Monday 24 October 2011

९६ कुळी शिंद्यांचे अनिता पाटील यांना पत्र


अस्पृश्यता पाळणारी श्यामची आई आदर्श कशी या लेखावर विनायक शिंदे यांनी मला तीन-चार  भागांत एक प्रदिर्घ पत्र मेलवरून पाठवले. स्वत:ला ९६ कुळी मराठा म्हणविणारया शिंदे यांच्याया पत्राला मी यापूर्वीच उत्तर दिले आहे. शिंदे यांचे हे पत्र वाचकांच्या माहितीसाठी देत आहे. 
..............................................................................................................................
1.
विनायक शिंदे:- हिंदुगर्जना 
श्यामच्या आईपेक्षा अनिता बाई तुमचेच विचार अधिक घातक आहेत. दिवस फार वाईट आले आहेत. दुसऱ्या समाजाची कुठलीही गोष्ट प्रसिद्ध दिसली तर मग उगाच काहीतरी खुसपट काढत राहायची ही प्रवृत्ती फोफावत आहे. ज्यांनी ज्यांनी साने गुरुजी आणि शामची आई मुळातून वाचली आहे, ते वरील लेखाला विरोधच करतील, मग ते कुठल्याही जात-धर्माची का असेनात ....
आपल्याला फक्त ब्राह्मण समाजाला टार्गेट करणं एवढच छान जमतं...
मी स्वत: ९६ कुळी मराठा आहे.. कोकणात रत्नागिरी इथे माझं वास्तव्य आहे..
आणि आजवर जात पात न बघता सर्वांशी मिळून मिसळून राहिलेलो आहे..
हे तुमचे "जातीयवादी धंदे" बंद करा..
मी स्वत: हिंदुत्ववादी आहे.. आणि आमचं हिंदुत्व "मनुवादी किंवा ब्राह्मणी" नाही..
सरसकट सर्वांना एकाच तराजुत तोलू नका....
तुमचा ब्लॉग वाचणारा माणूस "शहाणा" असेल तर त्याचं डोकं आउट होउन जाईल..
माझं आत्ता तेच झालेलं आहे...


2.
आणि हो...............
जमल्यास "संभाजीनगर" म्हणा..
"औरंगाबाद" शक्यतो नको............
तुमच्या सर्व धर्म समभावाला तडा जात नसेल तरच हां... जबरदस्ती नाही...
नाहीतर एकीकडे "संभाजी प्रेमाचे पोवाडे" गायचे.. आणि दुसरीकडे त्याच संभाजी महाराजांना हाल हाल करून मारलं त्या हलकट औरंग्याच्या नावाने स्वत:च्या शहराचा उल्लेख करायचा...
"औरंगाबाद" असा.... काय हे तुमचे "संभाजीप्रेम..." मानलं बुवा....
असो.....
"संभाजीनगर" बोलायला काय प्रॉब्लम येतो ????????? समजू शकेल काय ?

3.
आणि एक गोष्ट पक्की ध्यानात ठेवा......मला या बड्या लोकांच्या वादात बिलकुल इंटेरेस्ट नाही..
मग ते इतिहासकार असोत किंवा लेखक असोत किंवा राजकारणी असोत..
आणि ते कोणत्याही समाजाचे असोत.. पण यामुले दोन समाजात कटुता येऊ नये असं माझं मनापासून मत आहे.. आणि त्यासाठी मी कायम प्रयत्न करणार.. मला त्यात माँसाहेब जिजाऊ यश देतीलच यात शंकाच नाहिये...
कारण कसं असतं ना हे कितीही भांडले तरी "बड़ेजाव" असतो यांचा.. दिवसा भांड भांड भांडतील आणि रात्री एका ताटात जेवतिल..
पण यामुले समाज दुभंगता कामा नये.. आणि चांगले वाईट लोकं प्रत्येक जातीत असतात..
तुम्ही एकच न्याय सरसकट सगळ्या समाजाला लाऊ शकत नाही..
आता इथे तुम्ही म्हणाल असं कोणी केलं.. तर त्याचं उत्तर तुम्हाला मी द्यायची गरज नाही..
म्हणून पुस्तक प्रकाशित झाल्या झाल्या त्यावर बंदी घालून लेखकावर गुन्हा दाखल होतो..
हे एवढं पुरेसं आहे.. मग सोशल नेट्वर्किंग वर नाचक्की.. संकेत स्थळावरून लिंक गायब असले "मर्दानी" प्रकार घडतात...
आणि एक मराठा म्हणून मला हे पटत नाही..
चांगलं वाईट याची जातपातविराहित समीक्षा व्हायला हवी या मताचा आहे मी..
या मुद्द्यावर आता वाद नको आणखी..
.
या इतिहास संशोधाकांमाधिल मतभेद, दादोजी कोंडदेव, वाघ्या कुत्रा, रामदास असल्या विषयांना पुढे करून "ब्राह्मण मराठा" हां वाद सर्वसामान्य जिणं जगणार्या समाजात मोठ्या प्रमाणात कोण फैलावु पाहत असेल तर त्याला माझ्यासारख्या असंख्य "तगड्या" मराठ्यांचा सामना करावा लागेल..
.
मग असं करणारा कोणीही असो.... "खेडेकर समर्थक" असो किंवा "पुरंदरे समर्थक, किंवा दादा समर्थक, किंवा अन्य कोणी..."Doesn't matter.............
.
हां माझा शब्द आहे............
जय जिजाऊ........ जय संभाजी..........
4. 
वंदे मातरम:- 
आपण बरोबर बोललात... वंदे मातरम हे "राष्ट्रगीत" नाही...
पण आपण एवढं च बोलून थाम्बलात... आणि मुस्लिम लोकांनी ते म्हटलं नाही तरी चालेल अशी "निधर्मी परवानगी" देऊन सुद्धा मोकळ्या झालात..
अहो पण वंदे मातरम हे राष्ट्रगीत नसलं तरी ते "राष्ट्रीय गीत" आहे..
आणि "राष्ट्रगीत आणि राष्ट्रीय गीत" ही दोन्ही समान महत्वाची आहेत..
कारण दोन्हींचा मूळ उद्देश असतो "राष्ट्रवंदना"..
कोणालाही यापैकी एक झिडकारण्याचा हक्क नाही... उद्या तुमच्या घरच्यांनी तुम्हाला म्हटलं की "आम्ही तुला फ़क्त रात्रीचं जेवण देऊ, दुपारचं नाही.." तर चालेल का ? नाही ना ?? तसंच आहे हे... जशी दोन्ही वेळेची जेवणं महत्वाची तसंच ही दोन्ही गीते महत्वाची..
राष्ट्रगीत आणि राष्ट्रीय गीत सुद्धा...
काय आहे असं वंदे मातरम मध्ये ज्यामुले मुस्लिम लोकांनी ते म्हटलं नाही तरी चालेल अशी बेलाशक परवानगी आपण देऊ केलीत ?
हे असले फतवे निघतात आणि तुमच्या सारखे लोकं त्याला पाठिंबा देतात ?
हे हिन्दुस्थानचं दुर्दैव नाही तर आणखी काय आहे ?
लेख लिहिता तेव्हा काय दिग्विजय सिंग अंगात येतात का तुमच्या ?? की प्रशांत भूषण ?
काहीतरी जाण ठेवून लिहित जावा की..
काही चुक आहे का यात माझं ?

मी शिंदे यांना दिलेले उत्तर खालील लिंकवर वाचा :



विनायक शिंदे:- हिंदुगर्जना 
..........................................................................................

No comments:

Post a Comment