फुल्यांनी केलेली परशुरामाची हजामत
क्षत्रियांना पराभूत न करू शकलेला परंतु तरीही २१ वेळा पृथ्वी नि:क्षत्रिय केल्याचा दावा करणारा. ब्राह्मण सोडून इतर कोणालाही विद्या न देण्याचे पाप करणारा आणि स्वत:च्या आईचे मुंडके उडवून क्रूरतेचा शिरोमणी ठरलेला परशुराम चिरंजीव आहे, असा दावा सनातनी ब्राह्मण करीत असतात. अशा कथा महाभारत, हरीवंशम आणि श्रीमद्भागवत पुराणात आहेत. परशुरासम जर चिरंजीव असेल, तर तो कोणाला तरी कुठे तरी नजरेस पडायला हवा. तसा तो आजपर्यंत कोणाच्याही नजरेस पडलेला नाही. मग हा चिरंजीव म्हणजे कधीही न मरणारा परशुराम कुठे आहे? हा प्रश्न माझा एकट्याचा नाही. महात्मा फुले यांनाही हाच प्रश्न पडला होता.
क्षत्रियांना पराभूत न करू शकलेला परंतु तरीही २१ वेळा पृथ्वी नि:क्षत्रिय केल्याचा दावा करणारा. ब्राह्मण सोडून इतर कोणालाही विद्या न देण्याचे पाप करणारा आणि स्वत:च्या आईचे मुंडके उडवून क्रूरतेचा शिरोमणी ठरलेला परशुराम चिरंजीव आहे, असा दावा सनातनी ब्राह्मण करीत असतात. अशा कथा महाभारत, हरीवंशम आणि श्रीमद्भागवत पुराणात आहेत. परशुरासम जर चिरंजीव असेल, तर तो कोणाला तरी कुठे तरी नजरेस पडायला हवा. तसा तो आजपर्यंत कोणाच्याही नजरेस पडलेला नाही. मग हा चिरंजीव म्हणजे कधीही न मरणारा परशुराम कुठे आहे? हा प्रश्न माझा एकट्याचा नाही. महात्मा फुले यांनाही हाच प्रश्न पडला होता.
परशुरामाचा पर्दाफाश करणारे लिखाण फुल्यांनी मोठ्या प्रमाणात केले आहे. त्यावेळी पुण्यातल्या ब्राह्मणांनी त्यांच्या विरुद्ध आकांडतांडव केले. परंतु त्याला अजिबात भिक न घालता फुल्यांनी परशुरामाला उद्देशून एक जाहीर प्रकटनच त्यावेळच्या वृत्तपत्रांत प्रसिद्ध केले होते. १ ऑगस्ट १८७२ रोजी हे प्रकटन प्रसिद्ध झाले.
आज आपण हरवलेल्या व्यक्तींविषयी ज्या प्रकारचे जाहीर प्रकटन वृत्तपत्रात वाचतो, तसेच हे प्रकटन फुल्यांनी दिले होते. त्याचा हा मजकूर (समग्रस फुले वाङ्मयातील या पत्राच्या पानाचा फोटो सोबत जोडला आहे.) फुले म्हणतात :
..................................................................
चिरंजीव परशुराम उर्फ आदिनारायणाचा अवतार यास--
मुक्काम सर्वत्र ठायी,
अरे दादा परशुरामा, तूं ब्राह्मणांच्या ग्रंथांवरून चिरंजीव आहेस. तूं कडू कां होईना, परंतु विधिपूर्वक कारली खाण्याचा धिक्कार केला नाहीस. तुला पहिल्यासारखे कोळ्यांच्या मढ्यापासून दुसरे नवीन ब्राह्मण उत्पन्न करावे लागणार नाहीत. कारण हल्ली येथे तू जे मढ्यापासून उत्पन्न केलेले ब्राह्मण (आहेत) त्यांपैकी कित्येक ब्राह्मण ‘विविधज्ञानी' बनून बसले आहेत. त्यांना कांही अधिक ज्ञानसुद्धा देण्याची तुला जरूरी पडणार नाही. फक्त तूं येथे ये आणि त्यांनी शूद्रांची गाजरे खाल्ल्याबद्दल त्यांस चांद्रायण प्रायश्चित्त देऊन त्यांच्याकडून तुझ्या वेदमंत्रजादूच्या सामथ्र्याने पहिल्यासारखे काही चमत्कार इंग्लिश, फ्रेंच वगैरे लोकांस करून दाखीव म्हणजे झाले. तू असा तोंड चुकवून पळत फिरू नको. पण एकंदर सर्व जगांतील लोक तू सर्वसाक्ष आदिनारायणाचा अवतार खास आहेस म्हणून मान देतील. व तू तसे न केल्यास येथील महारमांग आमच्या म्हसोबाच्या पाठीस लपून बसलेल्या तुझ्या विविधज्ञानी म्हणविणाèया ब्राह्मण बच्चांस ओढून आणून त्यांची फटफजीती करण्यास कधी कमी करणार नाहीत. आणि तेणेंकरून त्यांच्या तुणतुण्याची तार तुटून त्यांच्या झोळींत दगड पडल्याने त्यांस विश्वामित्रासारिखे उपाशी मरू लागल्यामुळे कुत्र्याचे फरे खाण्याचा प्रसंग आणू नको.
आपला खरेपणा पहाणारा,
जोतीराव गोविंदराव फुले,
तारीख १ ली, माहे आगस्ट
सन १८७२ इसवी, पुणे,
जुना गंज, घर नं. ५२७
.....................................................
KHUP CHAHN G
ReplyDeleteKHUP CHHAN G
ReplyDeleteअनिता पाटील विचार मंच मधील सर्वच लेख खरोखरच विचार करायला लावणारे आहेत. मागील अनेक वर्षापासून मी कवितासागर हे आंतरराष्ट्रीय नियतकालिक चालवतो, कवितासागर च्या अंकाला जगभरातून वाचकवर्ग असून कवितासागर ला अनेक पुरस्कार प्राप्त झाले असून. पहिले व एकमेव आंतरराष्ट्रीय कविताविषयक नियतकालिक म्हणून इंडिया बुक ऑफ रेकोर्ड आणि एशिया बुक ऑफ रेकोर्ड कडून कवितासागरचा नुकताच सन्मान करण्यात आला असून, माझ्या नियतकालिकात जोशी - देशपांडे - कुलकर्णी दाखवा आणि १० रुपये बक्षीस मिळावा असे माझे आवाहन आहे, थोडक्यात माझ्या नियतकालिकात बडव्याना प्रवेश नाही. कदाचित बडव्यांच्या सहभागा शिवाय चालविण्यात येणारे हे एकमेव नियतकालिक असेल. तात्पर्य असे की अनिता पाटील विचार मंच वरील काही किंवा सर्वच लेख आम्ही संबंधित लेखकाच्या नावासह व अनिता पाटील विचार मंच वरून साभार असा स्पष्ट उल्लेख करून पुनर्प्रकाशित करू इच्छितो तरी कृपया आपण आमची विनंती मान्य करून आम्हांस तशी परवानगी द्यावी. या विषयाला अनुसरून आपणास जर काही सुचवायचे असल्यास आपले स्वागत आहे. आपल्या सहकार्य व प्रतिसादाच्या प्रतीक्षेत.
ReplyDeleteडॉ सुनील पाटील,
प्रकाशक,
कविता सागर प्रकाशन,
सुदर्शन, प्लॉट # १६, पद्मावती सोसायटी, नांदणी नाक्याजवळ, बायपास रोड,
जयसिंगपूर - ४१६१०१, तालुका - शिरोळ, जिल्हा - कोल्हापूर, महाराष्ट्र
मोबाईल - ९९७५८७३५६९, ०२३२२ २२५५००
sunildadapatil@gmail.com
तुम्ही लेख छापू शकता. 'अपाविमं'वरील लेख कॉपी राईट मुक्त आहेत.
ReplyDeleteNice article
ReplyDelete