Sunday, 29 July 2012

अलविदा!

प्रिय भावांनो आणि बहिणींनो,

गेले 10 महिने मी हा ब्लॉग चालवित आहे. आज निरोप घेण्याची वेळ आली आहे. 15 ऑगस्ट साजरा करून 16 ऑगस्ट रोजी मी अमेरिकेला जात आहे. पुढील 15 दिवस तयारीसाठी लागतील. ऑक्टोबर 2013 पर्यंत मी अमेरिकेत आहे. अमेरिकेच्या टेक्सास प्रांतातील डलास येथे माझे वास्तव्य राहणार आहे. टेक्सास हे अमेरिकेचे दुस-या क्रमांकाचे मोठे राज्य आहे. तसेच डलास हे टेक्सासमधील तिस-या क्रमांकाचे तर संपूर्ण अमेरिकेतील नवव्या क्रमांकाचे शहर आहे. डलासमध्ये मी एका अमेरिकी कंपनीसाठी काम करणार आहे. आमचा 14 महिन्यांचा करार आहे. डलासला माझी मावशीही राहते. अमेरिकेतील वास्तव्याच्या काळात ब्लॉग लिहून होईल, असे वाटत नाही. याचाच अर्थ पुढील 14 महिन्यांच्या काळात मी नवा लेख ब्लॉगवर टाकू शकणार नाही. 

आज घडीला ब्लॉगवर 150  लेख आहेत. मी एवढे लिखाण करू शकेल, असे मलाही वाटले नव्हते. वाचकांच्या प्रेमामुळे हे शक्य झाले. ब्लॉगची वाचकसंख्या सव्वा लाखाला स्पर्श करीत आहे. वाचक संख्येचा लाखाचा आकडा पार करणारे फारच थोडे ब्लॉग मराठीत आहेत. विशेष म्हणजे अवघ्या नऊ-दहा महिन्यांत सव्वा लाख हिट मिळविणारा एकही वैचारिक ब्लॉग मराठीत नाही. आज ब्लॉगच्या पाठिराख्यांची संख्या 300 ला स्पर्श करीत आहे. एवढी सदस्यसंख्या असलेला ब्लॉगही मराठीत नाही. या ब्लॉगला एवढी लोकप्रियता मिळेल, असे मला अजिबात वाटले नव्हते. ब्लॉगबद्दल आपण जो जिव्हाळा दाखविला, त्याबद्दल मी खरोखरच भारावून गेले आहे. निरोप घेताना उर भरून आला आहे. 

या ब्लॉगची दखल विकिपीडियानेसुद्धा घेतली. देवनागरीत अनिता पाटील असा सर्च दिल्यास विकीपीडियावरचे माझे पान दिसायला लागते. मी विकीपीडियाची आभारी आहे. 

नजीकच्या भविष्यात ब्लॉगवर नवीन लेख पडणार नसला तरी १50 लेख आपल्या सोबत आहेतच. त्यांना वाचकांचा प्रतिसाद मिळतच राहील, अशी अपेक्षा व्यक्त करून आपणा सर्वांचा निरोप घेते. 14 महिन्यांनी काय होईल, हे आताच सांगणे कठीण आहे. मात्र, परत आल्यानंतर पुन्हा एकदा ब्लॉग लेखन करायला मला नक्कीच आवडेल. 

जय जिजाऊ, जय शिवराय.

आपली लाडकी बहीण
अनिता पाटील.

मुस्लिमविरोधी दंगली

स्वातंत्र्योत्तर काळात मुस्लिमांच्या विरोधात अनेक दंगली झाल्या. यातील प्रत्येक दंगलीचे नेतृत्व कोणी  केले आहे? फार जुना इतिहास चाळायची गरज नाही. १९९० नंतरच्या काही दंगलींकडे नजर टाकली तरी ब्राह्मणवादी लोकच  मुस्लिमांचे खरे शत्रू असल्याचे दिसून येईल. 

१९९२ : बाबरी मशीद पाडली
भारतातील ब्राह्मणांची सर्वांत मोठी संघटना असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने (आरएसएस) आपल्या विविध संघटनांच्या मदतीने ६ डिसेंबर १९९२ रोजी अयोध्येतील बाबरी मशीद पाडली. भाजपा, विश्व हिन्दू परिषद आणि बजरंग दल या तीन प्रमुख संघटना बाबरी मशीद पाडण्यात सहभागी होत्या. या तिन्ही संघटना आरएसएस चालविते. बाबरी पाडण्यात आली तेव्हा भाजपाचे अध्यक्ष होते डॉ. मुरली मनोहर जोशी. डॉ. जोशी जातीने ब्राह्मण आहेत. बाबरी मशीद पाडल्यानंतर देशभरात दंगली झाल्या. त्यात १२०० लोक मारले गेले. मरणा-यांमध्ये मुस्लिमांची संख्या जास्त होती.

१९९२-९३ मुंबई दगंल 
डिसेंबर १९९२ आणि जानेवारी १९९३ मुंबईत मुसलमानविरोधी दंगल झाली. त्यात ५०० मुस्लिम मारले गेले. या दंगलीची सूत्रे शिवसेनेने हलविली, असा ठपका न्या. बी. एन. श्रीकृष्ण यांच्या नेतृत्वाखालील आयोगाने ठेवला आहे. शिवसेनेचे सर्वेसर्वा असलेले बाळ ठाकरे जातीने सारस्वत ब्राह्मण आहेत. न्या. श्रीकृष्ण दंगलीची चौकशी करीत होते, तेव्हा महाराष्ट्रात शिवसेना-भाजपाचे सरकार होते. मुख्यमंत्री होते मनोहर जोशी. जोशी हेसुद्धा जातीने ब्राह्मणच आहेत. जोशी यांच्या सरकारने १९९६ मध्ये न्या. श्रीकृष्ण आयोग रद्द केला. प्रसार माध्यमांनी आरडा ओरड केल्यानंतर २८ डिसेंबर १९९६ रोजी पुन्हा आयोग कायम करण्यात आला. शिवसेना नेत्यांनी दंगल भडकावली असा ठपका आयोगाने अहवालात ठेवला. हा अहवालही ब्राह्मण जोशींनी फेटाळला. माध्यमांनी पुन्हा आरडा-ओरड केली. त्यावर हा अहवाल स्वीकारला पण त्यावर कारवाई केली नाही. ५०० मुस्लिमांना मारणाèया आरोपींना अजूनही शिक्षा झालेली नाही.

मुंबई दंगलीत हात असल्याच्या आरोपाखाली शिवसेनेचे एक ब्राह्मण नेते मधुकर सरपोतदार आणि इतर २ जणांना मुंबईच्या कोर्टाने २८ जुलै २००८ रोजी १ वर्षाची सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली. पण त्यांना लगेच जामीन मिळाला. २० फेब्रुवारी २०१० रोजी शिक्षा न भोगताच सरपोतदार यांचे निधन झाले.

२००२ गुजरात दंगल
गुजरातमध्ये मुसलमानविरोधी दंगल भडकाविण्यात आली. सुमारे ३ हजार मुसलमान क्रूरपणे जाळून मारण्यात आले. सुमारे १ हजार मुस्लिम बेपत्ता झाले. १ लाख मुस्लिमांना घरे दारे सोडून पळून जावे लागले. या दंगलीचे नेतृत्व करणारे नरेंद्र मोदी हे आरएसएसचे कार्यकर्ते आहेत. आरएसएस ही ब्राह्मणांची सर्वांत मोठी संघटना आहे. या दंगलीची चौकशी होऊ नये, म्हणून आरएसएसचे लोक अजूनही प्रयत्नशील आहेतच.


या मालेतील इतर लेख 
1. हिंदू नावाचा कोणताही धर्म अस्तित्वात नाही!
२. मुस्लिमविरोधी दंगली
३. खरे अस्पृश्य ब्राह्मणच!
 
४. अंगप्रदर्शन करणा-या सर्व नट्या ब्राह्मणच कशा? 



Monday, 23 July 2012

लोकसत्तेचा अभिनव गुप्तरोगी

गेस्ट रायटर - रवींद्र तहकिक (दादाहरी)


अभिनव गुप्त या गुप्त नावाने कुणी तरी ( नक्कीच एखादा " मी शिवाजी " म्हणत 
एकमेकाच्या तंगड्या मधून घुसत पळण्याचे सांस्कृतिक खेळ खेळणारा एखादा इरसाल 
संघोटा ) "वाचावे नेटके" नावाचे एक फुटकळ आणि टुकार सदर चालवतो. या सदरात 
हा "चड्डीखोर"..."दंडजादा" इंटरनेट वरील ब्लॉग विश्वाची दखल घेतो म्हणे....
म्हणजे नेमके काय करतो ? तर अर्थातच प्रत्येक टोपलीत आपला एक तरी सडका कांदा 
लपवून ठेवायचा या ब्राम्हणी काव्याच्या नियम नुसार हा "काळटोप्या "ब्लॉग विश्वाच्या 
घडामोडीवर नजर ठेवतो आणि ब्राम्हणाच्या घाणीवर माती टाकून घाण झाकावण्याचा 
प्रयत्न करतो. त्याचे आजवरचे सर्व लेख वाचले तर ही बाब कुणाच्या ही लक्षात येयील 
की ब्लॉग समीक्षा या नवा खाली लोकसत्तेचे हें " अभिनव" गुप्तरोगी वैचारिक व्यभिचारा
पलीकडे दुसरे काहीही करत नाही. व्यभिचार आणि गुप्तरोग यांचा अन्योन्य संबंध आहे. 
मग तो व्यभिचार शारीर असो नाही तर वैचारिक. वैचारिक व्यभिचा-यांना 
अभिनव गुप्तासारखे गुप्तरोगी ठेवून आपली कामे उरकावे लागतात. लोकसत्तेने तेच चालविले आहे.
 बामनांच्या जातीय विचारांची पाठराखण करण्यासाठी लोकसत्तेने 
अभिनव गुप्त नावाचा हा गुप्तरोगी ठेवला आहे. मुळात लोकसत्तेसारख्या एकेकाळच्या अव्वल
 दर्जाच्या वृत्तपत्राला अशी गुप्त नावांनी लिखाण करावे लागते, तेव्हाच त्यामागील बामनी कावे
 स्पष्ट होत जातात. अनिता पाटील यांच्यासारख्या समतावादी लेखिकेवर जातीय टीका
केल्यास लोक तोंडात शेण घालतील, हे माहीत असल्याने अशा गुप्त कारवाया लोकसत्तेला 
कराव्या लागत आहेत.
-----------------------------------------------------------------------------------------------------------
 वैचारिक मोनोपोज झालेला कलमी लेखकराव
------------------------------------------------------------------------------------------------------------
संत तुकारामांनी असल्या नाठाळाच्या माथी काठी हाणली आहे . या अभिनव नामक  वैचारिक 
गुप्तरोग्याला   जातीयश्रेष्ठत्व आणि वर्ण वर्चस्वाची पोल खोल करणारे, थोतांड उघडे पाडणारे 
अनिता पाटीलचे  परखड आणि पुरोगामी लिखाण " तिरस्काराच्या पलीकडचे "
वाटणे साहजिकच आहे. कारण तिरस्काराच्या पलीकडचे वाटावे असे अनिताच्या ब्लॉग वरील 
एकही लेखात एकही विधान नाही. तिथे अनिता कुणा ऐका जातीची किंवा जाती समूहाची 
प्रतिनिधी म्हणून कुणा ऐका जातीवर जाणीवपूर्वक आघात करते आहे असेही नाही. 
त्यातील आघात ब्राम्हण जातीवर नव्हे तर ब्राम्हणी लबाड/ कावेबाज / ऐतखाऊ /
प्रपोगंडवादी प्रवूत्तीवर आहेत. अनिता फक्त काही सत्य सांगते, अशी सत्ये जी ब्राम्हणी 
प्रवूत्तीला लपवायची आहेत. म्हणूनच अनिता तिरस्काराच्या पलीकडे; 
संजय सोनवणी मात्र समतोल आणि समन्वयशील; कारण ते आता अशात ब्राम्हणाच्या 
घाणीवर माती टाकून झाकवण्याचे महानकार्य अतिशय प्रामाणिकपणे आणि इमाने इतबारे 
करत आहेत. वैचारिक मोनोपोज झालेला कलमी लेखकराव  " गुप्तरोग्या''ने
सोनवणी यांना " टाळ्या" वाजवाव्यात यात काही नवल नाही 
---------------------------------------------------------------------------
अनिताला "गुप्त"पाठिंब्याची गरज नाही 
---------------------------------------------------------------------------
अनिता पाटील हें नाव आज मराठी ( आणि इंग्रजी सुध्धा ) ब्लॉग विश्वातील एक 
विश्वसनीय नाव म्हणून समोर येत आहे. या ब्लॉगची वाचकसंख्या, प्रतिसाद ,लेखातील 
वैविध्य / अभ्यासकता/ प्रबोधनाची तळमळ / विचारातील ठाम पणा / निश्चित भूमिका / 
दिशा आणि दृष्टीकोन / या सर्व गोष्टी थक्क करणाऱ्या आहेत. म्हणूनच अनिता पाटील 
ला फक्त महाराष्ट्रातूनच नव्हे तर संपूर्ण देशातून ( आणि विदेशातून देखील )लाखोच्या 
संख्येने वाचक आणि पाठीराखे मिळत आहेत. हें सर्व वाचक आणि पाठीराखे मूर्ख, 
बावळट , काय वाचावे-स्वीकारावे आणि काय टाळावे-तिरस्कारावे याचा विधिनिषेध 
नसणारे आहेत असे गृहीत धरून हा गुप्त माझा ज्याला पाठींबा तेच "नेटके" आणि 
बाकी सर्व तिरस्काराच्या पलीकडले...असा कांगावा करीत आहे. परंतु अनिताला अशा 
मिशा भादरून भरचौकात टाळ्या वाजवीत हाय हाय करीत लोकांचे लक्ष विचलित 
करणाऱ्या अभिनव गुप्ताच्या गुप्त पाठिंब्याची आजीबात गरज नाही. 
हें लोकसत्ताच्या या " गुप्तरोग्या''ने  नीट लक्षात असू द्यावे. 

लोकसत्ता आणि लोकप्रभेतील कावळ्याची पिले!


गेस्ट रायटर- समीर पाटील बोरखेडकर

इंद्रावन फळ घोळिले साकरा । भितरील थारा न संडीच ।
कावळ्याचे पिलू कौतुके पोशिले । न राहे उगले विष्ठेविण ।।
                                  -जगद्गुरू संत तुकाराम महाराज

एक्स्प्रेस ग्रुपच्या लोकसत्ता आणि लोकप्रभा या पत्रांतून सध्या बामनी जातीयवादाचा विखार ओकला जात आहे, त्याचे वर्णन करण्यासाठी तुकोबांच्या वरील ओळी अगदी यथार्थ आहेत. संतांना त्रास देणा-या लोकांचे वर्णन तुकोबांनी या ओळींतून केले आहे. ज्ञानेश्वरांपासून बहिणाबाईपर्यंत सर्व मराठी संतांना त्रास देणारी जमात एकच आहे. ती म्हणजे ब्राह्मण! संत-सज्जनांना त्रास देण्याची जी वृत्ती आहे, त्या वृत्तीला म्हणून ब्राह्मणवाद म्हटले जाते. लोकसत्ता हे दैनिक आणि लोकप्रभा हे साप्ताहिक सध्या महाराष्ट्रातील ब्राह्मणवादी विचारांचे मुख्य प्रचारकेंद्र ठरले आहे. एक्स्प्रेस ग्रुपचे मालक गोयंका यांनी ही पत्रे चालविण्याचे काम प्रारंभापासूनच बामनांच्या हाती सोपविले आहे. राजहंस म्हणून निवडलेले हे लोक मुळात कावळ्याच्या जातीचे आहेत, याची जाण गोयंका शेठ यांना नसावी. कावळ्यांच्या पिलांना कितीही कौतुकाने पोसले तरी शेवटी विष्ठा दिसली की, ती खाण्याचा मोह कावळ्यांना होतोच. तसेच बामनांचे आहे. समतेच्या विचारांचे कितीही डोस पाजले तरी तरी जातीयवादाची विष्ठेसाठी बामनांचे तोंड पाणी सोडतेच. लोकसत्तेतील बामनांचे तसेच झाले आहे. गोयंकासेठ यांनी कौतुकाने पोसलेले हे कावळे बहुजनांच्या श्रद्धास्थानांवर जातीय घाव घालू लागले आहेत. 

या दोन्ही पत्रांच्या बामनी जातीयवादाचे ताजे उदाहरण ‘वाचावे नेटके' या सदराने फार बटबटीतपणे पेश केले. अभिनवगुप्त या टोपण नावाने कोणी तरी इसम हे सदर चालवितो. या मानवाचे खरे नाव काय, हे त्याच्या नावाप्रमाणेच ‘गुप्त' आहे. त्याने अनिता पाटील आणि संजय सोनवणी यांच्या ब्लॉगविषयी लिहिलेला लेख गेल्या सोमवारी ९ जुलै रोजी लोकसत्तेच्या संपादकिय पानावर प्रसिद्ध झाला. अनिता ताई यांच्यावर या गुप्ताने एकच परिच्छे लिहिला असला तरी तो अत्यंत विखारी आहे. बामनांनी पोसलेली विषमता नष्ट करण्यासाठी अनिता ताई यांनी लेखनी हातात घेतली. त्यामुळे लोकसत्तेतील बामनांचे पित्त खवळले आहे. त्यातून त्यांनी अभिनवगुप्ताला पुढे करून अनिता ताई यांच्यावर हल्ला चढविला आहे. 

लोकसत्ता आणि लोकप्रभा यातील बामनी जातीयवादांची काही ठोस उदाहरणे आपण पाहू या. कुठल्याही क्षेत्रातील बामनी नाव दिसले की, ही पत्रे त्यांचा उदोउदो करायला सुरूवात करते. कविता महाजन आणि मेघना पेठे ही साहित्य क्षेत्रातील दोन नावे लोकसत्तेने अशीच उचलली. वस्तुत: या दोघीही जे काही लिहितात ते अत्यंत सुमार दर्जाचे असते. कविताबाइंचे ब्र आणि मेघनाबाइंचे नातिचरामि ही दोन पुस्तके काही वर्षांपूर्वी आली. ही पुस्तके प्रकाशकांच्या फडताळात पडून होती. मग एक दिवस या दोघींवर लोकसत्तेत पान-पान भर मजकूर प्रसिद्ध झाला. त्याबरोबर या दोघी लेखिका म्हणून मराठीत एस्टॅब्लिश झाल्या. एखाद्या बहुजन समाजातील लेखकासाठी लोकसत्तेने असे पानभर कधी लिहिले नाही. पानभर सोडाच, साधा टीचभर मजकूरही कधी छापला नाही. 

लोकप्रभेने तर दादोजी कोंडदेव आणि रामदास यांच्या वतीने सुपारीच घेतली आहे. दादोजी प्रकरणावरून वाद पेटला, तेव्हा लोकप्रभेतील बामनांनी बामन इतिहासकार शोधून शोधून बाहेर काढले. त्यांच्याकडून खोटे नाटे लेख लिहून घेतले. या लेखांना संजय सोनवणी सोनवणी यांनी सडेतोड उत्तरे दिली, तेव्हा त्यांना जरा आराम पडला. रामदासाचे जानवे मात्र अजूनही लोकप्रभा सोडायला तयार नाही. रामदासाला मानणारा वर्ग किती? महाराष्ट्राच्या एकूण लोकसंख्येच्या ०.२ टक्केही नाही. पण केवळ रामदास हा जातीने बामन होता, म्हणून त्याच्यावर एक विशेषांक लोकसत्तेने काढला. तुम्हाला एवढा पुळका आहे, तर काढा लेको, काय विशेषांक काढायचे तर. पण नीट तरी काढा. बहुजन महापुरुषांची त्यात बदनामी तरी करू नका. पण नाही. लोकप्रभेने रामदास विशेषांकात वारकरी संतांना कमी लेखले. प्रसिद्ध अभ्यासक सचिन परब यांच्यासारख्या अभ्यासकाला ही बाब खटकली. परब यांनी आपल्या ब्लॉगवर एक लेख त्याविरोधात लिहिला होता.
लोकप्रभेने ताजी बामनी काढी केली ती पंढरपूरच्या आषाढी यात्रा विशेषांकात. रामदासी पंथाचा आणि पंढरपूरचा काडीचाही संबंध नाही. चाफळ हे रामदासींचे मुख्यालय. सगळ्या महाराष्ट्रातील देवस्थानांवरून आषाढी कार्तिकीला पंढरपूरला पालख्या, दिंड्या येतात. चाफळ हे असे एकमेव देवस्थान आहे, जेथून पंढरपूरला दिंडी  येत नाही. पंढरपूरपासून रामदासी बामन फटकून राहतात. असे असले तरी लोकप्रभेने काढलेल्या पंढरपूर विशेषांकात चाफळच्या मठाधीशांचा लेख अग्रक्रमाने छापला. किती हा जातीयवाद?
..................................................................................................................
समीर पाटील बोरखेडकर यांच्या sarvsamaj |सर्वसमाज या ब्लॉगवरून साभार 

लोकसत्ता-लोकप्रभेची विनाशाची वाट


गेस्ट रायटर- समीर पाटील बोरखेडकर

लोकसत्ता आणि लोकप्रभाही ही दोन्ही पत्रे आता महाराष्ट्रातील बामनांची मुखपत्रे बनली आहेत. ‘ब्राह्मण जातींच्या हितासाठी लेखणी चालविणारे महाराष्ट्रातील एकमेव पत्र' अशा टॅगलाईनचीच काय ती उणीव राहिली आहे. दोन्ही पत्रांच्या संपादकांनी आपल्या अखत्यारीत निर्णय घेऊन ही टॅगलाईन मास्ट हेडच्या वर टाकून द्यावी, म्हणजे औपचारिकता पूर्ण होऊन जाईल.

लोकप्रभेतील बामनी जातीयवादाची मुहूर्तमेढ ह.मो. मराठे यांनी रोवली. मराठे हे थोडेच दिवस लोकप्रभेचे संपादक होते. एवढ्या काळात त्यांनी संधी साधली आणि लोकप्रभेत बामनी सेटअप उभा करून दिला. हा सेटअप आता पूर्ण रूपाने काम करू लागला आहे, असे दिसते. 

लोकसत्तेतील ब्राह्मणवाद श्री. कुमार केतकर हे संपादक असताना रुजवला गेला. सुरूवातीच्या काळात ब्राह्मणवाद पोसताना केतकरांनी बèयापैकी खबरदारी घेतली होती. खायचे वेगळे आणि दाखवायचे वेगळे, असे त्यांच्या धोरणाचे स्वरूप होते. वरकरणी ते आरएसएस आणि त्याचे पिल्लू असलेल्या भाजपाला विरोध करीत. तथापि, त्यांची खरी साथ असे ती याच लोकांना. या देशात ब्राह्मणांची सर्वंकश सत्ता आणण्याचा एककलमी कार्यक्रम आरएसएस राबवित आहे. त्यांचे अनेक मुखवटे अनेक क्षेत्रांत वागत असतान. हे मुखवटे धर्मनिरपेक्षतेची घोंगडी पांघरून बामनी जातीयवादाला खतपाणी देत असतात. पत्रकारितेतील सर्वांत मोठा घोंगडीधारी आहेत कुमार केतकर. हे महायश वरवर धर्मनिरपेक्षतेचा आव आणित असले तरी आतून ते बामनी जातीयवाद पोसत असतात. केतकर आता लोकसत्तेत नसून, अन्यत्र लाह्या भाजित आहेत. मात्र, लोकसत्तेत असताना त्यांनी बामनी जातीयवादाची छान मशागतीने पेरणी करून ठेवलेली आहे. त्याची विषारी फळे आता बटबटीतपणे जगासमोर येत आहेत.

आरएसएसची सगळी माणसे (अर्थात मुखवटे) कसे एका दोरीत काम करीत असतात. अटलबिहारी वाजपेयी हे आरएसएसचा राजकारणातील मुखवटा म्हणून काम करीत होते. वाजपेयी पंतप्रधान झाल्यानंतर पत्रकारितेतील मुखवटा असलेल्या केतकरांचा खरा उत्कर्ष झाला. वाजपेयी सरकारनेच केतकरांना पद्म पुरस्कार देऊन गौरविले. हे साटेलोटे लक्षात घेतले की संघाच्या बामनी राजकारणाचे गुपित उलगडलायला लागते.

महाराष्ट्र सरकारने अरबी समुद्रात शिवाजी महाराजांचे स्मारक बांधण्याचा निर्णय घेतला तेव्हा केतकरांना आपल्या मनातील खदखद लपविता आली नाही. स्मारकाला जाहीर विरोध करणारा अत्यंत विषारी लेख त्यांनी लोकसत्तेतून लिहिला. त्यावेळी केतकरांचा विकृत बामनी चेहरा समोर आला. केतकर गेले तरी केतकरांनी दिलेला बामनी चेहरा लोकसत्तेने प्राणपणाने जपला आहे.

केवळ बामनांचा उदोउदो करणारे हे धोरण एक दिवस लोकसत्ता आणि लोकप्रभेच्या अंगलट येईल. ही पत्रे विनाशाची वाट चालत आहेत. बहुजन वाचक आता जागा झाला आहे, हे या दैनिकांच्या व्यवस्थापनाने लक्षात घ्यायला हवे.
...............................................................................................................
समीर पाटील बोरखेडकर यांच्या sarvsamaj |सर्वसमाज या ब्लॉगवरून साभार 

Saturday, 21 July 2012

लोकसत्तेचे खोटे आरोप

अभिनवगुप्त साहेब, वाईटाचा तिरस्कारच 
करायचा असतो; पुरस्कार नव्हे..............!


लोकसत्तेतून प्रसिद्ध होणा-या अभिनवगुप्तकृत ‘वाचावे नेटके' या सदरात माझ्या ब्लॉगविषयी जे काही छापून आले त्याचा गोषवारा काढणयाचा प्रयत्न मी केला. तेव्हा प्रमुख तीन मुद्दे हाती आले. ते असे :

१. ते आणि आपण : अनिता पाटील यांची शैली ‘आपण आणि ते' असा भेदभाव निर्माण करणारी आहे.
२. तिरस्कार : अनिता पाटील यांच्या लेखनातून तिरस्काराचा भाव पसरविला जातो.
३. ब्राह्मणांचे गोमांस भक्षण : ब्राह्मण हे गोमांस खात होते, असे प्रतिपादन करणारे काही लेख अनिता पाटील यांनी लिहिले. तथापि, हा विषय ‘द होली काऊ' या ग्रंथात आधीच आलेला आहे.

हे तिन्ही आक्षेप कसे खोटे आहेत, हे आता आपण पाहू या. 

ते आणि  आपण  : अभिनवगुप्त यांच्या म्हणण्यानुसार येथे ते म्हणजे ब्राह्मण आणि आपण म्हणजे अनिता पाटील यांच्या जातीचे लोक. माझ्या ब्लॉगरवर आजघडीला सव्वाशे लेख आहेत. त्यापैकी एकाही पोस्टवर मी माझी जात दिलेली नाही. अशा परिस्थितीत आपले आणि परके असा प्रश्न येतोच कुठे?

तिरस्कार : होय मी तिरस्कार पसरविण्याचे काम करते! धर्मग्रंथ, साहित्यग्रंथ आणि चालीरिती यांचा आधार घेऊन ब्राह्मणांनी समाजात भेदभाव आणि द्वेषभाव निर्माण केला आहे. या भेदभावाचा आणि द्वेषभावाचा मी तिरस्कार करते. या वाईट भावनांचा ब्राह्मणांसह सर्वांनीच तिरस्कार करावा, असा माझा आग्रह आहे. त्यासाठी प्रचार आणि प्रचाराचे काम मी माझ्या ब्लॉगच्या माध्यमातून करते. ब्राह्मणांनी निर्माण केलेला भेदभाव आणि द्वेषभाव यांच्याविषयी अभिवनगुप्त यांना प्रेम वाटत असेल, तर त्यांनी ते खुशाल व्यक्त करावे. मी तसे करू शकत नाही. 

ब्राह्मणांचे गोमांस भक्षण : येथे अभिनवगुप्त ‘द होली काऊ' या ग्रंथाचा हवाला देतात. ‘द होली काऊ'मध्ये आलेल्या विषयावर अन्य कोणी लिहूच नये, असा कायदा भारत सरकारने बनविला आहे काय? अभिनवगुप्त यांचा हा मुद्दाच बालिश आहे. लोकसत्तेचेच भावंड असलेल्या ‘इंडियन एक्स्प्रेस'मध्ये ज्या बातम्या येतात, त्या लोकसत्तेत तुम्ही छापताच ना. मग आम्ही असे म्हणायचे का की, इंडीयन एक्स्प्रेसमध्ये आलेल्या बातम्या लोकसत्तेत पुन्हा छापण्याचे काय कारण?
गोमांस भक्षणाच्या मुद्यावर अभिनवगुप्त यांचे अगाध अज्ञान प्रकट होते. लोकसत्तेचे माजी संपादक कुमार केतकर यांनी जालन्यात ब्राह्मण महासंघाच्या अधिवेशनात व्यासपीठावर ‘ब्राह्मण गोमांस खात होते' असे विधान केले होते. हे बहुधा अभिनवगुप्त यांना माहिती नसावे. 
महाराष्ट्रातील प्रख्यात समाजसुधारक लोकहितवादी यांनी ब्राह्मण कसे गोमांस भक्षण करीत होते, हे सांगण्यासाठी एक अख्खा ग्रंथ लिहिलेला आहे. ‘द होली काऊ'चा संदर्भ देणा-या अभिनवगुत्त यांना लोकहितवादी यांचा हा ग्रंथही माहिती नाही, असे दिसते. अन्यथा लोकहितवादी यांनी शे-दिडशे वर्षांपूर्वीच हा विषय मांडला होता, असे लिहायला ते विसरले नसते. लोकसत्तेच्या संपादकांनी आपल्या कर्मचा-यांना मराठी ग्रंथ वाचायचा आदेश (सल्ला नव्हे) द्यावा, अशी नम्र सूचना यानिमित्ताने मला करावीशी वाटते.
(लोकसत्तेने जे काही खोटे नाटे छापले तेच सत्य आहे, असा चुकीचा संदेश वाचकांत जाऊ नये, म्हणून या लेखाचा प्रपंच केला आहे. हे कृपया वाचकांनी ध्यानी घ्यावे.) 

असो. तूर्त एवढेच.

थोडेसे जास्त महत्त्वाचे : माझ्या ब्लॉगची बदनामी करणा-या लोकसत्तेतील लेखाचा खुलासा लोकसत्तेला पाठवा, असा सल्ला माझ्या असंख्य वाचकांनी मला गेल्या पाच-सहा दिवसांत दिला. तथापि, लोकसत्ताच नव्हे, तर बहुतांश मराठी दैनिके खुलासे नीट छापित नाहीत, हे अलीकडे दिसून येत आहे. टीकात्मक लेखन भडकपणे छापायचे आणि त्याला उत्तर देणारे लेख कुठे तरी कोप-यात, नजरेत येणार नाही, असे छापायचे, हा खाक्या माध्यमे वापरतात. (असे करून वृत्तपत्रे आपली विश्वासार्हता गमावीत आहेत. पण विश्वासार्हतेचे पडलेय कोणाला?) अशा परिस्थितीत खुलासा पाठवून काहीही साध्य होणार नाही. विश्वासार्हता गमावलेल्या वृत्तपत्रांत टीकात्मक लेख छापून आला म्हणून आपली विश्वासार्हता अजिबात कमी होत नाही! 

अनिता पाटील

Wednesday, 18 July 2012

" कळी " चे " राज " कारण

गेस्ट रायटर- रवींद्र तहकीक


चारपाच दिवसांपूर्वी महाराष्ट्रातील तमाम मिडिया ( विशेषतः इलेक्ट्रोनिक ) 
ऐका कळीने अख्खा दिवस कासावीस झाला होता. एकच क्लिप वारंवार 
घासून दाखवली जात होती. आणि तीच तीच माहिती वारंवार आळवली जात होती. 
उद्धव ठाकरे लीलावतीत, राज ठाकरे दौरा सोडून परत फिरले, राज लीलावतीत दाखल , 
उद्धवची अन्जिओग्रफ़ि, डिस्चार्ज आणि राज उद्धवला घेवून मातोश्रीवर ...........................
पूर्ण दिवसभर आणि रात्री उशिरा पर्यंत हेच दळण तमाम मराठी ( आणि काही हिंदी सुध्धा )
न्यूज चेनल वर अखंड पणे चालू होतं . 
-----------------------------------------------------------------
टी आर पी मंगता है भाय
--------------------------------------------------------------------
अख्खा महाराष्ट्र आज दुष्काळाच्या टकमक टोकावर उभा आहे , विदर्भातीलच नव्हे तर 
मराठवाडा -कोकण इतकेच काय कृषीसधन पश्चिम महाराष्ट्रातील शेतकऱ्यावर देखील 
या वर्षी आत्महत्या करण्याची पाळी येण्यासारखी स्थिती आहे. जुलै महिना संपत 
आला तरी राज्यातील तमाम धरणे कोरडी आहेत. पुढील वर्षात पिण्याच्या पाण्याचा 
प्रश्न बिकट होण्याची चिन्हे आहेत. त्याच बरोबर महागाईचा टी आर पी गगनाला 
भिडला आहे. विविध घोटाळ्यांच्या आणि भ्रष्टाचाराच्या प्रकरणात सत्ताधारी आणि 
विरोधी एकमेकाशी संगममत असल्यासारखे वागत आहेत. या सर्वा बाबतीत आमचा 
मिडिया चिडीचुप्प आहे. कारण त्यात टी आर पी नाही. राज -उद्धव कहाणीत मात्र 
टी आर पी ला लागणारा सर्व मालमसाला आहे. एक्शन ,इमोशन , मेलोड्रामा सर्वकाही 
म्हणूनच त्यांच्या किरकोळ कळीचे दिवसभर दळण. टी आर पी मंगता है भाय ! 
--------------------------------------------------------------------
स्क्रिफ्ट, स्क्रीनप्ले, स्टोरीबोर्ड , 
डायलॉग एकदम झकास 
----------------------------------------------------------------------
त्या दिवशीची दो- भाई की कहाणी बॉलीवूड मधील मी मी म्हणणाऱ्या मसाला फिल्म 
मेकर्सनी तोंडात बोटे घालावी अशीच होती. मिडीयाने देखील या आगामी " बीछडे मिले " 
कहाणीचा प्रोमो अगदी प्रामाणिक पणे दाखवला. सकाळी १० वाजता दवाखान्यात दाखल 
झालेला एक भाऊ दुपारी चार वाजता जणू काही झालेच नाही अशा थाटात ( अन्जिओग्रफ़ि ?) 
करून बाहेर पडतो तेंव्हा तो अगदी मेकप वगैरे केल्या सारखा फ्रेश दिसतो. आणि काही महिन्या पूर्वी 
पर्यंत एकमेकाची खाल्लेले घास मोजेपर्यंत खाली गेलेली आरोपांची पातळी विसरून दुसरा भाऊ 
त्याचा ड्रायव्हर होऊन त्याला घरापर्यंत सोडतो. दुसऱ्या भावाची बायको तर अगदी चाळीत राहणाऱ्या 
सर्वसामान्य गृहणी सारखी अक्षरश: सैरावैरा पळत दवाखान्यात येताना ऐका सीन मध्ये दिसते. 
इतका मेलोड्रामा मनमोहन देसाईना तरी सुचला असता का ? 
--------------------------------------------------------------------------------
एक्स्ट्रा कलावंताची कमाल 
--------------------------------------------------------------------------------
या कहाणीत मनोहरपंत, रावते, राउत, गोरेबाई , नांदगावकर आदी एक्स्ट्रा कलावंताची 
कामे देखील उत्तम वठली. त्यांना दिलेली वेळ आणि संवाद त्यांनी अतिशय जीव ओतून 
सादर केले . त्यातील खोटेपणा त्यांच्या देहबोलीतून जाणवत असला तरी मुळात कहाणीत 
दम असल्याने या किरकोळ त्रुटी झाकल्या गेल्या . त्यातही कहाणी पुढे काय वळण घेणार 
या बाबतीत या एक्स्ट्रा कलावंताना काहीही कल्पना नसल्याने पुढे मागे आपला रोल कापला जाऊ 
नये याची भीती त्या सर्वांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होती. ( यात फक्त मनोहर पंत जरा गालातल्या 
गालात हसल्या सारखे वाटत होते ) 
------------------------------------------------------------------------
बाळासाहेब आजारी होते तेंव्हा कुठे होता राज ?
------------------------------------------------------------------------
कुणी असेही म्हणेल की मी वड्याचे तेल वांग्यावर नेत आहे किंवा 
राईचा पर्वत करून कल्पनाचे बंगले बांधत आहे. एक भाऊ आजारी पडला
दुसरा भाऊ त्याला भेटायला गेला यात कसले आहे राजकारण ? 
परंतु एक लक्षात घ्या जे राज ठाकरे बाळा साहेबाना आपले दैवत मानतात 
ते दैवत गेल्या सात वर्षात अनेकवेळा लीलावतीत दाखल झाले तेंव्हा 
राज ठाकरे त्यांना भेटायला गेले नाही. ते उद्धवच्या बाबतीत अचानक 
एवढे हळवे का झाले ? 
-----------------------------------------------------------------------------
पिक्चर अभी बाकी है 
------------------------------------------------------------------------------
आर्थात हा फक्त प्रोमो आहे. या प्रोमोच्या समाजात -कार्यकर्त्यात 
काय प्रतिक्रिया उमटतात हें आता पहिले जाईल. आगामी विधानसभा 
निवडणुकीच्या अगदी तोंडावर एक होण्याचा निर्णय घेता येणार नाही 
आशा परीस्थित तिकीट वाटपाचे अनेक पेच निर्माण होतील. बंडखोरी 
माजेल. नियोजन करता येणार नाही. पुढील निवडणुकीत हिंदुत्व आणि 
मराठी हें दोन्हीही मुद्दे कुचकामी ठरतील आशा स्थितीत बाळा साहेबाना 
" विधान सभेवर भगवा फडकलेला दाखवून त्यांचा शेवटचा दिन गोड "करण्याची 
जबाबदारी दोन्ही भावांनी मजबुरीने म्हणा की अपरिहार्यता म्हणून म्हणा 
स्वीकारली आहे . आर्थात यातील अनेक उपकथानके आजून घडायची आहेत 
ती जेव्हा उलगडतील तेंव्हा खरे कथानक समोर येयील. पिक्चर अभी बाकी है 

Tuesday, 17 July 2012

डॉ. बालाजी जाधव यांचे ‘लोकसत्ते'ला खणखणीत उत्तर


आपले ‘मराठ्यांनो षंढ झाला आहात काय?' हे
पुस्तक चाळताना. 
डॉ. बालाजी जाधव 

अनिता पाटील यांच्या ब्लॉगला दुषणे लावणा-या ‘दै. लोकसत्ता'मधील लेखाला  डॉ. बालाजी जाधव यांनी उत्तर दिले आहे. नवविचारांचा पाठपुरावा करणारे, नव्या पिढीतील लेखक म्हणून डॉ. जाधव यांनी लौकिक प्राप्त केलेला आहे. त्यांच्यासारख्या सव्यसाची लेखकाला ‘लोकसत्ते'ने केलेला खोडसाळपणा आवडलेला नाही. ‘लोकसत्ते'तील या लेखाचा दर्जा किती हीन आहे, हेच यावरून सिद्ध होते. 

वाचकांच्या सोयीसाठी डॉ. बालाजी जाधव यांचा लेख खाली देत आहे :

चला बामन गोमांस खात होते, हे तरी मान्य केले!
"‘ब्राह्मण गोमांस खात होते’ हा ‘द होली काऊ’ यांसारख्या पुस्तकात आधीच अभ्यासूपणे ग्रथित झालेला दावा अनिता पाटील यांनी ब्लॉगलिखाणात अशा प्रकारे केला आहे की तिरस्कार ही भावनाच लिखाणात प्रबळ होते आहे, याची खात्री वाचकाला पटावी."

लिहिण्याची ज्याची त्याची पद्धत असते, परंतु लोकसत्ता मधील गुप्ताने बामन गोमांस खात होते हे तरी मान्य केले.खरच ती अभिनव लिहिता तुम्ही.

"....मध्येच साप,वांझ,षंढ...असे हीनत्वदर्शक शब्द सोनवणी यांच्याही लिखाणात दिसतात.हे शब्द निव्वळ भावनिक प्रतिसाद म्हणून वापरलेले (किंवा असा भावनिक प्रतिसाद यावा म्हणून योजलेले) आहेत, यात शंका नाही. संजय सोनवणी यांच्या लिखाणामागचा हेतू भावना भडकावण्याचा नसतो आणि तरीही जोरकसपणासाठी असले शब्द ते वापरतात, याचा अर्थ लिखाणातला मनस्वीपणा, असा घेतला जाणार आहे."

संजय सोनवनीने हीनत्व दर्शक शब्द जरी वापरले तरी ते मनस्वी लिखाण आणि अनिता पाटलाने काही लिहिले की ते तिरस्कार पसरविण्या साठी लिहिले.व्वा काय न्यायबुद्धी आहे.अरे परीक्षण करताना दोघांना एकच मोजपट्ट्या लावणा. हा भेदभाव अभिनव गुप्ताने का केला असेल?

कारण संजय सोनावनीने जे हीनत्व दर्शक शब्द वापरले आहेत ते बहुजनांसाठी.म्हणजे बहुजनांना कमीपणा आणणारे लिखाण हे बाम्नांसाठी मनस्वी असणारच.त्यात काही वादच नाही.

पण अनिता दीदीने वापरलेली भाषा ही भटासाठी हीनत्व दर्शक असल्यामुळे गुप्ताच्या मते हे लिखाण केवळ विद्वेष पसरविणारे ठरते.बस्स झालं परीक्षण.भटांच्या याच हरम्खोरीमुळे आम्हाला इच्छा नसतानाही तिरस्करणीय लिखाण करावे लागते.

असो. या ब्लोग विषयी लोकसत्तेत छापून तेणे यावरूनच भटांनी या ब्लॉगचा धसका घेतला आहे हे सिद्ध करते.अनिता दीदी कीप ईट अप

Monday, 16 July 2012

‘दै. लोकसत्ता'त अनिता पाटील

दै. लोकसत्तामध्ये ‘वाचावे नेट-के' या नावाचे सदर कोणी तरी अभिनवगुप्त या नावाने चालवितो. ब्लॉगविषयीची माहिती त्यात दिली जाते. दर सोमवारी हे सदर प्रसिद्ध होते, असे दिसते. आजच्या सोमवारी म्हणजेच १६ जुलै २०१२ रोजी अभिनवगुप्तांनी माझ्या ब्लॉगवर लिहिलेय. श्री. संजय सोनवणी यांच्या ब्लॉगचीही दखल घेण्यात आलीय. माझ्या ब्लॉगबद्दल संशयाचे वातावरण निर्माण होईल, अशी विधाने लेखात आहेत. माझ्या स्त्रीत्वाबद्दलही संशय घेण्यात आला आहे. काहीच हरकत नाही. सत्याचा मार्ग पत्करलेल्यांना घाव हे सोसावे लागतातच! समाधानाची बाब एवढीच की,  ज्येष्ठ ब्लॉगर संजय सोनवणी यांच्या ब्लॉगवर स्तुतीसुमनांची उधळण झाली आहे. परवापर्यंत सोनवणी साहेबही शिव्यांचेच धनी होत होते. स्तुतिसुमनांनी उधळून बहुधा ते पहिल्यांदाच अनुभवत असावेत. मी सोनवणीसाहेबांचे अभिनंदन करते तसेच अभिनवगुप्तांचे आभार मानते. 

अभिनवगुप्तांनी माझ्या ब्लॉगविषयी काही ‘अभिनव संशोधन' केले आहे, असे त्यांच्या एक-दोन वाक्यांवरून दिसते. मी उत्तर द्यावे, अशा अर्थाचे एक वाक्यही अभिनवगुप्तांनी आपल्या लेखात टाकले आहे. अभिनवगुप्तांच्या लेखात जे काही आरोप माझ्यावर करण्यात आले, त्यावर मी सवडीने लिहिणार आहे! घाई नाही!!  तूर्त अभिनव‘गुप्तां'चा लेख ‘गुप्त' राहू नये, ब्लॉगच्या वाचकांनाही कळावा, एवढ्याचसाठी आजची ही पोस्ट लिहिली आहे. 

--अनिता पाटील

.....................................................................................
अभिनवगुप्तांनी लिहिलेला मजकूर असा : 

वाचावे नेट-के : तिरस्काराच्या पलीकडे...

सोमवार, १६ जुलै २०१२
आम्ही जे सांगतो आहोत ते सत्यच आहे, असा समज कुणाचाही असू शकतो आणि ब्लॉगजगतात या समजाचे विविध आविष्कार दिसतात. त्यापैकी जे आग्रही दावे केवळ स्वत:बद्दल किंवा आप्तस्वकीयांबद्दल असतात, ते निरुपद्रवी मानून वाचक पुढे जातो.
पण समाजाबद्दल किंवा भारतीय- महाराष्ट्रीय समाजरचनेत आजही ठसठसणाऱ्या ‘जाती’ या विषयाबद्दल असे ‘आपलंच खरं’ मानणारे आग्रही दावे कुणी ब्लॉगवर करत असेल, तर त्यामागचा हेतू केवळ सत्यकथनाचा आहे की उपद्रवी विधाने करण्याचा, असा प्रश्न वाचकाला पडतो. उदाहरणार्थ, एखाद्या वाचकाला, ‘अब्राह्मणी’ ही संकल्पना व्यापक अर्थाची आहे हे पटत असेल, तरीही त्याला अनिता पाटील यांच्या ब्लॉगवर ‘अब्राह्मणी’ या संकल्पनेचं जे स्तोम माजलेलं दिसतं, ते पटणार नाही. ‘हा समाज विरुद्ध तो समाज’ हेच सत्य असल्याचा आग्रह अनिता पाटील यांच्या ब्लॉगवरच्या अनेक (बहुतेक) नोंदींचा पाया आहे. ‘ब्राह्मण गोमांस खात होते’ हा ‘द होली काऊ’ यांसारख्या पुस्तकात आधीच अभ्यासूपणे ग्रथित झालेला दावा अनिता पाटील यांनी ब्लॉगलिखाणात अशा प्रकारे केला आहे की तिरस्कार ही भावनाच लिखाणात प्रबळ होते आहे, याची खात्री वाचकाला पटावी. ही खात्री पटलेल्या वाचकांचे मग दोन तट पडतात : पहिला, ‘होय- तिरस्कारणीयच’ असा पवित्रा घेतो. दुसरा- आपल्यावरच तिरस्काराचा हल्ला झाला आहे असं समजून प्रतिहल्ल्याची तयारी करू पाहतो. स्वत: ब्लॉगलेखक वा लेखिकेला हा तिरस्कार हवाच असतो का, पसरवायचाच असतो का, याबद्दल संबंधित लेखकांनी जरूर बोलावं, पण अनिता पाटील यांच्या ब्लॉगवरल्या प्रतिक्रिया पाहिल्या असता- ‘तिरस्काराच्या भावनेची चाहूल ब्लॉगलिखाणातूनच लागल्यामुळे पडलेले दोन तट’ आणि त्यानुसार प्रतिक्रियांचेही दोन प्रकार- हे उघडपणे दिसेल.
तिरस्कारजनक किंवा तिरस्कारजन्य प्रतिक्रिया संजय सोनवणी यांच्या ब्लॉगवर कमी दिसतात, याचं कारण त्यांच्या ब्लॉगवरलं लिखाण. ते सहसा केवळ तिरस्कारवादी किंवा तुच्छतावादी नसतं. आपण सगळेचजण आपला इतिहास समजून घेऊ.. ‘हे म्हणजे इतिहास’ एवढंच जे तथाकथित मुख्य धारेतल्या शैक्षणिक संधींनी आपणा सर्वाच्या माथी मारलंय त्याच्या पलीकडे जाऊन आपण सगळेजण कसे होतो हे पाहू, असा त्यांच्या ब्लॉगचा हेतू असावा असं नोंदींमधल्या विविध संदर्भामुळे लक्षात येत राहतं. म्हणजे या ब्लॉगची बैठक ही अभ्यासकाची आहे. शोधकाची आहे. त्यांच्या ब्लॉगचा हेतू केवळ इतकाच नाही. सोनवणी हे प्रकाशन-क्षेत्रात आहेत आणि त्यांच्या स्वलिखित पुस्तकांची संख्याही भरपूर आहे, हे लक्षात घ्यावं लागेल. छापील माध्यम हाती असताना ब्लॉगसारखं संवादमाध्यम वापरून, चर्चा घडवून आणण्याकडे या ब्लॉगचा कल दिसतो. सभासदसंख्या बऱ्यापैकी असल्यामुळे चर्चा होतेसुद्धा. अगदी ‘शेतमालाचे निर्जलीकरण’ या विषयावरसुद्धा दिल्लीच्या प्रताप नलावडे यांनी ‘तापमान १४० हे चूक- फारतर १२० तापमान हवे’ अशी- म्हणजे ‘दाद- वाहवा’च्या पलीकडची प्रतिक्रिया दिली होती.
या ब्लॉगला दाद मिळते, पण ती अभावितपणे. संजय सोनवणी हे मनस्वी लेखक आहेत आणि ते एकटे आहेत की एखादी टीम संजय सोनवणींचा ब्लॉग लिहिते असा प्रश्न पडतो, असा अभिप्राय संभाजी घोरपडे यांनी ११ जुलै रोजी दिला होता.  ‘मनस्वी’ हा शब्द फार गुळगुळीत झालेला वाटेल, पण सोनवणींच्या ब्लॉगवरले लिखाण कसं असतं आणि ते तसंच का असते, हे समजून घेण्यासाठी तो फार महत्त्वाचा आहे. सोनवणी यांच्या लिखाणात अभ्यास, संकल्पना आणि व्याख्या यांची समज, पुरोगामित्वाच्या मर्यादा ओलांडण्याचा आणि बुद्धिनिष्ठच राहण्याचा प्रयत्न हे सारे दिसत असले तरीही मध्येच साप, वांझ, षंढ.. असे हीनत्वदर्शक शब्द सोनवणी यांच्याही लिखाणात दिसतात. हे शब्द निव्वळ भावनिक प्रतिसाद म्हणून वापरलेले (किंवा असा भावनिक प्रतिसाद यावा म्हणून योजलेले) आहेत, यात शंका नाही. संजय सोनवणी यांच्या लिखाणामागचा हेतू भावना भडकावण्याचा नसतो आणि तरीही जोरकसपणासाठी असले शब्द ते वापरतात, याचा अर्थ लिखाणातला मनस्वीपणा, असा घेतला जाणार आहे.
लिखाणात एकतर मनस्वीपणा असू शकतो किंवा अभ्यासूपणा तरी. या दोन्ही तलवारी संजय सोनवणी यांच्या ब्लॉगमध्ये एकाच म्यानात दिसतात. बऱ्याचदा अभ्यासू लिखाण इतकं असतं की, या नोंदी म्हणजे एखाद्या विद्यार्थ्यांनं एखाद्या शिक्षकाकडून घेतलेल्या नोट्स- आहेत, असा भास व्हावा. पाणिनी आणि त्याचा काळ याबद्दलचं सोनवणी यांच्या ब्लॉगवरचं लिखाण हे असंच नोट्सवजा आहे. ब्लॉगनोंदीच्या साधारण कल्पनीय आकाराच्या मानानं ते बरंच लांबलचकही आहे. पण सोनवणी यांना अखेर एक निष्कर्ष मांडायचा आहे किंवा असलेल्या निष्कर्षांची बाजू घ्यायची आहे. ती बाजूच खरी, असा त्यांचा आग्रह नाही. उलट, ही माझी बाजू आहे आणि त्यावर तुम्ही चर्चा करू शकता, असं आवाहन त्यातून वाचकाला मिळू शकतं आणि अनेक वाचक ते घेतात, असं प्रतिक्रियांची संख्या आणि सूर यांवरून दिसून येतं.
संजय सोनवणी यांचा ब्लॉग हा ‘यशस्वी’ ब्लॉगपैकी एक आहे. सोनवणी यांचे लेख अन्यत्र (दैनिकं, दिवाळी अंक) छापून येत असले, तरी ते इथे तसेच्या तसे डकवण्याचा उद्योग कमी आहे. आठवडय़ातून जवळपास तीन नोंदी, एवढय़ा संख्येनं वाचनसंधी देणारा हा ब्लॉग आहे. इथे विषयांचं वैविध्य असलं तरी ‘खऱ्या’ पुरोगामित्वाच्या शोधात सोनवणी आहेत आणि त्यांचा ब्लॉगयज्ञही त्यासाठीच आहे, अशी वाचकाची धारणा झाल्यास हा ब्लॉग वाचनीय ठरू शकतो. आजच्या पुरोगाम्यांचा धिक्कार करण्याची जी कारणं सोनवणी यांच्याकडे आहेत, ती एरवी पुरोगाम्यांना हास्यास्पद अथवा दुष्ट ठरवणाऱ्यांपेक्षा नक्कीच वेगळी आहेत.
अगदी ताज्या, अलीकडच्या तीन नोंदींमध्ये परमेश्वर, धर्म आणि आनंद-दु:ख यांच्यावरचे विचार सोनवणी यांनी मांडले आहेत. हे विचार फक्त त्यांचे अर्थातच नाहीत. ते संस्कृतीचं आणि विचारधनाचं सार आहे.. त्यातून सोनवणी यांनी अमुकच का वेचलं, याचं स्पष्टीकरण त्यांच्या लिखाणातून मिळतं, हा त्या लिखाणाचा गुणच आहे. मात्र, शैलीदृष्टय़ा या तीन नोंदींकडे पुन्हा एकवार कुतूहलानंच पाहावंसं वाटेल. फेसबुकवरचा चटपटीतपणा, ट्विटरवरली शब्दमर्यादा या सर्वाची उगाच आठवण समजा या तीन नोंदी वाचताना झाली, तर याच नोंदींबद्दल अशी काळजीही वाटू लागेल की, ‘हे आता कुणीतरी मेलवर ‘फॉरवर्ड’ वगैरे करणार की काय?’
‘कल्ट’ ठरण्याचा- पंथाभिमानाचा धोका संजय सोनवणी यांच्या ब्लॉगला आहे आणि तो लेखकामुळे नसून उत्साहीपणे किंवा आपले आग्रही दावे या ब्लॉगवर लादून इथल्या नोंदी वाचणाऱ्या वाचकांमुळे आहे.. हा धोका या नोंदीपासून सुरू झाला आहे, हे आत्ताच या ब्लॉगची दखल घेण्याचं एक निमित्त. स्वत: भरपूर ब्लॉगिंग करणाऱ्या सागर भंडारे यांनी या ब्लॉगची शिफारस केली होती. 

Saturday, 14 July 2012

बोलका शंख : न्या. चंद्रशेखर धर्माधिकारी



रविवार दि. ८ जुलै २०१२ रोजी आमिर खान याचा ‘सत्यमेव जयते' हा शो मी एबीपी न्यूजवर पाहिला. हा भाग आमिरने ‘अस्पृश्यता' हा विषय घेऊन उभा केला. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या कार्यक्रम पत्रिकेत अस्पृश्यता निवारण हा विषय प्रमुख स्थानी होता. या पाश्र्वभूमीवर आमिरने आपल्या शोमध्ये ज्येष्ठ गांधीवादी न्या. चंद्रशेखर धर्माधिकारी यांना पाचारण केले होते. चिकने-चोपडे दिसणारे न्या. धर्माधिकारी या कार्यक्रमाचे हिरो ठरले! स्टुडिओत उपस्थित असलेल्या प्रेक्षकांमधून न्या. धर्माधिकारी यांच्या दर तिस-या वाक्याला टाळ्या मिळत होत्या. न्या. धर्माधिकारी यांची गाजलेली काही वाक्ये अशी :

१. मी सनातन ब्राह्मण कुटुंबात जन्माला आलो तरी व्रतबंधादि बंधने (गळ्यातील जानवे वगैरे) मी झुगारून दिली.

२. माझ्या कुटुंबियांनी, मुला-बाळांनी मला विरोध केला. तरी मी जुमानले नाही. मला आज माझ्या घरात मला इतर कुटुंबीय वापरतात ते बाथरूम वापरता येत नाही. 

३. जन्म कोणाच्या पोटी घ्यायचा हे आपल्या हातात नसते. हातात असते, तर माझ्या मुलांनी माझ्या पोटी जन्म घेतला नसता.

४. मी ब्राह्मण्य सोडले म्हणून कोणीही धर्माधिकारी आडनावचा माणूस आमच्या घरी येत नाही. त्यामुळे माझ्या बायकोला पाहुण्यांचा त्रास अजिबात झाला नाही. 

५. माझा पुतण्या आजारी पडला, तेव्हा आम्हा धर्माधिका-यांचे रक्त त्याच्या रक्ताशी जुळू शकले नाही. एका दलिताचे रक्त जुळले. जात मनात कितीही घर करून बसली असली तरी ती रक्तात उतरत नाही.

६. ब्राह्मणांच्या हातात झाडू आणि दलिताच्या हातात गीता यावी, यासाठी गांधीजींनी आंदोलन केले. 

न्या. धर्माधिकारी यांची वरील रोमांचक वाटणारी वाक्ये त्यांचा ढोंगीपणा आणि अपयश सिद्ध करणारी आहेत. न्या. धर्माधिकारी यांचे ढोंग अधिक स्पष्टपणे समोर यावे यासाठी मी आधी महात्मा गांधी यांच्या आयुष्यातील एक घटना सांगते. ही घटना आहे १९१५ सालची. महात्मा गांधी यांचे ठक्कर बाप्पा नावाचे एक निकटचे सहकारी होते. ठक्कर बाप्पांनी दुधाभाई नावाच्या एका दलित व्यक्तीला महात्मा गांधी यांच्याकडे पाठविले. गांधीजींनी दुधाभाईला साबरमती आश्रमात ठेवून घेतले. दलिताला आश्रमात जागा दिली म्हणून आश्रमातील सर्वजण गांधीजींच्या विरोधात गेले. गांधीजींची बहीण गोकीबेन आणि पत्नी कस्तुरबा  यांच्यासह इतर सर्व कुटुंबीयसुद्धा गांधीजींच्या विरोधात गेले. आश्रम चालविण्यासाठी पैसा देणा-या देणगीदारांनीही विरोध केला. गांधीजींचा आश्रम बंद पडण्याची वेळ आली. 

विरोध झाला म्हणून गांधीजींनी आपले विचार बदलले नाहीत. ते आपल्या सहकाèयांना म्हणाले, ‘दुधा आश्रम सोडून जाणार नाही. ज्यांना दुधासोबत राहायचे नसेल, त्यांनी आश्रम सोडून जावे.' देणगीदारांना उद्देशून गांधीजी म्हणाले, ‘देणग्यांसाठी मी दुधाला सोडू शकत नाही. तुमच्या देणग्या मिळाव्यात म्हणून मी आश्रम चालवित नाही. पैशावाचून माझे अडत नाही. मी दुधाभाईला घेऊन दलितांच्या वस्तीत राहीन.'

मधला मार्ग म्हणून दुधाभाईसाठी आश्रमात वेगळी व्यवस्था करावी, असा आग्रह विरोधकांनी गांधीजींकडे धरला. तो गांधीजींनी फेटाळून लावला. दुधाभाईसाठी वेगळी व्यवस्था करणे हे त्याला आश्रम प्रवेश नाकारण्यापेक्षाही भयंकर आहे, असे गांधीजींनी सुनावले. दुधाभाई माझ्यासोबत इतरांसारखाच बरोबरीच्या नात्याने आश्रमात राहील, असा निर्णय गांधीजींनी दिला. गांधीजींनी दुधाभाईला आश्रमात ठेवले. गांधीजींची बहीण गोकीबेन आश्रम सोडून गेल्या. इतरांनी मात्र नमते घेऊन दुधाभाईला स्वीकारले. 


आणखी तीन वर्षांनी या घटनेला आता १०० वर्षे पूर्ण होतील. या शंभर वर्षांत गांधीजींचा विचार समाजात विशेषत: ब्राह्मण समाजात किती रुजला, याचे परिमाण म्हणून न्या. धर्माधिकारी यांच्या परवाच्या वक्तव्यांकडे पाहता येईल. त्यासाठी गांधीजी आणि न्या. धर्माधिकारी यांची आता थोडक्यात तुलना करूयात.

१. 
गांधीजी : आपल्या घरात दलिताला ठेवले. 
न्या. धर्माधिकारी : गळ्यातील जानवे नावाचा धागा फेकून दिला. 
२. 
गांधीजी : दलिताला घरात राहू द्यावे, यासाठी नातेवाईकांची परवा केली नाही. दुधा पसंत नसेल तर, आश्रम सोडा, असे ते कुटुंबीयांनाही फर्मावले. सख्ख्या बहिणीला आश्रमाबाहेर काढतले.
न्या. धर्माधिकारी : मी जानवे घालणार नाही. माझे वागणे पसंत नसेल, तर घर सोडा, असे फर्मान सोडण्याचे धाडस न्या. धर्माधिकारी करू शकले नाही. 
४. 
गांधीजी : आपल्या कुटुंबाने सनातनीपणा सोडवा यासाठी गांधीजी अडून बसतात. 
न्या. धर्माधिकारी : आपल्या कुटुंबाने ब्राह्मण्य सोडावे, यासाठी काहीही करीत नाहीत. उलट कुटुंबियांचा सनातनीपणा सहन करीत घरातच कोडग्यासारखे राहतात. कुटुंबीयांचे बाथरूमही न्या. धर्माधिकारी वापरू शकत नाहीत. 

दलिताचे रक्त चालेल, पण दलित चालणार नाही!
न्या. धर्माधिकारी यांच्या कुटुबांने त्याच्या पुतण्यासाठी दलिताचे रक्त स्वीकारले. पण दलितांना स्वीकारले का? अजिबात स्वीकारलेले नाही. न्या. धर्माधिकारीच सांगतात की, आमच्या घरी कोणीही धर्माधिकारी येत नाही. ज्या लोकांना गळ्यात जानवे नसलेला धर्माधिकारी चालत नाही, त्यांना दलित चालतीलच कसे? ब्राह्मणांनी हजारो वर्षे दलितांचे शोषण केले आहे. आता ब्राह्मण दलितांचे रक्तही शोषण करीत आहेत. ही ब्राह्मणांनी १०० वर्षांत केलेली प्रगती आहे, असा निष्कर्ष यावरून काढता येईल. 

जातीयवादी पुतण्याला मरू द्यायला हवे होते
ब्राह्मण्य न सोडणारा न्या. धर्माधिकारी यांचा पुतण्या आणि त्याचे आईवडील हे जीवावर बेतते तेव्हा दलिताचे रक्त बिनबोभाट स्वीकारतात. भेदभाव पाळणा-या आपल्या पुतण्याला दलिताचे रक्त त्यांनी द्यायलाच नको होते. त्याला मरू द्यायला हवे होते. तोच योग्य न्याय झाला असता. बरे रक्त दिल्यानंतर तो पुतण्या आणि त्याचे कुटंबीय सुधारले असे नाही. हे लोक अजूनही ‘जानवे न घालणाèया धर्माधिका-या'च्या घरी जात नाही, ते नाहीतच. आधुनिकतेचे लाभ उचलायचे, त्यासोबतची कर्तव्ये मात्र लाथाडायची, ही ब्राह्मणी वृत्ती जशी या पुतण्यात आहे, तशीच ती न्या. धर्माधिकारी यांच्यातही आहे, असे दिसते. तसे नसते, तर न्या. धर्माधिकारी यांनी त्या पुतण्याला दलिताचे रक्त मिळूच दिले नसते. 

जन्म कोणाच्या पोटी घ्यायचा हे ठरविता आले असते, तर माझ्या मुलांनी माझ्या पोटी जन्म घेतला नसता, असे न्या. चंद्रशेखर धर्माधिकारी सांगतात. ब्राह्मणवादापुढे न्या. धर्माधिकारी किती हतबल आहेत, हेच त्यांच्या या वक्तव्यातून दिसते. स्वत:च्या घरात ज्यांना साधे माणूसपणाचे संस्कार पेरता आले नाहीत, त्यांच्याकडून फारशी अपेक्षा करण्यात काहीच अर्थ नाही. या पाश्र्वभूमीवर न्या. चंद्रशेखर धर्माधिकारी हे केवळ ‘बोलके शंख' ठरतात. 

ब्राह्मण ही जात कधीच सुधारू शकणार नाही, असे मी जेव्हा म्हणते, तेव्हा लोक माझ्यावर टीका करतात. न्या. धर्माधिकारी यांनी आपली हतबलता सांगून जणू माझ्यावतीने माझ्या टीकारांना उत्तरच दिले आहे. 
अनिता पाटील

Wednesday, 11 July 2012

कुणबी-मराठा एकच : तुकोबांच्या गाथ्यातील पुरावे

बरे झाले देवा कुणबी केलो

मराठा आणि कुणबी या जाती एकच आहेत, हे पाहण्यासाठी आपण आता जगद्वंद्य जगद्गुरू श्रीसंत तुकाराम महाराज यांनी आपल्या अभंगांत मागे ठेवलेले पुरावे पाहणार आहोत. संत तुकाराम हे जन्मजात महाकवी होते. त्यांनी आपल्या मनातील भाव व्यक्त करताना कोणताही आडपडदा ठेवला नाही. घरात पत्नी रागावली तरी त्यांनी त्याचे अभंग रचून ठेवले. मन आवरताना होणा-या यातनाही अभंगरूपाने लिहून ठेवल्या. त्यासाठी एकच उदाहरण देते. तुकाराम म्हणतात,  काय काय करितो या मना । परी ते नाईके नारायणा ।। 


संत तुकाराम प्रत्यक्ष कविताच जगत होते. सर अ‍ॅलेक्झांडर ग्रँट या इंग्रजी विद्वानाने तुकारामांना ''भारताचे राष्ट्रीय कवी'' अशी उपाधी दिली होती. (ग्रँट यांच्या विषयीच्या माहितीसाठी तळटीप पहा. )  या पाश्र्वभूमीवर संत तुकारामांनी कुणबी या जातीबद्दल मागे ठेवलेल्या पुराव्यांचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. 

संत तुकारामांचा उल्लेख करताना विविध प्रकारच्या जातीवाचक उपाध्या लावला जातात. परंतु त्या सर्व त्यांच्या व्यवसायानुसार लावल्या गेल्या. त्यांना वाणी म्हणत. तुका झाला वाणी । चुकवुनी चौरयांशीच्या खाणी ।। अशा अभंग पंक्तीमुळे त्यांना वाणी म्हटले गेले. तुकारामांकडे मोठा व्यापार-उदिम होता. त्यामुळे त्यांनी हा उल्लेख प्रतिकात्मकरित्या केला आहे. तुकारामांनी सर्व संसाराचा त्याग केला होता;  म्हणून त्यांना गोसावी  म्हटले गेले. त्यांच्या घराण्यात महाजनकी होती;  म्हणून त्यांना महाजन म्हणण्याचीही प्रथा होती. परंतु या सर्व उपाध्या होत. त्याचा तुकारामांच्या जातीशी काहीही संबंध नाही, हे येथे लक्षात घेतले पाहिजे.
तुकारामांचे मुळचे घराणे क्षत्रियांचे होते. परंतु कालौघात ब्राह्मणांनी स्वत: वगळता इतर सर्व वर्णांना  वेदाधिकार नाकारला. त्यामुळे क्षत्रिय जातीही शुद्र गणल्या गेल्या. त्यामुळे तुकाराम स्वत:चा उल्लेख शुद्र असा करतात. असा उल्लेख करताना त्यांच्या मनातला नम्र भावही प्रकट होतो. भेदाभेद भ्रम अमंगळ या आपल्या उक्तीशी प्रमाणिक राहून तुकाराम स्वत:ला शुद्र म्हणवून घेण्यात धन्यता मानतात. संत तुकारामांच्या गाथ्यात असे असंख्य अभंग आपणास दिसून येतात. मात्र या सारयांत न पडता एकच उदाहरण देते. ‘‘आपणांस वैराग्य कसें प्राप्त झाले याविषयी तुकोबारायांचे संतांशीं व देवाशीं संभाषण''  या शीर्षकाखाली काही अभंग तुकाराम गाथ्यात आहेत. त्यातील पहिल्याच अभंगातील काही पंक्ती अशा -
याती शुद्र वैश्य केला वेवसाव ।
आधी तो हा देव कुळपूज्य ।।१।।
नये बोलो परि पाळिले वचन ।
केलिया प्रश्न तुम्ही संती ।।२।।
दुष्काळे आटिले द्रव्य, नेला मान ।
स्त्री एकी अन्न करिता मेली ।।४।।
लज्जा वाटे जीवा त्रासलो या दु:खे ।
वेवसाव देखे तुटी येता ।।५।।
या अभंगात तुकाराम स्वत:ला शुद्र म्हणतात. वैश्य (व्यापार) व्यवसाय केल्याचे नमूद करतात. मी वैश्य आहे असे म्हणत नाहीत. याचाच अर्थ तुकाराम हे वैश्य नव्हते. मग ते कोण होते? त्यासाठी खालील अभंग पाहा -
बरे झाले देवा कुणबी केलों ।
नाही तरी दंभे असतो मेलो ।।१।।
भले केले देवराया ।
नाचे तुका लागे पाया ।।२।।
तुका म्हणे थोरपणे ।
नरक होती अभिमाने ।।६।।
या अभंगात संतश्रेष्ठ तुकाराम देवाला उद्देशून म्हणतात, ‘‘देवा बरे झाले तू मला कुणबी केले. उच्च जातीत जन्माला घातले असतेस तर मी फुकाचा ताठा मनात बाळगून मेलो असतो.''   आपण कुणबी असल्याचा आनंद होऊन तुकाराम नाचत देवाच्या पायी लागतात. हे दुसरया कडव्यावरून स्पष्ट होते.

या पुराव्यांवरून एक गोष्ट सूर्य प्रकाशाइतकी स्पष्ट आहे कि, तुकाराम  हे कुणबी जातीत जन्माला आले होते. वारकरी संतांनी आपल्या जाती कधी लपविल्या नाहीत. या उलट संतांनी आपल्या जाती मिरविल्या. कारण कोणतीही जात श्रेष्ठ नाही, तसेच कोणतीही जात कनिष्ठही  नाही, अशी त्यांची निस्सीम श्रद्धा होती. ‘भेदाभेद भ्रम अमंगळ'  हाच वारकरी पंथाचा आत्मा होता.

कुणबी-मराठा पर्यायवाचक यातीनामे

असो. या वरून एक गोष्ट निर्विवाद सिद्ध होते की, तुकाराम कुणबी होते. पण खरा प्रश्न असा आहे की, यावरून कुणबी आणि मराठा या जाती एकच आहेत, हे सिद्ध होते का? याचे उत्तर आहे - होय, कुणबी आणि मराठा या जाती एकच आहेत, हे यावरून सिद्ध होते. तुकारामा नंतरच्या त्यांच्या बहुतेक पिढ्या आपली जात मराठा अशीच नोंदवित आहेत. तुकारामांचा मूळचा वंश शिवकालीन मोरे घराण्यातील आहे. त्यांचे वंशज आजही मोरे हेच आडनाव वापरतात. जावळीचे मोरे इतिहासात प्रसिद्ध आहेत. ते स्वत:ला पूर्वापार मराठा याच नावाने संबोधतात. याचाच अर्थ कुणबी आणि मराठा ही दोन्ही यातीनामे एकमेकांना पर्यायवाचक ठरतात.

- अनिता पाटील.

तळटीप  : तुकारामांना राष्ट्रकवी ही उपाधी देणारे सर अलेक्झांडर ग्रँट (१८२६-१८८४) हे ब्रिटिश विद्वान होते. इंग्रजी राजवटीत १८६० साली ते मुंबईतील एल्फिन्स्टन कॉलेजात प्रोफेसर म्हणून रूजू झाले. १८६२ साली ते याच महाविद्यालयाचे प्राचार्य झाले. १८६३ साली ते तत्कालीन बॉम्बे युनिव्हर्सिटीचे कुलगुरू झाले. १८६८ पर्यंत ते कुलगुरूपदावर कायम होते. १८६८ साली ते तत्कालीन बॉम्बे लेजिस्लेटिव्ह कौन्सिलचे (विधान परीषद) सदस्य म्हणून नियुक्त झाले.

Monday, 9 July 2012

वैदिक धर्म बडविण्यात बौद्ध-जैनांचे योगदान



उपनिषदे : अवैदिक परंपरेचा परिणाम 
 आज भारतात वैदिक धर्म पूर्णत: बुडाला असून, अहिंसाधिष्ठित मूलनिवासी दयाधर्म विविध रूपांत दिसून येतो. महाराष्ट्रातील भक्तिपंथ हे या अहिंसाधिष्ठित मूलनिवासी परंपरेचे एक रूप होय. ब्राह्मणी परंपरेतील उपनिषदे ही वैदिक धर्मापेक्षा मूलनिवासी दयाधर्माला जवळची आहेत. उपनिषदांना वेदान्त म्हणतात. वेदान्त म्हणजेच वेदांचा अंत. उपषिदांत हिंसा  वर्ज्य  केली आहे. वैदिक धर्माचा मुख्य आधारच हिंसा होता. 
उपनिषदांनी वेदांचा मुख्य आधार तोडून वैदिक परंपरा संपविली, म्हणून त्यांना वेदांत म्हणतात. बौद्ध आणि जैन धर्माचा भारतासह संपूर्ण आशिया खंडात प्रसार झाल्यानंतर ब्राह्मणांनी स्वत:च्या परंपरांचा त्याग करून दयाधर्मीय परंपरेचा स्वीकार केला. त्यातून उपनिषदांची निर्मिती झाली. अशा प्रकारे उपनिषदांचे कर्ते ब्राह्मण ऋषि असले तरी त्यातील विचार बिगरब्राह्मणी परंपरेतून घेण्यात आले असल्यामुळे उपनिषदांना अवैदिक दयाधर्म परंपरेत समाविष्ट करणेच अधिक श्रेयस्कर ठरेल. 

बौद्ध आणि जैन धर्माची धास्ती 
बौद्ध आणि जैन धर्मामुळे भारतातील वैदिक परंपरेचा उच्छेद झाला. पुढे कुमारिल भट्ट व आद्य शंकराचार्यांनी वैदिक परंपरा स्थापित केली, तरी तिचा ‘यज्ञसंस्कृती' हा  मूळ आत्मा हरवला होता. शंकराचार्यांनी एकप्रकारे बौद्धमताचा स्वीकार करून वैदिक धर्मात बदल केले. बौद्ध-जैन परंपरांचा हा आघात वैदिकांच्या प्रचंड जिव्हारी लागला. या परंपरांविषयी असंख्य कठोर वचने वैदिकांनी लिहून ठेवली आहेत. बौद्ध-जैन मंदिरांत वैदिकाने प्रवेश करू नये असे कडक निर्बंध घालणारे संस्कृत वचन असे :
हस्तिना ताड्यमानोऽपि न गच्छेज्जैनमंदिरम् !२
हे वाचन पाहता वैदिक आर्य ब्राह्मणांनी बौद्ध आणि जैन धर्माची धास्ती घेतली होती असे दिसून येते.

पशु हिंसेला प्रतिबंध 
वैदिक परंपरेत कर्म हे प्रधान असून त्या काळीही जाती होत्या. वैदिक हे वेदच प्रमाण मानीत. बौद्ध परंपरेत वेद, कर्म व जाती या तिन्ही गोष्टी दयाधर्माच्या विरुद्ध जाऊ लागल्या. त्यामुळे बौद्धांनी त्यांचा नि:पात केला. या संदर्भात मोठ मोठे वादविवाद झाले. (उत्तर काळात कुमारिल भट्टाने बौद्ध पंडितांसोबत घातलेले वादविवाद प्रसिद्धच आहेत.) ‘शेवटी दयाधर्माचा जय होऊन वैदिकांस नमावे लागले. प्रमाणं परमं श्रुति: (अर्थ : श्रुती म्हणजेच वेदवचन हेच प्रमाण) इत्यादि मताभिमानाची सूत्रे जाऊन त्या जागी अस्वग्र्यं लोकविद्धिष्टं (लोकांत जे रूढ आहे ते प्रमाण मानावे.) इत्यादि वचने लोकांमध्ये चालू झाली. यज्ञात पशु मारू नये याविषयी उत्तरकालीन वेदवाङ्मयात अनेक वचने सापडतात. ती सर्व बौद्ध धर्माच्या रेट्यामुळे आलेली दिसतात. ऐतरेय आरण्यकातील हे एक वचन पाहा :
पुरूषं वै देवा: पशुमालभन्त 
अमेध्या: पशवस्तस्मादेतेषां नाश्नीयात
(द्वितीय पंचिका. आठवा खंड)
अर्थ : पशुंतून मेध्य निघून तांदुळांत आले आहे. म्हणून पशूंनी यज्ञ न करता तांदुळांनी करावे. 
तैत्तिरीय आरण्यकाच्या १२ व्या अनुवाकात असाच उपदेश आढळून येतो. 
माता रुद्राणां० मा गामनागामदितिं वधिष्ट ।।ऋग्वेद ६-७-८
या मंत्रात याज्ञिकांस असा उल्लेख उपदेश आहे की, तुम्ही गरीब गायीचा जीव घेऊ नका. गायीला माता म्हटल्याचा हा वेदवाङ्मयातील पहिला उल्लेख होय. कालांतराने गाय ही नुसतीच गोमाता न राहता तिच्यात ३३ कोटी देव घुसडविण्यात आले.  बौद्धांच्या अहिंसा तत्त्वावर कडी करण्याच्या प्रयत्नात वैदिकांनी हे उपद्व्याप केले. त्यात वैदिक धर्माचा मूळ आत्मा मात्र हरवला. एकप्रकारे वैदिक धर्मच पराभूत झाला.
देवा-धर्माच्या नावर हिंसा करणे हे माणूसपणाचे  लक्षण नव्हे. अमानवी वैदिक ब्राह्मण आर्यांना भगवान गौतम बुद्ध व भगवान महावीर यांनी माणूस बनविले.  

अनिता पाटील

गीतेतला वेदविरोध

वंशशुद्धीची कल्पना नाकारली
  
सध्या ज्याला हिंदू धर्म म्हणून संबोधले जाते त्या धर्मात श्रीकृष्णाने भर रणांगणावर अर्जुनाला सांगितलेल्या गीतेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आज अस्तित्वात असलेला भारतीय धर्माचा ढाचा भक्ती सांप्रदायाच्या पायावर उभा आहे आणि भक्ती सांप्रदाय गीतेच्या पायावर उभा आहे. गुजरातपासून बंगाल-आसामपर्यंत आणि महाराष्ट्रापासून नेपाळपर्यंत भक्ती संप्रदायाचा प्रभाव आहे. हा सांप्रदाय भारतीय धर्माच्या ब्राह्मणी शाखेपेक्षा पूर्णत: भिन्न आहे. ब्राह्मणी धर्म भेदभावाच्या तत्त्वाला अनुसरतो; तर भक्ती सांप्रदाय समानतेच्या तत्त्वाला अनुसरतो. देशातील सर्वच भागांतील भक्तिपंथियांना ब्राह्मणी छळाला तोंड द्यावे लागल्याचा इतिहास आहे. भक्ती सांप्रदायाने ब्राह्मणी धर्माला सुरूंग लावला. भक्ती सांप्रदायाचे मूळ नाथपंथात आहे. ही परंपरा आदिनाथापासून सुरू होते. या परंपरेतील पहिला महापुरुष मच्छिंद्र होय. ही परंपरा मच्छिंद्र-गोरक्ष-गहिनी-निवृत्ती आणि ज्ञानेश्वर अशी महाराष्ट्रात आली. बंगालात चैतन्य सांप्रदायाच्या रूपाने ती अस्तित्वात आहे. याच परंपरेतील बाबाजी चैतन्य यांना जगद्गुरू संत तुकारामांनी आपले गुरू मानले. अशा प्रकारे वारकरी परंपरा ही नाथपंथात मिसळून गेलेली आहे. या परंपरेने ब्राह्मणी भेदभावाला विरोध करून सर्व जातींना समान तत्त्वावर धार्मिक अधिकार दिले. या समानतेचे मूळ गीतेत सापडते. वेदांना धक्का दिल्याशिवाय समानतेचे तत्त्व अस्तित्वात येऊ शकत नाही. याची कल्पना श्रीकृष्णाला होती. त्यामुळे त्याने गीतेत वेदांतील तत्त्वज्ञानालाच नव्हे, तर खुद्द वेदांनाच बाजूला उचलून फेकले. हा विचार कोणालाही धाडसी वाटेल, पण तोच सत्य आहे. याचे पुरावे इतरत्र नव्हे, तर खुद्द गीतेतच सापडतात. तथापि, ब्राह्मणी हितसंबंध जपण्यासाठी आजपर्यंत गीतेतील हे क्रांतीकारी विचार हेतूत: दाबून टाकण्यात आले. वैदिक विचारांचे सार असलेले मुद्दे काढायचे ठरल्यास पुढील प्रमाणे निघतील :  
१. वंशशुद्धी.
२. ठराविक जातींना विशेषाधिकार. 
३. विशिष्ट जातींना धर्माधिकार देण्यास नकार. 
४. वेद सर्वश्रेष्ठ. वेदांचा शब्द अंतिम.
हे सारमयी मुद्दे श्रीकृष्णाने गीतेत कसे निकाली काढले ते आता आपण टप्प्याने पाहू. पहिले तीन मुद्दे वेगवेगळे दिसत असले तरी ते एकमेकांशी संबंधित आहेत. किंबहुना एकच मुद्दा वेगवेगळ्या रूपात समोर येताना दिसतो.
तो म्हणजे वंशशुद्धी.

अर्जुन का घाबरला? 
अर्जुन रणांगणात येतो. समोर आपले नातेवाईक पाहून हतधैर्य होतो. माझ्याच नातेवाईकांना कसे मारू, असा प्रश्न त्याला पडतो. आणि तो रथातून खाली उतरतो. त्याच्या हातील गांडीव धनुष्य गळून पडते. +न कांक्षे विजयं कृष्ण न च राज्यम सुखानिच्+ असे म्हणून अर्जून युद्ध करण्याचे नाकारतो. त्यावर श्रीकृष्ण त्याला गीता सांगतो. हा गीतेचा कारणभाव आजपर्यंत आपल्याला सांगितला जातो. यात काही चूकही नाही. पण हे पूर्ण सत्य नाही. ब्राह्मणवादी आपल्याला अर्धेच सत्य सांगत आहेत. किंबहुना अर्जुनाने उपस्थित केलेला मुख्य मुद्दा जाणीवपूर्वक दुर्लक्षिला जातो. काय आहे हा मुख्य मुद्या? हा मुख्य मुद्दा आहे, वंशशुद्धीचा! अर्जुनाच्या तोंडचे गीतेच्या पहिल्या अध्यायातील पुढील श्लोक पहा :

कथं न ज्ञेयमस्माभि: पापादस्मान्निवर्तितुम ।
कुलक्षयकृतं दोषं प्रपश्यद्भिर्जनार्दन् ।।३८।।
कुलक्षये प्रणश्यन्ति कुलधर्मा: सनातना: ।
धर्मे नष्टे कुलं कृत्स्नमधर्मोऽभिभवत्युत ।।३९।।
अधर्माभिभवात्कृष्ण प्रदुष्यन्ति कुलस्त्रिय: ।
स्त्रीषु दुष्टासु वारष्णेय जायते वर्णसंकर: ।।४०।।
संकरो नरकायैव कुलघ्नानां कुलस्य च ।
पतन्ति पितरो ह्येषां लुप्त पिण्डोदकक्रिया: ।।४१।।
दोषैरेतै: कुलघ्नां वर्णसंकरकारकै: ।
उत्साद्यन्ते जातिधर्मा: कुलधर्माश्च शाश्वता: ।।४२।।
उत्सन्नकुलधर्माणां मनुष्याणां जनार्दन ।
नरकेऽनियतं वासो भवतीत्यनुशुश्रूम ।।४३।।

हे पहिल्या अध्यायातील अंतिम टप्प्यातील श्लोक आहेत. यानंतर उपसंहाराचे तीन श्लोक येऊन पहिला अध्याय संपतो. यावरून या श्लोकांचे महत्त्व लक्षात येते. हे श्लोक अर्जुनाच्या मनातील सर्वांत मोठे प्रश्न आहेत. पण या प्रश्नांची चर्चाच आपल्याकडे कधी होत नाही. कारण त्यांची उत्तरे अत्यंत धक्कादायक आणि आपल्या मूळ धार्मिक धारणांना धक्का देणारी आहेत. 
हे सर्व समजून घेण्यासाठी आपण प्रथम या श्लोकांचा अर्थ समजून घेऊ या :

युद्ध केल्याने कुलक्षय म्हणजेच कुलांचा नाश होणार आहे. तसेच कुलक्षय करणे हे पाप आहे, हे माहीत असूनही आपण हे पाप का करावे ।।३८।।
कुलांचा नाश झाल्याने कुलांच्या सनातन परंपरा नष्ट होतात. धर्म नष्ट होऊन अधर्माचा पगडा बसतो ।।३९।।
अधर्माचे प्राबल्य होते तेव्हा कुलातील स्त्रिया प्रदुषित होतात. कुलस्त्रिया प्रदुषित झाल्याने वर्णसंकर होतो ।।४०।।
वर्णसंकरामुळे नरकमय स्थिती प्राप्त होते. पिंडदानादि क्रिया नष्ट होतात. अंतत: पितरे पतन पावतात ।।४१।।
कुलपरंपरांचा अशा प्रकारे नाश केल्यामुळे सर्व प्रकारच्या जातीव्यवस्था नष्ट होतात. जातिधर्म आणि कुलधर्म उद्ध्वस्त होतो ।।४२।।
हे रक्षणकत्र्या श्रीकृष्णा मी असे ऐकले आहे की, अशा प्रकारे कुलधर्म नष्ट करणारे लोक नेहमी नरकात राहतात ।।४३।।

या सहा श्लोकांतून असे दिसते की, अर्जुनाला युद्धाची पर्वा नाही. त्याची भीती वेगळीच आहे. त्याला वाटते की, +युद्ध केल्यानंतर वीर पुरूष मारले जातील. त्यांच्या बायका विधवा होतील. विधवा बायका प्रदुषित होतील. त्यातून वर्णसंकर होईल. जातीव्यवस्था नष्ट होईल.+ ही भीती त्याला वाटते कारण, असे केल्याने आपण नरकात जाऊ असे त्याला वैदिक परंपरेने शिकविले आहे.

अर्जुनाला चिंता जातीव्यवस्था नष्ट होण्याची 
वेदांनी घालून दिलेला वर्णाश्रम धर्म हा जातीसंस्थेपेक्षा भिन्न आहे, असा युक्तिवाद ब्राह्मणवादी करतात. +युद्धाने जातीधर्म म्हणजे जातीव्यवस्था नष्ट होईल+ अशी भीती खुद्द अर्जुनानेच व्यक्त केली आहे. त्यामुळे जातीव्यवस्था आणि वर्णव्यवस्था एकच आहेत, हे सिद्ध करण्यासाठी दुसरे कोणतेही प्रमाण देण्याची गरज नाही. जातीव्यवस्था नष्ट होणे म्हणजेच वेगवेगळ्या जातींतील पुरूष आणि स्त्रियांना एकत्र येण्याची परवानगी देणे होय. यालाच वर्णसंकर म्हणतात. वर्णसंकरातून नको असलेली मिश्र संतती निर्माण होईल, ही अर्जुनाची खरी भीती आहे. जातीव्यवस्था नष्ट होण्याच्या संभाव्य धोक्यामुळे अर्जुन एवढा घाबरला आहे की, तो कौरवांच्या हातून मरायलाही तयार होतो. तो म्हणतो :
धार्तराष्ट्रा रणे हन्युस्तन्मे क्षेमतरं भवेत् ।।४५।।
अर्थ : धृष्टराष्ट्राच्या पुत्रांनी मला ठार मारले तरी ते (जातीव्यवस्था मोडण्याचे पाप करण्यापेक्षा) क्षेमतर म्हणजे अधिक चांगले आहे.
जाती व्यवस्था नष्ट होण्याचा धोका हीच अर्जुनाची मुख्य चिंता आहे. परंतु हा मुद्दा कोणीही अधोरेखित करीत नाही. कारण आपली परंपरा झापडबंद आहे. अर्जुनाच्या +आपल्याच बांधवांना कसे मारू?+ या प्रश्नाभोवतीच ही परंपरा फिरत राहिली आहे.

कृष्णाने अर्जुनाची चिंता दुर्लक्षिली! 
जातीव्यवस्था उच्चाटनाची भीती अर्जुनाच्य दृष्टीने मुख्य असली तरी श्रीकृष्णाने या मुद्याला अजिबात महत्त्व दिलेले नाही. भगवतगीतेच्या संपूर्ण १८ अध्यायांत या प्रश्नाचे थेट उत्तरच श्रीकृष्णाने दिलेले नाही. वर्णसंकर होणार असेल, तर होऊ दे असेच श्रीकृष्णाने अर्जुनाला सूचित केले, असा याचा अर्थ होतो. आज भारतात कोणताही मानववंश शुद्ध स्वरूपात अस्तित्वात नाही. भारत देश हा मिश्रवंशीयांचा आहे. एकाच बापाच्या पोटी जन्मलेल्या दोन भावांतील एक जण फॉरेनर वाटावा एवढा गोरा आणि घा-या डोळ्यांचा असतो, तर दुसरा काळाकुट्ट असतो. अगदी ऋग्वेदी ब्राह्मणांतही हीच स्थिती आहे. भारती युद्धाचेच हे परीणाम आहेत. ते स्वीकारून श्रीकृष्णाने अर्जुनाला +युद्धस्व भारत+ असे म्हणून युद्ध करण्याचा आदेश दिला. वंशशुद्धीच्या भेदभावकारक तत्त्वाला श्रीकृष्णाने तिलांजली दिली. 

श्रीकृष्णाने वर्ण संकराला अप्रत्यक्षरित्या पाठींबाच दिल्याचे यावरून दिसते.
अनिता पाटील