Thursday, 22 March 2012

ब्राह्मणांच्या साहित्याची समीक्षा करणे गुन्हा आहे का?


मी पु ल देशपांडे यांच्या साहित्याची समीक्षा करताच महारास्त्रातील ब्राह्मण चवताळून उठले आहेत. माझ्यावर टीकेचा आणि धमक्यांचा भडीमार सुरु झाला आहे. या राज्यातील ब्राह्मण इतके किती जातीयवादी झाले आहेत, कि त्यंना ब्राह्मण लेखकांच्या साहित्याची समिक्ष करणे सुद्धा गुन्हा वाटतो. ब्राह्मण म्हणजे सर्व नियमांच्या वर अशी जी धारणा या देशात निर्माण झालेली आहे तिची हि अंतिम परिणती आहे.

१) मुद्दा हा आहे की पु ल वरील माझ्या लेखात
तुम्हाला नेमके काय खटकले ? कोणता मुद्दा
अक्षेपार्ह्र्य वाटला ? हें काही आपण संगीतले नाही.
भारतीय संस्कृतीत ब्राम्हण आणि गाय अवध्य
आहे म्हणून ब्राम्हण लेखकाचे साहित्यही
"टीकाअवध्य" असावे असे तर आपले म्हणणे
नाहीना ?

२) आणि आपला आक्षेप नेमका कशा बाबत आहे ?
पु ल नी आणीबाणी आणि संयुक्त महाराष्ट्र आंदोलनात
कार्य केले नाही किंवा त्यांनी "मुक्तांगण "सारख्या
सामाजिक चळवळीना चालना दिली नाही असे मी कुठेच
म्हटलेले नाही. उलट त्यांनी आणि त्यांच्या सुविद्य पत्नी
सुनिताताईनी अमरावतीच्या माळरानावर " आनंदवनात"
महिना -महिना राहून कुष्ठरोग्याची सेवा केली आहे.
त्यांच्या राया गेलेल्या चेहऱ्यावर हसू फुलवले आहे
हें कोन नाकारेल; निदान मी तरी एवढा कृतघ्न
नाही.

परंतु याचा अर्थ असा नव्हे की पु ल च्या
साहित्य कृतीवर टीका-विश्लेषण-वाद-चर्चा
होऊ नये ! हें म्हणजे कलमाडीने पुण्याचा विकास
केला ना ? केला की नाही ? मग याचे उपकार
मानून त्याने केलेला भ्रष्टाचार माफ करून टाका की राव !

असे म्हणण्या सारखे होयील. हा पोथी वाद झाला
" बाबा वाक्य प्रमाणाम " त्या बद्दल बोलायचे नाही.
हें कसे चालेल.

पण जातीयवाद्यांनी एक गोष्ट लक्षत ठेवावी कि
मी त्यांच्या अशा धक्या किंवा टीकेला अजिबात
भीक घालणार नाही.

 -रवींद्र तहकिक. 




या मालेतील इतर लेख 


No comments:

Post a Comment

आपली प्रतिक्रिया येथे लिहा.
केवळ मुद्देसूद विचार व्यक्त करणाऱ्या प्रतिक्रियांनाच 'अपाविमं'वर प्रसिद्धी दिली जाईल. मुद्दे नसलेल्या प्रतिक्रिया प्रसिद्ध केल्या जाणार नाहीत.