Sunday 12 January 2014

जिजाऊ स्वराज्याच्या खर्‍या संस्थापिका

प्रा. नितीन बानगुडे पाटील यांनी जिवंत केली शिवशाही 

औरंगाबादेतील देवगिरी महाविद्यालयाच्या प्रांगणातजिजाऊ
 जन्मोत्सवानिमित्त 'शिवचरित्र व शिवरायांचा स्त्रीविषयक दृष्टिकोन'
या विषयावर व्याखान देताना प्रा. बानगुडे पाटील.
 
स्वराज्याच्या खर्‍या संस्थापिका जिजाऊ होत्या. सामान्य माणूस जगला पाहिजे, या दृष्टीने त्यांनी शिवबांना स्वराज्याची संकल्पना शिकवली. माणसाला संरक्षण, पोरीबाळींना सन्मान मिळवून देणारे राज्य निर्माण करण्याचा सल्लाही त्यांनीच शिवबांना दिला. राष्ट्र मोठे झाले, तर माणसे मोठी होतात, हा आदर्श जिजाऊनेच घालून दिला. शिवचरित्राच्या अनुकरणावर आपण जग जिंकू शकतो, असे मत शिवचरित्राचे अभ्यासक प्रा. नितीन बानगुडे पाटील यांनी व्यक्त केले. औरंगाबादेतील देवगिरी महाविद्यालयाच्या प्रांगणात गुरुवार दि. ९ जानेवारी रोजी जिजाऊ जन्मोत्सवानिमित्त प्रा. बानगुडे पाटील यांचे 'शिवचरित्र व शिवरायांचा स्त्रीविषयक दृष्टिकोन' या विषयावरील व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला हजारोंची उपस्थिती होती. 

प्रा. नितीन बानगुडे पाटील यांनी म्हटले कि,  केवळ शिवचरित्राचा अभ्यास महत्त्वाचा आहे. अमेरिकेत 'शिवाजी द मॅनेजमेंट गुरू' हा धडा अभ्यासक्रमात आहे; परंतु आपल्या पाठय़पुस्तकात शिवरायांना कितपत स्थान आहे, हे सारेच जाणतात. शिवचरित्रामध्ये कर्तव्य आणि जबाबदारी कशी पार पाडावी याबाबत मार्गदर्शक घटनांचा उल्लेख आहे. स्वराज्याने आपल्याला मतदानाचा हक्क दिला आहे. ज्या दिवशी शंभर टक्के मतदान होईल त्या दिवशी स्वराज्यात एकही चूक होणार नाही. फक्त गरज आहे हक्क आणि कर्तव्य निभावण्याची. यासाठी राजकारण हे दंडाच्या बळावर न लढता ते बुद्धीच्या बळावर लढायला हवे, 

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विनोद पाटील होते. आमदार सतीश चव्हाण, नगरसेवक अभिजित देशमुख, डॉ. राजेश करपे, धनंजय मिसाळ, अमोल कर्डिले यांची प्रमुख उपस्थिती होती. 

No comments:

Post a Comment