मी लिहिलेल्या काही लेखांवरून महाराष्ट्रातील सनातनी ब्राह्मण्यवाद्यांनी फेसबुकवर शिव्या आणि धमक्यांचा सपाटा सुरू केला आहे. या लोकांनी कितीही शिव्या दिल्या तरी मी मात्र शिव्या देणार नाही. मी वारकरी संप्रदायाला मानणारी आहे, माझी परंपरा मला शिव्या देण्याची परवानगी देत नाही.
माझे फेसबुक खाते फेक आहे, असा अपप्रचार आता हे लोक करीत आहेत. माझ्या प्रोफाईलवर मी माझ्या स्वत:च्या फोटो ऐवजी गुलाबाचे फूल टाकले आहे, पत्ता आणि मोबाईल नंबर दिलेला नाही, अशी कारणे हे लोक देत आहेत. तुमचे खातेच फेक आहे, त्यामुळे आम्ही तुम्हाला अनफ्रेंड करून तुमच्याशी कोणतीही चर्चा करणार नाही, अशी भूमिका या लोकांनी आता घेतली आहे. या लोकांनी माझ्या फे्रंडलिस्टमध्ये राहावे की न राहावे, हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. परंतु त्यांची ही भूमिका कशी ढोंगीपणाची आहे, हे सांगण्यासाठी मी आज येथे आली आहे.
फेकअकाऊंटचा आरोप करणारी अलीकडील दोन नावे आहेत, रेणुकादास मुळे आणि मधुकर रामटेके. (भावांनो आणि बहिणींनो, रेणुकादास या गृहस्थाचे नाव मी सभ्यपणाने लिहिले आहे. तरीही तो असा सभ्यपणा दाखविलच याची खात्री नाही. तरीही मी माझा तोल ढळू देणार नाही. कारण मी Hinduत्ववादी उर्फ ब्राह्मण्यवादी नाही. त्याला काय शिव्या द्यायच्या असतील त्या देऊ द्यात.)
रेणुकादासचे 29 फेसबुक फ्रेंड बिनचेहरयाचे
आधी मी रेणुकादासच्या प्रोफाईलबाबत आणि त्याच्या फेसबुक फ्रेंड्सबद्दल सांगते. मी त्याच्या खात्याला भेट दिली तेव्हा त्याचे ७१४ फ्रेंडस् होते. त्यातले पहिले नाव आहे- आकाशदीप गुप्ता. गुप्ता यांचे खाते खरोखरच गुप्त आहे. गुप्ता याच्या प्रोफाईलवर स्वत:च्या फोटोऐवजी भगव्या झेंडयाचे चित्र टाकलेले आहे. त्याच्या प्रोफाईलवरही पूर्ण पत्ता वा फोन नंबरही नाही. ही याच्या पहिल्या क्रमांकाच्या फ्रेंडची अवस्था! मी सर्व ७१४ फ्रेंडसची तपासणी केली. तेव्हा असे आढळून आले की, त्याच्या फेसबुक फ्रेंड्समध्ये तब्बल 29 जणांनी स्वत:चे प्रोफाईल चित्र म्हणून स्वत:चा फोटो वापरलेला नाही. काहींनी भगवा झेंडा वापरला. काहींनी परशुराम, काहींनी अण्णा हजारे, काहींनी भारताचा नकाशा, काहींनी अक्षरे अशा प्रकारचे प्रोफाईल चित्रे वापरली आहेत. तसेच यांपैकी अनेक जणांनी आपले पत्ते आणि फोन नंबर इतकेच काय इमेल अकाऊंटही दिलेले नाहीत. सावरकर मित्र मंडळाचे 90 टक्के सदस्य बिनचेहèयाचे आहेत. माझ्या लेखांना विरोध करणारे प्रकाश कुलकर्णी, जयतु हींदुराष्ट्रम वगैरे शंभरेक मंडळी बिनचेहरयाची आहे.
मराठ्यांचा काटा का टोचतो?
माझा रेणुकादासला प्रश्न आहे की, माझ्यावर फेक आकाउंटचा आरोप करताना तुला हे तुझे फ्रेंड दिसले नाहीत का? ते तुला फ्रेंड म्हणून कसे चालतात? माझ्या गुलाबाच्या फुलाचे काटेच तुला का टोचतात? आणखी एक गोष्ट लक्षात आणून दिली पाहिजे की, वरील बिनचेहèयांच्या खातेधारकांपैकी बहुतांश खातेधारक ब्राह्मण आहेत. रेणुकादास, असे तर नाही ना की, हे लोक ब्राह्मण आहेत म्हणून तुला त्यांचा परशुराम, अण्णा, झेंडे वगैरे चालतात. मी ब्राह्मण नाही, म्हणून माझ्या गुलाबाचे काटे टोचतात?
मी अजून मधुकर रामटेके यांची फ्रेंडलिस्ट चेक केलेली नाही. मात्र त्यांच्या फ्रेंड लिस्टमध्येही अशी बिनचेहèयाची अनेक खाती आढळून येतील. तुम्हीच त्यांची फ्रेंडलिस्ट चेक करावी, ही विनंती.
चर्चेपासून पळण्याचा बहाणा
चर्चा अंगलट आली की, मनुवादी आणि ब्राह्मण्यवादी पलायन करण्यासाठी बहाणे शोधतात. काही तरी बहाणा करून अनफ्रेंड होतात. हा माझा गेल्या काही महिन्यांचा अनुभव आहे. आल्हाद देशपांडे. केतकी केळकर, सुधीर देशपांडे ही काही त्यातली उदाहरणे आहेत. चर्चेला उत्तर देणे अशक्य झाल्यावर ही मंडळी माझ्यापासून अनफ्रेंड झाली. बिगर जाणव्याचे ब्राह्मण हरी नरके यांनीही माझ्याशी चर्चा केली. चर्चा अंगलट आल्यानंतर त्यांनीही चर्चा एकतर्फी बंद करून पलायन केले. आता हीच भाषा रेणुकादास मुळे आणि मधुकर रामटेके करीत आहेत. संकट आल्यानंतर शहामृग आपले तोंड वाळूत खुपसून घेतो. चर्चेमुळे हैराण झालेल्या मुळे आणि रामटेके यांची भूमिका यापेक्षा वेगळी नाही. माझ्यापासून अनफ्रेंड होऊन त्यांनी खुशाल वाळूत तोंड खुपसून घ्यावे. त्यांना माझ्या शुभेच्छा.
हा माझा अधिकार
फेसबुकवर कोणती माहिती जाहीर करायची आणि कोणती नाही, याचा अधिकार फेसबुक निर्मात्यांनी सर्वांना दिला आहे. तसाच तो मलाही आहे. तो मी बजावणारच. रेणुकादास कींवा रामटेके हे मला आदेश देऊ शकत नाही. त्यांना हा अधिकार दिला कुणी? मी तुम्हाला जा म्हणणार नाही. परंतु तुमची इच्छा असेलच तर तुम्ही खुशाल अनफ्रेंड होऊ शकता. ऐनवेळी वाळूत तोंड खुपसून घेणारया असल्या शहामृगी विचारवंतांचा तसाही समाजाला काही फायदा नाही.
..........................................................
हे पाहा रेणुकादासचे बिनचेहèयाचे मित्र
प्रोफाईलवर स्वत:चे छायाचित्र आणि इतर माहिती जे २७ फेसबुक फे्रंड रेणुकादास मुळेच्या लिस्टवर आहेत, त्यांची यादी अशी -
१. अकाशदीप गुप्ता.
२. अभिराम देशपांडे
३. एबीव्ही बीसारी.
४. अqजक्य वाळवेकर
५. अजित पाठक
६. अमोल लोहगावकर
७. अंगद ढोमसे
८. अमित कुलकर्णी
९. विकास विभास
१०. अमित चिखलकर
११. अमित जाधव
१२. अनंत रावळे
१३. अनिकेत जोशी
१४. अनुराग पटवर्धन
१५. अनुप रामकुट्टी
१६. अनुप रामटेके
१७. अंकुश देशपांडे
१८. अर्जुन पाटील
१९. अर्पित गोटारकर
२०. अर्पित जोशी
२१. अरुण पंडीत
२२. अतुल भातखळकर
२३. अश्विनीकुमार श्रीवास्तव
२४. अश्विनी त्रिपाठी
२५. आशू जाधव
२६. अविनाश निळे
२६. अतुल कुलकर्णी
संस्थांच्या नावे वापरून
चालविली जाणारी खाती
२७. अमरावती लोकसभा
२८. अखंड भारत
२९. अखिल भारतीय qहदू महासभा
good post
ReplyDeletethanx seema.
ReplyDeletethanx yogesh.
ReplyDelete