चिरंजीव परशुराम उर्फ आदिनारायणाचा अवतार यास--
मुक्काम सर्वत्र ठायी,
अरे दादा परशुरामा, तूं ब्राह्मणांच्या ग्रंथांवरून चिरंजीव आहेस. तूं कडू कां होईना, परंतु विधिपूर्वक कारली खाण्याचा धिक्कार केला नाहीस. तुला पहिल्यासारखे कोळ्यांच्या मढ्यापासून दुसरे नवीन ब्राह्मण उत्पन्न करावे लागणार नाहीत. कारण हल्ली येथे तू जे मढ्यापासून उत्पन्न केलेले ब्राह्मण (आहेत) त्यांपैकी कित्येक ब्राह्मण ‘विविधज्ञानी' बनून बसले आहेत. त्यांना कांही अधिक ज्ञानसुद्धा देण्याची तुला जरूरी पडणार नाही. फक्त तूं येथे ये आणि त्यांनी शूद्रांची गाजरे खाल्ल्याबद्दल त्यांस चांद्रायण प्रायश्चित्त देऊन त्यांच्याकडून तुझ्या वेदमंत्रजादूच्या सामथ्र्याने पहिल्यासारखे काही चमत्कार इंग्लिश, फ्रेंच वगैरे लोकांस करून दाखीव म्हणजे झाले. तू असा तोंड चुकवून पळत फिरू नको. पण एकंदर सर्व जगांतील लोक तू सर्वसाक्ष आदिनारायणाचा अवतार खास आहेस म्हणून मान देतील. व तू तसे न केल्यास येथील महारमांग आमच्या म्हसोबाच्या पाठीस लपून बसलेल्या तुझ्या विविधज्ञानी म्हणविणाèया ब्राह्मण बच्चांस ओढून आणून त्यांची फटफजीती करण्यास कधी कमी करणार नाहीत. आणि तेणेंकरून त्यांच्या तुणतुण्याची तार तुटून त्यांच्या झोळींत दगड पडल्याने त्यांस विश्वामित्रासारिखे उपाशी मरू लागल्यामुळे कुत्र्याचे फरे खाण्याचा प्रसंग आणू नको.
आपला खरेपणा पहाणारा,
जोतीराव गोविंदराव फुले,
तारीख १ ली, माहे आगस्ट
सन १८७२ इसवी, पुणे,
No comments:
Post a Comment