भाग-२
पोखरण-२ : आयत्या बोगद्यावर
डोलला वाजपेयींचा नागोबा!
मे १९९६ मध्ये वाजपेयी पहिल्यांदा १३ दिवसांसाठी पंतप्रधान बनले. बहुमत सिद्ध करण्यापूर्वी वाजपेयींना धोरणात्मक निर्णय घेण्याचा अधिकारच नव्हता. लोकशाहीचा हा संकेत आहे. तथापि, एक अत्यंत प्रामाणिक नेता म्हणून गौरविल्या गेलेल्या या नेत्याने लोकशाहीची फसवणूक केली. बहुमत सिद्ध करण्याआधीच धोरणात्मक निर्णय घेऊन पोखणमध्ये अणुबॉम्बचे चाचणी स्फोट केले. ११ मे रोजी वाजपेयी सरकारने ३ अणुस्फोट चाचण्या घेतल्या. त्यानंतर तिसèयाच दिवशी १३ मे रोजी आणखी २ अणुस्फोट चाचण्या घेतल्या. शक्ती या नावाने या चाचण्या ओळखल्या जातात. या अणुस्फोट चाचण्यांची शक्ती निर्माण करण्यात भाजपा आणि वाजपेयी यांचा काडीचाही वाटा नव्हता, हे येथे सर्वांत आधी लक्षात घेतले पाहिजे. १८ मे १९७४ रोजी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी भारताचा पहिली अणुस्फोट चाचणी घेऊन भारताला अण्वस्त्र सज्ज केले होते. या अणुस्फोट चाचण्यांचे कोडनाव होते +स्माईqलग बुद्धा+ इंदिरा गांधींनी भारताच्या अणुशक्तीचा बुद्ध हसवला. नंतर तो संशोधनाच्या रूपाने हसतच होता. नरqसह रावांच्या काळात दुसèया अणुस्फोट चाचण्यांची तयारी भारताने करून ठेवली होती. अगदी चाचण्यांचे बोगदे सुद्धा तयार होते. हे सगळे तयार साहित्य वाजपेयींनी वापरले आणि पोखरण-२ घडवून आणले. नवे बोगदे खोदण्याची तसदीही वाजपेयींना घ्यावी लागली नाही. मराठीत आयत्या बिळावरचे नागोबा अशी म्हण आहे. त्यानुषंगाने वाजपेयींना +आयत्या बोगद्यावरचे नागोबा+ म्हणायला हरकत नसावी. या चाचण्यांतून काहीही साध्य झाले नाही. उलट पाकिस्तानने तोडीस तोड उत्तर देऊन छगाई टेकड्यांच्या परीसरात अणुबाँम्ब फोडले. भारतावर आर्थिक निर्बंध लादले ते वेगळेच.
कारगिल युद्ध : वाजपेयी
झोपल्याचा पुरावा
पोखरण-२ चा वापर करून वाजपेयी कसे निडर आहेत, असा प्रचार भाजपाने केला. त्यामुळे मतदारांनी एनडीएला पुन्हा संधी देऊन वाजपेयींना पंतप्रधान केले. वाजपेयींच्या निडरपणाचा फुगा मात्र कागगिल युद्धाने फोडला. वाजपेयी दुसèयांदा पंतप्रधान झाले तेव्हा पाकिस्तानने काश्मिरातील द्रास आणि कागगिल भागातील मोठ्या भूभागावर अतिक्रमण केले. कित्येक दिवस या अतिक्रमणाची कल्पनाच वाजपेयी सरकारला नव्हती. बटालिक आखनूरचा भाग पाकिस्तानने बळकावला. इतकेच नव्हे, तर सियाचेन ग्लॅसियरवर तोफमारा सुरू केला. एवढी मोठी कारवाई पाक लष्कराने केली. या काळात मुत्सद्दी वाजपेयी यांचे सरकार ढाराढूर झोपलेले होते. या संपूर्ण भूभागावर पाकिस्तानचे ४ हजार पेक्षाही जास्त सैनिक आणि निमलषकरी जवान घुसले होते. अतिरेकयांची संख्याही मोठी होती. पाकिस्तानने केलेले हे अतिक्रमण काढण्यासाठी भारतीय लष्कराला जून १९९९ मध्ये पाकसोबत युद्ध छेडावे लागले. त्यात ८०० जवान शहीद झाले. भारताच्या बहादूर जवानांनी पाक लष्कराला हुसकावून ७० टक्के भूभाग पुन्हा ताब्यात मिळविला. राजीव गांधी पंतप्रधान असताना खरेदी करण्यात आलेल्या बोफोर्स तोफांच्या बळावर कारगिलमधील ७० टक्के भूभाग भारतीय लष्कराने मोकळा करून घेतला. बोफोर्स तोफा खरेदी केल्या तेव्हा याच वाजपेयींनी आणि त्यांच्यासोबतच्या विरोधकांनी ८० च्या दशकात काँग्रेसवर आरोपांची राळ उडवून दिली होती. या आरोपांच्या बळावरच व्हिपी qसगांचे सरकार पुढे आले. या सरकारात भाजपा सहभागी होता.
क्लिंटन मदतीला धावले
म्हणून वाजपेयींचे धोतर वाचले
कारगिल युद्ध थांबविण्यासाठी अमेरिकेचे तत्कालिन पंतप्रधान बिल क्लिंटन यांना हस्तक्षेप करावा लागला. क्लिंटन यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांना बोलावून घेऊन समज दिली. तेव्हा उरलेल्या भूभागावरून पाकिस्तानने माघार घेतली. आणि वाजपेयी यांची उरली सुरली इज्जत वाचली. अन्यथा त्यांचे धोतर फिटायची वेळ आली होती.
जवानांच्या शवपेट्यात
पैसे खाणारे सरकार
कागगिल युद्धात लढणाèया शहिद जवानांसाठी वाजपेयी सरकारने शवपेट्या खरेदी केल्या. या खरेदीत मोठ्या प्रमाणात पैसे खाल्ले गेले. वाजपेयी सरकारमधील संरक्षणमंत्री जॉर्ज फर्नांडिस या घोटाळ्यातील प्रमूख आरोपी होते. शहीद जवानांच्या टाळूवरचे लोणी खाण्याचे घोर पाप वाजपेयी सरकारच्या माथ्यावर आहे. ते कशानेही धुतले जाणार नाही.
कंदाहार विमान अपहरण
कारगिलमधील पाकिस्तानी घुसखोरीबद्दल भारतीय मतदारांनी वाजपेयी आणि एनडीएला माफ केले. सत्ता पुन्हा त्यांच्याच हातात दिली. यावेळी ३०३ खासदारांचे पूर्ण बहुमत त्यांच्या हाती मतदारांनी सोपविले होते. या बहुमताची वाजपेयींनी अक्षरश: माती केली. ऑक्टोबर १९९९ मध्ये वाजपेयी पंतप्रधान बनले आणि दोनच महिन्यांनी डिसेंबरमध्ये पाकिस्तानी अतिरेक्यांनी इंडियन एअर लाईन्सचे आयसी ८१४ हे विमान अपहरण करून कंदाहारला नेले. काठमांडूहून राजधानी दिल्लीला आलेले हे विमान अतिरेक्यांनी वाजपेयी सरकारच्या नाकासमोरून कंदाहारला नेले. दिल्ली विमानतळावरून सरकारने विमानाला इंधनही दिले! अवघ्या पाच अतिरेक्यांनी या विमानाचे अपहरण केले होते. अफगाणिस्तानातील कंदाहारला विमान नेऊन अतिरेक्यांनी वाजपेयी सरकारला आपल्या तालावर थयथया नाचायला लावले. सरकारही नाचले. कुख्यात पाकिस्तानी अतिरेकी मौलाना मसूद अजहर आणि त्याच्या इतर तीन साथीदारांची वाजपेयी सरकारला सुटका करावी लागली. सगळ्यांत मानहानीकारक बाब अशी की, वाजपेयी सरकारचे परराष्ट्रमंत्री जसवंत सिंग हे एक विशेष विमान घेऊन कंदाहारला गेले. या विमानात जसवंतqसग यांच्यासोबत मसूद अजहरसह चार अतिरेकी होते. या अतिरेक्यांची कंदाहार विमानतळावर सुटका करण्यात आल्यानंतर आयसी ८१४ हे विमान अतिरेक्यांनी सोडले. जसवंतqसग यांना अतिरेक्यांसोबत का पाठविण्यात आले, याचे स्पष्टिकरण वाजपेयी यांनी आजपर्यंत दिलेले नाही. एका सार्वभौम देशाचा मंत्री चार अतिरेक्यांना विशेष विमानात बसवून दुसèया देशात नेऊन सोडतो, असे दृश्य जगाने आधुनिक इतिहासात पहिल्यांदा पाहिले.
संसदेवरील हल्ला
२००१ मध्ये वाजपेयी सरकारने या देशाच्या सार्वभौमत्वाला काळिमा लावला. १३ डिसेंबर २००१ रोजी पाकिस्तानी अतिरेक्यांनी थेट भारतीय संसदेवरच हल्ला केला. संसदेच्या सुरक्षा रक्षकांनी प्राणांची आहुती देऊन अतिरेक्यांचा खात्मा केला. सुरक्षा रक्षकांच्या कामगिरीमुळे हा देश वाचला. नाही तर अख्खे सरकारच अतिरेक्यांनी ठार केले असते. अतिरेकी संसदेत घुसेपर्यंत वाजपेयी सरकार काय करीत होते?
फसलेली बसयात्रा अन् आग्रा समीट
पाकिस्तान भारताच्या छातीत विश्वासघाताच्या कट्यारी खुपशित असताना वाजपेयी मात्र पाकिस्तानसोबत प्रेमालाप करण्यात मग्न होते. देशाचे काहीही होवो, स्वत:ची प्रतिमा शांतीदूत अशी राहावी, यासाठी हा सारा खटाखटाटोप वाजपेयींनी केला. परंतु त्यांनी हाती घेतलेले एकही मिशन यशस्वी होऊ शकले नाही. वाजपेयी शांततेची बस घेऊन पाकिस्तानला गेले. कारगिल युद्धानंतर पाकचे सर्वेसर्वा बनलेल्या जनरल परवेज मुशर्रफ यांना त्यांनी आग्रा शिखर परिषदेसाठी भारतात बोलावले. फेब्रुवारी १९९९ साली वाजपेयींनी दिल्ली-लाहोर बससेवा सुरू केली. वाजपेयींचे हे सर्व प्रयत्न अपयशी ठरले. वाजपेयींनी पाकचा बसदौरा केल्यानंतर कारगिल युद्ध झाले. जनरल मुशर्रफ आग्रा समीट अर्धवट सोडून निघून गेले. दोन नेत्यांची शिखर परीषद अर्धवट राहण्याचा नवा इतिहास या निमित्ताने लिहिला गेला.
अनिता पाटील, औरंगाबाद.
No comments:
Post a Comment