Saturday, 30 June 2012

ही पाहा ब्राह्मणांची गुप्त कारस्थाने

फेसबुकवरील ब्राह्मणांचे जातीयवादी गुप्त ग्रुप बहुजन समाजाविरुद्ध कारस्थाने करीत आहेत. याचा हा पाहा पुरावा. अनिता पाटील यांचा ब्लॉग बंद पाडण्यासाठी आता हे लोक कारस्थाने करीत आहेत. त्यासाठी आपण सगळे ब्राह्मण आणि अखिल भारतीय पेशवा संघटना या गुप्त ग्रुपवरन अ‍ॅब्युज रिपोर्टचे आवाहन सध्या केले जात आहे. अनिता पाटील या नावाची ब्राह्मणांनी किती दहशत घेतली आहे, हे यावरून स्पष्ट होते. ज्यांच्या मनात पाप आहे, ज्यांची बाजू असत्य आहे, जे विचारांचा सामना करू शकत नाही, असेच लोक अशा प्रकारची गुप्त कारस्थाने करीत असतात.


हे लोक स्वतःभोवती तिरस्कारांचे डोंगर उभे करीत आहेत

बहुजन समाज आणि बहुजन समाजातील व्यक्ती, महापुरूष यांच्या विरोधात कारस्थाने करीत राहिल्याने ब्राह्मणांबद्दलचा समाजात वाढतच जाईल, हे या लोकांना कळत नाही. हे लोक स्वतःभोवती तिरस्कारांचे डोंगर उभे करीत आहेत. ब्लॉग बंद झाल्याने काही बिघडणार नाही. जातीयवादी ब्राह्मणांनी जगदगुरू संत तुकारामांच्या वह्या बुडविल्या म्हणून तुकारामांचे अर्भग बुडाले नाही. उलट तुकारामांची लोकप्रियता वाढली. माझा ब्लॉग बंद केला म्हणून काही फरक पडणार नाही. हा ब्लॉग आता पुस्तक रूपाने येत आहे.

ब्राहणांच्या कपटकारस्थांचा पुढे दिलेला पुरावा मला 
अखिल पेशवा संघटना या ग्रुपवर मिळाला आहे :

.......................................
अनिता पाटील चा ब्लोग बंद पाडा..हिंदूमध्ये जाती-पातीच्या आधारावर फूट पडण्याचा हा प्रयत्न हाणून पाडा भावांनो.
खाली लिंक दिली आहे तेथे जाऊन ब्लोग बंद करण्यासाठी रिपोर्ट करा..
रिपोर्ट कशी करावी..:-
लिंक वर क्लिक करा..वरती Report Abuse लिहलेले दिसेन त्यावर क्लिक करा..
मग Hate or violence वर क्लिक करा.. सगळ्यात शेवटी continue वर क्लिक करा..
http://anita-patil.blogspot.in/2012/06/blog-post_20.html

 ·  ·  ·  · Yesterday at 2:46pm

Wednesday, 27 June 2012

वाल्मिकीचा झाला वाल्या कोळी!


महावीर सांगलीकरांची शोकांतिका

महावीर सांगलीकर
...............................
वाल्या कोळ्याचा वाल्मिकी झाला आणि त्याने रामायण लिहिले. ही कथा सर्वांना माहीत आहे. वाल्या-वाल्मिकीची ही गोष्ट वाईटातून चांगल्याकडे प्रवृत्तीचे उदाहरण म्हणून प्रतिक रूपात भारतभर वापली जाते. त्यातूनच वाल्याचा वाल्मिकी होणे, हा शब्दप्रयोग रूढ झाला आहे. ‘वाल्मिकीचा वाल्या कोळी होणे' अशी उलटी उदाहरणेही समाजात दिसत असतात. तथापि, ती अजून प्रतिक रूपात रूढ होऊ शकलेली नाही. महाविचार या नावाने ब्लॉग लेखन करणारे महावीर सांगलीकर यांनी ‘वाल्मिकीचा वाल्या' असे उलटे प्रतिक बनण्याचा चंग बांधला असावा. ‘बहुजनवाद : शिक्षणबंदीचे सत्यशोधन' या मथळ्याचा त्यांचा एक लेख आज ‘महाविचार'वर प्रकटला. सांगलीकर वाल्मिकीचे वाल्या बनले आहेत, याचे प्रत्यंतर हा लेख वाचल्यानंतर येते. बहुजनांना शिक्षणबंदी केलेलीच नव्हती. बहुजन समाज शिक्षणात मागे आहे, त्याला स्वत: बहुजनच जबाबदार आहेत, अशी अविचारी विधाने सांगलीकरांनी या लेखात केली आहेत. या लेखातील प्रत्येक वाक्य खोटे आहे. सांगलीकरांना माझा सल्ला आहे की, त्यांनी महात्मा फुल्यांच्या लेखनातील कोणतेही एक पान काढू वाचावे. आपण हा लेख लिहून किती बेजबाबदारपणा केला आहे, याची प्रचिती त्यांना हे पान देईल. 

सांगलीकर यांच्या पुरोगामी लेखांची चाहती असे बिरूद मी गेले वर्षभर मिरवत आहे. आजचा लेख वाचल्यानंतर मला त्याबद्दल खरोखरच पश्चात्ताप होत आहे. ज्यांना विचारवंत, अभ्यासक अशी बिरुदावली आपण लावत होतो, त्यांनी अचानक असा कुविचार करावा, हे बघूनच मला धक्का बसला आहे.

महावीर सांगलीकर हे उत्तम वाचक आहेत. त्यांचे वाचन आणि अभ्यास चांगला आहे, याची मला जाणीव आहे. त्यामुळे ते अज्ञानातून असे काही लिहितील असे मला वाटत नाही. हेतूत: केलेला हा कुविचार आहे, हे उघडच दिसते. काही तात्कालिक लाभ या कुविचारामागे असणार नाही, अशी मी आशा करते. असो. सांगलीकरांनी प्रा.हरी नरके आणि संजय सोनवणी यांची वाट धरली आहे. आपल्या वाटेवर त्यांनी सुखाने प्रवास करावा. आम्ही महात्मा फुले यांच्या वाटेने चालत राहू. आमची काहीही तक्रार नाही. ही मंडळी उद्या विश्व  हिन्दू परिषदेच्या व्यासपीठावर दिसली, तरी आम्ही काहीही म्हणणार नाही. शेवटी, कोठे जायचे याचा निर्णय घेण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे. 

अनिता पाटील

'आपण सगळे ब्राह्मण' की 'आपण सगळे घाबरट'!

आपण सगळे ब्राह्मण या ग्रुपचा लोगो.
हाच लोगो ब्राह्मण महासभेनेही स्वीकारला आहे.
.......................................................................................................................................
ब्राह्मणांतर्फे अत्यंत गुप्त पद्धतीने चालविण्यात येत असलेल्या +आपण सगळे ब्राह्मण+ या फेसबुक ग्रुपवरील लोकांनी अनिता पाटील या नावाचा धसका घेतला आहे. या ग्रुपवर अनिता पाटील यांच्या विषयी कोणतीही पोस्ट टाकायची नाही, असा नियमच या लोकांनी करून ठेवला आहे. या नियमाचे उल्लंघन करणारावर अ‍ॅडमीनकडून हकालपट्टीची कारवाई केली जाते. +आपण सगळे ब्राह्मण+ या ग्रुपविषयीची माहिती +अबाऊट+ या सदराखाली देण्यात आली आहे. ग्रुपची माहिती १) ग्रुप कशासाठी? आणि २) कशासाठी नाही? अशा दोन पोटमथळ्यांत समाविष्ट करण्यात आली आहे. +कशासाठी नाही+ या पहिल्याच मुद्यात अनिता पाटील यांनी लिहिलेल्या कोणत्याही लेखावर प्रतिक्रिया देऊ नये असे सदस्यांना बजावण्यात आले आहे. 

यांना पाण्यातही अनिता पाटील दिसते का?
अनिता पाटील यांचा 'अ' सुद्धा उच्चारायचा नाही, असा फतवा काढल्यानंतरही या ग्रुपमधील सदस्य अनिता पाटील ब्लॉगवरील लेखांवर टीका टिप्पणी करणयाचे सोडायला तयार नव्हते. त्यानंतर ग्रुपच्या अ‍ॅडमीनने सक्त ताकिद देणारे दुसरे कलम या सदरात घातले. +अनेक वेळा विनंती करूनही सभासद लव्ह जिहाद, अनिता पाटील, संभाजी ब्रिगेड ... (इ. अनेक विषयांची यादी येथे आहे) वर प्रतिक्रिया टाकीतच आहेत. त्यामुळे आता या विषयावर सक्त बंदी घालण्यात आली आहे.+ अशा आशयाची सक्त सूचना या कलमात टाकण्यात आली आहे. औरंगजेबाच्या सैनिकांनी संताजी आणि धनाजी यांचा एवढा धसका घेतला होता, की त्यांच्या घोड्यांनाही पाण्यात संताजी-धनाजी दिसत असत. आपण सगळे ब्राह्मण या ग्रुपवरील ब्राह्मणांची अवस्था अगदी अशीच झाली आहे. त्यांना सकाळी संध्येनंतर आचमन करायला घेतलेल्या पाण्यातही बहुधा अनिता पाटील हा ब्लॉग दिसत असावा. अनिता पाटील असे शब्द कानी पडताच ब्राह्मणवाद्यांच्या पोटात भीतीचा गोळा उठतो. याचे कारण अगदी साधे आहे. अनिता पाटील ब्लॉगवर जे सत्य मांडण्यात आले आहे, त्याचा प्रतिवाद होऊ शकत नाही. कारण ब्लॉगवरील प्रत्येक वाक्याला ब्राह्मणी ग्रंथांतील भक्कम पुरावा जोडण्यात आला आहे. त्यामुळे त्यांची भीतीने गाळण उडाली आहे. ग्रुपवर मात्र हे लोक शूरवीरतेचा आव आणत असतात. या परिस्थितीत एवढेच सांगावेसे वाटते की, +आपण सगळे ब्राह्मण+ हे नाव या ग्रुपला अजिबात शोभत नाही. +आपण सगळे घाबरट+ असे नाव ग्रुपला द्यायला हवे. ते अधिक शोभून दिसेल. 

+आपण सगळे ब्राह्मण+ या फेसबुक ग्रुपवर अ‍ॅडमीनने टाकलेले सर्व नियम खाली जसेच्या तसे :  


मित्र हो, बऱ्याच वेळेस हे विचारले गेले कि ह्या ग्रुप कश्यासाठी सुरु केला आहे, उद्दिष्ट आहे काय? नक्की काय करणार?
ह्याचे स्पष्टीकरण अनेक वेळा दिले गेले होते पण ति माहिती विखुरलेल्या स्वरूपात होती. म्हणून एकाच ठिकाणी सलग्न अशी देण्याचा प्रयत्न करतो आहोत. सूचना, दुरुस्ती व मार्गदर्शन ह्याचे स्वागतच असेल.
सुरुवातीला एक कबुली देणे गरजेचे आहे. मराठी टाईप करताना चूक झाली कि "आपण सगळे ब्राह्मण" ऐवजी " आपण सगळे ब्राम्हण" झाले. हे टाईप करताना काही मर्यादा होत्या, नजरेतून हि गोष्ट निसटली व नंतर 200 पेक्षा ज्यास्त सभासद झाल्याने ति चूक दुरुस्त करणे अशक्य झाले. त्याबाबत असंख्य वेळेस क्षमायाचना ही करून झाले. तरी सर्व सभासदांना नम्र विनंती कि झालेल्या ह्या चूकीची परत परत ग्रुप मध्ये चर्चा करू नये.
ग्रुप कशासाठी?
१) जे आपले बांधव व्यवसाय करतात त्यांना एकमेकांची मदत होवून व्यवसाय ही वाढेल व प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष आपल्याच बांधवांचा फायदा होईल. म्हणजे आपल्याला काही गोष्टींची, सेवेची आवशक्यता असेल, तर सर्व प्रथम आपल्यातलेच ही गरज भागवू शकणारे शोधणे. त्यासाठी सभासद आपल्या व्यवसायाची माहिती, जाहिरात करू शकतात. ज्यांना एखादी सेवा, खरेदी व मार्ग दर्शन हवे असेल तर ते इथे विनंती करू शकतात. जे सभासद ह्यातले जाणकार आहेत ते मदत करतील. जी मदत विनामूल्य करणे शक्य आहे ति केली जाईल. व जी मोबदला शिवाय करता येणार नाही ते सेवा देणारे व घेणारे मग एकमेकांच्या संपर्क व संवादाने ठरवतील. नवीन जे व्यवसायात प्रयत्न करू इच्छित असतील त्यांना नव्या नव्या संधीची माहिती मिळेल.


२) दुसरी गोष्ट म्हणजे नोकरीच्या संधी व त्यांची माहिती. आपले बरेच बांधव शासकीय, निमशासकीय, सहकारी, खाजगी व बड्या उद्योग समुहात निर्णय घेण्याचे अधिकार असलेल्या जागी काम करतात. त्यांनी त्यांना माहित असेलेल्या उपलब्ध संधींची माहिती इथे देणे म्हणजे आपल्यातील सभासदांना त्याचा फायदा होईल. बेरोजगार किंवा नोकरी बदलण्यासाठी जे प्रयत्न करतात त्यांना मदत होईल. नोकरी शोधणारे ही आपली माहिती देवू शकतील.

३) संवादातून विचारांचे आदान-प्रदान होईल, कलाकार, होशी कलाकार, वेगळ्या छंद जोपासणारे, काही हटके केलेले, काही आपल्या वेगळीच कला जोपासणारे ह्यांची माहिती सर्वांना होईल, त्याना व्यासपीठ मिळेल, कौतुकही होईल व एकादी चांगली संधी हे उपलब्ध होईल.

४) आपल्या समाजातील गरजवंत आहेत त्यांना शक्य असेल तेवढी मदत करणे. बऱ्याच भागात विशेष करून ग्रामीण भागात मुलींच्या शिक्षणा विषयी अनास्था दाखवली जाते. मग आर्थिक परस्थिती नाजूक असल्याचे कारण असते, मग कसेतरी करून लग्न करून दिले म्हणजे पालकांची जबाबदारी संपली. दुसरा हाही समज असा कि शिकून काय करणार, चूल व मुल ही सांभाळणे आहे. तसेच काही मुलांच्याही बाबतीत होते. शिक्षणात विशेष प्रगती नसेल कि लागलीच शिक्षण बंद केले जाते मग मिळेल त्या कामाला लावले जाते. शिक्षण नसल्याने मिळणारे काम हे अश्या तश्याच स्वरूपाचे असते. मग सोबत हे तशीच. हळू हळू व्यसने, बेफिकीरपणा, नको त्या मार्गाला जातात. मग पुढचे सगळेच बारगळते. म्हणतात कि घरातला एक जण शिकला कि पूर्ण घर सुधारते. हेच इथे होत नाही. अश्या गरजवंत विद्यार्थी शोधणे व त्यांना योग्य ति मदत करणे.

५) आता सर्वात महत्वाचा मुद्दा हा कि आर्थिक मदत कशी उभा करायची? त्यासाठी काही जेष्ठ व सन्मानीय सदस्यांशी चर्चा चालू आहे. एकादी एनजिओ सारखी संस्था स्थापन करणे, ज्यामुळे दानशूर व्यक्तीकडून देणगी स्विकारू शकू व योग्य त्या प्रकारे वापरता येईल. त्यासाठी राष्ट्रीयकृत बँकेत एक खाते उघडावे म्हणजे इच्छुक तिथे आपली मदत जमा करतील. जशी जशी प्रगती होत जाईल, त्याची सविस्तर माहिती प्रसारित केली जाईलच.
सध्या तरी कार्यक्षेत्र मर्यादितच ठेवणे. नंतर अनेक गोष्टी करणे आहे पण सगळ्याच गोष्टी एकच वेळेस करण्याचा विचार केला कि मग एकही काम पूर्ण समर्कतेने करणे शक्य आहोत नाही.

कश्यासाठी नाही?
१) सध्या बऱ्याच ठिकाणी आपल्या समाजाविषयी, आपल्या पूर्वजाविषयी चुकीचा प्रचार केला जातो. ज्यांना झोपेचे सोंग घेवून असे प्रकार करावयाचे आहेत ते खुशाल करोत. त्याना आपण त्यांच्या पातळीवर जावून उत्तरे देवू शकत नाही कारण आपण आपली पातळी सोडणे म्हणजे एक प्रकारे त्यांच्या प्रयत्नांना यशस्वी करण्यात हातभार लावण्या सारखे आहे, आता राहिला अनिता पाटील चा विषय, इथे एक गोष्ट सांगावीशी वाटते कि ति हे सगळे का करत असावी? तिला आपल्याला दुखवायचे आहे व आपण दुखावले गेलो किंवा तिच्या पातळीवर जावून बोलत राहिलो तर तिला अपेक्षित अशीच प्रतिक्रिया देण्यासारखे नाही का? कुत्रा आपल्याला चावला म्हणून आपण कुत्र्याला चावतो का? म्हणून अश्या पोस्ट मग त्या A ते Z ह्यातल्या कोणत्याही ग्रेड च्या लोकांनी केलेल्या असो वा त्याला प्रतिक्रिया देणे असो ह्या पैकी कोणताच प्रकार इथे होणार नाही.

२) अनेक वेळा विनंती करून ही सभासद वारंवार लव्ह जिहाद, अनिता पाटील, मांसाहार, दारू, ब्राह्मणाच्या मुलींचा आंतरजातीय विवाह, संभाजी ब्रिगेड, आपल्याच मुली कश्या चुकतात?, खरे ब्राह्मण असला तर असे कराल, तसे कराल ह्या सगळ्याना मनाई आहे सद्या, पूर्वी नव्हती पण अतिरेक झाला ह्या सगळ्या गोष्टींचा म्हणून आता बंदी आहे. कृपया इथे लक्षात घेणे असे आहे कि नाण्याला दुसरी बाजू असते. एकांगी विचार व पोस्ट स्वीकारल्या जाणार नाहीत. ह्या वर बरेच सभासद विचारतात हे खरे नाही का? आपण आपल्या मुलीना सावध करू नये का? मला वाटते आजकाल इतरही मार्गाने त्यांना त्याची माहिती असते व त्याबाबत आपण काही सार्वजनिक रित्या बोलणे म्हणजे त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात ढवळा ढवळ करणे आहे ज्याचा आपल्याला काही एक अधिकार नाही.

३) ग्रुपवर निखळ विनोद, कविता, सुविचार, शायरी व छोटे छोटे संदेश जे बहुतेक मोबाईल वरून पोस्ट केले जातात. त्याना मनाई नाही पण त्याचेच गर्दी ज्यास्त होते व मग महत्वाच्या पोस्ट पडद्यामागे जातात किवा मागे पडतात. ह्याबाबत अडमीन वेळोवेळी व योग्य ती भूमिका घेतीलच, त्याबाबत चर्चा किवा वाद होणे नाही, त्यात अडमीन ह्यांचा निर्णय अंतिम असेल.


४) कोणतेही पोस्ट, लेखन, उतारे व छायाचित्रे ग्रुपवर टाकताना एक लक्षात घेणे कि इथे सर्व वयाची, पुरुष व महिला सभासद आहेत. त्यांच्या भावना दुखावल्या जावू नयेत वा वेगळा अर्थ अभिप्रेत होईल अश्या पोस्ट स्वीकारल्या जाणार नाहीत. कोणी पोस्ट केल्यातर लागलीच काढून टाकण्यात येतील. त्याबाबतही अड्मीन ह्यांचा निर्णय हा अंतिम राहिला.


अनिता पाटील

Wednesday, 20 June 2012

या ब्राह्मणांवर कायदेशीर कारवाई व्हावी

इतिहास काळी ब्राह्मणांनी चुका केल्या असतीलही, पण त्याची शिक्षा आताच्या ब्राह्मण समाजाला का देता? असा प्रश्न ब्राह्मणच नव्हे तर अनेक बहुजनही उपस्थित करीत असतात. हा युक्तिवाद अत्यंत लंगडा आणि दिशाभूल करणारा आहे. भूत-भविष्य-वर्तमान अशा कोणत्याही काळातील ब्राह्मण माणू आणि ब्राह्मण समाज हा एकाच जातीय विचाराने काम करीत असतो. इतिहास काळापेक्षाही सध्याचा ब्राह्मण समाज मनाने किडलेला आणि नासलेला आहे. आपल्या जातीचा अभिमान आणि इतर जातींविषयी पराकोटीचा द्वेष असे एकमेव सूत्र घेऊन हा समाज जगत आला आहे, आजही जगत आहे. फेसबुकसारख्या आधुनिक माध्यमाचा वापरही ही जमात याच सूत्राच्या आधारे करीत आहे.


महाराष्ट्रातील ब्राह्मण फेसबुकवर आपण सगळे ब्राह्मण  या नावाने एक क्लोज्ड ग्रुप चालवतात.  या ग्रुपवर केवळ ब्राह्मणांनाच सदस्य करून घेतले जाते. महाराष्ट्रातील अत्यंत नावाजलेले विचारवंत, पत्रकार, लेखक मंडळी या ग्रुपचे सदस्य आहेत. जुन २०१२ च्या मध्यापर्यंत या ग्रुपची सदस्य संख्या १२,८०० च्या वर पोहोचलेली आहे. हा ग्रुप इतर जातींच्या विरोधात सातत्याने कटकारस्थाने करीत आहे. ही कारस्थाने गुन्हेगारी स्वरूपाची आहेत. ब्राह्मणेतर जातीतील महापुरुषांबद्दल अत्यंत गलिच्छ प्रचार येथे केला जातो. 

या ग्रुपवरील कारवाया अशा आहेत की, ब्राह्मण ही जात जगातील सर्वाधिक जात्यंध जात आहे, हे याची खात्री पटल्यावाचून राहत नाही. ६ महिन्यांपेक्षाही जास्त काळापासून मी या ग्रुपच्या कारवायांवर लक्ष ठेऊन आहे. त्यांच्या सर्व कारवायांवर लिहायचे म्हटले तर हजारो पाने लिहावे लागतील. केवळ एकच आणि ताजे उदाहरण येथे देते. केंद्रातील संयुक्त पुरोगामी आघाडीचे राष्ट्रपतीपदाचे उमेदवार म्हणून प्रणव मुखर्जी यांच्या नावाची घोषणा कालच झाली. त्यावर साधक बाधक राजकीय चर्चा देशभर होत आहे. ती साहजिकच आहे. ‘आपण सगळे ब्राह्मण' गूपवर मात्र राजकीय चर्चा न होता, मुखर्जी यांच्या जातीची चर्चा केली जात आहे. मुखर्जी जातीने ब्राह्मण असल्यामुळे त्यांचे राष्ट्रपती होणे ग्रुपवरच्या ब्राह्मणांना महत्त्वाचे वाटते! आदिवासी नेते पी. ए. संगमा यांनी अपक्ष लढण्याची तयारी चालविली आहे. त्यामुळे हा ग्रुप संगमांवर खार खात आहे. काही ब्राह्मणांना वेगळ्याच प्रश्नाने घेरले आहे. 'मुखर्जी हे ब्राह्मण आहेत, म्हणून त्यांचे स्वागत करायचे की ते काँग्रेसचे उमेदवार आहेत, म्हणून विरोध करायचा?' असा पेच त्यांच्यासमोर पडला आहे.

बहुजनांविरोधात गुन्हेगारी कारवाया
एक स्पष्टिकरण देते. क्लोज्ड ग्रुप चालविणे गुन्हा नाही. परंतु, अशा ग्रुपवरून विखारी जातीयवादाचा प्रसार करणे नक्कीच गुन्हा आहे. बहुजन समाजातील नेत्यांचे, महापुरुषांचे चारित्र्यहनन करणे, फेसबुकवरील महापुरुषांच्या नावे उघडण्यात आलेले पेजेस बंद पाडण्यासाठी त्यांच्या विरुद्ध सामुहिक ‘अब्यूज रिपोर्ट' मोहीम  राबविणे, बहुजन समाजाच्या हितासाठी लिखाण करणा-या लोकांची फेसबुक खाती बंद पाडण्यासाठी सामुहित ‘अब्यूज रिपोर्ट' मोहीम राबविणे, यांसारख्या अनेक प्रकारच्या गुन्हेगारी कारवाया हा ग्रुप करीत आहे. अनेक लोकांची फेसबुक खाती यांनी बंद पाडली आहेत. माझे स्वत:चे फेसबुक खातेही या लोकांनी बंद पाडले होते. मला ते पोलिसांत जाऊन सुरू करून घ्यावे लागले. खेडेकर साहेबांच्या विरुद्ध येथे सतत गरळ ओकली जात आहे.

‘आपण सगळे ब्राह्मण' हा ग्रुप आठ जणांचा अ‍ॅडमीन ग्रुप चालवतो. या लोकांवर कायदेशीर कारवाई व्हायला हवी. तुर्तास एवढेच. पुढील लेखांत या ग्रुपच्या आणखी काही कारवायांवर प्रकाश टाकेन. 

....................................................
‘आपण सगळे ब्राह्मण' या ग्रुपवरील
काही प्रातिनिधिक पोस्ट अशा : 
...............................................................1


प्रणव दा यांची राष्ट्रपतीपदी नियुक्ती होण्याचे जवळ जवळ नक्की झाले आहे , आता कदाचित एखादे आश्चर्यकारक घटनाच हि गोष्ट होण्यापासून रोखू शकते
मग आता प्रश्न हा पडतो कि एक ब्राम्हण म्हणून प्रणव मुखर्जी यांचे कौतुक करायचे त्यांचा उदो उदो करायचे कि भारतीय राजकारणातील एक गालीच्च्छ राजकारणाद्वारे ( त्यांच्या निवडीसाठी जे काही केले जात आहे ते गलिच्छ राजकारण ) त्यांची निवड होईल म्हणून त्याचा विरोध करायचा ??
 ·  ·  · 3 hours ago

  • 2 people like this.

    • Ajinkya Waghmare Rajkaran te rajkaran tyat galich vaigere kay ???
      pratibha patil ya congi umedvarala shiv sena ne support kela hota nahi tar tyanchyaveli hech chitra disla asta ...
      2 hours ago via mobile ·  · 1

    • Dhiraj Kirpekar ब्राह्मण म्हूणून प्रणवदा काही आपल्या हिताचे निर्णय घेणार आहेत का ! राजकारणी माणसे शेवटी कोणत्याही पदाचा वापर गलिच्छ राजकार साठीच करणार आपल्याला कलामान सारखा दूरदृष्टीचा राष्ट्रपती हवा आहे .उद्या जर अफजल गुरु किवा कसाब ची फाशी कायम झाली तर त्याचे श्रेय घ्यायला कॉग्रेस कमी करणार नाही
      2 hours ago · 

    • Ajinkya Waghmare Uttar bhartamadhe congress brahman party aahe ani te brahmanala support kartat !
      2 hours ago via mobile · 

  • ...............................................................2



  • शतकातील जोक - पी . ए . संगमा राष्ट्रपती पदाची निवडणूक लढविणार आहेत म्हणे !

    पटनाईक यांनी केलेली मस्करी संगमा यांनी भलतीच मनावर घेतलेली दिसतेय ! देशाला ' जोकर ' नको तर राष्ट्रपती हवा आहे हे त्यांना सांगायला हवे !
     ·  ·  · 2 hours ago

    • 2 people like this.

      • Rohit Sathe माणसे मुर्ख असतात हे माहित होते पण इतकी मुर्ख असतात हे संगमांच्या वरून कळले
        58 minutes ago · 

      • Virochan Prabhu पवावारी जो जो विसंबला
        त्याचा कार्यभाग संपला

        23 minutes ago · 
...............................................................3



--अनिता पाटील



Saturday, 16 June 2012

भारतातील मुलींची पहिली शाळा


गेस्ट रायटर : महावीर सांगलीकर (नव्या पिढीतील विचारवंत, अभ्यासक)

भारतातील मुलींची पहिली शाळा कोणी काढली? असा प्रश्न आपणास कोणी विचारला तर आपल्या डोळ्यापुढे सहजच महात्मा फुले यांचे नाव येते. त्यांनी ती कोणत्या साली काढली असे विचारले तर आपल्यापैकी बहुतेक सगळ्यांना ते साल सांगता येत नाही.

महात्मा फुले यांनी पुणे येथे १८४८ साली मुलींची शाळा काढली. यासाठी त्यांना आपल्या बायकोला, सावित्री बाई फुले यांना शिकवून मग शिक्षिका बनवायला लागले. या त्यांच्या महान कामास ब्राम्हणांनी आणि बहुजनांनीही मोठा विरोध केला. (त्या काळात महात्मा फुले यांना बहुजनांनी किती मदत केली हा एक संशोधनाचा विषय आहे. महात्मा फुलेंबरोबर मातंग, मुस्लीम आणि इंग्रज हेच होते असे दिसते) . पण कोणाच्याही विरोधाला न जुमानता, न डगमगता महात्मा फुले आणि सावित्री बाई फुले यांनी मुलींना शिकवण्याचे आपले काम नेटाने पुढे चालू ठेवले. महात्मा फुले यांनी मुलींसाठी एकून तीन शाळा काढल्या होत्या, तसेच त्या काळातील अस्पृश्य विद्यार्थ्यांसाठी एक खास शाळा काढली होती.

असे असले तरी भारतातील मुलींच्या शिक्षणाची सुरवात करण्याचे काम ब्रिटीश आणि अमेरिकन मिशन -यांनी केले ही गोष्ट फारशा लोकांना माहीत नाही. इ.स. १८१० साली या मिशन -यांनी बंगाल प्रांतात मुलींची पहिली शाळा काढली. १८२७ पर्यंत मुलींच्या अशा शाळांची संख्या १२ पर्यंत गेली. विशेष म्हणजे या शाळांमध्ये मुस्लीम विद्यार्थीनींची संख्या उल्लेखनीय होती.

महात्मा फुले यांनी मुलींची पहिली शाळा काढण्याच्या अगोदर एक वर्ष, १८४७ साली, प्यारी चरण सरकार यांनी नवीन कृष्ण मित्र आणि काली कृष्ण मित्र यांच्या मदतीने बंगाल मधील बरसात येथे मुलींची शाळा सुरू केली. हा ब्राम्हण बहुल भाग होता व त्यांनी मुलींच्या शाळेला प्रचंड विरोध केला. प्यारी चरण सरकार यांना खुनाच्या धमक्या यायला लागल्या. अशा वेळी जॉन इलियट ड्रिंकवाटर बेथून हा स्त्री शिक्षणाचा पुरस्कर्ता इंग्रज अधिकारी पुढे आला व त्याने मित्र बंधू व सरकार यांना धीर दिला. १९४८ साली त्याने बरसात येथी मुलींच्या शाळेला भेट दिली. त्या शाळेमुळे जॉन बेथून इतका प्रभावीत झाला की पुढच्याच वर्षी त्याने कलकत्ता येथे मुलींसाठी एक शाळा सुरू केली.

प्यारी चरण सरकार यांनी १८४७ साली स्थापन केलेली मुलींची शाळा आजही चालू आहे व ती काली कृष्ण गर्ल्स हायस्कूल या नावाने ओळखली जाते.

इंग्रज व अमेरिकन मिशन-यांनी सुरू केलेल्या व कृष्ण बंधू, प्यारी चरण सरकार, महात्मा फुले-सावित्री बाई फुले यांनी पुढे नेलेल्या या कामास आलेले आणखी एक फळम्हणजे बेगम रोकेया शकावत हुसेन यांनी मुस्लीम मुलींसाठी काढलेली शाळा. बेगम हुसेन यांनी १९०९ साली बिहारमधील भागलपूर येथे मुस्लीम मुलींसाठी शाळा सुरू केली. बेगम हुसेन हिच्या नव-याचे नुकतेच निधन झाले होते आणि त्या काळात मुलींनी शिक्षण घेणे मुस्लीम समाजाला मान्य नव्हते. त्यामुळे तिच्या नातेवाईकांनी तिला शाळा बंद करायला आणि घर सोडून जायला भाग पाडले. तेंव्हा ही बाई आपली शाळा बंद करून कलकत्त्याला आली व तिथे तिने १९११ साली आपल्या नव-याच्या नावाने शकावत हुसेन मेमोरिअल गर्ल्स स्कूल ही शाळा काढली. बेगम रोकेयाला तिच्या भावाने लिहायला-वाचायला चोरून शिकवले होते व पुढे तिच्या नव-याने तिला इंग्रजी भाषा शिकवली होती. बेगम रोकेयाने महिलांच्या प्रश्नांना वाचा फोडणारे अनेक लेख व कथा लिहिल्या.

(सांगलीकर यांच्या शोध आणि बोध या ब्लॉगवरून साभार.)