Wednesday 12 September 2012

मराठ्याचे ब्राम्हणकांड

ह मो मराठ्यांनी  आपल्या निवडणूक प्रचार पत्रकातील मजकुराबद्दल दिलगिरी अखेर व्यक्त केली. परंतु तो पर्यंत पुलाखालून ( आणि वरूनही ) बरेच पाणी वाहून गेले होते .
ह. मो. नी हे पत्रक कोणत्या हेतूने काढले होते हे जगजाहीर आहे. त्यांना चिपळूण
साहित्य संमेलनाचा अध्यक्ष होण्यासाठी ब्राम्हण साहित्यिकांची मते हवी होती.
हा   ग्रहस्थ केवळ साहित्य संमेलनाचा अध्यक्ष होण्यासाठी पहिल्यांदा असे करतोय असे नाही
तर गेल्या अनेक वर्षापासून ब्राम्हणाची बाजू मांडण्याच्या नावाखाली याने पुन्हा नव्याने
ब्राम्हण- ब्राम्हणेतर वाद उकरून काढला आहे त्याने खरडलेल्या काही कंचुकी-पुस्तिकाची
नुसती नावे जरी वाचली तरी हा 'कावळा' कोणत्या 'निष्पर्ण झाडाच्या शेंड्यावर' बसून
कुठे 'काकस्पर्श' करीत आहे हे लक्षात येते. या कावळ्याने वेळोवेळी टाकलेल्या 'शीटा' ची
ही नावे पहा १) ब्राम्हण मानस २)ब्राम्हण निंदेची नवी लाट ३)विद्रोही ब्राम्हण ४) ब्राम्हण चळवळ
कशासाठी ? ५) गंध,शेंडी,जानवे आणि ब्राम्हण चळवळ ६) ब्राम्हणांना आणखी किती झोडपणार ?
७) आधी रोखल्या बंदुका आता उगारल्या तलवारी ( आर्थात ब्राम्हनावर ) ८) ब्राम्हण,शिवधर्म आणि स्वदेश ई ई ई
वाचलीत ही पुस्तकांची नावे ?  या पुस्तकांचा मसुदा काय असेल याचा अंदाज केवळ नावे वाचली
तरी लक्षात येतो. या  प्रत्येक पुस्तकात केवळ ब्राम्हणाचा पुळका नाही तर ब्राम्हणेतरा बद्दल
तुच्छता आणि वर्णविद्वेषी गरळ आहे. मराठा, दलित, साळी,माळी, कोळी अशा ब्राम्हणेतर बहुजन समाजातील अठरापगड जाती बद्दल त्यांचा निर्मिती आणि रचने बद्दल 
अतिशय हीन भूमिका ठेवून शंका उपस्थित केल्या   आहेत.
       'ब्राम्हण समाज सुधारक ', ' ब्राम्हणाचे पुरोगामित्व '  ' ब्राम्हणाचे शोर्य ' असे चमत्कारिक शब्द प्रयोग करताना मराठ्यांना चक्क पळपुटे ; व्यभिचारी आणि धोकेबाज व 
फितूर गुणसूत्रांची जमात ठरवण्याचे धाडस याने केले आहे . व्यक्तीची शुद्धता .पावित्र्य ,प्रामाणिकता ,
निष्ठा ,आणि देशप्रेम देखील त्याच्या ब्राम्हण असण्या नसण्यावर अवलंबून असण्याचा संकेत देणारे लेखन 
या पुस्तकांच्या पानोपानी आहे . 
         असा जात्यंध कावळा मराठीसारस्वताच्या सर्वोच्य स्थानी  बसला तरी वर कावकाव आणि खाली घाणच 
करणार ! म्हणूनच त्यावर केवळ पोलिसात केस दाखल करणे पुरेसे नाही तर कुठल्या स्थितीत त्याला 
साहित्य संमेलनाचा अध्यक्ष न होऊ देणे आणि  जातीय  समीकरणे जुळून झालाच   तर त्याला अध्यक्ष पदाच्या 
खुर्चीवरून खाली खेचून त्याची जागा दाखून देणे गरजेचे आहे .
……………………

हे लेख अवश्य वाचा :

No comments:

Post a Comment