Sunday, 30 October 2011

लवकरच वाचा वैदिक हिंसाचाराबद्दल




प्रिय भावांनो आणि बहिणींनो,


वैदिक धर्म फार महान आहे. त्यात जगभरातील तत्त्वज्ञान साठवलेले आहे, असे आपल्या देशात उच्चरवाने वारंवार सांगितले जाते. शंकराचार्यांपासून दयानंद सरस्वती, स्वामी विवेकानंद अशा अनेक वेदांती विद्वानांनी वेदांकडे चला अशी हाक दिली. त्यामुळे कळत्या वयापासून मला वेदांबद्दल आकर्षण होते. त्यातून अल्पसा अभ्यास घडू शकला. लक्षात असे आले की, वेदांत ज्ञानआहे, असे सांगणारे वेदांती आपली दिशाभूल करीत असतात. वेदांमधील चांगल्या गोष्टी तेवढ्या ते आपल्यासमोर ठेवतात. वेदांचा काळा चेहरा मुद्दाम झाकून ठेवला जातो.

 उदा. वेदकाळात ब्राह्मणांसह सर्व लोक गायीचे मांस खात असत. यज्ञात गायीची चरबी अग्नी भडकाविण्यासाठी वापरली जात असे. गाय कशी कापावी, याचे विधिसुद्धा वेदवाङ्मयात सांगितले आहेत. 
या विषयीची एक महामालिका मी वेदवाङ्मयातील पुराव्यांसह आपल्यासमोर घेऊन येत आहे. 


फक्त दोन दिवस प्रतीक्षा करा.      





तुमची लाडकी बहीण
अनिता पाटील, औरंगाबाद

Saturday, 29 October 2011

आरएसएस से ज्यादा हिन्दुवत्ववादी है आई.बी. - एस एम मुशरिफ़


पिछले कुछ वर्षों से नई पीढ़ी की राजनीतिक आकांक्षाओं के दबाव में और कुछ अपने “हिन्दुवत्व मूल” पर हिन्दू मुखौटा चढाने की वजह से आर एस एस और उसके राजनितिक संगठन बी जे पी को पिछले वर्षों के दौरान अपने मूल एजेंडे के कुछ बिन्दुवों पर समझौता करना पड़ा जिसका एक नतीजा यह हुआ कि हिन्दुवत्व वादी एजेंडे के प्रति उनका उत्साह बड़ी हद तक कमजोर पड़ गया। लेकिन आई बी में मौजूद हिन्दुवत्व वादियों का मामला ऐसा नहीं है। वे संघ परिवार के एजेंडे को बराबर दिमाग में रखते हैं। और न केवल पहले की तरह ही उस एजेंडे के प्रति वफादार और समर्पित हैं बल्कि सरकार में लगातार बढ़ते प्रभाव और प्रशासन पर अपने दबदबे की बदौलत दिन-प्रतिदिन ज्यादा से ज्यादा दुस्साहसिक कारनामे अंजाम देने का हौसला पा रहे हैं। इस तरह धीरे-धीरे आई बी ने हिन्दुवत्व वादी के असल चैम्पियन की भूमिका अपना ली है और आर एस एस की विचारधारा और नीतियों का संरक्षक बन गई हैं। अगर हिन्दुवत्व वादी मानसिकता के आई बी अफसरों की आर एस एस एजेंडे प्रति ऐसी वफादारी और निष्ठां न होती तो आर एस एस की मूल आत्मा कब की मिट चुकी होती और अपने सारे संसाधनों और मजबूत संगठन के बावजूद समाज पर ऐसी मजबूत पकड़ वह हासिल न कर पाती जैसी कि उसने कर ली है। आर एस एस और आई बी एक दूसरे से कितने जुड़े हुए हैं, निम्न उदहारण से यह अच्छी तरह समझा जा सकता है:

दिल्ली यूनिवर्सिटी के प्रोफेस्सर सैयद अब्दुर्रेह्मान गिलानी ने, जिनको दिल्ली हाई कोर्ट और सुप्रीम कोर्ट दोनों ने संसद भवन पर आतंकी हमले के आरोप से बरी कर दिया था, तहलका ( 22 नवम्बर 2008 ) में लिखा है : ‘मैंने इस इंटेलिजेंस एजेंसी को बहुत करीब से देखा है। उनके साथ बैठ कर मुझे कभी ऐसा नहीं लगा कि मै एक लोकतांत्रिक देश के किसी सरकारी दफ्तर में बैठा हूँ। बल्कि हमेशा ऐसा प्रतीत हुआ कि मै आर एस एस के मुख्यालय में बैठा हूँ।''


मै “रा” को आई बी की श्रेणी में नहीं रखना चाहता क्यूंकि दोनों की विशेषताएं अलग हैं। और उसके निम्न कारण हैं :

1. “रा” (RAW: Research & Analyasis Wing ) की स्थापना आजादी के कोई बीस साल बाद इंदिरा गाँधी के शासन काल में हुई थी, इसलिए लगातार कोशिशों के बावजूद इस संगठन का आई बी की तरह हिंदुत्वीकरण नहीं हो सका। यूँ तो रा में भी कुछ अधिकारी हिंदुत्व वादी विचारधारा के हैं, मगर ऐसा मामला एक-आध ही हो सकता है इसलिए इस संस्था में उस प्रकार की वैचारिक घुसपैठ नहीं हो सकी जिस तरह आई बी में हो गयी है।
2. इसके अलावा यह कि “रा” का कार्य क्षेत्र पाकिस्तान, बंगला देश, चीन, अफगानिस्तान, श्रीलंका और कुछ दूसरे देशों तक सीमित है और वह देश के आंतरिक मामलों पर प्रभाव नहीं डाल सकती। इसलिए आई बी की तरह उपस्तिथि महसूस नहीं हो सकती।
3. पिछले कुछ वर्षों के दौरान इन दोनों संगठनो में प्रोफेशनल मुकाबला इस हद तक पहुँच गया है कि दोनों एक दूसरे को नीचा दिखाने का एक भी अवसर हाथ से जाने नहीं देते।
इस वजह से “रा” में काफी संख्या में हिन्दुवत्व वादी अधिकारीयों की मौजूदगी के बावजूद आर एस एस और दूसरे हिन्दुवत्व वादी संगठन उसको ‘अपना’ नहीं समझते और उसपर ज्यादा भरोसा नहीं करते। यद्यपि समय-समय पर वे अपने उद्देश्यों के लिये उसका उपयोग भी करते हैं। नतीजे के तौर पर आई बी धीरे-धीरे सबसे ज्यादा शक्तिशाली संगठन बन गई है।

- एस एम मुशरिफ़

पूर्व आई जी पुलिस

महाराष्ट्र

Wednesday, 26 October 2011

आता आपली भेट दिवाळीनंतरच


प्रिय भावांनो आणि बहिणींनो,
मी दोन दिवस दिवाळीच्या सुट्टीवर असणार आहे. त्यामुळे आता आपली भेट शनिवार qकवा रविवारीच होईल. राहिलेले विषय आणि प्रश्न यांवर आपण नंतर बोलू या. सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा. सर्व भावांनी माझ्या ब्लॉगवरील विचार हेच भाऊबीजेचे बत्तासे आणि कडदोरे म्हणून गोड मानून घ्यावेत. बहिणींना स्पेशल शुभेच्छा. एन्जॉय युअरसेल्फ.

तुमची बहीण

अनिता पाटील, औरंगाबाद.

Monday, 24 October 2011

९६ कुळी शिंद्यांचे अनिता पाटील यांना पत्र


अस्पृश्यता पाळणारी श्यामची आई आदर्श कशी या लेखावर विनायक शिंदे यांनी मला तीन-चार  भागांत एक प्रदिर्घ पत्र मेलवरून पाठवले. स्वत:ला ९६ कुळी मराठा म्हणविणारया शिंदे यांच्याया पत्राला मी यापूर्वीच उत्तर दिले आहे. शिंदे यांचे हे पत्र वाचकांच्या माहितीसाठी देत आहे. 
..............................................................................................................................
1.
विनायक शिंदे:- हिंदुगर्जना 
श्यामच्या आईपेक्षा अनिता बाई तुमचेच विचार अधिक घातक आहेत. दिवस फार वाईट आले आहेत. दुसऱ्या समाजाची कुठलीही गोष्ट प्रसिद्ध दिसली तर मग उगाच काहीतरी खुसपट काढत राहायची ही प्रवृत्ती फोफावत आहे. ज्यांनी ज्यांनी साने गुरुजी आणि शामची आई मुळातून वाचली आहे, ते वरील लेखाला विरोधच करतील, मग ते कुठल्याही जात-धर्माची का असेनात ....
आपल्याला फक्त ब्राह्मण समाजाला टार्गेट करणं एवढच छान जमतं...
मी स्वत: ९६ कुळी मराठा आहे.. कोकणात रत्नागिरी इथे माझं वास्तव्य आहे..
आणि आजवर जात पात न बघता सर्वांशी मिळून मिसळून राहिलेलो आहे..
हे तुमचे "जातीयवादी धंदे" बंद करा..
मी स्वत: हिंदुत्ववादी आहे.. आणि आमचं हिंदुत्व "मनुवादी किंवा ब्राह्मणी" नाही..
सरसकट सर्वांना एकाच तराजुत तोलू नका....
तुमचा ब्लॉग वाचणारा माणूस "शहाणा" असेल तर त्याचं डोकं आउट होउन जाईल..
माझं आत्ता तेच झालेलं आहे...


2.
आणि हो...............
जमल्यास "संभाजीनगर" म्हणा..
"औरंगाबाद" शक्यतो नको............
तुमच्या सर्व धर्म समभावाला तडा जात नसेल तरच हां... जबरदस्ती नाही...
नाहीतर एकीकडे "संभाजी प्रेमाचे पोवाडे" गायचे.. आणि दुसरीकडे त्याच संभाजी महाराजांना हाल हाल करून मारलं त्या हलकट औरंग्याच्या नावाने स्वत:च्या शहराचा उल्लेख करायचा...
"औरंगाबाद" असा.... काय हे तुमचे "संभाजीप्रेम..." मानलं बुवा....
असो.....
"संभाजीनगर" बोलायला काय प्रॉब्लम येतो ????????? समजू शकेल काय ?

3.
आणि एक गोष्ट पक्की ध्यानात ठेवा......मला या बड्या लोकांच्या वादात बिलकुल इंटेरेस्ट नाही..
मग ते इतिहासकार असोत किंवा लेखक असोत किंवा राजकारणी असोत..
आणि ते कोणत्याही समाजाचे असोत.. पण यामुले दोन समाजात कटुता येऊ नये असं माझं मनापासून मत आहे.. आणि त्यासाठी मी कायम प्रयत्न करणार.. मला त्यात माँसाहेब जिजाऊ यश देतीलच यात शंकाच नाहिये...
कारण कसं असतं ना हे कितीही भांडले तरी "बड़ेजाव" असतो यांचा.. दिवसा भांड भांड भांडतील आणि रात्री एका ताटात जेवतिल..
पण यामुले समाज दुभंगता कामा नये.. आणि चांगले वाईट लोकं प्रत्येक जातीत असतात..
तुम्ही एकच न्याय सरसकट सगळ्या समाजाला लाऊ शकत नाही..
आता इथे तुम्ही म्हणाल असं कोणी केलं.. तर त्याचं उत्तर तुम्हाला मी द्यायची गरज नाही..
म्हणून पुस्तक प्रकाशित झाल्या झाल्या त्यावर बंदी घालून लेखकावर गुन्हा दाखल होतो..
हे एवढं पुरेसं आहे.. मग सोशल नेट्वर्किंग वर नाचक्की.. संकेत स्थळावरून लिंक गायब असले "मर्दानी" प्रकार घडतात...
आणि एक मराठा म्हणून मला हे पटत नाही..
चांगलं वाईट याची जातपातविराहित समीक्षा व्हायला हवी या मताचा आहे मी..
या मुद्द्यावर आता वाद नको आणखी..
.
या इतिहास संशोधाकांमाधिल मतभेद, दादोजी कोंडदेव, वाघ्या कुत्रा, रामदास असल्या विषयांना पुढे करून "ब्राह्मण मराठा" हां वाद सर्वसामान्य जिणं जगणार्या समाजात मोठ्या प्रमाणात कोण फैलावु पाहत असेल तर त्याला माझ्यासारख्या असंख्य "तगड्या" मराठ्यांचा सामना करावा लागेल..
.
मग असं करणारा कोणीही असो.... "खेडेकर समर्थक" असो किंवा "पुरंदरे समर्थक, किंवा दादा समर्थक, किंवा अन्य कोणी..."Doesn't matter.............
.
हां माझा शब्द आहे............
जय जिजाऊ........ जय संभाजी..........
4. 
वंदे मातरम:- 
आपण बरोबर बोललात... वंदे मातरम हे "राष्ट्रगीत" नाही...
पण आपण एवढं च बोलून थाम्बलात... आणि मुस्लिम लोकांनी ते म्हटलं नाही तरी चालेल अशी "निधर्मी परवानगी" देऊन सुद्धा मोकळ्या झालात..
अहो पण वंदे मातरम हे राष्ट्रगीत नसलं तरी ते "राष्ट्रीय गीत" आहे..
आणि "राष्ट्रगीत आणि राष्ट्रीय गीत" ही दोन्ही समान महत्वाची आहेत..
कारण दोन्हींचा मूळ उद्देश असतो "राष्ट्रवंदना"..
कोणालाही यापैकी एक झिडकारण्याचा हक्क नाही... उद्या तुमच्या घरच्यांनी तुम्हाला म्हटलं की "आम्ही तुला फ़क्त रात्रीचं जेवण देऊ, दुपारचं नाही.." तर चालेल का ? नाही ना ?? तसंच आहे हे... जशी दोन्ही वेळेची जेवणं महत्वाची तसंच ही दोन्ही गीते महत्वाची..
राष्ट्रगीत आणि राष्ट्रीय गीत सुद्धा...
काय आहे असं वंदे मातरम मध्ये ज्यामुले मुस्लिम लोकांनी ते म्हटलं नाही तरी चालेल अशी बेलाशक परवानगी आपण देऊ केलीत ?
हे असले फतवे निघतात आणि तुमच्या सारखे लोकं त्याला पाठिंबा देतात ?
हे हिन्दुस्थानचं दुर्दैव नाही तर आणखी काय आहे ?
लेख लिहिता तेव्हा काय दिग्विजय सिंग अंगात येतात का तुमच्या ?? की प्रशांत भूषण ?
काहीतरी जाण ठेवून लिहित जावा की..
काही चुक आहे का यात माझं ?

मी शिंदे यांना दिलेले उत्तर खालील लिंकवर वाचा :



विनायक शिंदे:- हिंदुगर्जना 
..........................................................................................

Sunday, 23 October 2011

भरकटलेल्या ब्राह्मणवादी शिंद्यांस पत्र !

आनंद आणि वेदना 

प्रिय विनायक  शिंदे,  
उत्तर भारतात स्वतंत्र राज्य स्थापन
करणारे महादजी शिंदे उर्फ पाटीलबाबा.

भाऊराया, ज्या शिंद्यांनी उत्तर भारतात स्वत:चे राज्य निर्माण केले, त्यांचे आडनाव तू लावतोस. प्रथमत: महादजी, दत्ताजी आदी सर्व महाप्रराक्रमी शिंद्यांना मानाचा मुजरा. शिंद्यांनी नवे राज्य घडविण्यासाठी आपली शक्ती पणाला लावली. तू मात्र ब्राह्मणवाद्यांची लढाई उसनी  लढण्यासाठी शक्तीपणाला लावत आहेस. शिंदे पानपतावर लढले तेव्हा त्यांच्या तोफखान्याचा प्रमुख इब्राहीम खान गारदी होता, हे तुला माहिती असेलच. नसेल, तर तू थोडासा इतिहास वाचून घ्यावास हे बरे.
असो.  तुझा मेल वाचताना आनंद आणि वेदना अशा संमिश्र भावना होत्या. आनंद यासाठी की, तुझी तळमळ खरी होती. वेदना यासाठी की, ही तळमळ तू ज्या लोकांसाठी तू दाखवित आहेस, त्यांची कपटनीती ओळखण्यास तू असमर्थ ठरलास. तू इतकी पाने लिहिलीस त्यासाठी तुझे कौतुक केले पाहिजे. पण त्यातून फारच थोडा अर्थ हाती आला. मी ९६ कुळी मर्द मराठा आहे, असे तू वारंवार सांगत होतास. का? मी माझ्या संपूर्ण ब्लॉगवर माझी जात लिहिलेली नाही. मला ती सांगण्याची गरज वाटत नाही. मी विचार सांगते, जात नाही. तुला जात का सांगावीशी वाटली कोणास ठाऊक?  तू तुझ्या नावापुढे हिंदू गर्जना असे लिहिले आहे, हा काय प्रकार आहे? 
ग्वाल्हेर येथे जीवाजीराव शिंदे यांनी बांधलेला
मराठेशाहीचा जय विलास राजवाडा.
मी ब्राह्मणांविरुद्ध नव्हे, ढोंगाविरुद्ध आहे
मी ब्राह्मणांविरुद्ध लिहिते असा आरोप तू केलास. त्यात कोणतेही तथ्य नाही. मी ढोंगी, कारस्थानी, षडयंत्रकारी लोकांच्या विरुद्ध लिहिते. मी जे विषय निवडले, त्यात ब्राह्मणांचे ढोंग मला दिसून आले. मी त्याविरुद्ध लिहिले. उद्या मराठ्यांचे किंवा आणखी इतर कोणाचेही ढोंग दिसून आले, तर त्याविरुद्धही लिहीन.
हिंदू नावाचा कोणताही धर्म अस्तित्वात नाही
हिंदू नावाचा कोणताही धर्म अस्तित्वात नाही, हा माझा विचार आहे. आणि मी त्यावर ठाम आहे. आपल्या देशात एकसंध असा स्वदेशी धर्मच अस्तित्वात नाही. अस्तित्वात आहेत त्या जाती. तू स्वत:ला वारंवार ९६ कुळी मराठा म्हणवून घेतोस, यावरूनच हे सिद्ध होत नाही का? एखादा ब्राह्मण बाप आपली मुलगी तुला द्यायला तयार होईल का? किंवा तुम्ही ९६ कुळी मराठे  आपल्या मुली दलितांना द्यायला तयार व्हाल का? ज्या दिवशी असे घडेल, त्या दिवशी हिंदू नावाचा एकसंध धर्म अस्तित्वात आहे, असे मी समजेन.
शिवाजी महाराजांच्या सेनेतील मुसलमानांचे काय करायचे?
तू म्हणालास माझा मुसलमानांना विरोध आहे. पण शिवाजी महाराजांच्या सैन्यात असंख्य मुसलमान होते. आग्रा येथून महाराजांना सहीसलामत बाहेर काढणारा मदारी मेहतर मुसलमानच होता, हे तू विसरलास. विसरलास म्हणण्यापेक्षा जातीयवादी ब्राह्मणवाद्यांनी तुला विसरायला भाग पाडले. महाराजांच्या सेवेत असलेल्या या मुसलमानांचे काय करायचे?  महाराजांनी अनेक मशिदींनाही इनाम जमिनी दिल्या त्याचे काय करायचे? ब्राह्मणवादी अशा अडचणीच्या प्रश्नांची उत्तरे देत नाहीत. शिवरायांच्या लष्करातील मुसलमान सरदारांची माहिती देणारे मूलनिवासीचे एक पेपर कटिंग मी माझ्या फेसबुक वॉलवर टाकलेले आहे. ते अवश्य पाहा.
मुसलमान अरबस्तानातून 
आलेले नाहीत
तू संभाजी राजांनी राजपुत सरदारांना लिहिलेल्या पत्राचा उल्लेख केला, म्हणून अजून एक गोष्ट तुझ्या लक्षात आणून देणे मला आवश्यक वाटते. शिवरायांच्या सैन्यात मुसलमान होते, तसेच औरंगजेबाच्या सैन्यात भारतीय होते. ज्यांना तुम्ही हिंदू म्हणता. औरंगजेबच नव्हे, तर बहुतांश मोगल सम्राटांच्या लढाया राजपुतांनी लढल्या. शिवरायांवर चालून आलेला मिर्झाराजा जयसिंग  राजपूतच होता. याच राजपुतांनी मोगलांना मुली दिल्या. या हिंदूंचे काय करायचे? आज भारतात जे मुसलमान आहेत, त्यापैकी सर्वांचे पूर्वज हे हिंदूच होते. ते काही अरबस्तानातून आलेले नाहीत. त्यांचा या भूमीवर तुमच्या एवढाच हक्क आहे. उच्चवर्णीयांच्या छळाला कंटाळून असंख्य दलित फार पूर्वीपासून धर्मांतरीत होत आले आहेत. त्यात मुस्लिम झालेल्यांची संख्या मोठी आहे. या सगळ्या मुसलमानांचे काय करायचे? गुजरातमध्ये ब्राह्मणवाद्यांनी केले तसे सगळ्यांना मारून टाकायचे?

दोन्ही पोस्टर्स लावा
अफजल खान मारला गेल्यानंतर त्याचा
ब्राह्मण वकील कृष्णाजी भास्कर शिवरायांच्या अंगावर चालून आला.
महाराजांनी त्याला समाजवले. तरीही फितूर कृष्णाजीने
तीन वार महाराजांवर केले. एक वार महाराजांच्या कपाळावर लागला.
शेवटी नाईलाजाने महाराजांनी कृष्णाजीला कट्यारीच्या
वाराने ठार केले. कृष्णाजीवर वार करताना महाराज.
अफजल खानाचा कोथळा बाहेर काढणारी पोस्टर्स ब्राह्मणवादी लावतात. हे तू स्वत:च मान्य केले. अफजल खानासोबत कृष्णाजी भास्करचे मुंडके उडवितानाचे पोस्टर्स हे लोक का लावित नाहीत? पोस्टर्स लावायचीच आहेत, तर दोन्ही लावा. तू स्वत:ला नि:पक्ष म्हणवून घेत असशील तर तुझ्या घरासमोर ही दोन्ही पोस्टर्स तू लावून दाखव.
राज्य कायद्याचे आहे की ठाकरयांचे
औरंगाबादचा उल्लेख संभाजीनगर असा का करायचा याचे उत्तर कोणी देईल का? इंदूरहून आलेल्या उपरया ठाकरयांना औरंगाबादचे नाव बदलण्याचा अधिकार कोणी दिला? तुझे ब्राह्मणवादी ५ वर्षे महाराष्ट्रात सत्तेत होते. केंद्रातही तेव्हा त्यांचीच सत्ता होती. तेव्हा शहराचे नाव रितसर बदलून का घेतले नाही. येथे राज्य कायद्याचे आहे की, ठाकरयांचे? तुम्ही ठाकरेवादी आहात, म्हणून सगळ्यांनी ठाकरेवादी बनून ते म्हणतील तसे वागले पाहिजे, ही हुकूमशाही कोण चालू देणार? कायद्यानुसार नाव बदला. आम्हीच काय सर्व जनता शहराला त्या नावाने हाक मारील. 
मी कोणत्याही संघटनेची नाही
तू मला स्वत:च्या अधिकारात संभाजी ब्रिगेडची सदस्य करून टाकले. बाबा रे मी कोणत्याही संस्थेची संघटनेची सदस्य नाही. मी स्वयंप्रज्ञ आहे. माझ्या ब्लॉगची चिरफाड करण्याची तयारी चालविली आहेस, त्याबद्दल माझी कोणतीही तक्रार नाही. मला जशी माझी मते मांडण्याचा अधिकार आहे, तसाच तुझ्यासह इतर सर्वांनाच तो आहे. तुझ्या लेखांचे मी स्वागतच करीन. 
अपशब्द वापरले नाहीत, त्याबद्दल आभार
शेवटी एका गोष्टीबद्दल तुझे अभिनंदन आणि कौतुक करते. आभारही मानते.  कोणत्याही प्रकारचे अपशब्द न वापरता माझ्या लेखावर प्रतिक्रिया देणारा तू पहिला ब्राह्मणवादी आहेस. आज पर्यंत   प्रत्येक ब्राह्मणवाद्यांने मला आई-बहिणींवरून शिव्याच दिल्या आहेत. लोकांना ब्राह्मणवाद्यांची  संस्कृती कळावी यासाठी माझ्या फेसबुक अकाऊंटवर मी या सर्व शिव्यायुक्त प्रतिक्रिया तशाच ठेवल्या आहेत.  ज्या ब्राह्मणवादाबद्दल तुला एवढा अभिमान वाटतो, त्यांचे खरे स्वरूप हे असे आहे. पूर्वीचे ब्राह्मण ओव्या लिहीत, आताचे शिव्या लिहितात.
असो. लिहिण्यासारखे खूप आहे. पण तू माझ्या लेखांची चिरफाड करणारच आहेस, तेव्हा आपला संवाद होईलच. त्यामुळे आत्ता फार लिहीत नाही.

ता. क. 
१. जाता जाता एक सूचना करू इच्छिते. तू संक्षिप्त लिहिण्याचा प्रयत्न कर. इंग्रजीत एक म्हण आहे. ‘ब्रेव्हिटी इज साऊल ऑफ विट'  ब्रेव्हिटी म्हणजे थोडक्यात सांगणे आणि विट म्हणजे बुद्धिमत्ता, हे तर तुला माहिती असेलच. या म्हणीचा सोपा अर्थ असा : संक्षिप्तता हा विद्वत्तेचा बुद्धिमत्तेचा आत्मा आहे.

२. तू ब्राह्मणवाद्यांची बाजू घेऊ लढतो आहेस. तो तुझा निर्णय आहे, माझा त्याला कोणताही आक्षेप नाही. परंतु अशी लढाई लढणारयांना इंग्रजीत मर्सिनरी असे म्हणतात. मर्सिनरीचे सोप्या मराठीतील भाषांतर होते ''भाडोत्री सैनिक''.  हरी नरके, संजय सोनवणी, मधुकर रामटेके यांनी तुझ्या आधी हीच महनीय कामगिरी करून पाहिली आहे. ते ब्राह्मणांची लढाई स्वत:च्या अंगावर घेऊन प्राणपणाने लढत होते. त्यांचे ब्राह्मणांनी काय हाल केले, हे वाचायचे असेल, तर माझ्या याच ब्लॉगवरील खालील लेख वाच. तुझ्यासाठी त्याची खास लिंक  येथे देत आहे.

अखरे ब्राह्मण नरके-सोनवणी-रामटेके यांच्यावर उलटले!
.........................................................................................................................
'हिंदू गर्जना'चे विनायक शिंदे यांनी मला पाठविलेले
चार भागातील पत्र खालील लिंकवर वाचा :

९६ कुळी शिंद्यांचे अनिता पाटील यांना पत्र
.........................................................................................................................


धन्यवाद. 
तुझीच बहीण

अनिता पाटील, औरंगाबाद.
............................................................................................ 

Friday, 21 October 2011

माझे फेसबुक पेज जॉईन करा


Pls Join My PAGE
फेसबुकची माझी मैत्री मर्यादा संपली आहे. नवे मित्र जोडता यावेत यासाठी मी माझे स्वत:चे पेज काढले आहे. तेथे मीत्रसंख्येची मर्यादा नाही. याबाबत मी माझ्या वॉलवर मेसेजही टाकला होता. तरीही अजून खूप जण माझ्या फेसबुक खात्यावरच फ्रेंड रिक्वेस्ट पाठवित आहेत. सर्र्वाना विनंती आहे, की फेसबुक खात्याऐवजी पेजवर जाऊन मला जॉईन करा. पेजवरील Like बटन क्लिक केले की, तुम्ही माझ्या फ्रेंडलिस्टमध्ये येऊन जाल. खात्यावर असलेल्या सर्व सुविधा पेजवरही उपलब्ध आहे. पेजची लींक खाली देत आहे.  
http://www.facebook.com/pages/Anita-Patil/266353166719003

I am an Author. Writing for uplifment of downtroddens knows as Bahujan Samaaj in India.

Page: ‎65 like this

Wednesday, 19 October 2011

स्वाध्याय परिवाराला अस्पृश्यता परत आणायची आहे का?

बाट पाळणारा मनुष्य गौरव दिन

स्वाध्याय परीवाराचे संस्थापक पांडुरंगशास्त्री आठवले यांची आज जयंती. हा दिवस त्यांचे अनुयायी मनुष्य गौरव दिन म्हणून साजरा करतात. यासंबंधी तसेच एकूणच परीवाराच्या विचारधारेसंबंधी मला काही प्रश्न पडले आहेत. आज निमित्त आहे म्हणून मी ते येथे मांडते.  

१. स्वाध्यायी लोक धर्मप्रचारार्थ बाहेर पडतात, कोणाच्या घरचे अन्न घेत नाहीत. इतकेच काय पाणीसुद्धा स्वत:चे स्वत:सोबत घेऊन येतात. माझ्या घरी त्यांचे एक पथक आले होते, तेव्हा मी स्वत:च हा अनुभव घेतला.
माझा प्रश्न :  पूर्वी ब्राह्मण समाज इतर समाजाच्या हातचे काहीही खातपीत नव्हता. इतर जातींच्या हातचे काही खाल्ले-पिल्ले तर आपल्याला बाट लागेल, अशी ब्राह्मणांची तेव्हा समजूत होती. हा भेदाभेद आज संपत आला आहे. फार थोड्या प्रमाणात तो सुरू आहे.  बाटाची ही विचारधारा स्वाध्याय परीवार पुन्हा एकदा पुनरुज्जीवित करण्याचा प्रयत्न करीत आहे का? परिवाराला अस्पृश्यता परत आणायची आहे का?

२. पांडुरंगशास्त्र्यांच्या हयातीत स्वाध्याय परीवाराचे दैवत होते योगश्वर रूपातील श्रीकृष्ण आणि मुख्य ग्रंथ होता गीता. त्यामुळे हिंदू म्हणविणाèया सर्व लोकांना पांडुरंगशास्त्री हे काही वेगळे सांगत नसून आपलीच मूळ परंपरा पुढे नेत आहेत, असे वाटले. त्यांना मोठा अनुयायीवर्ग मिळाला.
माझा प्रश्न :  स्वाध्याय परीवाराने आता अमृतालय नावाने आपली स्वतंत्र प्रार्थनागृहे म्हणजेच मंदिरे बांधणे सुरू केले आहे. अमृतालयात योगेश्वर कृष्णाच्या मूर्तीच्या बरोबरीने पांडुरंगशास्त्र्यांची प्रतिमा ठेवणे बंधनकारक आहे. याचाच अर्थ शास्त्रीबुवांना परीवाराने देवाचे स्वरूप देऊन कृष्णाच्या बरोबरीचे स्थान दिले आहे. शास्त्रीबुवांची कृष्णाच्या बरोबरीने प्रतिष्ठापना करणे योग्य आहे का? 
३. शास्त्रीबुवांच्या हयातीत स्वाध्याय परीवार स्वत:ला हिंदूच म्हणवून घेत असे. गीता हा मूळ ग्रंथ म्हणून त्यांनी त्यासाठीच स्वीकारला होता.
माझा प्रश्न :  आता स्वाध्याय परीवाराने अमृतालय नावाने स्वत:चे स्वतंत्र मंदिर निर्माण केल्यामुळे परीवाराला आता  हिंदू म्हणावे का? स्वत: परीवाराची याबाबत काय भूमिका आहे. परीवार स्वत:ला अजूनही हिंदूच म्हणवतो का? 
४. स्वाध्याय परीवाराने अजून तरी अधिकृतरित्या हिंदू धर्मापासून फारकत घेतलेली नाही. याचा अर्थ सर्व जनता स्वाध्याय परीवाराला अजूनही हिंदूच समजते.
माझा प्रश्न : यातून दोन प्रश्न निर्माण होतात.   प्रश्न १- हिंदू धर्मात ३३ कोटी देव आहेत. शास्त्रीबुवांना योगेश्वर कृष्णाच्या बरोबरीने मंदिरात स्थान मिळाले याचाच अर्थ त्यांना देवत्व प्राप्त झाले. मग आता  हिंदू धर्माने ३३ कोटी १ इतके देव मानायचे का? प्रश्न २-  स्वाध्याय परिवाराने  हिंदू धर्मात राहून शास्त्रीबुवांच्या रूपाने आपला सवता  देव निर्माण करणे योग्य आहे का? 
५. शास्त्रीबुवांनी स्वाध्याय परीवारासाठी निवडलेल्या योगेश्वर कृष्णाच्या मूर्तीचे कॉपीराईट घेतले आहे. १९८५ साली त्यांनी मूर्तीचे कॉपीराईट घेतल्याचे सांगितले जाते. या मूर्तीसारखी दुसरी मूर्ती कोणालाही बसविता येत नाही. २००७ साली जळगाव येथील संत ज्ञानेश्वर मंदिरात योगेश्वर कृष्णाची मूर्ती बसविण्यात आली होती. स्वाध्याप परीवाराच्या वतीने तक्रार करण्यात आल्यानंतर ही मूर्ती तेव्हाच्या जळगाव पोलीस अधीक्षकांनी जप्त केली होती.
माझा प्रश्न : मूर्तीचे कॉपी राईट घेण्याचा शास्त्रीबुवांचा उद्देश काय? आपले वेगळेपण ठेवण्यासाठीच हा खटाटोप केलेला आहे, असे दिसून येते. स्वतंत्र धर्मस्थापनेची ही पूर्वतयारी होती का?

६. स्वाध्याय परीवाराच्या सर्व दैनंदिन प्रार्थना संस्कृतात आहेत. खेड्यापाड्यातील अज्ञानी लोकांच्या त्या गळी उतरविण्यात येत आहेत.
माझा प्रश्न : यातूनही दोन प्रश्न निर्माण होतात. प्रश्न १- संस्कृत मंत्रांचे अत्यंत चुकीचे उच्चार खेड्यातील लोक करतात. त्यातून अर्थाचे अनर्थ होतात. अर्थ समजत नसल्यामुळे हे त्या गोरगरीब लोकांच्या लक्षात येत नाही, एवढेच. मराठी संतांनी संस्कृताला दूर सारून लोकभाषा मराठीत ग्रंथ रचना केली. स्वाध्याय परीवार उलटी गंगा वाहवून लोकांना पुन्हा संस्कृताकडे नेऊ पाहत आहे. परीवाराला लोकभाषेचा एवढा तिटकारा का? प्रश्न १- चुकीचा मंत्र म्हटल्यास अयोग्य फळ मिळते, असे वेदांत म्हटले आहे. वृत्रासुराच्या आईला इंद्राला मारणारा मुलगा हवा होता. ब्रह्मदेवाकडे वर मागताना तिने विसर्ग चुकीच्या ठिकाणी वापरला. त्यामुळे तिला इंद्राकडून मारला जाणारा वर मिळाला. या संबंधीचा -यजमानम् हिनस्ती- हा संस्कृत श्लोक फार प्रसिद्ध आहे. अशा फलप्राप्तीला जबाबदार कोण?  
सारांश : वरील सर्व चर्चेचा सारांश काढताना मला दोन तीन गोष्टी प्रकर्षाने दिसतात. स्वाध्याय परीवाराने स्वतंत्र धर्म निर्मितीच्या दिशेने प्रयत्न चालविला आहे. त्यात काही चूक आहे, असे नाही. या देशात कोणालाही कोणताही धर्म स्वीकारण्याचा अधिकार आहे. तसेच आपले स्वतंत्र धर्ममत प्रतिपादन करण्याचा अधिकार आहे. स्वाध्याय परीवाराला स्वतंत्र धर्मस्थापना करायवयाची असल्यास कोणाचीच हरकत नाही. फक्त त्यांनी त्यातील छुपेपणाचा त्याग करावा. उघडपणे आपले मत प्रतिपादन करावे. हिंदू धर्माच्या अडून त्यांनी हे उद्योग करू नये. छुपेपणा ही संघाची कार्य पद्धती आहे. त्याच मार्गाने स्वाध्याय परिवार चालला आहे.  

अनिता पाटील, औरंगाबाद.

Saturday, 15 October 2011

पुढील ५० वर्षे केवळ बहुजन लेखकानांच ज्ञानपीठ मिळावे!


ब्राह्मण लेखकांना ५० वर्षे मिळाले अघोषित आरक्षण

ज्ञानपीठ पुरस्कार केवळ ब्राह्मणांनाच का मिळतात? असा प्रश्न करणारा माझा लेख ब्लॉगवर आहे. गीता असे नाव लावणारया कुण्या व्यक्तीने त्यावर मखलाशी करताना म्हटले की, ''अनिताबाई, मग हा पुरस्कार बहुजनांसाठी आरक्षित करून टाका.'' पितळ उघडे पडल्यामुळे निर्माण झालेला जळफळाट या व्यक्तीच्या वाक्यातून दिसून येतो. मात्र, या व्यक्तीचे म्हणणे वेगळ्या अर्थाने विचारात घेण्यासारखे आहे. ज्ञानपीठ पुरस्कारांमध्ये ब्राह्मणांना गेली ४०-५० वर्षे अघोषित आरक्षण होते. १९६५ साली ज्ञानपीठ पुरस्कारांना सुरूवात झाली. आजपर्र्यत ४८ लेखकांना हा पुरस्कार दिला गेला. उर्दू साहित्यातील काही मोजके मुस्लिम लेखक वगळता उरलेले सर्व नसले तरी बहुतांश  लेखक ब्राह्मण आहेत. ज्ञानपीठाच्या वेबसाईटवर कोणीही ही यादी पाहू शकतो. वाचकांच्या सोयीसाठी मी ही यादी लेखाच्या शेवटी देत आहे. कृपया पाहावी. कोणाला त्यात बहुजन लेखकाचे नाव सापडल्यास मला अवश्य कळवावे. मी माझ्या लेखात दुरुस्ती करून घेईन.
आरक्षण नको पुरस्कार द्या
भावांनो-बहिणींनो, गेल्या ५० वर्षांत केवळ ब्राह्मण लेखकांचीच या पुरस्कारांसाठी निवड केली गेली, हा अन्याय नव्हे का? गीता नावाच्या व्यक्तीने बहुजनांना आरक्षण देण्याचे वक्तव्य उपरोधाने केले आहे. परंतु त्याचा खरोखरच विचार करण्याची वेळ आली आहे. ज्ञानपीठ पुरस्कारांत बहुजनांना आरक्षण नाही दिले तरी चालेल. परंतु पुढची ५० वर्षे आता एकाही ब्राह्मण लेखकाला हा पुरस्कार मिळू नये, अशी मागणी करणे अयोग्य ठरणार नाही. कारण गेली ५० वर्षे ब्राह्मणी लॉबीने हे पुरस्कार लाटले आहेत. आता पुढची ५० वर्षे बहुजन समाजातील लेखकांना ते मिळू द्या. किमान मराठीत तरी या पुढे किमान तीन बहुजन लेखकांना ज्ञानपीठ मिळायला हवे. बहुजन लेखकांचा कोटा पूर्ण झाल्यानंतर ब्राह्मण लेखकांचा विचार व्हायला हरकत नाही.

.....................................................................................
ज्ञानपीठ पुरस्कारप्रात्त लेखकांची यादी. मराठीतील ज्या तीन ब्राह्मणांना हा पुरस्कार मिळाला आहे, त्यांची नावे ठळक टाईपात दिली आहेत. 


Laureates Awarded, so far,by the Jnanpith Award

1. G. Sankara Kurup (1965) Malayalam
2. T.S. Bandyopadhyaya (1966) Bangla
3. Uma Shankar Joshi (1967) Gujarati
4. K.V. Puttappa (1967) Kannada
5. Sumitranandan Pant (1968) Hindi
6. Firaq Gorakhpuri (1969) Urdu
7. V. Satyanarayana (1970) Telugu
8. Bishnu Dey (1971) Bangla
9. Ramdhari Singh `Dinkar' (1972) Hindi
10. D.R. Bendre (1973) Kannada,
11. Gopinath Mohanty (1973) Oriya
12. V.S. Khandekar (1974) Marathi 
13. P.V. Akilandam (1975) Tamil
14. Ashapurna Devi (1976) Bangla
15. K.S. Karanth (1977) Kannada
16. S.H.V. Ajneya (1978) Hindi
17. B.K. Bhattacharya (1979) Assamese
18. S.K. Pottekkatt (1980) Malayalam,
19. Amrita Pritam (1981) Punjabi
20. Mahadevi Varma (1982) Hindi
21. Masti V. Iyengar (1983) Kannada
22. Thakazhi S. Pillai (1984) Malayalam
23. Pannalal Patel (1985) Gujarati
24. Satchidanand Rautroy (1986) Oriya
25. V.V.S. 'Kusumagraj' (1987) Marathi 
26. C. Narayana Reddy (1988) Telugu
27. Qurratulain Hyder (1989) Urdu
28. V.K. Gokak (1990) Kannada
29. Subhash Mukhopadhyaya (1991) Bangla
30. Naresh Mehta (1992) Hindi
31. Sitakant Mahapatra (1993) Oriya
32. U.R. Anantha Murthy (1994) Kannada
33. M.T. Vasudevan Nair (1995) Malayalam
34. Mahasveta Devi (1996) Bangla
35. Ali Sardar Jafri (1997) Urdu
36. Girish Karnad (1998) Kannada
37. Nirmal Verma (1999) Hindi
38. Gurdial Singh (1999) Punjabi
39. Indira Goswami (2000) Assamese
40. Rajendra Shah (2001) Gujarati
41. D. Jayakanthan (2002) Tamil
42. Vinda Karandikar (2003) Marathi
43. Rahman Rahi (2004) Kashmiri
44. Kunwar Narain (2005) Hindi
45. Satyavrat Shastri (2006) Sanskrit
46. Ravindra Kelekar (2006) Konkani
47. O. N. V. Kurup (2007) Malayalam
48. Akhlaq Khan Shahryar (2008) Urdu




Tuesday, 11 October 2011

गोमांस भक्षण : इतिहासाचा गळा घोटण्याचे कारस्थान !


विदेशात खास मांसासाठी ‘कॅटल फार्मसङ्क विकसित
केले आहेत. या फार्ममध्ये केवळ मांसासाठी जनावरांचे
 पालन केले जाते. अमेरिकेतील हा एक कॅटलफार्म
.................................................................................................
गायीच्या पोटात ३३ कोटी देव असतात, अशी अंधश्रद्धा ब्राह्मणांनी या देशात पसरवली. लोकांच्या भावना भडकावण्यासाठी ब्राह्मणवादी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने गोहत्याबंदीसाठी आंदोलन करून पाहिले. अजूनही त्यांच्याकडून अशा आंदोलनाचे चाळे सुरूच असतात. परंतु भारतात एकेकाळी गोमांस खाल्ले जात होते. खुद्द ब्राह्मणांचे पूर्वजही त्याकाळी गोमांस भक्षण करीत होते, असे संशोधन करणारे एक पुस्तक दिल्ली विद्यापीठाचे एक विद्वान प्राध्यापक डॉ. डी. एन. झा यांनी लिहिले आहे. हे पुस्तक प्रकाशित होऊ नये यासाठी काही ब्राह्मणवादी (हिंदुत्ववादी)  संघटना झा यांना आता धमक्या देत आहेत. या विषयी एकता या स्वयंसेवी संस्थेचे एक सदस्य राम पुनियाणी यांनी 'द हिंदू'मध्ये ‘Beef eating: strangulating history' (अर्थ- गोवंशी जनावरांचे मांस भक्षण : इतिहासाचा गळा घोटण्याचे कारस्थान) या नावाने एक लेख लिहिला आहे. १४ ऑगस्ट २०११ रोजी हा लेख हिंदूमध्ये प्रसिद्ध झाला. हा लेख तज्ज्ञ आणि विचारी वाचकांसाठी मी येथे देत आहे. या लेखाची 'द हिंदू'ची मूळ लींकही लेखासोबत जोडली आहे. लींकवर क्लिक करून आपण थेट हिंदूच्या पानावर जाऊन हा लेख वाचू शकाल.

धन्यवाद.

आपली लाडकी बहीण
अनिता पाटील, औरंगाबाद.
................................................................................................................
हिंदूमध्ये प्रसिद्ध झालेला हाच तो लेख : 

Beef eating: strangulating history

While one must respect the sentiments of those who worship cow and regard her as their mother, to take offence to the objective study of history just because the facts don't suit their political calculations is yet another sign of a society where liberal space is being strangulated by the practitioners of communal politics. [text Tag=blue-tint][/Text]PROF. D. N. JHA, a historian from Delhi University, had been experiencing the nightmares of `threats to life' from anonymous callers who were trying to prevail upon him not to go ahead with the publication of his well researched work, Holy Cow: Beef in Indian Dietary Traditions.

As per the reports it is a work of serious scholarship based on authentic sources in tune with methods of scientific research in history. The book demonstrates that contrary to the popular belief even today a large number of Indians, the indigenous people in particular and many other communities in general, consume beef unmindful of the dictates of the Hindutva forces.

It is too well known to recount that these Hindutva forces confer the status of mother to the cow. Currently 72 communities in Kerala - not all of them untouchables - prefer beef to the expensive mutton and the Hindutva forces are trying to prevail upon them to stop the same.

Not tenable

To begin with the historian breaks the myth that Muslim rulers introduced beef eating in India. Much before the advent of Islam in India beef had been associated with Indian dietary practices. Also it is not at all tenable to hold that dietary habits are a mark of community identity.

A survey of ancient Indian scriptures, especially the Vedas, shows that amongst the nomadic, pastoral Aryans who settled here, animal sacrifice was a dominant feature till the emergence of settled agriculture. Cattle were the major property during this phase and they offered the same to propitiate the gods. Wealth was equated with the ownership of the cattle.

Many gods such as Indra and Agni are described as having special preferences for different types of flesh - Indra had weakness for bull's meat and Agni for bull's and cow's. It is recorded that the Maruts and the Asvins were also offered cows. In the Vedas there is a mention of around 250 animals out of which at least 50 were supposed to be fit for sacrifice and consumption. In the Mahabharata there is a mention of a king named Rantideva who achieved great fame by distributing foodgrains and beef to Brahmins. Taittiriya Brahman categorically tells us: `Verily the cow is food' (atho annam via gauh) and Yajnavalkya's insistence on eating the tender (amsala) flesh of the cow is well known. Even later Brahminical texts provide the evidence for eating beef. Even Manusmriti did not prohibit the consumption of beef.

As a medicine

In therapeutic section of Charak Samhita (pages 86-87) the flesh of cow is prescribed as a medicine for various diseases. It is also prescribed for making soup. It is emphatically advised as a cure for irregular fever, consumption, and emaciation. The fat of the cow is recommended for debility and rheumatism.

With the rise of agricultural economy and the massive transformation occurring in society, changes were to be brought in in the practice of animal sacrifice also. At that time there were ritualistic practices like animal sacrifices, with which Brahmins were identified. Buddha attacked these practices. There were sacrifices, which involved 500 oxen, 500 male calves, 500 female calves and 500 sheep to be tied to the sacrificial pole for slaughter. Buddha pointed out that aswamedha, purusmedha, vajapeya sacrifices did not produce good results. According to a story in Digha Nikaya, when Buddha was touring Magadha, a Brahmin called Kutadanta was preparing for a sacrifice with 700 bulls, 700 goats and 700 rams. Buddha intervened and stopped him. His rejection of animal sacrifice and emphasis on non-injury to animals assumed a new significance in the context of new agriculture.

The threat from Buddhism

The emphasis on non-violence by Buddha was not blind or rigid. He did taste beef and it is well known that he died due to eating pork. Emperor Ashok after converting to Buddhism did not turn to vegetarianism. He only restricted the number of animals to be killed for the royal kitchen.

So where do matters change and how did the cow become a symbol of faith and reverence to the extent of assuming the status of `motherhood'? Over a period of time mainly after the emergence of Buddhism or rather as an accompaniment of the Brahminical attack on Buddhism, the practices started being looked on with different emphasis. The threat posed by Buddhism to the Brahminical value system was too severe. In response to low castes slipping away from the grip of Brahminism, the battle was taken up at all the levels. At philosophical level Sankara reasserted the supremacy of Brahminical values, at political level King Pushyamitra Shung ensured the physical attack on Buddhist monks, at the level of symbols King Shashank got the Bodhi tree (where Gautama the Buddha got Enlightenment) destroyed.

One of the appeals to the spread of Buddhism was the protection of cattle wealth, which was needed for the agricultural economy. In a way while Brahminism `succeeded' in banishing Buddhism from India, it had also to transform itself from the `animal sacrifice' state to the one which could be in tune with the times. It is here that this ideology took up the cow as a symbol of their ideological march. But unlike Buddha whose pronouncements were based on reason, the counteraction of Brahminical ideology took the form of a blind faith based on assertion. So while Buddha's non-violence was for the preservation of animal wealth for the social and compassionate reasons the counter was based purely on symbolism. So while the followers of Brahminical ideology accuse Buddha of `weakening' India due to his doctrine of non-violence, he was not a cow worshipper or vegetarian in the current Brahminical sense.

Despite the gradual rigidification of Brahminical `cow as mother' stance, large sections of low castes continued the practice of beef eating. The followers of Buddhism continued to eat flesh including beef. Since Brahminism is the dominant religious tradition, Babur, the first Mughal emperor, in his will to his son Humayun, in deference to these notions, advised him to respect the cow and avoid cow slaughter. With the construction of Hindutva ideology and politics, in response to the rising Indian national movement, the demand for ban on cow slaughter also came up. In post-Independence India RSS repeatedly raised this issue to build up a mass campaign but without any response to its call till the 1980s.

While one must respect the sentiments of those who worship cow and regard her as their mother, to take offence to the objective study of history just because the facts don't suit their political calculations is yet another sign of a society where liberal space is being strangulated by the practitioners of communal politics. We have seen enough such threats and offences in recent past - be it the opposition to films or the destruction of paintings, or the dictates of the communalists to the young not to celebrate Valentine's Day, etc., - and hope the democratic spirit of our Constitution holds the forte and any threat to the democratic freedom is opposed tooth and nail.

Prof. RAM PUNIYANI
A member of EKTA (Committee for Communal Amity), मुंबई
...................................................................................................................
‘द हिंदू'मधील लेखाची मूळ लींक
http://hindu.com/2001/08/14/stories/13140833.htm
........................................................................................................................

Sunday, 9 October 2011

ब्लॉगला जगभरातून पाठिंबा


प्रिय भावांनो आणि बहिणींनो,
मी ब्लॉग सुरू करून उणापुरा महिना-दीड महिनाही झालेला नाही. या अवधीत ब्लॉगची वाचकसंख्या साडेपाच हजारांच्या वर गेली आहे. तसेच ब्लॉग वाचणारा वाचकवर्ग जगातील सर्व प्रमुख देशांत पसरलेला आहे. अमेरिकेपासून बहारीनपर्यंत माझा ब्लॉग वाचला जात आहे. तुम्हा सर्वांच्या निर्मळ प्रेमामुळेच मी लिहू शकले व त्याला असा सर्वत्र पाqठबा मिळत गेल्यामुळे लिहिण्याचा उत्साह द्विगुणीत होत गेला.
ब्लॉगच्या यशाचे सर्व श्रेय माझ्या या भावा-बहिणींनाच आहे. 

आपली लाडकी बहीण
अनिता पाटील, औरंगाबाद.
महाराष्ट्र, भारत.
......................................................................................................................
हा पहा वाचक चार्ट 
कोणत्या देशात किती वाचकांनी हा ब्लॉग वाचला, त्याचा ब्लॉगर्सने उपलब्ध करून दिलेला चार्ट खाली देत आहे. तो अवश्य पाहा



Friday, 7 October 2011

श्रीपाद अमृत डांग्यांची 'मराठा' आई..!

गळ्यातले जानवे हेच भेदाचे मूळ..!

श्रीपाद अमृत डांगे.
.............................................................................
भारतीय राजकारणातील एक मोठे नाव म्हणजे श्रीपाद अमृत डांगे. डाव्या विचारांची भारतभूमीत स्थापना करणारया मोजक्या महानुभावांमध्ये डांग्यांचा समावेश होतो. डावा विचार घेऊन चालतानाच डांगे महात्मा गांधी यांचेही चाहते होते. गांधी हे नुसते धार्मिकच नव्हते, तर उजव्या विचार सरणीचे होते. निधर्मी डावा विचार आणि धर्मिक प्रवृत्तीचा गांधीवाद यांची सांगड घालताना डांग्यांची चांगलीच कसरत झाली असणार. पण डांगे हे सत्प्रवृत्तीचे चाहते होते. ब्राह्मणी जातीयवादाचा त्यांना लहानपणापासूनच तिटकारा होता. या वृत्तीमळे डांगे हा मेळ घालू शकले असे मला वाटते.
१ वर्षाचे असताना आईचे निधन. 
डांग्यांचा जन्म १० ऑक्टोबर १८९९ चा. मुंबईतला. पण डांगे वर्षभराचे असतानाच त्यांच्या आईचे निधन झाले. एक वर्षाच्या बाळाचा सांभाळ कसा करायचा, असा प्रश्न त्यांचे वडील अमृतराव डांगे यांच्यासमोर निर्माण झाला. अमृतरावांचा एक भाऊ नाशिकला राहत असे. अमृतरावांनी १ वर्षाच्या बाळाला भावाच्या पत्नीच्या स्वाधीन केले. हीच डांग्यांची धर्माची आई. या महान स्त्रीचे नाव होते दगूबाई. दगूबाई जातीने मराठा होत्या. त्यांची वर्तणूक इतकी स्वच्छ होती की, ब्राह्मणी पगडा असलेल्या डांगे परीवाराच्या त्या सर्वांत लाडक्या होत्या. त्यांना सर्वजण प्रेमाने दगूताई म्हणत. अमृतराव डांगे यांनी आपले १ वर्षाचे बाळ अत्यंत विश्वासाने दगूताइंच्या ओटीत घातले.
मुंजीने उभी केली समस्या 
दगूताइंनी बाळाला यशोदेच्या मायेने सांभाळले. दोघांतील उत्कट ममतेची कहाणी पत्थर दील माणसालाही हेलावून सोडणारी आहे. दगूताई स्वयंपाक उत्तम करीत. मराठा असल्यामुळे साहजिकच त्यांना मांसाहार वर्ज्य   नव्हता. दगूताइंनी लहानग्या श्रीपादलाही अंडी, मटण भरपूर खाऊ घातले. डांग्यांच्या भरदार बांध्याचे रहस्य असे त्यांच्या बाळपणात दडलेले आहे. आठव्या वर्षी डांग्यांची मुंज झाली. ब्राह्मणी कर्मकांडानुसार मुंज होईपर्यंत ब्राह्मणही शुद्रच असतो. मुंज झाल्यानंतर तो ब्राह्मण होतो. मुंज झाल्यानंतर डांगे अशा प्रकारे ब्राह्मण झाले. त्यांच्या गळ्यात जानवे आले. हेच जानवे या माय-लेकरांतील निर्मळ प्रेमात अडसर ठरले. दगूताई मराठा म्हणजेच ब्राह्मणांच्या दृष्टीने शूद्र. शूद्र स्त्रीच्या हातचे खाणे ब्राह्मणाला कसे चालणार? त्यात त्याकाळचे नाशिक शहर म्हणजे ब्राह्मणी कर्मकांडांचे माहेरघरच. ब्राह्मणांची संख्याही मोठी. श्रीपादला दगूताईच्या हातचे खाऊ घातले जाऊ नये, यासाठी डांगे कुटुंबाला सनातनी ब्राह्मणांनी वेठीस धरले. त्याकाळी समाजावर ब्राह्मणी अंधश्रद्धांचा प्रचंड प्रभाव होता. दगूताईसारखी सामान्य स्त्री या प्रभावापासून दूर राहणे शक्यच नव्हते. श्रीपादला आपल्या हातचे खाऊ घालणे म्हणजे त्याला बाटवणे आहे, असे त्यांनाही वाटू लागले. गावातील ब्राह्मण पंडीत घरी येऊन दगूताईला दोष देऊ देत.  त्यामुळे दगूताई खचल्या. या माऊलीने शेवटी श्रीपादला दूर केले. श्रीपादच्या जेवणाची सोय दगूताइंनी एका ब्राह्मण कुटुंबाकडे केली.

नाशिक शहरातील पंचवटी हे धार्मिक दृष्ट्या महत्त्व असलेले स्थळ.
.......................................................................................................................................
माणूस नुसता भाकरीवर जगत नाही
दगूताईने जी माया लावली होती, ती माया नवे ब्राह्मण कुटुंब श्रीपादला देऊ शकले नाही. माणूस नुसता भाकरीवर जगत नाही, असे येशूने एकेठिकाणी म्हटले आहे. ते अगदी खरे आहे. दगूताईच्या भाकरीत माया होती, ममता होती. ती ब्राह्मणाघरच्या भाकरीत श्रीपादला सापडेना. तो अस्वस्थ झाला. आठ वर्षे दगूताईच्या सान्निध्यात वाढल्यामुळे मराठ्यांमध्ये असणारया कणखरपणाचे आणि बंडखोरीचे बाळकडूच डांग्यांना मिळाले होते. त्यांचे बंडखोर मन त्यांना स्वस्थ बसू देईना. गळ्यात घातलेले चार सुताचे वेटोळे आपल्या आणि काकूंच्या आड येत आहे, हे त्यांच्या लक्षात आले. त्यामुळे गळ्यातले जानवे त्यांना गळफासासारखे वाटू लागले. एके दिवशी त्यांनी गळ्यातले जानवे काढले. त्याची गुंडाळी केली आणि काकूंच्या हातावर ठेवले. ते काकीला म्हणाले- ‘‘या सुतामुळे जर आपल्यातलं नातं संपणार असेल, तर हे सुताचं वेटोळं मला नको.''
धन्य त्या दगूताई. परक्या लेकराला त्यांनी असा जीव लावला की, या लेकराने दगूताइंसाठी आपले ब्राह्मणत्व सोडले. डांग्यांचे श्रेष्ठत्वही येथे भावोत्कटतेच्या सर्व सीमांना पार करून समोर येते. माणूसकी नाकारणारी जात डांग्यांनी नाकारली. जातीची बंधने नसलेल्या माणूसकीचा स्वीकार केला. १९०० ते १९१७ अशी १७ वर्षे डांगे दगूतार्इंकडे राहिले. वयाच्या १८ व्या वर्षी ते उच्चशिक्षणासाठी मुंबईला वडिलांकडे आले. पण आपल्या मराठा आईला ते त्या हयात असेपर्यंत कधीही विसरले नाही.

ब्राह्मणांनो जानवी तोडून फेका
या देशातील भेदभावाचे मूळ कारण ब्राह्मणांच्या गळ्यातील हे सुताचे वेटोळे आहे. कॉम्रेड डांगे यांनी समस्त ब्राह्मणवर्गासमोर चांगला आदर्श घालून दिला आहे. या देशातील भेदभाव मिटविण्यासाठी ब्राह्मण समाजाने पुढाकार घेऊन जानवी तोडून फेकावीत, असे माझे त्यांना विनम्र आवाहन आहे.


शेवटी दगूताई नावाच्या या यशोदेला लक्ष लक्ष प्रणाम!


- अनिता पाटील, औरंगाबाद. 

Tuesday, 4 October 2011

कुणबी कोण होते?


कुणबिक करतो तो कुणबी 
मराठी भाषेचे दोन प्रकारांत विभाजन करता येते. मूळ मराठी हिलाच देशीभाषा असे म्हटले जाते. दुसरी संस्कृतप्रचूर मराठी. देशीभाषा हीच खरी मराठी आहे. ज्ञानेश्वरांनी आपल्या ज्ञानेश्वरीचे वर्णन करताना ‘देशीकार लेणेङ्क असा शब्दप्रयोग केलेला आहे. दुर्दैवाने आज लिखाणातून मराठीचे हे देशीकार लेणे बाद झाले असून संस्कृतप्रचूर निर्जीव मराठी वापरली जात आहे. असो. देशी बोलीत शेतीला कुणबिक असे म्हटले जाते. जो कुणबिक करतो तो कुणबी. महाराष्ट्रातील कोणत्याही खेड्यात जाऊन कोणत्याही शेतकèयाला विचारा कुणबिक म्हणजे काय? तो शेती असाच अर्थ सांगेल. माझे वडील म्हणत - ''कुणबिकीला कमीत कमी दोन बैल लागतात.'' सर्वच शेतकरयांच्या तोंडी हे वाक्य असते.  
कुळवाडी ते कुणबी 
हा कुणबी समाज आहे तरी कोण? त्याचाच धांडोळा आपण आता घेणार आहोत. मागील सुमारे हजार-दीडहजार भर वर्षांच्या काळात महाराष्ट्रात शेतकरी वर्ग स्थिरावला असे दिसून येते. पूर्वी संपूर्ण शेतकरी वर्ग एकाच जातीत मोडत होता. त्याला त्यालाच कुळवाडी म्हणत. मूळ शब्द कुळ आहे. हे दोन्ही शब्द 'कृषिवल'  या शब्दाच्या अपभ्रंशातून आले आहेत.  कृषिवल-कृषिवळ-कुवळ-कुळ अशी त्याची उपपत्ती आहे. कुळ म्हणजे शेती कसणारा. हा फार प्रचलित शब्द आहे. शेती कसणारया कुळांना शेतीचे मालक बनविणारा कुळकायदा सर्वपरिचित आहे. 'वाडी' हा प्राकृत भाषेतील प्रत्यय आहे. मारवाडी, काठेवाडी, भिलवाडी, असे शब्द भारतीय भाषांत दिसतात. तसाच कुळवाडी हा शब्द आहे. कृषिवल आणि कुळवाडी यात किती साम्य आहे, हे वेगळे सांगायला नको. सोप्या भाषेत कुळवाडी म्हणजे शेतीवाला. शेतीची शासकीय पातळीवर नोंद ठेवणारया ग्राम अधिकारयास कुळकर्णी म्हणत. 'कुळ'वरूनच कुळकर्णी हा शब्द निर्माण झाला. ही व्यवस्था किमान हजार-बाराशे वर्षे जुनी आहे. संत ज्ञानेश्वरांच्या घराण्यात कुळकर्णपद होते. ज्ञानेश्वरांचे वडील विठ्ठलपंत. विठ्ठलपंतांच्या पंजोबांचे पंजोबा हरीपंत कुळकर्णी होत. शके १०६० च्या सुमारास हरीपंत आपेगावचे कुळकर्णी होते. कुळवाडी हा प्राकृत शब्द असून त्याचा अपभ्रंश होऊन-होऊन कुणबी हा शब्द तयार झाला आहे.
कुणबी, माळी, धनगरांचे मूळ एकच
महात्मा फुले यांनी या विषयावर केलेल्या संशोधनाला तोड नाही. त्यांचा ‘शेतकरयाचा असूड'  हा अजोड ग्रंथ त्यासाठी उपयुक्त ठरतो. या पुस्तकाच्या मुखपृष्ठावरच फुले यांनी एक छोटेसे उपशीर्षक टाकले आहे. त्यात ते म्हणतात - हे लहानसे पुस्तक जोतीराव  गोविंददराव फुले यांनी शूद्र शेतकरयांचे बचावाकरिता केले आहे.
‘शेतकरयाच्या असूड'च्या उपोद्घातात फुले यांनी कुणबी, माळी आणि धनगर या जातींविषयी लिहिले आहे.
फुले म्हणतात - ‘‘वाचकहो, सांप्रत शेतकरी म्हटले म्हणजे त्यामध्ये तीन भेद आहेत. शुद्ध शेतकरी म्हणजे कुणबी, माळी व धनगर. आता तीन भेद होण्याची कारणे पाहिली असता, मुळचे जे लोक शुद्ध शेतकीवर आपला निर्वाह करू लागले, ते कुळवाडी अथवा कुणबी. जे लोक आपले शेतकीचे काम सांभाळून बागाइती करू लागले , ते माळी व जे ही दोन्ही कामे करून मेंढरे , बकरी वगैरेंचे कळप बाळगू लागले ते धनगर, असे निरनिराळ्या कामांवरून प्रथम हे भेद उपस्थित झाले असावेत. परंतु आता या प्रथक जातीच मानतात. त्यांचा सांप्रत आपसांत फक्त बेटी व्यवहार मात्र होत नाही. बाकी अन्नव्यवहारादि सर्व काही होते. यावरून हे (कुणबी, माळी व धनगर) पूर्वी एकाच जातीचे असावेत.''
खंडोबा-भानू : पहिले आंतरजातीय प्रेमीयुगुल
विद्यमान मराठे-कुणबी, धनगर आणि इतर बहुजन
 जातींचे कुलदैवत खंडोबा, श्रीक्षेत्र जेजुरी.
..........................................................................................................
महात्मा फुले यांचा हा युक्तिवाद अगदी पटण्यासारखा आहे. कुणबी, माळी आणि धनगर या तिन्ही जातींच्या रितीभाती सारख्याच आहेत. यांची दैवते समान आहेत. धनगर आणि कुणब्यांत पूर्वी बेटी व्यवहार होता, असेही दिसून येते. या तिन्ही जातींचे कुलदैवत असलेल्या खंडोबाची पहिली पत्नी म्हाळसाई ही कुणबीण होती. तर दुसरी पत्नी बाणाई उर्फ भानू ही धनगरीण होती. वाघ्या-मुरळींच्या फडात गायिल्या जाणारया आख्यानानुसार मल्हारी मार्तंड खंडेराय भानूच्या प्रेमात पडला. तिला वश करण्यासाठी राज्य सोडून तिच्या बापासोबत मेंढराच्या कळपात राहिला. कळपाची नीट राखण करून तिच्या बापाचे मन जिंकून  घेतले आणि तिच्याशी प्रेमविवाह केला. मराठी संस्कृतीतला हा पहिला आंतरजातीय प्रेमविवाह म्हटला पाहिजे.
वखराच्या पाशींच्या तलवारी
कुणबी समाज हा मुळातच लढवय्या आणि काटक आहे. प्रसंगी वखराच्या पाशींच्या तलवारी करण्याचीही त्याची तयारी होती. सातवाहन घराण्यातील प्रसिद्ध सम्राट गौतमीपूत्र सातकर्णी याने मातीच्या पुतळ्यांत प्राण फुंकून लढाई जिंकल्याची आख्यायिका सांगितली जाते. ही कथा प्रतिमात्मक आहे. हे मातीचे पुतळे म्हणजे खरोखरचे पुतळे नव्हेत. हे शेतीत राबणारे शेतकरी होते. त्यांची स्थिती मातीमोल होती. म्हणून त्यांना 'मातीचे पुतळे' म्हटले गेले. या शेतकऱ्यांना  लष्करी प्रशिक्षण देऊन गौतमीपूत्र सातकर्णीने लढाई मारली. महाराष्ट्रातील शेती पूर्णत: पावसावरच अवलंबून होती. त्यामुळे कुळवाडी उर्फ कुणबी अर्धवेळच शेती करायचा. शेतीभातीची कामे आटोपायची, दसरयाला शिलंगणाचे सोने लुटायचे आणि युद्ध मोहिमेवर रवाना व्हायचे, हा कुणबी वीरांचा वर्षक्रम होता. कुळवाडी भूषण शिवाजी राजांच्या काळातही मराठा सैन्य असेच अर्धवेळ लढाया मारीत असे.  हाती सत्ता आल्यानंतर हेच कुळवाडी उर्फ कुणबी पुढे मराठे म्हणून नावारूपास आले. हा बदल शिवरायांच्या आधी शंभरेक वर्षे सुरू झाला असावा. पण आपले मूळ कुणबी हे नाव या समाजाने शेवटपर्यंत टाकले नाही.

- अनिता पाटील, औरंगाबाद. 
.................................................................................................................

Saturday, 1 October 2011

खरे अस्पृश्य ब्राह्मणच!

भगवान बुद्ध म्हणाले -
न जच्चा बसलो होति, न जच्चा होती ब्राह्मणो ।
अर्थ - जन्मत: कोणीही ब्राह्मण होत नाही, तसेच जन्मत:च कोणी शूद्र (अस्पृश्य) होत नाही.
.........................................................................................................................


वैदिक धर्म हा  हिंसा आणि अमानुषतेवर आधारित होता. वैदिक धर्मात कनिष्ठ जातीचे लोक तसेच स्त्रिया यांना माणूसपणाचेही हक्क नव्हते. त्यामुळे व्यथित झालेल्या भगवान बुद्धांनी आपला नवा मार्ग प्रतिपादन केला. वैदिक धर्माने ब्राह्मणांना दिलेले सर्व विशेषाधिकार भगवान बुद्धांनी नाकारले. त्यामुळे त्याकाळातील समस्त ब्राह्मणवर्ग भगवान बुद्धाच्या विरुद्ध उभा राहिला होता. त्याचे पुरावे बौद्ध वाङ्मयात जागोजागी सापडतात. त्यातील काही मोजक्या कहाण्या ‘भगवान बुद्ध आणि ब्राह्मण'  या मालिकेतून मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे. 
अस्पृश्य कोणाला म्हणावे?
भगवान बुद्ध श्रावस्तीजवळील जेतवनात राहत होते. एकेदिवशी ते भिक्षाटनासाठी श्रावस्तीनगरीत आले. श्रावस्तीत यज्ञाची तयारी सुरू होती. नुकताच यज्ञाग्नी पेटविण्यात आला होता. भगवान बुद्ध भिक्षापात्र घेऊन येत आहेत, हे पाहताच एक याज्ञिक ब्राह्मण संतप्त झाला. तो दुरूनच ओरडला-
‘‘मुंडक (मुंडण केलेल्या गृहस्था) तिथेच थांब. दरिद्री श्रमणा तिथेच थांब. अरे, वृषल तिथेच थांब"
वृषल म्हणजे अस्पृश्य.
ब्राह्मणाचे ओरडणे ऐकून भगवान बुद्ध शांतपणे म्हणाले- ‘‘हे ब्राह्मण ! अस्पृश्य कोणाला म्हणायचे? काय केल्याने माणूस अस्पृश्य होतो? या प्रश्नांची उत्तरे तुला माहीत आहेत का?"
भगवान बुद्धांचे वचन ऐकून दांभिक ब्राह्मण सटपटला. तो म्हणाला - ‘‘नाही यापैकी एकाही प्रश्नाचे उत्तर मला माहीत नाही."
भगवान बुद्ध म्हणाले तर मग ऐक -
१. जो माणूस क्रोधी आहे, लोभी आहे, अनैतिक आहे, चुगलखोर आहे, अपिवत्र दृष्टीचा आहे. त्याला वृषल समजावे.
२. जो प्राण्यांना त्रास देतो. ज्याच्या मनात प्राण्यांबद्दल दयाभाव नाही, तो वृषल समाजावा.
३. जो दुसरयाची वस्तू कोणताही मोबदला न देता घेतो, तो वृषल समाजावा.
४. जो कर्ज घेतो, परंतु ते फेडित नाही, तो वृषल समजावा.
५. जो कोणत्याही वस्तूच्या इच्छेपोटी वाटमारी करतो, लुटतो, कोणाला ठार करतो, त्याला वृषल समजावे.
६. जो खोटी साक्ष देतो, तो वृषल समाजावा.
७. जो आपल्या मित्राच्या किंवा नातेवाईकांच्या पत्नीसोबत व्याभिचार करतो (व्याभिचार जबरदस्तीचा असो की सहमतीने) त्याला वृषल समजावे.
८. आपल्याकडे पैसा असतानाही आपल्या मातापित्यांना जो सांभाळित नाही, तो वृषल समजावा.
९. जो अकल्याणकारी, खोट्या धर्माचे शिक्षण देतो आणि धर्माला रहस्य बनवू ठेवतो त्याला वृषल समजावे. (येथे रहस्य या शब्दातून भगवान बुद्धांना ‘हातचे राखून ठेवून धर्मशिक्षण देणे, विशिष्ट लोकांना धर्मशिक्षण देऊन विशिष्टांना शिक्षणापासून वंचित ठेवणे' , असा अर्थ अभिप्रेत आहे.)
१०. जन्मत: कोणीही ब्राह्मण होत नाही, तसेच जन्मत:च कोणी शूद्र (अस्पृश्य) होत नाही.
मथितार्थ
भगवान बुद्धांनी केलेल्या शेवटच्या दोन व्याख्या महत्वाच्या आहेत. ब्राह्मणी धर्माने अर्थात वैदिक धर्माने वर्णाश्रमाची मांडणी करून कनिष्ठ जातींना धर्मशिक्षण नाकारले. ही व्यवस्था निर्माण करणारे ब्राह्मण होते. त्यामुळे या व्याख्येनुसार, ब्राह्मण सर्वप्रथम अस्पृश्य ठरतात! १० व्या व्याख्येचे मूळ पाली शब्द असे आहेत : न जच्चा बसलो होति, न जच्चा होती ब्राह्मणो ।  (वृषलचे पालीत बसल होते. त्याला प्रत्यय लागून बसलो असे रूप झाले आहे. जच्चा म्हणजे माता.)


या मालेतील इतर लेख 
1. हिंदू नावाचा कोणताही धर्म अस्तित्वात नाही!
२. मुस्लिमविरोधी दंगली
३. खरे अस्पृश्य ब्राह्मणच!
 
४. अंगप्रदर्शन करणा-या सर्व नट्या ब्राह्मणच कशा?