राहुलचा मुलगाच काँग्रेसचा पुढचा पक्षाध्यक्ष
एखाद्या नेत्याच्या मुलाला निवडणुकीचं तिकीट देणं म्हणजे घराणेशाही होत नाही, तर एकाच घराण्याला पक्षाचे सर्वाधिकार देणं ही खरी घराणेशाही आहे. ती फक्त काँग्रेसमध्ये चालते. भविष्यात राहुल गांधींना मुलगा झाला तर तोच काँग्रेसचा पुढचा अध्यक्ष होईल.
-अमीत शहा, उत्तर प्रदेश भाजपचे प्रभारी
ब्राह्मणाचा मुलगाच आरएसएसचा पुढचा अध्यक्ष
घराणेशाहीची ही व्याख्या आम्हाला बिलकूल मान्य आहे. पण ही व्याख्या फक्त एका व्यक्तीला न लागता संपूर्ण समाजालाच लावायला हवी. कोणत्याही एका घराण्याकडे कोणत्याही संघटनेचे अध्यक्षपद असायला नको, त्याच प्रमाणे कोणत्याही एका जातीकडेही संघटनेचे अध्यक्षपद असायला नको. आरएसएसचा प्रमुख ब्राह्मणच कशाला हवा. अमीत शहा यांचा आदेश मान्य मानून मोहन भागवत यांनी पहिल्यांदा आरएसएसच्या प्रमुखपदाचा राजीनामा द्यायला हवा. आरएसएसमधील इतरही सर्वच पदांवर ब्राह्मणच आहेत. त्यांनीही पदे रिकामी करायला हवी. पण हे होणार नाही. आरएसएसचा पुढचा अध्यक्ष ब्राह्मणच असेल.
- टोलेवाले पाटील, अपाविमंचे राजकीय प्रभारी.
No comments:
Post a Comment