Thursday, 28 November 2013

शिवरायांची समाधी शोधण्याचं श्रेय जोतिरावांचंच

पोवाडारुपी ‘शिवचरित्र’ लिहून आणि प्रकाशित करून महाराजांचा पराक्रमी वारसा घराघरांत पोहोचवण्याचं खरं श्रेय जातं ते महात्मा फुले यांनाच. जोतिरावांच्या या महान कार्यावर प्रकाश टाकलाय, प्रा. हरि नरके यांनी

शिवजयंती सुरू करण्याचे श्रेय सामान्यपणे लोकमान्य टिळक यांना दिलं जातं. १८९५-९६ साली लोकमान्य टिळक शिवजयंती उत्सवाच्या कार्यक्रमाला रायगडावर उपस्थित राहिले आणि त्यांनी या कार्यक्रमात सहभाग दिला. ही महत्त्वाची ऐतिहासिक घटना आहे. तथापि त्याआधी पंधरा वर्ष म्हणजे १८८० साली पुण्याचे महात्मा जोतिराव फुले हे रायगडावर गेल्याचे आणि तिथे त्यांनी शिवरायांची समाधी शोधून काढल्याचे महत्त्वपूर्ण ऐतिहासिक दस्तावेज उपलब्ध झाले आहेत. १८६९ साली जोतिराव फुल्यांनी मराठी भाषेतील शिवचरित्र (पोवाडा रूपी) लिहून प्रकाशित केले आहे. आणि शिवाजी महाराजांचा अभिमानास्पद वारसा घराघरात पोहोचवला. छपाईची सुरूवात झाल्यापासूनचे मराठीतले हे पहिले शिवचरित्र आहे. जोतिरावांनी सत्यशोधक चळवळीच्या प्रेरणा सांगताना शिवरायांना महत्त्वाचे स्थान दिलेले आहे. जोतिरावांच्या सगळ्या लेखनात, आणि भाषणांमध्ये शिवरायांचा प्राधान्याने उल्लेख आढळतो. त्यांच्या शिवचरित्राच्या आजवर २५ हून अधिक आवृत्त्या प्रकाशित झालेल्या आहेत. त्याची भाषांतरंही विविध भाषांमध्ये झालेली आहेत. १८८० साली जोतिराव पुण्यातून चालत रायगडावर गेले. तिथे झाडा-झुडपात हरवलेली आणि पालापाचोळ्यात दिसत नसलेली शिवरायांची समाधी जोतिरावांनी मोठ्या कष्टाने शोधून काढली. त्याठिकाणी साफसफाई केली व शिवरायांच्या समाधीवर फुले वाहिली. ही माहिती जोतिरावांनी पुण्यात येऊन सारसबाग जवळ असलेल्या हिराबागेत आयोजित केलेल्या शिवसमाधी विषयक सभेत स्वतः सांगितल्याची नोंद मिळालेली आहे. या सभेत साफळकर स्वामी, गंगारामभाऊ म्हस्के आदी मान्यवर पुणेकरांची भाषणे झालेली होती. त्याच सभेत शिवजयंची उत्सव सुरू करण्याचा विचार जोतिरावांनी मांडला. आणि त्याला सर्वानुमते पाठिंबा देण्यात आला. त्या बैठकीत शिवजयंतीसाठी लोकवर्गणी जमवण्याचा निर्णय झाला. एकूण २७ रूपये त्या सभेत जमले. त्यातील तीन रुपये स्वतः जोतिरावांनी दिले. १८८०साली पुण्यात आणि रायगडावर शिवजयंती उत्सवाची जोतिरावांनी सुरूवात केली. त्यांचे सहकारी कामगार नेते रावबहादूर नारायण मेघाजी लोखंडे यांनी मुंबईच्या लालबाग आणि परळ या गिरणी कामगारांच्या वस्त्यांमध्ये शिवजयंती उत्सव सुरू केला. हा उत्सव सत्यशोधक मंडळी अतिशय भव्य प्रमाणात करत असत. १८९३ साली गणेशोत्सवाला सार्वजनिक रूप देऊन टिळकांनी त्याचे चळवळीमध्ये रूपांतर केले. त्यांना शिवजयंतीचेही महत्त्व वाटत होते. म्हणूनच पंधरा वर्षे सुरू असलेल्या राष्ट्रीय कार्यक्रमात टिळक जातीने उपस्थित राहिले. आणि आपला सहभाग देऊन त्यांनी हा उत्सव आणखी मोठा केला.

१८८२ साली टिळक-आगरकरांना शिवाजी महाराजांच्या वंशजाबद्दल केलेल्या लेखनासंदर्भात एका खटल्याला सामोरं जावं लागलं. त्यावेळी त्यांना डोंगरीच्या तुरुंगात राहावं लागलं. महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाचे खजिनदार रामशेठ बापुशेठ उरवणे यांना रूपये दहा हजार रोख घेऊन जामिनासाठी मुंबईला पाठविलं. आपल्या जामिनासाठी जोतिरावांनी ही धडपड केल्याचे खुद्द टिळक आगरकरांनी ‘केसरी’मध्ये नमूद केली आहे. टिळक-आगरकर तुरुंगातून सुटल्यावर सत्यशोधकांनी त्यांची वाजतगाजत मिरवणूक काढली, सत्कार करून मानपत्र दिले. हे मानपत्र ‘केसरी’मध्ये छापून आलं. उरवणे यांच्या मृत्युनंतर खुद्द टिळकांनी या आठवणींना उजाळा दिला. तेव्हा पोलिस खात्याचे अहवाल, सत्यशोधक चळवळीचे दस्तावेज, पुरावा लेखागारातील कागदपत्रे आणि सत्यशोधक माधवराव बागल यांनी १९३३ साली सत्यशोधक समाज हिरक महोत्सव ग्रंथात केलेले लेखन, हे सर्व दस्तावेज असे सांगतात की, जोतिरावांनी १८८० साली देशात सर्वप्रथम शिवसमाधी शोधणं, तिचे सुशोभिकरण करणं आणि शिवजयंती उत्सव सुरू करणं, अशी महत्त्वपूर्ण ऐतिहासिक कामे केलेली आहेत.

जामिन आणि मानपत्र याबाबतची नोंद तर खुद्द टिळकांनी केली आहे. तेव्हा आज आपण असे म्हटले पाहीजे की, शिवजयंती सुरू करणारे जोतिराव आहेत आणि ती मोठी करण्यात लोखंडे आणि लोकमान्य टिळक यांचा महत्त्वाचा वाटा आहे.

राष्ट्रवादी कोंग्रेसच्या वेब साईटवरून साभार 
मूळ लिंक येथे पाहा : http://ncp.org.in/stories/ourachievers/260

Thursday, 21 November 2013

सनी लिओनला भारतरत्न का नाही? Why Bharat Ratna Not Been Conferred On Sunny Leone

राहुल पगारे


तो जर क्रिकेट चा देव तर ती हि मोक्ष देवता .दोघे हि शुद्ध व्यावसायिक पैसा साठी खेळणारे. सचिन ने म्हणे लाखो चाहत्यांचे मने जिंकलेत तर सनी लिओन ने हि कित्येकांना मनोरंजन तर दिलेच दिले परत्नू कित्येकांना मोक्ष हि दिला असेल. सचिन जर चरित्रवान तर काय सनी लिओन कमी चरित्रवान आहे …? सनी लिओन ज्या व्यवसायात आहे जिथे प्रयत्न करूनही चरित्र हनन होऊ शकत नाही.

सचिन ला सोशल साईटवर खूप लाईक भेटतात तर काय सनी ला कमी लाईक भेटतात? सचिन ने एवढे नाव कमावले नसेल एवढे नाव सनी ने जग भरात भारता साठी कमावले असेल. जगात भारतीय म्हणून इंदिरा गांघी यांनाहि कोणी ओळखत नसेल एवढे सनी ला लिओन ला ओळखले जाते. असे असूनही एक स्री म्हणून तिची दखल घेतली गेली नाही ...!

सनी लिओन ला ती करत असलेल्या व्यवसाया बद्दल भारतरत्न द्यालाच हवा, कारण भारतरत्न आता समाज कार्या साठी नव्हे तर शुद्ध व्यवसाया साठी दिला जातो ! काहीना गाणे गायल्या बद्दल तर काहीना उगाच काही लिहिता येते म्हणून लिहत असल्या बद्दल,काहीना नाटकात सिनेमात काम केल्या बद्दल तर काहीना पैसा साठी खेळल्या बद्दल हि भारतरत्न वाटला जातो… ख़रच. 



Monday, 11 November 2013

शास्रीय संगीत आणि लोकसंगीत ?

- राहुल पगारे

जर आम्हाला एखादे संगीत ऐकला आवडत असेल तर ते म्हणजे लोक संगीत. लोकसंगीतात जो बाज आहे तो शास्रीय संगीतात नाही. किंवा आपण असेही म्हणू शकतो की, शास्रीय संगीतात असा बाज असूच शकत नाही. शास्रीय संगीत बामनाचे तर लोकसंगीत मूलनिवासी भारतीयांचे, बहुजनांचे. शास्रीय संगीत तोच स्विकारू शकतो जो सधन आहे आणि समाजाशी अंतर ठेवून जो आहे.

लोकसंगीत फक्त मनोरंजन करत बसत नाही. असे ही म्हणा की, लोकसंगीत मनोरंजन करतच नाही. ते समाज प्रबोधनाचेच काम करते. लोक संगीत नाकातून व कसले कसले मार्गातुन उगाच आवाज़ काढत बसत नाहि. समाज प्रबोधन म्हणजे बामनाचे डोके सरकणारच कारण समाज कुषातच तो बामन भुंगा लपून बसला आहे.

इतके असून ही शास्रीय संगीत हे ३ टक्के बामनांचे कमालीचे आर्थिक उत्पंन मिळवून देणारे साधन आहे. बिचारे आमचे लोकसंगीतक़ार कला असून ही उपाशीच आहेत. बहुजनांनो विचार करा, आमचा समाज प्रबोधन करणारा उपाशी ठेवायचा की शास्रीय अश्लील संगीत म्हननारे पोसायचे आहे?


राजा श्री शाहू छत्रपति

बहुजनांचा मुलनिवासियांचा राजा छत्रपति ।
वंशज खरा महारठ्थ शोभतो शिवरायांच्या प्रति ।।
रयेतेच्या कल्यानासाठी चिंता त्याच्या उरी ।
बहुजनाच्या समतेसाठी झटला रात्र अन दिनी ।।

विषमतेच्या अग्नीत जळ्तो समतेचा मानकरी ।
घेतली शपथ नष्ट करण्या ती वैदिक भोंदुगिरी ।।
लावुनी सुरुंग त्या भटशाहिला पोकळ गड तो केला ।
तुड्वुनी पायी मनुवाद्याला शेंडीसकट आपटला ।।

घडविला इतिहास नवा तयाने राज थाट त्यागिला ।
सोडुनी स्वर्ण सिंहासन तयाने जन नायकात अवतरला ।।
रायेतेची ज्याने सेवा मानली महापरम पारमिता ।
महापुरुषाची स्वप्ने सार्थिले तो लोकशाहीचा नेता ।।

मेरु हिमालय अचल निष्टा,तो शिववंशांची शान ।
ज्योतिरावांचा ज्ञानप्रदीप तो, जन समतेचा प्राण ।।
न्यायनिष्ट तो, समताधिष्ट तो, सतप्रिय तो बहुमान ।
लोकसंत तो, ज्ञान गंध तो नागवंशीय अभिमान ।।

-राहुल पगारे. 

Sunday, 10 November 2013

मंगेशकर नावाची लोभाची मांजरे

लताबाई यांच्याकडून प पुरस्कारासाठी वशिलेबाजी

राजा मइंद, संपादक मंडळ सदस्य, अपाविमं. 


झाले लोभाचे मांजर । विषया हिंडे दारोदार ।। असे तुकोबांचे एक वचन आहे. हे वचन मंगेशकर घराण्याला तंतोतंत लागू पडते. लताबाई पासून उषाबाई- मीनाबाई यांच्यापर्यंत सगळे मंगेशकर प्रचंड लोभी आणि स्वार्थी आहेत, हे वारंवार सिद्ध होत आले आहे. लताबाई यांनी आपली बहीण उषा मंगेशकर यांना प पुरस्कार मिळावा यासाठी शिफारस पत्र गृहमंत्रालयाला पाठविल्याची बाब नुकतीच उजेडात आली आहे. माहिती अधिकार कार्यकर्ते सुभाष अगरवाल यांनी एक अर्ज करून केंद्रीय गृहमंत्रालयाकडून माहिती मागविली होती. त्यात विविध क्षेत्रातील १३०० शिफारशी गृहमंत्रालयाने जाहीर केल्या. 

एक बहीण, दुसरा इस्टेट एजंट
लता मंगेशकर यांनी उषा मंगेशकर आणि गायक सुरेश वाडकर अशा दोघांना प परुस्कार मिळावा म्हणून शिफारस केली होती. लताबाई आणि उषाबाई या सख्ख्या बहिणी आहेत. तर सुरेश वाडकर हे लताबार्इंचे इस्टेट एजंट म्हणून काम करतात. कोल्हापुरातील जयप्रभा स्टुडिओची जमीन विकण्याच्या प्रकरणात सुरेश वाडकर हेच लताबाई यांच्या वतीने व्यवहार पाहत होते. 
मंगेशकरांना भारतातील सर्व पुरस्कार मिळून झाले आहेत. स्वतः लताबाई यांना भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार भारतरत्न मिळाला आहे. आशा भोसले आणि हृदयनाथ मंगेशकरांना प पुरस्कार मिळाला आहे. तरीही मंगेशकरांची पुरस्कारांची हाव सुटत नाही. 

धडपड पुरस्कारासाठी की आर्थिक लाभासाठी
प पुरस्कार हा नुसता पुरस्कार नाही. हा पुरस्कार मिळाल्यानंतर दरमहा मोठे मानधनही मिळते. हा आर्थिक लाभ मुख्यतः लोभाचे कारण आहे. खरे म्हणजे गाण्याचा धंदा करून मंगेशकरांनी अब्जावधी रुपये कमावले आहेत. धंदा-पाणी करणे हा घटनेने दिलेला अधिकारच असल्यामुळे त्यावर काही आक्षेप घेण्याचे कारण नाही. तथापि, अब्जावधी रुपयाची माया स्वतः जवळ असतानाही प पुरस्कारातून मिळणाèया थोड्याशा पैशासाठी मंगेशकर मंडळी धडपड करू लागतात, तेव्हा त्यांच्या लोभीपणाची शिसारी येते.



संबधित लेख