेताजी पालकर हे शिवाजीराजे निष्ठावं सेनापती होते. पण त्यांचे सक्तीने धर्मांतर करण्यात आले.
ते महंमदकुलीखान झाले. औरंगजेबाचे नेताजींना अफगाणिस्तानात पाठविले. नेताजींचे नाव बदलले
पण मन बदलले नव्हते. धर्म बदलला पण राजांवरील निष्ठा अभंग होती. राजांकडे यावे यासाठी
नेताजींनी अनेक वेळा पळून येण्याचा प्रयत्न केला. पण त्यांना पाठ फुटेपर्यंत मारले, पण एके दिवशी
नेताजी पालकर राजांकडे आले आणि प्रेमाने ते राजांना कडाडून भेटले. त्यांनी स्वधर्मात येण्याची इच्छा
व्यक्त केली. केली हे ब्राह्मणांस समजले तेव्हा त्यांनी नेजाजींना स्वधर्मात येण्यास कडाडून विरोध केला.
तेव्हा राजे भटांना म्हणाले,  "निराश्रीतांना जवळ घेणेणे हाच धर्म आहे. आणि त्यांना दूरूर लोटणे हा अधर्म
आहे. नेताजींना मी धमार्त घेणार. धमाच्या नावाखाली विरोधेध केलेला तरी तुम्ही आणि तुमचा धर्म
गुंडाळून ठेवा. " राजांनी धर्ममार्तंड पुरोहितांची हांजी-हांजी केली नाही. 
संस्कृतीच्या नावाखाली केली जाणारी पिळवणूक थांबविण्यासाठी राजांनी वैदिकांचा विरोध
झुगारुन दिला व नेताजी पालकरांना स्वधर्मात घेतले.

आता दुसरी अत्यंत महत्वाची घटना म्हणजे संभाजीराजांच्या काळात औरंगाबाद प्रांतातील
कसबे हरसुल येथील गंगाधर रंगनाथ कुलकर्णी याने धर्मांतर केले होते. त्याने स्वखुशीने मुसलमान धर्म
स्विकारला होता. सक्तीने त्याचे धर्मांतर झाले नव्हते. पण पुढे गंगाधर कुलकर्णीला परत धर्मांत येण्याची
इच्छा झाली. गंगाधरभाई कुलकर्णी संभाजीराजांकडे आला व त्याने राजांजवळ स्वधर्मात येण्याची इच्छा
व्यक्त केली. (संदर्भ: छ.संभाजी स्मारक ग्रंथ. पृ.१८३) पण नेताजी पालकरांना स्वधर्मात घेताना जसा
विरोध केला होता तसा गंगाधर कुलकर्णीला ब्राह्मणांनी विरोध केला नाही. या प्रसंगी सर्व भट-पुरोहित
मूग गिळून गप्प बसले. नेताजींचे सक्तीने धर्मांतर केले होते तसे गंगाधरचे सक्तीचे धर्मांतर नव्हते. तरी
नेताजी पालकर व राजांना ब्राह्मणांनी वैदिक धर्मातील अनेक कारणे सांगून प्रखर विरोध केला. मग
गंगाधर कुलकर्णीच्या वेळेस कुठे गेला धर्म आणि संस्कृती?

नेताजी पालकरांच्या धर्मांतराला वैदिक धर्म ग्रंथातील प्रमाणाव्दारे कडाडून विरोध केला
यापाठीमागे नेताजी पालकरांकडून धर्मांतर विधीसाठी धन-संपत्ती मिळविण्याच्या ब्राह्मणांचा हेतू असावा.
म्हणूनच नेताजी पालकरांच्या धर्मांतरास सर्व ब्राह्मणांनी विरोध केला. म्हणजे ग्रंथांचा आधार घेऊन
विरोध करण्यामागे धर्म, संस्कृती आणि तत्वज्ञान याबाबत ब्राह्मणांना श्रद्धा तर फक्त पैसा-संपत्ती
मिळावी आणि वर्णव्यवस्थेव्दारे ब्राह्मणांचे वर्चस्व सर्व जातींवर रहावे यासाठीच ते धर्मग्रंथांचा  वापर
करतात. याचा अर्थ धर्मग्रंथांचे दोन भाग पडतात. ब्राह्मणांचे धर्मग्रंथ व बहुजनांचे धर्मग्रंथ. यावरुन सिद्ध
होते की, ब्राह्मणांना व्रतवैकल्ये व ग्रंथांचा  प्रामाण्य मान्य नाही. पण त्यांनी बहुजनांना मात्र पाप-पुण्याची
भिती दाखवून अर्थसत्ता प्रस्थापित केली आहे. धर्मांतर प्रसंगी नेताजी पालकरांच्या पैशावर ब्राह्मणांचा
डोळा होता पण गंगाधर कुलकर्णीच्या कडून ब्राह्मणांनी पैशाची का अपेक्षा ठेवली नाही? याचा अर्थ
ब्राह्मणांचा आणि बहुजनसमाजाचा धर्म एक नाही. तसेच ब्राह्मण हे देव, धर्म आणि संस्कृतीला मानत
नाहीत. ब्राह्मण हे स्वत: देव मानत नाहीत फक्त देव मानण्याचे नाटक करता. सुसंस्कृतपणाचे
नाटक करतात. म्हणजे बहुजनसमाज देवाधर्माच्या नादी लागावा हा त्यांचा हेतू असतो. देव हा
ब्राह्मणांनी बहुजन समाजाला गाडण्यासाठीच निर्माण केला आहे. त्यामुळे ब्राह्मण देवाच्या दरबारात
उर्मटपणे पैसा उकळतात, खोटे बोलतात, भक्तांना दमदाटी करतात, देवाला अर्पण केलेल्या सर्व वस्तु
आणि पैसा स्वत: घेतात, मग या ठिकाणी देव मूग गिळून का गप्प बसतो? याच अर्थ ब्राह्मण दैववादी
नाहीत. भारतीय संस्कृतीचे ते पालन करीत नाहीत. पण बहुजनसमाजाने करावे यासाठी ते बहुजनांना
देवा-धर्मांची भिती घालतात. म्हणून नेताजी पालकरांच्या धर्मांतरास ब्राह्मणांनी विरोध केला पण
गंगाधर कुलकर्णीला त्यांनी विरोध केला नाही.

(शिवाजी राजांचे खरे शत्रू कोण? या पुस्तकातून)


प्रख्यात इतिहास संशोधक आणि शिवचरित्राचे अभ्यासक श्रीमंत कोकाटे यांनी लिहिलेले ‘शिवाजीराजांचे खरे शत्रू कोण?' हा ग्रंथ "अनिता पाटील विचार मंच"च्या वाचकांसाठी येथे उपलब्ध करून देत आहोत. जिज्ञासूंनी त्यावर प्रतिक्रिया जरूर द्याव्यात.

ग्रंथ प्रवेश 
भाग-१
भाग-४
  1. नेताजी पालकरांच्या धर्मांतराला विरोध, गंगाधर कुलकर्णीच्या धर्मांतराला मात्र समर्थन
  2. संभाजीराजांना मोगलांच्या ताब्यात देणारा विश्वासघातकी कवि कुलेश
  3. औरगजेबाने संभाजी राजांना मनुस्मृती संहितेप्रमाणे ठार मारले
  4. शिवशक बंद करुन मोगलांचा फसलीशक सुरु करणारे पेशवे
  5. शिवजयंती बंद पाडण्यासाठी टिळकाने गणेशोत्सव सुरु केला
  6. शिवरायांना मर्यादित करणारे अत्रे

No comments:

Post a Comment