Thursday, 29 September 2011

विद्वान वाचकांमुळेच लिहायला ऊर्जा मिळते


भावांनो आणि बहिणींनो,

आपण ब्लॉगला दिलेला पाठींबा भारावून टाकणारा आहे. माझा ब्लॉग फॉलो करणारांची  संख्या महिनाभरात ३० झाली. या सर्व भावा-बहिणींच्या ऋणातून मुक्त होणे, मला कदापि शक्य नाही. वैभव पाटील, सीमा रॉय, श्रीकांत धर्माळे नितीन मनाळ, श्री. प्रफुल्ल, पंढरीनाथ कदम, महेश व्यवहारे, प्रसाद सातपुते, अजय मारे, श्री. विशाल, संजय प्रफुल पटेल, तेजस डाखोरे, दिनेश सुळसुळे, अवधूत कांबळे, श्री. प्रशांत, श्री. प्रवीण, श्री. नागेश, शशी गमरे, राहुल अपqसगकर, मुकुंद जगदाळे, राजेश पाटणकर, नवनाथ वल्ले हे मान्यवर माझा ब्लॉग फॉलो करीत आहेत. आपल्यासारख्या महनीय व्यक्ती ब्लॉग वाचताहेत, ही बाब माझ्यासाठी खरोखर भूषणावह आहे. या पैकी अनेक मान्यवरांनी व्यकत केलेल्या कॉमेंट्स तेवढ्याच तोलामोलाच्या आहेत. यांपैकी काही कॉमेंट्स तर स्वतंत्र लेख म्हणून वापरण्याच्या ताकदीच्या आहेत. या भावा-बहिणींचे ऋण व्यक्त करून मी त्यांच्या प्रेमाला उणेपणा आणू इच्छित नाही.

तुमचीच लाडकी बहीण
अनिता पाटील

Tuesday, 27 September 2011

ब्राह्मणांनाच का मिळतात ज्ञानपीठ पुरस्कार?


वि. स. खांडेकर
मराठीच्या वाङ्मयीन इतिहासात तीन जणांना भारतीय साहित्यातील सर्वोच्च ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. लेखकाची एकूण लेखन कारकिर्द लक्षात घेऊन हा पुरस्कार दिला जातो. तथापि, त्या लेखकाची सर्वोच्च कलाकृती गृहीत धरण्याची प्रथा आहे. मराठीत पहिला पुरस्कार मिळाला १९७४ साली वि. स. खांडेकर यांना. त्यासाठी ययाती ही त्यांची कादंबरीसाठी सर्वोच्च म्हणून गृहीत धरली गेली. १९८७ साली दुसरया ज्ञानपीठाचे मानकरी ठरले वि. वा. शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज. त्यांच्या नटसम्राट या नाटकासाठी त्यांची निवड झाली. तिसरे ज्ञानपीठ २००३ साली विंदा करंदीकर यांना मिळाले. त्यांचा अष्टपदी हा काव्यसंग्रह त्यासाठी गृहीत धरण्यात आला. मराठीतले हे तिन्ही ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त लेखक जातीने ब्राह्मण आहेत. तिघांच्याही आडनावात शेवटी ‘कर'  आहे. ब्राह्मणांशिवाय इतर कोणत्याही लेखकाला ज्ञानपीठ द्यायचे नाही, असेच एक अघोषित सूत्र या पाठीमागे दिसून येते.
तिन्ही कलाकृती आधारित 
वि. वा. शिरवाडकर
यातील आणखी एक गंमत अशी की, या तिन्ही लेखकांची ज्ञानपीठ प्राप्त पुस्तके आधारित आहेत. महाभारत आणि इतर अनेक पुराणांत असलेल्या राजा ययातीच्या कथानकावर खांडेकरांची ययाती ही कादंबरी  बेतली आहे. ययाती, देवयानी आणि शर्मिष्ठा अशा त्रिकोणी स्त्रिपुरूष संबंधांचे मूळ कथानक कादंबरीत जसेच्या तसे बेतले आहे. मूळ कथानकाच्या चौकटीला खांडेकरांनी काल्पनिक प्रसंगांत बसविले. ही जी काही काल्पनिक प्रसंगांची निर्मिती आहे, तेवढीच काय ती खांडेकरांची प्रतिभा. शिरवाडकरांच्या नटसम्राटाची कहाणी यापेक्षा वेगळी नाही. नटसम्राट ही एक शोकांतिका आहे. शोकांतिकामध्ये कथानकातील नायकाचा कारुण्यपुर्ण, शोकात्म अंत होत असतो .  जागतिक वाङ्मयात शोकांतिकांचे दोन प्रकार पडतात. ग्रीक शोकांतिका आणि शेक्स्पिअरच्या शोकांतिका. ग्रीक शोकांतिकांमध्ये नायक दैवाधीन असतो. त्याचे स्वत:चे प्राक्तन (नशीब) त्याला शोकांतिकेकडे घेऊन जाते. इडिपस रेक्स हे ग्रीक शोकांतिकेचे सर्वोच्च उदाहरण होय. पु. ल. देशपांडे यांनी इडिपस रेक्सचे राजा औदिपस या नावाने भाषांतर केले आहे. शेक्स्पिअरने शोकांतिकांचा नवा प्रकार निर्माण केला. त्याच्या नाटकातील नायकाचा शोकात्म अंत होतो, पण त्यासाठी तो स्वत:च जबाबदार असतो. राम गणेश गडकरी यांचे एकच प्याला हे नाटक शेक्स्पीअरच्या शोकांतिकेत मोडते. एकच प्यालातील सुधाकराला आपल्या ज्ञानाचा एवढा ताठा असतो की, तो थोडासाही अवमान सहन करू शकत नाही. त्यातून तो दारूच्या आहारी जाऊन शेवटी बचनाग हे विषारी औषध घेऊन आत्महत्या करतो.
विंदा करंदिकर
शिरवाडकरांचे  नटसम्राट समजून घेण्यासाठी ही थोडीसी पाश्र्वभूमी सांगितली. नटसम्राट हे नाटक दोन्ही प्रकारच्या शोकांतिकांचा अर्क काढून शिरवाडकरांनी लिहिले. त्याचे कथानक ग्रीक शोकांतिकेच्या अंगाने जाते. तर भाषाशैली शेक्स्पीअरच्या अंगाने जाते. म्हातारी माणसे पोटच्या लेकरांनाच कशी नकोशी होतात, असे कथानक या नाटकात आहे. अप्पासाहेब बेलवलकर हे मुख्य पात्र. त्याचा नाटकाच्या शेवटी करुण अंत होतो.
विंदा  करंदीकरांच्या अष्टपदीचेही तसेच. या काव्याची प्रेरणा ही मूळ संस्कृतातून घेण्यात आली आहे.
अस्सल कलाकृतींवर अन्याय
नामदेव ढसाळ
अशा प्रकारे आधारित कलाकृतींना ज्ञानपीठ पुरस्कार देऊन मराठीतील अस्सल कलाकृतींवर घोर अन्याय करण्यात आला आहे. साहित्यक्षेत्रातील ब्राह्मणी जातीवाद हेच एकमेव कारण यामागे आहे. मराठीत अनेक लेखक असे आहेत की, त्यांची प्रत्येक कलाकृती ज्ञानपीठ पुरस्काराच्या तोडीची आहे. अगदी मोजकी उदाहरणे येथे देते - माझे विद्यापीठ - नारायण सुर्वे, बलुतं- दया पवार, नामदेव ढसाळ - गोलपीठा. उपरा- लक्ष्मण माने, उचल्या- लक्ष्मण गायकवाड,  झुलवा - उत्तम बंडू तुपे, तराळ-अंतराळ - शंकरराव खरात, वळीव - शंकर पाटील, खळाळ - आनंद यादव, पाचोळा - रा. रं. बोराडे, धग - उद्धव ज. शेळके, कोसला - भालचंद्र नेमाडे. ई. ई. ही यादी खूप मोठी होऊ शकेल;
भालचंद्र नेमाडे 
परंतु विस्तारभयास्तव अगदी मोजकी उदाहरणे मी येथे दिली आहेत.
प्र. ई. यांचे एकच पुस्तक हजार ज्ञानपीठाच्या तोडीचे
आमच्या औरंगाबादचे प्र. ई. सोनकांबळे यांना तर त्यांच्या ‘आठवणींचे पक्षीङ्क या एकाच कलाकृतीसाठी हजार ज्ञानपीठे मिळायला हवी होती. नारायण सुर्वे, ढसाळ, दया पवार आणि नेमाडेंबद्दलही माझे हेच मत आहे. परंतु यापैकी कोणालाही ज्ञानपीठ मिळू शकले नाही. कारण हे लोक जातीने ब्राह्मण नव्हते. याच कलाकृती ब्राह्मणांच्या नावे असत्या तर मराठी साहित्यात क्षेत्रात त्यांना मानाच्या पालख्या मिळाल्या असत्या.
सावंत, देसाइंवरही अन्याय
शिवाजी सावंत 
आणखी एक मुद्दा येथे नमूद करावासा वाटतो की, आधारित कलाकृतींसाठीच पुरस्कार द्यायचा असे ठरविले गेले असेल, तर शिवाजी सावंतांना मृत्यूंजयसाठी ज्ञानपीठ मिळायलाच हवे होते. मराठीतील आधारित कलाकृतींत मृत्यूंजय ही सर्वांत श्रेष्ठ कलाकृती आहे. रणजीत देसाई यांनाही श्रीमान योगी हा पुरस्कार मिळायला हवा होता. दुर्दैवाने ते ब्राह्मण नव्हते, म्हणून ते ज्ञानपीठापासून वंचित राहिले.
....................................................................................................

ता. क. 
भावांनो, आणि बहिणींनो,
रा. रं. बोराडे. 
या माझ्या लेखावरून फेसबुकच्या व्यासपीठावर घणाघाती चर्चा झाली. ब्राह्मणवाद्यांना हा लेख भयंकर झोंबला. ‘खांडेकर-शिरवाडकर-करंदीकर या त्रिमूर्तीला ज्ञानपीठ मिळाले ते केवळ त्यांच्या गुणवत्तेमुळे' असा युक्तीवाद त्यांनी केला. मी त्यांना एकच सवाल होता - नारायण सुर्वे, दया पवार, नामदेव ढसाळ, लक्ष्मण माने, लक्ष्मण गायकवाड, उत्तम बंडू तुपे, शंकरराव खरात, शंकर पाटील, आनंद यादव, रा. रं. बोराडे, उद्धव ज. शेळके, भालचंद्र नेमाडे, प्र. ई. सोनकांबळे, शिवाजी सावंत, रणजीत देसाई यांच्यात गुणवत्ता नाही काय? त्यावर ब्राह्मणवाद्यांनी सारवासारक केली.
या देशात फक्त ब्राह्मण राहतात काय?
१२० कोटींचा देश आहे. या देशात केवळ ब्राह्मणच राहतात, असे नव्हे. इतरही जाती-जमाती आहेत. सर्वांना न्याय मिळायला हवा. बहुजन, दलित, आदिवासी यांना न्याय्य हक्कही नाकारण्यात आले आहेत. नाकारण्यात येत आहेत. जेव्हा जेव्हा न्यायाची मागणी केली गेली, तेव्हा तेव्हा ‘गुणवत्तेङ्कचा मुद्दा ब्राह्मणांकडून पुढे करण्यात येतो. ब्राह्मण सोडून इतर कोणातही गुणवत्ता नाही, असा युक्तीवाद केला जातो.
यालाच तर ब्राह्मणवाद म्हणतात.


अनिता पाटील, औरंगाबाद. 
......................................................................................

Monday, 26 September 2011

ताई तुम्ही ''जय महाराष्ट्र'' म्हणाल का?


एका वाचक भावासोबत झालेला संवाद 

माझे वाचक मला विविध प्रकारचे प्रश्न विचारतात. काहींच्या मनात प्रश्न असतात. तर काही जण अमूक विषयावर लिहा म्हणून आग्रह धरीत असतात. एका वाचने मला प्रश्न केला की, तुम्ही संभाजी ब्रिगेड किंवा मराठा सेवा संघाच्या रितसर सदस्य आहात काय? या वाचक भावासोबत झालेला माझा संवाद मी आपणा सर्वांसाठी देत आहे.

वाचक भाऊ - ताई तुम्ही संभाजी ब्रिगेडच्या किंवा मराठा सेवा संघाच्या आहात का?
मी - नाही भाऊ. मी एक लेखिका आहे. मनाला ज्या गोष्टी खुपतात त्यावर मी लिहिते. जगद्गुरु श्रीसंत तुकाराम महाराज यांच्या ‘‘भेदाभेद भ्रम अमंगळ''  या वचनाला प्रमाण मानून मी लेखन करीत असते. पण तुम्हाला हा प्रश्न का पडला?
वाचक भाऊ - तुमच्या अनेक पोस्टमध्ये मला जय जिजाऊ, जय शिवाजी दिसते. म्हणून मला हा प्रश्न पडला.
मी - भाऊ, ज्या माऊलीने शिवबासारख्या सिंहाला  जन्म दिला, ती देवी सर्व  देवतांपेक्षा श्रेष्ठ आहे. तिचा आणि तिच्या सुपुत्राचा जयघोष महाराष्ट्राच्या मातीत जन्मलेल्या प्रत्येकाने केला पाहिजे, असे माझे मत आहे. असेच लक्षावधी सजूतदार लोकांचे मत आहे. म्हणून मी जय जिजाऊ, जय शिवराय  लिहिते.
वाचक भाऊ - भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरही याच महाराष्ट्राच्या मातीचे सुपूत्र आहेत, मग तुम्ही जयभीम म्हणाल का?
मी - म्हणाल का? अहो मी जयभीम म्हणते. अभिमानाने म्हणते. महाराष्ट्राची माती रत्नांची खाण आहे. त्यातलेच एक रत्न म्हणजे डॉ. आंबेडकर.
वाचक भाऊ - ताई, तुम्हाला महाराष्ट्राच्या मातीचा एवढा अभिमान आहे, तर तुमच्या एकाही पोस्टमध्ये मला जय महाराष्ट्र दिसून आले नाही, असे का? ताई तुम्ही ''जय महाराष्ट्र'' म्हणाल का?
मी - प्रिय भाऊ आपल्या या संभाषणात मला हाच प्रश्न सगळ्यांत महत्त्वाचा वाटतो. मी जय महाराष्ट्र म्हणायचे की नाही, हे माझ्या कोण बोलते यावर अवलंबून असेल.
वाचक भाऊ - म्हणजे? मला कळले नाही.
वाचक मी- शिवसेनेचा माणूस जर मला जय महाराष्ट्र म्हणाला तर मी मुळीच जय महाराष्ट्र म्हणणार नाही.
वाचक भाऊ - कारण?
मी - कारण की, शिवसेना आणि ठाकरयांनी शिवाजी महाराजांची जेवढी बदनामी केली, तेवढी कोणीही केली नाही. जय भवानी, जय शिवाजी म्हणून राडेबाजी करणे कितपत योग्य आहे. जय भवानी जय शिवाजी म्हणून मशीद पाडणे कितपत योग्य आहे. महाराजांनी कधी कोणती मशीद पाडली नाही. जय भवानी जय शिवाजी म्हणत महाराष्ट्राबाहेरून आलेल्या गोरगरिबांवर हल्ले करणारे हात शिवसेनेचेच होते. हे गोरगरीब शिवरायांची कोणती प्रतिमा घेऊन आपल्या प्रांतात गेले असतील? जेम्स लेनला मदत करणारया बहुलकरादी कपट-कारस्थानी ब्राह्मणवाद्यांना पाठींबा  देणारी शिवसेनाच होती. बहुलकरांच्या घरी जाऊन माफी मागणारे नेते शिवसेनेचेच होते.
जय भवानी जय शिवाजी म्हणून मराठ्यांच्या, बहुजनांच्या पोरांना नादी लावून गुंडगिरी करायला लावण्याचे पाप शिवसेनेने केले. मराठ्यांच्या, बहुजनांच्या पोरांनी रस्त्यावर उतरून राडेबाजी करायची. प्रसंगी जीव द्यायचा. पोलिस केसेस अंगावर घेऊन आयुष्य बरबाद करून घ्यायचे. ठाकरयांनी मात्र आपण आणि आपली मुले बाळे ''झेड दर्जा''च्या सुरक्षेत सुरक्षित ठेवायची. १५० शहिद शिवसैनिकांचा टेंभा मिरविणारया शिवसेना नेत्यांना माझा एकच सवाल आहे. या १५० शहिदांत एक तरी ठाकरे आहे का?
या लोकांनी शिवरायांना आणि महाराष्ट्राला कलंक लावला आहे. शिवसेना वाल्यांनो,  परप्रांतीयांवर हल्ले करा. राडे करा. काय करायचे ते करा.  पण हे करताना जय भवानी, जय शिवाजी म्हणू नका. महाराजांनी गोरगरिबांवर हल्ले केले नाहीत, हे लक्षात ठेवा...

म्हणून, म्हणून म्हणते भाऊ, मी या लोकांसाठी जय महाराष्ट्र म्हणणार नाही! महाराष्ट्राबद्दल माझ्या मनातील सर्वोच्य स्थान तरीही कायमच राहील. 

Sunday, 25 September 2011

ब्लॉगचा १ महिना

प्रिय भावांनो आणि बहिणींनो,
२५ ऑगस्ट २०११ रोजी मी हा ब्लॉग सुरू केला. आता बरोब्बर महिना झाला आहे. अवघ्या महिनाभराच्या अवधीत ब्लॉग व्हिजिटचा आकडा २८०० पेक्षा जास्त झाला आहे. हा मराठी ब्लॉग विश्वातील एक विक्रमच म्हणायला हवा. तुम्हा सर्वांच्या प्रेमामुळे हे शक्य झाले. या पुढेही आपण मला असाच प्रतिसाद द्याल, याबाबत माझ्या मनात तीळमात्र शंकान नाही.. 
मी तुमच्यातीलच
मी लेखन करते म्हणून कोणी फार मोठी आहे, अशी माझी अजिबात समजूत नाही. मी तुमच्यातीलच एक आहे. फक्त मी जे काही वाचले ते आता नव्याने सांगत आहे. त्याचा बहुजन चळवळीला उपयोग होत आहे, हे माझे भाग्य एवढेच. तुम्हांकडून मिळालेल्या प्रतिसादामुळेही हुरूप आला आणि लेखन घडत गेले. यापुढेही ते असेच सुरू राहू दे, अशी जिजाऊ चरणी प्रार्थना.
तुकारामांची प्रेरणा!
हे लेखन करीत असताना जगद्गुरू श्रीसंत तुकाराम महाराजांच्या ‘भेदाभेद भ्रम अमंगळङ्क ही अभंग पंक्ती माझ्या अंत:करणात ज्योतीसारखी सतत तेवत होती. त्यामुळै जिथे अमंगळ भेद दिसून आला तिथे मी प्रहार करू शकले. हे प्रहार करतानाही ‘नाठाळांच्या काठी हाणू माथाङ्क हे तुकारामांचे वचनच मला धीर देत गेले.
मला ऋणात राहू द्या 
असो. फार पाल्हाळ न लावता. हे हीतगुज संपवते. धन्यवाद म्हणून मी तुम्हा सर्वांच्या प्रेमाला उणेपणा आणू इच्छित नाही. आपली बहीण म्हणून आपल्या सर्वांच्या ऋणात राहणे मला अधिक आवडेल.
जय जिजाऊ, जय शिवराय.  

आपलीच लाडकी
अनिता पाटील, औरंगाबाद.

बदनामी हे दुधारी हत्यार

टिळक, रानडे, गोखले यांची बदनामी करू नका
महापुरूषांच्या बदनामीचे केंद्र पुणे शहर आहे. पुण्यातील पेठा विकृतांचे अड्डे बनल्या आहेत. येथे केवळ छत्रपतींच्या बाबतीच विकृत बोलले जाते, असे नव्हे. भारतभरातील अनेक महापुरूषांबद्दल येथे विकृत विनोद सांगितले जातात. दोन वर्षांपूर्वी मी पुण्यात गेले होते. जेम्स लेनने आपल्या पुस्तकात सांगितलेल्या रस्त्यावरील विनोदापेक्षाही भयंकर विनोद मला येथे ऐकायला मिळाले. हे लोक शिवाजी महाराजांची बदनामी करतात, त्याचप्रमाणे बाजीराव पेशव्यांचीही बदनामी करतात. बाजीरावाच्या आईला बदफैली सिद्ध करण्याचा प्रयत्न करतात. इतकेच काय, बाळ गंगाधर टिळक, न्या. महादेव गोविंद रानडे आणि ना. गोपाळ कृष्ण गोखले यांच्या पित्याविषयीसुद्धा वाईट बोलतात. टिळक आणि रानडे हे दोघेही चित्पावन ब्राह्मण असले तरी रंगाने काळेकुट्ट होते, याचे भांडवल करून त्यांच्यावर विनोद केले जातात. चित्पावन हे गोरेपान, घा-या डोळ्यांचे, भु-या आणि सरळ केसांचे असतात, मग टिळक आणि रानडे हे रंगाने काळे कसे, असे द्वेष निर्माण करणारे प्रश्न हे लोक उपस्थित करतात. टिळक आणि रानडे रंगाने काळे होते, म्हणून त्यांचे ‘बायलॉजिकल फादरङ्क दुस-या कोणत्या जमातीत शोधणे हा विकृतीचा कळसच आहे. ही विकृती वेळीच ठेचायला हवी.  

येथे आणखी एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. बदनामी ही दुधारी तलवार आहे. दुस-यावर वार करताना ती आपल्यालाही लागू शकते, हे लक्षात ठेवले पाहिजे. आपण जेव्हा दुसèया जातीतील महापुरुषांची बदनामी करतो, तेव्हा दुसèया जातीचे लोकही आपल्या महापुरुषांची बदनामी करू शकतात, हे लक्षात घेतले पाहिजे. आपल्याकडे नुसतेच जातीय भेद आहेत, असे नव्हे. जातींच्या संघर्षांतून उसंत मिळाल्यानंतर आपण पोटजातींचा आधार भांडणासाठी घेतो. त्यामुळेच कोकणस्थ विरुद्ध देशस्थ, ९६ कुळी विरुद्ध पंचकुळी असाही भेद आपण अपार निष्ठेने जोपासत आलो आहोत. कोकणस्थ आणि देशस्थांमधून विस्तवही जात नाही. qवचू आणि कोकणस्थ यापैकी पहिल्यांदा कोणाला मारायचे? नि:संशय कोकणस्थाला. असे देशस्थ म्हणत असतात. हीच गोष्ट शहाण्णव आणि पंचकुळी याबाबत आहे. अशा परिस्थितीत बदनामीचा वापर हत्यारासारखा करणे कोणालाही परवडणारे नाही. मात्र, छत्रपतींच्या बदनामीच्या प्रयत्नात असलेले ब्राह्मणांचे टोळके हे विसरले. त्यामुळे आता बदनामीची ही तलवार ब्राह्मणांवर उलटली आहे. ही विकृती आहे. ती रोखणेच सगळ्यांच्या हिताचे आहे. अन्यथा गोपाळ गणेश आगरकर, लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख, विष्णूशास्त्री चिपळूणकर, तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी, महर्षी धोंडो केशव कर्वे, वि का राजवाडे, साहित्य सम्राट नर सिंह चिंतामण केळकर, आचार्य प्रल्हाद केशव अत्रे, राम गणेश गडकरी, वि. स. खांडेकर, पु. ल. देशपांडे, वि. वा. शिरवाडकर, बालगंधर्व, कुमारगंधर्व, भीमसेन जोशी यांसारख्या प्रात:स्मरणीय महापुरुषांची बदनामी आपल्याला उघड्या डोळ्यांनी पाहायची वेळ येईल. 

भेदांवर पोट भरणारांचे उद्योग
हे उद्योग कोण करते? जातीय संघर्षावर ज्यांचे पोट चालते, असे काही उपटसुंभ या उद्योगांमागे आहेत. ब्राह्मण विरुद्ध मराठा, ब्राह्मण विरुद्ध इतर जाती, मराठा विरुद्ध इतर जाती, असा संघर्ष निर्माण व्हावा, असे या विघ्नसंतोषी लोकांना वाटते. शिवरायांवर विनोद निर्माण करून हे लोक मराठ्यांना पेटवू पाहतात. आणि ब्राह्मण जातींतील महापुरुषांवर विनोद निर्माण करून ब्राह्मणांना पेटवू पाहतात. या लोकांना कोणत्याच महापुरुषाबद्दल प्रेम नसते. या विकृत लोकांचा परावभव करण्यासाठी समाजातील सर्वच जातींना एकत्र यावे लागणार आहे. 

अनिता पाटील 







Friday, 23 September 2011

अखरे ब्राह्मण नरके-सोनवणी-रामटेके यांच्यावर उलटले!


हरी नरके आणि संजय सोनवणी मधुकर रामटेके ही मंडळी अलिकडे ब्राह्मणांची बाजू घेऊन निकराने लढत आहेत. हरी नरके तर बिनजानव्याचे ब्राह्मण म्हणूनच हल्ली मिरवित असतात. मात्र जात्यंध सनातनी ब्राह्मणांना कधीही बहुजनांविषयी आस्था नव्हती, आजही नाही. हे कडवट सत्य नरके-सोनवणी-रामटेके हे त्रिकुट विसरले. स्वत:ला ब्राह्मणांच्या कळपात समाविष्ट करून घेण्यासाठी त्रिकुटाचा आटापिटा सुरूच राहिला. ब्राह्मणांना या त्रिकुटाबद्दल अजिबात आस्था नाही. ब्राह्मण यांना भाडोत्री सैनिक यापेक्षा जास्त किंमत  द्यायला तयार नाही. 
उपकारांची परतफेड ब्राह्मणवाद्यांनी केली अपकाराने!  
हे मी उगाच बोलायचे म्हणून बोलत नाही. सध्या फेसबुकवरील ब्राह्मणांमधून फिरणारया एका 'फोटो नोट'चा पुरावा समोर ठेवून मी बोलत आहे. सारे एका माळेचे मणी असे या नोटचे नाव आहे. या नोटमध्ये अनुक्रमे संभाजी ब्रिगेडचे भैय्या पाटील, मधुकर रामटेके, मूलनिवासीचे विलास खरात, तसेच संजय सोनवणी हरी नरके यांच्या विरुद्ध विषारी फुत्कार सोडण्यात आले आहेत. या पोस्टखालील चर्चेत माझ्या (अनिता पाटील) नावाचा तसेच महावीर सांगलीकर यांचाही उद्धार करण्यात आला आहे. आमचे ठीक आहे. आम्ही उघडपणे ब्राह्मणी जातीयवादाविरुद्ध मैदानात उतरलो आहोत. तसेच आम्ही अशा टीकेला कवडीची किंमत देत नाही. पण नरके, सोनवणी, रामटेके यांचे तर तसे नाही. ही मंडळी तर सनातनी ब्राह्मणवाद्यांसाठी सध्या रक्त आटवत आहे. या उपकारांची परतफेड ब्राह्मणवाद्यांनी अपकाराने केली आहे. उपकारकत्र्यावर सापासारखे उलटणे यालाच तर ब्राह्मणत्व म्हणतात. हरी नरके हेसुद्धा परवापर्यंत ब्राह्मणवादाची हीच व्याख्या करीत होते. मात्र भांडारकरमध्ये वर्णी लागली आणि त्यांचा रंग पालटला. जानवे गळ्यात नसले म्हणून काय झाले, आपल्याला या लोकांनी ब्राह्मण करून घेतले आहे, असा भ्रम त्यांना होऊ लागला. ज्यांच्यासोबत ते एकेकाळी राहिले, वाढले, त्यांच्यावरच ते दुगाण्या झाडू लागले. भांडारकरच्या जुनाट जळमटलेल्या कागदांनी एवढी नशा चढू शकते, याचा विचार कोणी स्वप्नातही केला नसेल.
ब्राह्मणवादी विकृतीला शोभणारी भाषा! 
असो. ब्राह्मणवाद्यांत फिरणारी नोट पाहून नरके आणि त्यांच्या दोन्ही मित्रांची ही भांडारकरी नशा आता नक्कीच उतरेल. या नोटमधली भाषाही ब्राह्मणांच्या अश्लिल संस्कृतीला अगदीच शोभून दिसणारी आहे. पूर्वी ब्राह्मण धर्मग्रंथांत रासलीलादी श्रृंगारिक चाळे लिहून आपल्या मनातील विकृतीला वाट मोकळी करून देत असत. आता ती सोय राहिली नाही. त्यामुळे आता हे लेख असे चाळे करीत आहेत.
ब्राह्मण होण्याचे हरीपंतांचे स्वप्न भंगले 
मला या नोटमुळे फार धक्का बसला आहे. कारण हरीपंत नरके यांचे ब्राह्मण होण्याचे स्वप्न ब्राह्मणांनी या कानावरचे जानवे त्या कानावर घालावे एवढ्या सहजतेने उडवून लावले आहे. अरेरे, फार वाईट झाले.
वाचकांच्या माहितीसाठी ब्राह्मणवाद्यांत फिरणारी ही नोट खाली देत आहे. तिच्या दोन ठिकाणच्या पोस्ट माझ्या हाती लागल्या आहेत. त्या दोन्ही खाली टाकीत आहे. त्या जरूर वाचा.


हीच ती विषारी नोट 
नोट क्र. १ 


एकाच माळेचे मणी कुणीही सरळ नाही
१) भैय्या पाटील :- नावातच भैय्या मग नेमका कुणाचा सैय्या ?
२) मधुकर रामटेके :- नावात मधु पण आहे मात्र कडू आणि परत अण्णाव म्हणजे श्री रामांच्या टेकूवर
३) विलास खराटे :- विलासी माणूस आणि खेड्याचा भोगदास मूर्ख निवासी मल मूत्र वासी
४) संजय सोनवणी :- दोन्ही पक्षातील एकमेव प्राणी
आणि या सगळ्यांचा मेरू मणी
५) हरी नरके :- नावात हरी पण विचार नरकातल्या माणसांचे तोंडावर भोळा सांब पण आतून पाताळयंत्री
खेडेकरावर केस करून याने खेड्याला प्रसिद्धी मिळवून दिली काय शट वाकडे झाले खेड्याचे
केस करून नुसता मोठेपणा मिळवला भामट्याने पुण्याच्या भांडारकर निवडणुकीत केलेले
राजकारण तर सर्वश्रुत आहेच
 ·  · Share · September 16

  • Renukadas Muley and 10 others like this.
  • View 1 share

    • Nitin Pant Aaychya gaavaat ani Baaraachya bhaavaat!
      September 16 at 11:46am ·  ·  3 people

    • बन्सीधर देशपांडे या नरक्याला नरकात घाला दुतोंडी साप आहे हा
      September 16 at 6:52pm ·  ·  3 people

    • बन्सीधर देशपांडे याचे ऐकून दुतोंडी सापाला पण लाज वाटते आणि तो भांडारकर मधील सदस्यांसारखा मान खाली करून बसतो 
      भांडार कर मधील सगळे सभासद याचे चाटे आहेत

      September 16 at 7:06pm ·  ·  1 person

    • बन्सीधर देशपांडे विलास खरात याचा मुल निवासी चाटया आहे
      September 16 at 7:07pm ·  ·  1 person

    • Dhananjay Dixit vilas kharat palun gela group madhun
      September 16 at 7:09pm ·  ·  3 people

    • चाव्कुरा पोपट palputyaa
      September 16 at 7:12pm · 

    • चाव्कुरा पोपट pan he maaleche mani aahet ka...maaleche dhonde aahet
      September 16 at 7:13pm ·  ·  1 person

    • Vikrant Phadke 
      माफ करा बन्सिजी पूर्ण घटना घडेपर्यंत असा समज करून घेऊ नये .......
      वरचे दोन आहेतच हरामी 
      पण प्रा. मधुकरजी , संजयजी आणि नरके साहेबांनी केस घातली आहे 
      आत्ता भारतीय कायदा सबळ नाही त्याला ते तरी काय करणार हो ? 
      खेड्या सुटेलच ना? कायदा बदलाने गरज...See More

      September 16 at 7:16pm ·  ·  4 people

    • Prasad Raut gote??? sadhe nahit narmadetle gote aahet..........tyanchyavarun changlya vicharancha kitihi pani gela tari kahi farak nahi tyana
      September 16 at 7:17pm ·  ·  2 people

    • Dhananjay Dixit pls follow brigedi athttps://www.facebook.com/groups/162182097180497/

      September 16 at 7:17pm · 

    • Kumar Dewlalkar मला दिलीट केलं वरील ग्रुप मधून..
      September 16 at 7:19pm ·  ·  2 people

    • Dhananjay Dixit so report dis
      September 16 at 7:22pm · 

    • Vikrant Phadke Questions And Answers ha BAI cha group ahe na?
      September 16 at 7:34pm · 

    • Nitin Pant Ho
      September 16 at 7:47pm · 

    • चाव्कुरा पोपट BAI ne malaa pan delete kela
      September 16 at 8:51pm · 

    • बन्सीधर देशपांडे हे बाई काय आहे
      Monday at 9:08am · 

    • Renukadas Muley बन्सीधरजी ,... रामटेके सोडून बाकीचे चौघे विषारी साप आहेत. त्यातील तो तोतया भय्या पाटील तर माझ्या समोरून गांडीला पाय लावून पाळलाय. आणखी दोन नवे आपण सोडलीत. एक म्हणजे अनिता पाटील उर्फ शिखंडी ( फेक अकौंट ) आणि या सर्वांचा शिरोमणी महावीर ( महामूर्ख ) सांगलीकर हे दोन महाभाग असून अन्य बरीच मोठी पिलावळ वळ-वळ करणारी आहे.
      Tuesday at 11:55am ·  ·  2 people

    • बन्सीधर देशपांडे Renukadas Muley dada रामटेके सोडून ???? patat nahi tyache vichar wacha
      Yesterday at 12:57am · 

.........................................................................................................
तृतीयरत्न रेणुकादास मुळे याच्या वाल वर सापडलेली हि आणखी एक  नोट
नोट क्र. २  
................................................................................................................

Renukadas Muley shared बन्सीधर देशपांडे's photo.


एकाच माळेचे मणी कुणीही सरळ नाही 
१) भैय्या पाटील :- नावातच भैय्या मग नेमका कुणाचा सैय्या ?
२) मधुकर रामटेके :- नावात मधु पण आहे मात्र कडू आणि परत अण्णाव म्हणजे श्री रामांच्या टेकूवर 
३) विलास खराटे :- विलासी माणूस आणि खेड्याचा भोगदास मूर्ख निवासी मल मूत्र वासी 
४) संजय सोनवणी :- दोन्ही पक्षातील एकमेव प्राणी 
आणि या सगळ्यांचा मेरू मणी 
५) हरी नरके :- नावात हरी पण विचार नरकातल्या माणसांचे तोंडावर भोळा सांब पण आतून पाताळयंत्री 
खेडेकरावर केस करून याने खेड्याला प्रसिद्धी मिळवून दिली काय शट वाकडे झाले खेड्याचे 
केस करून नुसता मोठेपणा मिळवला भामट्याने पुण्याच्या भांडारकर निवडणुकीत केलेले 
राजकारण तर सर्वश्रुत आहेच


 ·  ·  · Tuesday at 11:56am · Privacy: