Sunday 25 September 2011

बदनामी हे दुधारी हत्यार

टिळक, रानडे, गोखले यांची बदनामी करू नका
महापुरूषांच्या बदनामीचे केंद्र पुणे शहर आहे. पुण्यातील पेठा विकृतांचे अड्डे बनल्या आहेत. येथे केवळ छत्रपतींच्या बाबतीच विकृत बोलले जाते, असे नव्हे. भारतभरातील अनेक महापुरूषांबद्दल येथे विकृत विनोद सांगितले जातात. दोन वर्षांपूर्वी मी पुण्यात गेले होते. जेम्स लेनने आपल्या पुस्तकात सांगितलेल्या रस्त्यावरील विनोदापेक्षाही भयंकर विनोद मला येथे ऐकायला मिळाले. हे लोक शिवाजी महाराजांची बदनामी करतात, त्याचप्रमाणे बाजीराव पेशव्यांचीही बदनामी करतात. बाजीरावाच्या आईला बदफैली सिद्ध करण्याचा प्रयत्न करतात. इतकेच काय, बाळ गंगाधर टिळक, न्या. महादेव गोविंद रानडे आणि ना. गोपाळ कृष्ण गोखले यांच्या पित्याविषयीसुद्धा वाईट बोलतात. टिळक आणि रानडे हे दोघेही चित्पावन ब्राह्मण असले तरी रंगाने काळेकुट्ट होते, याचे भांडवल करून त्यांच्यावर विनोद केले जातात. चित्पावन हे गोरेपान, घा-या डोळ्यांचे, भु-या आणि सरळ केसांचे असतात, मग टिळक आणि रानडे हे रंगाने काळे कसे, असे द्वेष निर्माण करणारे प्रश्न हे लोक उपस्थित करतात. टिळक आणि रानडे रंगाने काळे होते, म्हणून त्यांचे ‘बायलॉजिकल फादरङ्क दुस-या कोणत्या जमातीत शोधणे हा विकृतीचा कळसच आहे. ही विकृती वेळीच ठेचायला हवी.  

येथे आणखी एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. बदनामी ही दुधारी तलवार आहे. दुस-यावर वार करताना ती आपल्यालाही लागू शकते, हे लक्षात ठेवले पाहिजे. आपण जेव्हा दुसèया जातीतील महापुरुषांची बदनामी करतो, तेव्हा दुसèया जातीचे लोकही आपल्या महापुरुषांची बदनामी करू शकतात, हे लक्षात घेतले पाहिजे. आपल्याकडे नुसतेच जातीय भेद आहेत, असे नव्हे. जातींच्या संघर्षांतून उसंत मिळाल्यानंतर आपण पोटजातींचा आधार भांडणासाठी घेतो. त्यामुळेच कोकणस्थ विरुद्ध देशस्थ, ९६ कुळी विरुद्ध पंचकुळी असाही भेद आपण अपार निष्ठेने जोपासत आलो आहोत. कोकणस्थ आणि देशस्थांमधून विस्तवही जात नाही. qवचू आणि कोकणस्थ यापैकी पहिल्यांदा कोणाला मारायचे? नि:संशय कोकणस्थाला. असे देशस्थ म्हणत असतात. हीच गोष्ट शहाण्णव आणि पंचकुळी याबाबत आहे. अशा परिस्थितीत बदनामीचा वापर हत्यारासारखा करणे कोणालाही परवडणारे नाही. मात्र, छत्रपतींच्या बदनामीच्या प्रयत्नात असलेले ब्राह्मणांचे टोळके हे विसरले. त्यामुळे आता बदनामीची ही तलवार ब्राह्मणांवर उलटली आहे. ही विकृती आहे. ती रोखणेच सगळ्यांच्या हिताचे आहे. अन्यथा गोपाळ गणेश आगरकर, लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख, विष्णूशास्त्री चिपळूणकर, तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी, महर्षी धोंडो केशव कर्वे, वि का राजवाडे, साहित्य सम्राट नर सिंह चिंतामण केळकर, आचार्य प्रल्हाद केशव अत्रे, राम गणेश गडकरी, वि. स. खांडेकर, पु. ल. देशपांडे, वि. वा. शिरवाडकर, बालगंधर्व, कुमारगंधर्व, भीमसेन जोशी यांसारख्या प्रात:स्मरणीय महापुरुषांची बदनामी आपल्याला उघड्या डोळ्यांनी पाहायची वेळ येईल. 

भेदांवर पोट भरणारांचे उद्योग
हे उद्योग कोण करते? जातीय संघर्षावर ज्यांचे पोट चालते, असे काही उपटसुंभ या उद्योगांमागे आहेत. ब्राह्मण विरुद्ध मराठा, ब्राह्मण विरुद्ध इतर जाती, मराठा विरुद्ध इतर जाती, असा संघर्ष निर्माण व्हावा, असे या विघ्नसंतोषी लोकांना वाटते. शिवरायांवर विनोद निर्माण करून हे लोक मराठ्यांना पेटवू पाहतात. आणि ब्राह्मण जातींतील महापुरुषांवर विनोद निर्माण करून ब्राह्मणांना पेटवू पाहतात. या लोकांना कोणत्याच महापुरुषाबद्दल प्रेम नसते. या विकृत लोकांचा परावभव करण्यासाठी समाजातील सर्वच जातींना एकत्र यावे लागणार आहे. 

अनिता पाटील 







No comments:

Post a Comment