Sunday 30 October 2011

लवकरच वाचा वैदिक हिंसाचाराबद्दल




प्रिय भावांनो आणि बहिणींनो,


वैदिक धर्म फार महान आहे. त्यात जगभरातील तत्त्वज्ञान साठवलेले आहे, असे आपल्या देशात उच्चरवाने वारंवार सांगितले जाते. शंकराचार्यांपासून दयानंद सरस्वती, स्वामी विवेकानंद अशा अनेक वेदांती विद्वानांनी वेदांकडे चला अशी हाक दिली. त्यामुळे कळत्या वयापासून मला वेदांबद्दल आकर्षण होते. त्यातून अल्पसा अभ्यास घडू शकला. लक्षात असे आले की, वेदांत ज्ञानआहे, असे सांगणारे वेदांती आपली दिशाभूल करीत असतात. वेदांमधील चांगल्या गोष्टी तेवढ्या ते आपल्यासमोर ठेवतात. वेदांचा काळा चेहरा मुद्दाम झाकून ठेवला जातो.

 उदा. वेदकाळात ब्राह्मणांसह सर्व लोक गायीचे मांस खात असत. यज्ञात गायीची चरबी अग्नी भडकाविण्यासाठी वापरली जात असे. गाय कशी कापावी, याचे विधिसुद्धा वेदवाङ्मयात सांगितले आहेत. 
या विषयीची एक महामालिका मी वेदवाङ्मयातील पुराव्यांसह आपल्यासमोर घेऊन येत आहे. 


फक्त दोन दिवस प्रतीक्षा करा.      





तुमची लाडकी बहीण
अनिता पाटील, औरंगाबाद

No comments:

Post a Comment