रविवार दि. ८ जुलै २०१२ रोजी आमिर खान याचा ‘सत्यमेव जयते' हा शो मी एबीपी न्यूजवर पाहिला. हा भाग आमिरने ‘अस्पृश्यता' हा विषय घेऊन उभा केला. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या कार्यक्रम पत्रिकेत अस्पृश्यता निवारण हा विषय प्रमुख स्थानी होता. या पाश्र्वभूमीवर आमिरने आपल्या शोमध्ये ज्येष्ठ गांधीवादी न्या. चंद्रशेखर धर्माधिकारी यांना पाचारण केले होते. चिकने-चोपडे दिसणारे न्या. धर्माधिकारी या कार्यक्रमाचे हिरो ठरले! स्टुडिओत उपस्थित असलेल्या प्रेक्षकांमधून न्या. धर्माधिकारी यांच्या दर तिस-या वाक्याला टाळ्या मिळत होत्या. न्या. धर्माधिकारी यांची गाजलेली काही वाक्ये अशी :
१. मी सनातन ब्राह्मण कुटुंबात जन्माला आलो तरी व्रतबंधादि बंधने (गळ्यातील जानवे वगैरे) मी झुगारून दिली.
२. माझ्या कुटुंबियांनी, मुला-बाळांनी मला विरोध केला. तरी मी जुमानले नाही. मला आज माझ्या घरात मला इतर कुटुंबीय वापरतात ते बाथरूम वापरता येत नाही.
३. जन्म कोणाच्या पोटी घ्यायचा हे आपल्या हातात नसते. हातात असते, तर माझ्या मुलांनी माझ्या पोटी जन्म घेतला नसता.
४. मी ब्राह्मण्य सोडले म्हणून कोणीही धर्माधिकारी आडनावचा माणूस आमच्या घरी येत नाही. त्यामुळे माझ्या बायकोला पाहुण्यांचा त्रास अजिबात झाला नाही.
५. माझा पुतण्या आजारी पडला, तेव्हा आम्हा धर्माधिका-यांचे रक्त त्याच्या रक्ताशी जुळू शकले नाही. एका दलिताचे रक्त जुळले. जात मनात कितीही घर करून बसली असली तरी ती रक्तात उतरत नाही.
६. ब्राह्मणांच्या हातात झाडू आणि दलिताच्या हातात गीता यावी, यासाठी गांधीजींनी आंदोलन केले.
न्या. धर्माधिकारी यांची वरील रोमांचक वाटणारी वाक्ये त्यांचा ढोंगीपणा आणि अपयश सिद्ध करणारी आहेत. न्या. धर्माधिकारी यांचे ढोंग अधिक स्पष्टपणे समोर यावे यासाठी मी आधी महात्मा गांधी यांच्या आयुष्यातील एक घटना सांगते. ही घटना आहे १९१५ सालची. महात्मा गांधी यांचे ठक्कर बाप्पा नावाचे एक निकटचे सहकारी होते. ठक्कर बाप्पांनी दुधाभाई नावाच्या एका दलित व्यक्तीला महात्मा गांधी यांच्याकडे पाठविले. गांधीजींनी दुधाभाईला साबरमती आश्रमात ठेवून घेतले. दलिताला आश्रमात जागा दिली म्हणून आश्रमातील सर्वजण गांधीजींच्या विरोधात गेले. गांधीजींची बहीण गोकीबेन आणि पत्नी कस्तुरबा यांच्यासह इतर सर्व कुटुंबीयसुद्धा गांधीजींच्या विरोधात गेले. आश्रम चालविण्यासाठी पैसा देणा-या देणगीदारांनीही विरोध केला. गांधीजींचा आश्रम बंद पडण्याची वेळ आली.
विरोध झाला म्हणून गांधीजींनी आपले विचार बदलले नाहीत. ते आपल्या सहकाèयांना म्हणाले, ‘दुधा आश्रम सोडून जाणार नाही. ज्यांना दुधासोबत राहायचे नसेल, त्यांनी आश्रम सोडून जावे.' देणगीदारांना उद्देशून गांधीजी म्हणाले, ‘देणग्यांसाठी मी दुधाला सोडू शकत नाही. तुमच्या देणग्या मिळाव्यात म्हणून मी आश्रम चालवित नाही. पैशावाचून माझे अडत नाही. मी दुधाभाईला घेऊन दलितांच्या वस्तीत राहीन.'
मधला मार्ग म्हणून दुधाभाईसाठी आश्रमात वेगळी व्यवस्था करावी, असा आग्रह विरोधकांनी गांधीजींकडे धरला. तो गांधीजींनी फेटाळून लावला. दुधाभाईसाठी वेगळी व्यवस्था करणे हे त्याला आश्रम प्रवेश नाकारण्यापेक्षाही भयंकर आहे, असे गांधीजींनी सुनावले. दुधाभाई माझ्यासोबत इतरांसारखाच बरोबरीच्या नात्याने आश्रमात राहील, असा निर्णय गांधीजींनी दिला. गांधीजींनी दुधाभाईला आश्रमात ठेवले. गांधीजींची बहीण गोकीबेन आश्रम सोडून गेल्या. इतरांनी मात्र नमते घेऊन दुधाभाईला स्वीकारले.
आणखी तीन वर्षांनी या घटनेला आता १०० वर्षे पूर्ण होतील. या शंभर वर्षांत गांधीजींचा विचार समाजात विशेषत: ब्राह्मण समाजात किती रुजला, याचे परिमाण म्हणून न्या. धर्माधिकारी यांच्या परवाच्या वक्तव्यांकडे पाहता येईल. त्यासाठी गांधीजी आणि न्या. धर्माधिकारी यांची आता थोडक्यात तुलना करूयात.
१.
गांधीजी : आपल्या घरात दलिताला ठेवले.
न्या. धर्माधिकारी : गळ्यातील जानवे नावाचा धागा फेकून दिला.
२.
गांधीजी : दलिताला घरात राहू द्यावे, यासाठी नातेवाईकांची परवा केली नाही. दुधा पसंत नसेल तर, आश्रम सोडा, असे ते कुटुंबीयांनाही फर्मावले. सख्ख्या बहिणीला आश्रमाबाहेर काढतले.
न्या. धर्माधिकारी : मी जानवे घालणार नाही. माझे वागणे पसंत नसेल, तर घर सोडा, असे फर्मान सोडण्याचे धाडस न्या. धर्माधिकारी करू शकले नाही.
४.
गांधीजी : आपल्या कुटुंबाने सनातनीपणा सोडवा यासाठी गांधीजी अडून बसतात.
न्या. धर्माधिकारी : आपल्या कुटुंबाने ब्राह्मण्य सोडावे, यासाठी काहीही करीत नाहीत. उलट कुटुंबियांचा सनातनीपणा सहन करीत घरातच कोडग्यासारखे राहतात. कुटुंबीयांचे बाथरूमही न्या. धर्माधिकारी वापरू शकत नाहीत.
दलिताचे रक्त चालेल, पण दलित चालणार नाही!
न्या. धर्माधिकारी यांच्या कुटुबांने त्याच्या पुतण्यासाठी दलिताचे रक्त स्वीकारले. पण दलितांना स्वीकारले का? अजिबात स्वीकारलेले नाही. न्या. धर्माधिकारीच सांगतात की, आमच्या घरी कोणीही धर्माधिकारी येत नाही. ज्या लोकांना गळ्यात जानवे नसलेला धर्माधिकारी चालत नाही, त्यांना दलित चालतीलच कसे? ब्राह्मणांनी हजारो वर्षे दलितांचे शोषण केले आहे. आता ब्राह्मण दलितांचे रक्तही शोषण करीत आहेत. ही ब्राह्मणांनी १०० वर्षांत केलेली प्रगती आहे, असा निष्कर्ष यावरून काढता येईल.
जातीयवादी पुतण्याला मरू द्यायला हवे होते
ब्राह्मण्य न सोडणारा न्या. धर्माधिकारी यांचा पुतण्या आणि त्याचे आईवडील हे जीवावर बेतते तेव्हा दलिताचे रक्त बिनबोभाट स्वीकारतात. भेदभाव पाळणा-या आपल्या पुतण्याला दलिताचे रक्त त्यांनी द्यायलाच नको होते. त्याला मरू द्यायला हवे होते. तोच योग्य न्याय झाला असता. बरे रक्त दिल्यानंतर तो पुतण्या आणि त्याचे कुटंबीय सुधारले असे नाही. हे लोक अजूनही ‘जानवे न घालणाèया धर्माधिका-या'च्या घरी जात नाही, ते नाहीतच. आधुनिकतेचे लाभ उचलायचे, त्यासोबतची कर्तव्ये मात्र लाथाडायची, ही ब्राह्मणी वृत्ती जशी या पुतण्यात आहे, तशीच ती न्या. धर्माधिकारी यांच्यातही आहे, असे दिसते. तसे नसते, तर न्या. धर्माधिकारी यांनी त्या पुतण्याला दलिताचे रक्त मिळूच दिले नसते.
जन्म कोणाच्या पोटी घ्यायचा हे ठरविता आले असते, तर माझ्या मुलांनी माझ्या पोटी जन्म घेतला नसता, असे न्या. चंद्रशेखर धर्माधिकारी सांगतात. ब्राह्मणवादापुढे न्या. धर्माधिकारी किती हतबल आहेत, हेच त्यांच्या या वक्तव्यातून दिसते. स्वत:च्या घरात ज्यांना साधे माणूसपणाचे संस्कार पेरता आले नाहीत, त्यांच्याकडून फारशी अपेक्षा करण्यात काहीच अर्थ नाही. या पाश्र्वभूमीवर न्या. चंद्रशेखर धर्माधिकारी हे केवळ ‘बोलके शंख' ठरतात.
ब्राह्मण ही जात कधीच सुधारू शकणार नाही, असे मी जेव्हा म्हणते, तेव्हा लोक माझ्यावर टीका करतात. न्या. धर्माधिकारी यांनी आपली हतबलता सांगून जणू माझ्यावतीने माझ्या टीकारांना उत्तरच दिले आहे.
अनिता पाटील
No comments:
Post a Comment