Thursday, 14 June 2012

'भिडेंच्या वाड्या'चे रहस्य


गेस्ट रायटर : समीर जाधव, 
अध्यक्ष, बहुजन सेवा सेना.

भारतातील मुलींसाठी पहिली शाळा काढण्याचे महान कार्य महात्मा फुले यांनी केले. फुल्यांनी पुण्यात ही शाळा काढली. पुण्यातील भिड्यांच्या वाड्यात ही शाळा काढण्यात आली. त्यामुळे काही अडाणी ब्राह्मण असा प्रचार करीत आहेत की, पाहा भिडे नावाच्या ब्राह्मण ग्रहस्थाने जागा दिली म्हणून महात्मा फुले हे मुलींसाठी पहिली शाळा काढू शकले. 

ब्राह्मणी अपप्रचाराचे यापेक्षा दुसरे उदाहरण नाही. ‘भिडेंचा वाडा' एवढ्या एका नावावरून त्यांनी फुल्यांना मागे टाकून ब्राह्मणवाद पुढे आणला. अरे अडाण्यांनो, बाळ गंगाधर टिळक राहत असलेल्या वाड्याचे नाव गायकवाड वाडा होते. आता गायकवाड हे आडनाव मराठ्यांचे आहे, तर काय टिळक मराठा होते, असे मानायचे का? फुल्यांनी जेथे मुलींसाठी शाळा सुरू केली, त्या वाड्याचे नाव ‘भिडे वाडा' होते. तो कोणा ब्राह्मणाच्या मालकीचा वाडा नव्हता. त्या वाड्याचे मालक चांगले बहुजनच होते. ते कोण होते, हे सांगून मी ब्राह्मणांना फुकटचे ज्ञान देऊ इच्छित नाही. त्यांनी पुस्तके वाचून शोधून काढावे.

महात्मा फुले यांनी मुलींसाठी शाळा काढली, तेव्हा पुण्यातील ब्राह्मणांनी त्यांचा आतोनात छळ केला. मुलींना शिकविण्यासाठी पुरुष शिक्षकास बंदी घालावी म्हणून ब्राह्मणांनी पुण्याच्या त्याकाळच्या इंग्रज रेसिडेन्टाकडे तक्रार केली होती. मुळात बहुजन समाजात साक्षर महिला मिळणे अवघड होते. ब्राह्मण समाजात घरातल्या घरात शिकलेल्या महिला मिळू शकत होत्या, परंतु ब्राह्मणांच्या दट्ट्यामुळे कोणी पुढे येत नव्हते. अशा वातावरणात फुल्यांची शाळा दोन वर्षे रेंगाळत पडली. या काळात फुल्यांनी आपली पत्नी सावित्रीबाई फुले यांना साक्षर करून शिक्षिका केले. आणि शाळा सुरू झाली.

शाळा सुरू झाली तरी अडथळे आणण्याचे काम ब्राह्मणांनी सोडले नाही. सावित्रीबाई शाळेवर जात तेव्हा ब्राह्मण त्यांना खडे मारत. अनेकदा सावित्रीबार्इंच्या अंगावर शेणही फेकण्यात आले. हे पाप करणारे सर्व जण ब्राह्मणच होते. कालांतराने याच ब्राह्मणांनी आपल्या मुलींना फुल्यांच्या शाळेत पाठवायला सुरूवात केली. 

आजची स्थिती काय आहे? आज बहुजनांपेक्षा ब्राह्मणांच्याच बायका शिक्षणाचा अधिक लाभ उठवित आहेत. फुल्यांनी मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली म्हणून आपल्या बायका मुली शिकू शकल्या. पोटा पाण्याला लागल्या, याचे ऋण खरे म्हणजे ब्राह्मण समाजाने व्यक्त करायला हवे. तसेच सावित्रीबार्इंना शेण मारले म्हणून माफीही मागायला हवी. पण असे वागतील ते ब्राहण कसले? त्याऐवजी ते शाळेचे श्रेय भिडे नावाच्या अस्तित्वात नसलेल्या व्यक्तीला देऊ पाहत आहेत. याला कृतघ्नपणाशिवाय दुसरे कोणते नाव देता येईल?

असला कृतघ्नपणा अख्ख्या जगात एकच जात करू शकते. ती जात म्हणजे ब्राह्मण.

No comments:

Post a Comment