Monday, 19 March 2012

पू.ल. देशपांडे : हरमाल विकणारा लबाड "वल्ली" !




नव्या पिढीतील अभ्यासक, विचारवंत श्री. रवींद्र तहकीक यांनी महाराष्ट्राचे कथित लाडके व्यक्तिमत्व पू. ल. देशपांडे यांचे मोठेपणाचे पितळ उघडे पाडणारा जबरदस्त लेख लिहिला आहे. तो वाचक भावा-बहिणींसाठी येथे देत आहे.
....................................................................

पू.ल. देशपांडे : हरमाल विकणारा लबाड वल्ली



मराठीतील एक प्रसिद्ध कादंबरीकार आणि समीक्षक डॉ.भालचंद्र नेमाडे यांनी एकेठिकाणी असे म्हटले आहे की ‘ मराठी साहित्यात लाडके व्यक्तिमत्व हा जगात कोठेही न आढळणारा अजब प्रकार पहायला मिळतो. लेखक किंवा कवी लोकप्रिय ( खरेतर वाचक प्रिय ) असू शकतो तो पर्यंत सर्व काही ठीक असते परंतु एकदा का तो लाडका बनला की मग तो नाही ती थेरं करायला आणि सर्वाना गृहीत धरायला सुरुवात करतो.

मला वाटते ; नव्हे खात्रीच आहे की नेमाडेंचे वरील वाक्य केवळ आणि केवळ पु. ल. देशपांडे या आणि याच लेखन कामाठ्याला  लागू होते . लोक त्यांना मराठीतले महान आणि अभिजात (? ) विनोदी लेखक वैगैरे मानतात. आमच्या कडे दुध घालणारा गवळी देखील त्याच्या म्हशीला कतरिना कैफ म्हणतो. आणि भावात २ रुपये जास्तीचे मागतो.  कोजागिरीच्या आयटम मिल्क चे वेगळे !


साहित्यातला दहशतवादी 
असो सांगायचा मुद्दा हा की पु ल देशपांडे हा ‘व्यक्ती‘ साहित्याचा हरमाल विकणारा एक पोटार्थी ‘वल्ली‘ माणूस होता इतकेच ! त्याला काहीच वज्र्य नव्हते. शिरवाडकर तरी किमान मनाची नाहीतरी जनाची लाज बाळगून
नाटक आणि कविता या पलीकडे रेकले नाहीत ; परंतु या कावळ्याने बारा पिंपळा खालचा एकही मुंजा ‘रंगवल्या'  शिवाय सोडला नाही. अगदी कुणाच्या दहाव्याच्या पिंडाला सुध्धा हें लाडकं व्यक्तिमत्व  ‘शिवल्या शिवाय त्या मृतात्म्याला स्वर्गात जागा मिळणार नाही असं दहशतीचं वातावरण मराठी साहित्य वर्तुळात बनलं होतं .


सगळी मडकी उष्टी करणारा बोका 
यानं काय केलं नाही म्हणून विचारा ? विनोदी (?) लेखन केलं,
व्यक्तीचीत्रणं लिहिलीङ्क, नाटकं लिहिली, कविता लिहिल्या , आकाशवाणीवर
बातम्या आणि निवेदनं केली , एकपात्री नाटकाचे प्रयोग केले , गाणी लिहिली,
सिनेमाच्या कथा -पटकथा लिहिल्या , सिनेमात काम ही केली, प्रवास वर्णन लिहिली ,
मेळ्यात -नाटकात कामं केली ; गायन केलं , संगीत दिलं , ठीक ठिकाणी पेड पाहुणा
म्हणून हिंडला , पेपर मध्ये वार्ताहर /संपादक म्हणून ही कामं केली , समीक्षा लिहिली .......मराठी साहित्य संगीत आणि नाटक सिनेमातील असं एकही मडकं या लबाड  बोक्याने तोंड घालून उष्टे करायचे बाकी ठेवलेले नाही.


हा तर बहुश्रुत रेडाच 
कुणी याला बहुश्रुत बहुआयामी अष्टावधानी वैगेरे म्हणेल ; ( म्हणोत बिचारे ) या नियमाने रेड्याला देखील बहुश्रुत म्हणता येयील ; कारण तो देखील  भातशेतीत कुळव ओढतो .  पूर्वी पखालिनी पाणी वाहत असे , शिवारभर  चरून शेण मात्र मालकाला  देतो , म्हशीनी वंश वृद्धी करावी आणि वरतून पुन्हा दुधही द्यावे या साठी
महत्वपूर्ण योगदान देतो, दसर्याला टकरी खेळतो ....आणि शिवाय त्याच्या पाठीवरून प्रत्यक्ष ज्ञानेश्वरांचा  हात फिरून त्याच्या मुखी वेद प्रगटल्याचा दाखला आहेच !

साहित्य नव्हे निव्वळ 'खोगीर भरती'!
थोडक्यात पु लं ची साहित्य कामाठी म्हणजे एक ना धड भारा भर चिंध्या अशी होती ; निव्वळ खोगीर भरती ;
भारत ,भारतीय माणूस ,मराठी माणूस या बद्दल कायम ओशाळवाणे आणि टिंगल टवळी वजा लेखन करण्यात या रेड्क्याने आपली हयात घातली; शाब्दिक कोट्या आणि व्यक्तिमत्वातील व्यंगांचे प्रदर्शन करणाऱ्या या महाभागाने त्याने घातलेल्या अनेक उकिरड्याच्या ढिगात एक तरी सामाजिक संदेश दिला आहेका ?
हें तपासून पहा; केवळ हसवणूक ( खरे तर फसवणूक ) करणारा एक पोटार्थी विदुषक सर्कशीतील सगळ्या कसरती थोड्या थोड्या ( त्या ही विनोदी पद्धतीने ) करून शकतो म्हणून तो थेट लाडका कसा काय होऊ शकतो ? हां भोळ्या भाबड्या मराठी रसिकांना  बाष्कळ बालिश विनोदाचा रतीब घालून ‘ ते राज हंसाचे पोहणे
आहे ‘ हा गोड गैरसमज पसरवन्या एवढा तो लबाड होता हें मात्र नक्की !
-रवींद्र तहकीक 

अंगप्रदर्शन करणा-या नट्या ब्राह्मण, अन् संस्कृतीच्या नावाखाली त्यांना विरोध करणारेही ब्राह्मणच!


श्री. रवींद्र तहकीक यांनी एका माथेफिरू ब्राह्मणवाद्यास लिहिलेले सडेतोड पत्र. हा वादी स्वतःला  मोहक म्हणून घेतो!  तहकीक यांचा हा लेख मुद्दाम वाचकांसाठी येथे देत आहे.
.................................................................................
श्री.  तहकीक  लिहितात :


अरे ब्राह्मणवाद्या, तुझा अनिता पाटील किंवा छावा, संभाजी ब्रिगेड
वैगैरे संघटनावर काय वैयक्तिक राग असेल तो वैयक्तिक पातळीवर
काढ.  सरसगट मराठा समाज आणि जातीवर चिखलफेक नको !
वाईट आणि भ्रष्ट वृत्ती - प्रवृत्ती   एकाच जातीत असते; असे म्हणणे किंवा
स्वार्थ, अनैतिकता फंद- फितुरी हा कुणा एका जातीचा गुणधर्म आहे
असे म्हणणे प्रतिवाद म्हणून चालणारे असले तरी सत्याच्या कसोटीवर
टिकणारे नाही. उणी दुणी आणि उदाहरणेच द्यायची असल्यास तू जसा
मराठा समाजाच्या  नखातला राई एवढा मळ काढून ते पर्वता एवढे
पातक असल्याचा कांगावा करतो आहेस तसा मला ही ( म्हणजे कुणालाही )
ब्राम्हण बद्दल देखील करता येयील. उलट हजारो वर्षापासून धर्मसत्ता एकहाती
ताब्यात असल्याने आणि राजसत्तेत देखील  ( रामायण -महाभारत काळापासून मोर्य,गुप्त ,
शक-शालिवाहन,यादव, मोगल, मराठे, राजपूत, डच, हून , पोर्तुगीज,इंग्रज आणि आता
लोकशाहीत सुध्धा ) कायम प्रशासन आणि सल्लागार म्हणून ब्राम्हनांचेच वर्चस्व असल्याने
ब्राम्हणांच्या अनैतिक अचरनांची लाखो उदाहरणे पुराव्या सह सांगता येतील.
( पेशवे किंवा शिवसेनेच्या सत्ता काळात राजसत्ताही आली तो अपवाद/ खरे तर ब्राम्हणांना
त्यात रस नाहीच. फळे चाखायची सोडून मळे कोन राखील ? )


शिवाय कोणत्याही धर्म/जाती /समाज समूहाला दीर्घकालीन दिशा दर्शक ठरणारे
लिखत साहित्य हा प्रांत देखील पुरातन काळा पासून आजतागायत बहुसंख्येने ब्राम्हनांच्याच
वर्चस्वाखाली आहे; त्याचा त्यांनी गैरफायदा घेतला नाही असे तू छातीठोक पणे
म्हणू शकतोस काय ?

थोडक्यात एक अनिता तुझ्या  पूर्वजांच्या  हजारो पिढ्यांनी रचलेल्या बुलंद बुरुजाला धडाका
घेत असेल तर तो तिचा वेडेपणा आहे खास. त्यात तिचाच कपाळ मोक्ष आहे, हें ही निर्विवाद !
( जिथे ज्ञानेश्वर , तुकाराम , एकनाथ , शिवाजी , गांधी,  विनोबा , फुले शाहू ,आंबेडकर ,
कर्वे - आगरकर टवका ढिला करू शकले नाही  तिथे अनिता च्या टकराणी काय होणार ? )
असो; मला वाटते तू अनिताला किमान बोलू लिहू द्यायला हवे.


मराठा समाजाला दुषणे देण्या पेक्षा आपल्या समाजाच्या दिव्या ( बुडा )  खाली किती
अंधार आहे याचे आत्मपरीक्षण करावे. ( एक झलक ; सिनेमातील अंगप्रदर्शन या बद्दल
बॉम्ब मारणारे संस्कृती रक्षक कोन ? तर ब्राम्हण आणि अंग प्रदर्शन करणाऱ्या हिरोइन्स
कोन ? तर ( विद्या बालन, उर्मिला मातोंडकर / ममता कुलकर्णी /वर्षा उसगावकर /माधुरी दीक्षित / मधु सप्रे ई ई ई )
ब्राम्हनच ! तेंव्हा .....कशाला एकमेकाचा वास घेताय ?

तलवारी उपासल्याकी सर्वांचेच रक्त सांडते......शत्रूचेही आणि आपले सुध्धा !  नाही का ?

Saturday, 17 March 2012

मार्च महिन्यातील कडू-गोड प्रतिक्रिया


भावांनो आणि बहिणींनो,
माझ्या लेखांमुळे जातीवादी लोकांचा तीव्र जळफळाट होत आहे. खरे बोलल्यास सख्ख्या आईला राग येतो, अशी म्हण मराठीत उगाच नाही. जातीयवादी लोक मला नाऊमेद करण्यासाठी अनेक मार्गांचा अवलंब करीत असतात. माझ्या लेखांवर वाईट साईट खोट्या प्रतिक्रिया टाकणे हा एक उद्योग ही मंडळी न थकता करीत असतात.  माझी भूमिका अत्यंत स्वच्छ आहे. मी माझ्यावरील टीकाही कधी लपवित नाही. मार्च महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यातील प्रतिक्रिया वाचकांसाठी येथे देत आहे. कोण खरे आणि कोण खोटे हे सूज्ञ वाचकांनीच ठरवावे.
...............................................................



atharva - are tichya shidoritil shivya samplya bahutek. maze tila dilele sadetod uttar vach - http://kohamblogger.blogspot.com/2012/03/blog-post.html Anakhi ek lekh pan lihila ahe to pan vach.
Arey Anita kuthe Geli? evdha gaja waja karat aali hoti accidet wagaire jhaala mhanun. fakt ek 40000 aani kusumaagrajanwar lekh lihun gayab? adhi tar roj lihit hoti.te dadahari hee disat naahit
अनिता पडद्याआड कुणि काही बोलत ज्याला विचार सांगायचे असतात ते असे पडद्याआड शिव्या विकृत लिखाण करत नसतात **असो वाघाचे कातडे पांघरुन तूझ्यासारखे लांडगे मग तो कुणी का असेना असे लिहितो यांना बुद्धिभेद करण्यापलिकडे काही जमत नसते --परत आलीस तरी मला वाटले काही चांगले लिहिशिल असो कुञ्याचे शेपूट वाकडे ते वाकडे
अनिता पडद्याआड कुणि काही बोलत ज्याला विचार सांगायचे असतात ते असे पडद्याआड शिव्या विकृत लिखाण करत नसतात **असो वाघाचे कातडे पांघरुन तूझ्यासारखे लांडगे मग तो कुणी का असेना असे लिहितो यांना बुद्धिभेद करण्यापलिकडे काही जमत नसते --परत आलीस तरी मला वाटले काही चांगले लिहिशिल असो कुञ्याचे शेपूट वाकडे ते वाकडे
janeman AnitaraNI - ajun ek post takala ahe mazhya blog var. ashi lapu nakos ga. lapachapi khelayache vay ka tuze? http://kohamblogger.blogspot.com/2012/03/blog-post_04.html
and you are back - I have responded to your gibberish on kusumagraj at http://kohamblogger.blogspot.com/2012/03/blog-post.html Grow up young lady and get a life!
@विनायक शिंदे:- हिंदुगर्जना tumhi kon ahat,tumcha vay kay,kay karta hyatla mala kahi mahit nahi..pan tumhi hya blog var je kahi lihilay te atyanta yogya kelay..tyabaddal dhanyavaad!! hya anita patil sarkhya atyanta nich ani hin vicharyanchya kidyanna hya deshat kahihi sthan nahi...tyanchya sudaivane n aplya durdaivane tya ek stri ahet..so mala tya deserve kartat tase yogya shabda vaparta yet nahit :(. manakis vikruti n manasik aajar asleli hi bai ekhadya doctor kade jaun treatment karun ghenya aivaji ithe kay kartey?hicha ardhavat dnyan n hiche ardhavat guru itar brahmanetar samajachi dishabhul kartayet!! hya asha lokanna khara tar chabkache fatke marun tadipaar kele pahije!! kay layki tari ahe ka hyanchi sant dnyaneshwar, sant tukaram, shri kusumagraj, shyamchi aai, shree shivaji maharaj asha thor vyaktinbaddal lihaychi?? hyancha vay kay akkal ti kay n lihitat kay? sarkar pan asha lokanna kasa thevun gheta samjat nahi..hech jar koni ambedkarabaddal or fule baddal lihila tar?tasa tar ji ghatana lihili geli hoti ti suddha barichshi england parliament chya ghatanevarun copy keleli hoti..mag he bara chalta hya bai la..(bail la)
ani tumhi Shree Sant Dnyaneshwaranni asa mhatla vagaire ithe sangtay!! te tar brahman hote..n tumhi tar tyanna sant manatch nahit naa? tumchya mate brahman tar nich jaat ahe.ek kay te tharva naa!!asa aplabuddhi aslyasarkha kay lihitay?
Sann hyanni mhatle te ekdam yogya!! sant shiromani hi padvi fakt ekalach milte. tukaramanna hi padvi milaleli hoti..kay tyanche afat kartutva asel..pan ti kadhun jagadguru mhanaycha murkhapana kashala kartay?tumcha jar evdha sagla gadha(?) abhyas ahe, tar mag he evdha kasa nahi kalala tumhala?

तहकीक साहेब धन्यवाद


वि. वा. शिरवाडकर यांचा महानपणाचा बुरखा फाडल्यामुळे जातीयवाद्यांचा महाराष्ट्रभर जळफळाट सुरू आहे. मात्र, त्याचबरोबर काही सूज्ञ लोक जात, पंथ आणि धर्माचे भेद विसरून माझ्या सत्य लेखनाला पाठींबाही देत आहेत. रवीन्द्र तहकीक यांनी माझ्या लेखाला असाच  पाठींबा व्यक्त केला आहे. तहकीक साहेबांचे आधी आभार मानते. तहकीक साहेबांनी मला पाठविलेला मेल पुढे देत आहे. 
...............................................................

अनिता ओठांची मोहर खोलून
अन बोटांची भाषा बोलून ( ब्लॉग वरचे लेखन म्हणजे
एका अर्थाने अंगुली निर्देशच नाही का ) तू
नेट वरचा मूक मुक्तसंवाद पुन्हा सुरु केलास या बद्दल
प्रथम तुझे जाहीर अभिनंदन आणि स्वागत.
आज तू प्रदीर्घ विश्रांती नंतर एक चांगलाच धष्ट-पुष्ट
बकरा सोलून उलटा टांगला आहेस.
मराठीच्या कुरणात विनाअटकाव चरून पोसलेल्या
या मस्तवाल बोकडाला लोक वनराज समजायला
लागले होते. परंतु ज्याला लोक आयाळ समजतात
ती आयाळ नसून बोकडाला वेळीच खाटकाच्या खोडावर
न घेतल्या मुळे निबर होऊन फुटलेली दाढी आहे हें
तू दाखऊन दिलेस . त्याचे कवित्व आणि नाटककार असणे
देखील नैसर्गिक प्रतिभेचा अविष्कार  नसून अनाहूत आणि
अनावश्यक वाढलेले अजागळ ( काही बकऱ्याच्या हनुवटी खाली
लोंबणारे मांसल गळ किंवा गळू ; अजा ( बकरा ) गळ ( मांसल गळ /गळू )
आहेत हें सांगण्याचे तू धाडस केले.
मराठी साहित्यात असे अनेक मस्तवाल बकरे होऊन गेले ज्यांना असे
सोलून उलटे टांगणे गरजेचे आहे . त्याची सुरुवात तू एका महत्वाच्या
बकऱ्या पासून केली आहे. दिवाभीत घुबडा सारखा दिवसा घरात कोंडून घेवून
आणि रात्री अपरात्री  डोंगर माथ्यावर बसून विदेशी दारू आणि साहित्य रिचवत 
मराठी साहित्याच्या नावाखाली  चकण्याचा कचरा माथी मारणाऱ्या
या नशाबाज बकऱ्याला आज तू चांगलेच उघडे पाडले.
आनंद झाला . आता त्या पुल्याचाही एकदाचा निकाल लाऊन टाक .
 - रवीन्द्र तहकीक

Sunday, 26 February 2012

कुसुमाग्रज : प्रतिभावंत नव्हे उचल्या !



पतिव्रता ही उपाशी मरते तिला मिळेना सावली ।
चंचल नार बांधित असे नवे घर एक दरसाली ।।
पेशवाईतील प्रख्यात शाहीर अनंत फंदी यांचा हा फटका. अस्सल पतिव्रतांच्या नशिबी नेहमीच उपेक्षा येत असते. चंचल बायका मानाचे बाशिन्ग मिरवून घेत असतात. समाजातले हे वास्तव मराठी साहित्य क्षेत्रालाही पुरेपूर लागू पडते. परशय्येवर लाजेची फुले उधळणाèया अशा अनेक चंचल नारी मराठी साहित्यक्षेत्रात मानाचे पान घेऊन मिरवत आहेत. या चंचलांमुळे मातीतले अस्सल साहित्यिक उपेक्षेच्या गर्तेत खितपत पडले आहेत. 
अशा चंचलापैकी एक नाव आहे कुसुमाग्रज उपाख्य वि. वा. शिरवाडकर. कुसुमाग्रजांना महान नाटककार, महाकवी, कथाकार, कादंबरीकार अशी झाडून सगळी सर्वोच्च बिरुदे लावली जातात. शिरवाडकरांना ज्ञानपीठ पुरस्काराने गौरविण्यात आले. त्यांच्या नावे जनस्थान पुरस्कारही दिला जातो. त्यांचा जन्मदिन मराठी राजभाषा दिन म्हणून साजरा केला जातो. हे थोडे म्हणून की काय,  कुसुमाग्रजांना देवत्व बहाल करून पावित्र्याच्या मखरात बसविण्यात आले आहसे. या सर्व गोष्टींचा इतका अतिरेक झालाय की, त्यांच्या साहित्याची खरी समीक्षा करणे हे मराठी सारस्वताच्या दरबारातले सर्वांत मोठे पाप होऊन बसले आहे. कोणत्याही प्रकारची समीक्षा न होता, एका व्यक्तीला अशा प्रकारे देवत्व बहाल करण्याचे उदाहरण जगातील कोणत्याही भाषेच्या इतिहासात सापडणार नाही. तथापि, बुद्धी शाबूत असलेल्या कोणत्याही व्यक्तीला अशा प्रकारे वागून चालत नसते. योग्य समीक्षा करूनच माणसाची महत्ता ठरायला हवी. कुसुमाग्रज या नियमाला अपवाद ठरू शकत नाहीत. त्यामुळेच मी कुसुमाग्रजांच्या महानपणाची समीक्षा करण्याचा निर्णय घेऊन त्यांच्या साहित्याचा धांडोळा घेतला. तेव्हा या माणसाच्या महानपणाची सारीच वस्त्रे उसणी असल्याचे दिसून आले. ही उसनी वस्त्रे बाजूला सारून खरे कुसुमाग्रज महाराष्ट्राला कळायला हवेत.  उद्या २७ फेब्रुवारी रोजी    कुसुमाग्रजांच्या जन्म शताब्दी  वर्षाचा  शेवट होत आहे. या मूहुर्तावर त्यांची यथायोग्य समीक्षा करण्यासाठी मी  बसले आहे. या लेखामुळे अनेकांचे हितसंबंध दुखावणार आहेत. तथापि, सत्य जगासमोर येणे आवश्यक आहे. त्यासाठी प्रसंगी हितसंबंधी संधीसाधूंचा वाईटपण कोणाला तरी घ्यावा लागणार आहे. 
माझी ही अल्पशब्दांतील प्रस्तावना वाचून कुसुमाग्रजांसाठी बोलबच्चनगिरी करणाèया मुखंडांना धक्का बसला असेल. तथापि, अनिता पाटील पुराव्यांशिवाय काहीही बोलत नाही, हे या बोलबच्चनांनी लक्षात ठेवावे. अशा प्रकारे पावित्र्याच्या मखरात बसविलेली +श्यामची आई+ कशी जातीयवादी आहे, हे मी पुराव्यानिशी दाखवून दिलेले आहे. आज नंबर आहे. कुसुमाग्रज उर्फ वि. वा. शिरवाडकर. (विष्णू वामन शिरवाडकर हे कवितेसाठी कुसमाग्रज हे नाव वापरीत तसेच नाटके व इतर लेखनासाठी वि. वा. शिरवाडकर हे नाव वापरीत.)
कुसुमाग्रजांच्या बोगसपणाचे बिन्ग फोडण्यासाठी त्यांची महत्ता कोणत्या कलाकृतींच्या आणि निकषांच्या आधारे ठरविली गेली, हे आपण आधी पाहू. कुसुमाग्रजांची सर्वश्रेष्ठ कलाकृती कोणती? नि:संशय नटसम्राट. नटसम्राट ही मराठीतील अजरामर कलाकृती असल्याची टिमकी वाजवली जाते. त्यासाठी कुसुमाग्रजांना नाट्य लेखन क्षेत्रातील चक्रवर्ती सम्राट अशी उपाधी त्यांचे भाविक भक्त लावतात. परंतु नटसम्राट हे नाटक स्वतंत्र अनुभवांवर उभे नाही. ते शेक्सपिअरच्या किंग लिअर या नाटकाचे रूपांतर आहे. शिरवाडकरांनी qकग लिअर मराठी पेहरावात उभे केले एवढेच त्यांचे कर्तत्व.  किंग लिअरच्या जागी त्यांनी अप्पासाहेब बेलवलकर उभा केला. तथापि, अप्पासाहेब बेलवकर भाषा बोलतो ती  किंग लिअरचीच. मूळ कथेत अनेक फेरबदल नटसम्राटमध्ये करण्यात आले आहेत. तसेच शेक्सपिअरच्या इतरही अनेक नाटकांमधून संवादांची उचल शिरवाडकरांनी केली आहे. अप्पासाहेब बेलवलकरांचा ‘जगावं की मरावं हा एकच सवालङ्क हा अत्यंत प्रसिद्ध संवाद शिरवाडकरांनी शेक्सपिअरच्या हॅम्लेट या नाटकातून अगदी जशाच्या तसा उचलला आहे. शेक्सपिअरच्या +To be, or not to be, that is the question+ या संवादाचे हे शब्दश: भाषांतर आहे. 

शेक्सपिअरच्या लेखनीतून उतरलेला हा मूळचा 
संपूर्ण संवाद वाचकांसाठी खाली देत आहे :


To be, or not to be, that is the question:
Whether 'tis Nobler in the mind to suffer
The Slings and Arrows of outrageous Fortune,
Or to take Arms against a Sea of troubles,
And by opposing end them: to die, to sleep
No more; and by a sleep, to say we end
The heart-ache, and the thousand Natural shocks
That Flesh is heir to? 'Tis a consummation
Devoutly to be wished. To die to sleep,
To sleep, perchance to Dream; Ay, there's the rub,
For in that sleep of death, what dreams may come,
When we have shuffled off this mortal coil,
Must give us pause. There's the respect
That makes Calamity of so long life:
For who would bear the Whips and Scorns of time,
The Oppressor's wrong, the proud man's Contumely, [poor]
The pangs of despised Love, the Law’s delay, [disprized]
The insolence of Office, and the Spurns
That patient merit of the unworthy takes,
When he himself might his Quietus make
With a bare Bodkin? Who would Fardels bear,
To grunt and sweat under a weary life,
But that the dread of something after death,
The undiscovered Country, from whose bourn
No Traveller returns, Puzzles the will,
And makes us rather bear those ills we have,
Than fly to others that we know not of.
Thus Conscience does make Cowards of us all,
And thus the Native hue of Resolution
Is sicklied o'er, with the pale cast of Thought,
And enterprises of great pitch and moment, [pith]
With this regard their Currents turn awry, [away]
And lose the name of Action. Soft you now,
The fair Ophelia? Nymph, in thy Orisons
Be all my sins remembered.

वरील संवाद हॅम्लेटच्या तिसèया अंकातील पहिल्या दृश्याचा पहिलाच संवाद आहे. हॅम्लेट आपल्या मनातले भाव या संवादातून व्यक्त करतो. तिसèया अंकातले हे दृश्य +ननसी सीन+ म्हणून ओळखले जाते. शिरवाडकर महाशयांनी या संवादाचे शब्दश: भाषांतर करून आपल्या नाटकात घेतले.
प्रतिभावंत नव्हे उचल्या!
भाषांतर करण्यात काय आले आहे कौतुक?  ही शुद्ध उचलेगिरी आहे. मराठीच्या वाङ्मय व्यवहारात दुहेरी उचलेगिरी चालते.एखाद्याने शेक्सपिअर qकवा अन्य पाश्चात्य लोकांच्या कलाकृती जशाच्या तशा उचलून प्रसिद्ध करायच्या आणि जातीय प्रसारमाध्यमांनी ही उचलेगिरी उचलून धरायची! उचलेगिरीलाच प्रतिभा ठरवून उदो उदो करायचा. शिरवाडकरांचे हेच झाले आहे. त्यांनी शेक्सपिअरच्या नाटकांतून उचलेल्या कलाकृतींना असेच उचलून धरण्यात आले. तथापि, सत्य हे कधी ना कधी बाहेर येतच असते. आज ते आले. वि. वा. शिरवाडकर ही व्यक्ती नाटककार या नाात्याने प्रतिवंत नव्हतीच. ती होती केवळ एक उचल्या! कटू असले तरी हेच सत्य आहे. 
शिरवाडकरांनी शेक्सपिअरच्या मॅकबेथ या नाटकाचे राजमुकूट या नावाने रूपांतर केले. ऑथेल्ले त्यांचे रुपांतर ऑथेल्लो या नावानेच प्रसिद्ध आहे. ही सगळी नाटके मराठीत गाजली. याचे कारण मूळच्या शेक्सपिअरच्या संहिताच मजबूत आहेत. 
इंग्रजी शिकल्याचा असाही गैरफायदा
वि. वा. शिरवाडकर शाळेत असताना शिरवाडकर नाशकात त्यांच्या मामांकडे राहत. मामांना शेक्सपिअरच्या नाटकांचा नाद होता. त्यांच्याकडे शेक्सपिअरच्या नाटकांचा संग्रह होता. ही नाटके शिरवाडकरांच्या हाती पडली. इंग्रजीत शिक्षण झाले असल्यामुळे त्यांना ही नाटके वाचणे शक्य झाले. त्याकाळी शिक्षणाचा प्रसार कमी होता. त्यातल्या त्यात इंग्रजी जाणणारे तर विरळाच. +वासरांत लंगडी गाय शहाणी+ अशी एक म्हण मराठीत आहे. आजूबाजूला सगळीच वासरे असतील, तर लंगडी असली तरी गाय भाव खाणारच. कुसुमाग्रजांच्या काळातील साहित्यिक मंडळींत इंग्रजी जाणणारे असे जवळपास कोणी नव्हतेच. त्याचा फायदा कुसुमाग्रजांना झाला. इंग्रजी जाणारे कुसुमाग्रज भाव खाऊन गेले. कारण वासरांच्या गर्दीत ते एकटेच गाय होते. 
येथे युक्तिवाद असा केला जाऊ शकतो की, भाषांतरे qकवा रूपांतरे साहित्यक्षेत्रासाठी आवश्यकच असतात. त्यामुळे शिरवाडकरांना अगदीच क्षुल्लक ठरविणे चूक आहे. हा युक्तिवाद योग्य वाटत असला तरी, तो चूक आहे. भाषांतरे, रूपांतरे आवश्यक असली तरी त्यांच्या बळावर कोणाला महान ठरविता येऊ शकत नाही. महत्ता ही अस्सल कलाकृतींच्या आधारावरच ठरत असते. इतकेच काय या कलाकृतींमधील प्रतिमा आणि प्रतिकेची देशीच असतात. टॉलस्टॉय हा आधुनिक जगातील सर्वोच्च पातळीवरील महाकवी म्हणून नावाजिला जातो. त्याची +युद्ध आणि शांती+ ही ३०० पात्रे असलेली कादंबरी महाकाव्य समजली जाते. ती रशियन युद्धावर अधारित आहे. त्यातील सर्व पात्र अस्सल रशियन आहेत. कलाकृती साकारताना त्याने अस्सल रशियन पेहराव सोडला नाही. जगातील दुसरे महाकाव्य म्हणून मॅक्झिम गॉर्कीच्या +द मदर+ या कादंबरीचे नाव घेतले जाते. ही कादंबरीही अस्सल रशियन आहे. रशियातील बोल्शेविक क्रांतीचा इतिहास गॉर्कीने या कादंबरीत मांडला आहे. एर्नेस्ट हेqमग्वे, चार्लस् डिकन्स, डोस्टायवस्की, खलिल जिब्रान आणखी काही नावे वानगीदाखल येथे देते. हे सर्व लेखक महान या बिरुदाचे मानकरी ठरले ते केवळ त्यांच्या अस्सल कलाकृतींमुळे. रूपांतरीत कलाकृतींमुळे नव्हे. अलिकडचे अनेक मोठे qहदी सिनेमावाले इंग्रजी सिनेमांतून कल्पना आणि दृश्ये जशीच्या तशी उचलतात. हे लोक निर्माते म्हणून मोठे असतीलही परंतु महान ठरत नाहीत. पथेर पांचाली सारखे अस्सल बंगाली सिनेमे देणारे सत्यजित राय हेच महान ठरतात. ऑस्करवाल्यांनाही भारतात येऊन त्यांचा गौरव करावा लागतो. मराठीत मात्र उचल्यांनाच महत्ता देण्याचा अजब प्रकार घडत आला आहे. 
खरया महान लेखकांना समोर आणा
मराठीत आंतराष्ट्रीय तोडीच्या कलाकृती निर्माण होत नाहीत, असे म्हटले जाते. परंतु हे खरे नाही.  मराठीत महान म्हणता येतील, अशा कलाकृती आहेत. तथापि, त्यांना उपेक्षेच्या गर्तेत ढकलून कुसुमाग्रज उर्फ शिरवाडकरांसारख्या बोगस लोकांचाच उदो उदो केला जातो. त्यांनाच ज्ञानपीठ पुरस्कार दिले जातात. मग खरे टॅलेंट जगासमोर येणार कसे. मराठी प्रसारमाध्यमांनी आता तरी आपली जातीय भूमिका सोडून खरे टॅलेंट समोर आणले पाहिजे. अन्यथा स्वातंत्र्यानंतरचा आपला वाङ्मयीन इतिहास काळ्याकुट्ट पर्वाचा इतिहास ठरेल. 

Thursday, 23 February 2012

जयतु हिन्दू राष्ट्रम की जयतु ब्राह्मणराष्ट्रम?

बामणांना ‘जयतु ब्राह्मणराष्ट्रम'म्हणायचे असते. पण ते तसे म्हणू शकत नाहीत.
त्यामुळे ते जयतु हिन्दूराष्ट्रम असा बोगस नारा देतात. बंद करा आता हे धंदे.



बाळ ठाकरे स्वत:च्या नावापुढे ‘हिन्दूहृदयसम्राट'अशी लांबलचक पदवी लावून घेतात. पण ही पदवी किती बोगस आहे पाहा. हिन्दूच असलेल्या परप्रान्तियांना ठाकरे मुंबईत उपरे ठरवितात! इतकेच नव्हे, तर त्यांच्यावर हल्ले करतात. तेव्हा ठाकरेंचे हिन्दुत्व कोठे जाते. परप्रान्तिय भय्ये हिन्दू नाहीत, असे ठाकरेंचे मत आहे का?



बामण हा शेवटी आपल्या जातीवर जातो, याचे उत्तम उदाहरण म्हणून बाळ ठाकरे यांच्याकडे पाहता येईल. १९९५ साली राज्यात शिवसेना भाजपा युतीची सत्ता आली. तेव्हा ठाकरेंनी मुख्यमंत्री कोणाला केले? एका बामणाला. मनोहर जोशी यांना! वाचकांनो आता तुम्हीच विचार की. खरे काय आहे. जयतु हिन्दूराष्ट्रम की जयतु ब्राह्मणराष्ट्रम!



Sunday, 12 February 2012

मनापासून धन्यवाद


भावांनो आणि बहिणींनो, माझ्या ब्लॉगने नुकताच ४० हजार पेज हिट्सचा टप्पा पार पाडला. वाचकांकडून मिळालेल्या प्रतिसादाबद्दल मनापासून धन्यवाद.

गेल्या महिन्यात मला छोटासा अपघात झाला होता. त्यामुळे मी कोणत्याही प्रकारचे लिखाण करू शकले नाही. महाराष्ट्रातील भावा-बहिणींच्या आशीर्वादामुळे मी आता पुन्हा एकदा काम करण्यास सज्ज झाले आहे. 

या महिनाभराच्या काळात माझ्याविषयी विविध प्रकारच्या अफवा पसरविण्यात आल्या. विविध प्रकारचे दावे करण्यात आले. तथापि, हे सर्व खोटे आहे. या नतद्रष्टांचा मी योग्यवेळी समाचार घेणारच आहे. 

जय जिजाऊ, जय शिवराय.