लताबाई यांच्याकडून प पुरस्कारासाठी वशिलेबाजी
राजा मइंद, संपादक मंडळ सदस्य, अपाविमं.
झाले लोभाचे मांजर । विषया हिंडे दारोदार ।। असे तुकोबांचे एक वचन आहे. हे वचन मंगेशकर घराण्याला तंतोतंत लागू पडते. लताबाई पासून उषाबाई- मीनाबाई यांच्यापर्यंत सगळे मंगेशकर प्रचंड लोभी आणि स्वार्थी आहेत, हे वारंवार सिद्ध होत आले आहे. लताबाई यांनी आपली बहीण उषा मंगेशकर यांना प पुरस्कार मिळावा यासाठी शिफारस पत्र गृहमंत्रालयाला पाठविल्याची बाब नुकतीच उजेडात आली आहे. माहिती अधिकार कार्यकर्ते सुभाष अगरवाल यांनी एक अर्ज करून केंद्रीय गृहमंत्रालयाकडून माहिती मागविली होती. त्यात विविध क्षेत्रातील १३०० शिफारशी गृहमंत्रालयाने जाहीर केल्या.
एक बहीण, दुसरा इस्टेट एजंट
लता मंगेशकर यांनी उषा मंगेशकर आणि गायक सुरेश वाडकर अशा दोघांना प परुस्कार मिळावा म्हणून शिफारस केली होती. लताबाई आणि उषाबाई या सख्ख्या बहिणी आहेत. तर सुरेश वाडकर हे लताबार्इंचे इस्टेट एजंट म्हणून काम करतात. कोल्हापुरातील जयप्रभा स्टुडिओची जमीन विकण्याच्या प्रकरणात सुरेश वाडकर हेच लताबाई यांच्या वतीने व्यवहार पाहत होते.
मंगेशकरांना भारतातील सर्व पुरस्कार मिळून झाले आहेत. स्वतः लताबाई यांना भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार भारतरत्न मिळाला आहे. आशा भोसले आणि हृदयनाथ मंगेशकरांना प पुरस्कार मिळाला आहे. तरीही मंगेशकरांची पुरस्कारांची हाव सुटत नाही.
धडपड पुरस्कारासाठी की आर्थिक लाभासाठी
प पुरस्कार हा नुसता पुरस्कार नाही. हा पुरस्कार मिळाल्यानंतर दरमहा मोठे मानधनही मिळते. हा आर्थिक लाभ मुख्यतः लोभाचे कारण आहे. खरे म्हणजे गाण्याचा धंदा करून मंगेशकरांनी अब्जावधी रुपये कमावले आहेत. धंदा-पाणी करणे हा घटनेने दिलेला अधिकारच असल्यामुळे त्यावर काही आक्षेप घेण्याचे कारण नाही. तथापि, अब्जावधी रुपयाची माया स्वतः जवळ असतानाही प पुरस्कारातून मिळणाèया थोड्याशा पैशासाठी मंगेशकर मंडळी धडपड करू लागतात, तेव्हा त्यांच्या लोभीपणाची शिसारी येते.
संबधित लेख
No comments:
Post a Comment