Sunday 29 April 2012

ब्राह्मणांनी चित्रपटसृष्टीचाही खोटा इतिहास लिहिला



दादासाहेब फाळके नव्हे गोपाळ तोरणे 
भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक म्हणून गोविन्द धुन्डिराज उर्फ दादासाहेब फाळके यांचे नाव घेतले जाते. तथापि, ही तद्दन थाप असल्याचे पुरावे आता समोर येत आहेत. भारतीय चित्रपटसृष्टीची सुरूवात गोपाळ रामचंद्र तोरणे यांनी केली होती. तथापि, तोरणे हे बहुजन समाजातील असल्यामुळे त्यांचे नाव ब्राह्मणी व्यवस्थेने दाबून टाकले. आणि दादासाहेब फाळके या तोतयाचे नाव पुढे केले. खोटा इतिहास कसा लिहावा, याचे हे आणखी एक उदाहरण यानिमित्ताने समोर आले आहे. लोकमतने रविवार दि. २९ एप्रिल रोजीच्या अंकात यासंबंधीचे वृत्त प्रसिद्ध केले आहे.

दादासाहेब फाळके यांचा ३ मे १९१३ ला प्रदर्शित झालेला ‘राजा हरिश्‍चंद्र’ हा पहिला भारतीय मूकपट असल्याचे मानले जाते, पण फाळकेंच्याही आधी भारतीय सिनेसृष्टीची मुहूर्तमेढ रामचंद्र गोपाळ तोरणे उर्फ दादासाहेब यांनी रोवल्याचा दावा करण्यात आला आहे. तोरणेंनी १८ मे १९१२ रोजी ‘पुंडलिक’ नावाचा सिनेमा प्रदर्शित केल्याचा दावा मराठी सिनेनिर्माते तसेच इम्पाचे (इंडियान मोशन पिक्चर्स प्रोड्युसर्स असोसिएशन) संचालक विकास पाटील यांनी पत्रकार परिषदेत केला. न्यायालयाकडे धाव घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.

मूळचे सिंधुदुर्गकर असलेल्या दादासाहेब तोरणे यांनी नाटकाचे रेकॉर्डिंग केले. त्याची निगेटीव्ह लंडनहून डेव्हलप करून ‘पुंडलिक’ नावाने चित्रपट प्रदर्शित केला. १८ मे २0१२ रोजी कोरोनेशन या मुंबईतील सिनेमागृहात ‘पुंडलिक’ दोन आठवडे चालला, पण त्याला सिनेमा म्हणून मान्यता मिळाली नव्हती असे सांगण्यात येते. वर्षभरानंतर दादासाहेब फाळकेंचा ‘राजा हरिश्‍चंद्र’ हा मूकपट ‘कोरोनेशन’मध्येच प्रदर्शित झाला. पाटील यांच्या म्हणण्यानुसार तोरणेंचे कार्य महान असून आजवर त्यांना डावलण्यात आले आहे. त्यांच्या कार्याकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे.

लोकमतमधील मूळ बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा





No comments:

Post a Comment