लेखक : दादा हरी
ही घटना आहे १९७५ सालच्या आणिबाणी च्या काळातली. आणिबाणीच्या काळात इंदिरा गांधीच्या विरोधात किंवा आणीबाणी च्या निर्णया विरोधात लेखन , भाषण करण्यास पत्रके छापण्यास बंदी होती. जो असे करेल त्याला उचलून विनाचोकशी तुरुंगात टाकले जात असे. या अटकसत्रात जयप्रकाश नारायण , मोरारजी , अटलबिहारी वाजपेयी ,जॉर्ज फर्नाडीस . एस एम जोशी, अनंत भालेराव , या सारख्या अनेक नेत्यांना अटक झाली होती . असे असताना आमच्या गावातील ऐक ब्राम्हण प्रवचनकार ( दुर्गादास कुलकर्णी ) जे की भागवत कथासांगत असत त्यांनी एकदा प्रवचन करताना इंदिरा गांधींची तुलना कैकयीशी , संजय गांधीची तुलना भस्मासुराशी तर त्या वेळचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांची तुलना रावणाशी केली. "या कलियुगात इंदिरा या नावाने कैकयी ने पुन्हा जल्म घेतला असूनतिने राम लक्क्षमनाला पुन्हा वनवासात पाठवले आहे. भस्मासुर संजय होऊन कुणाच्याही डोक्यावर हात ठेवून त्याला भस्म करीत सुटला आहे. आणि रावण चव्हाण बनून सगळ्या देवांना तुरुंगात डाम्बत आहे, असे वाक्य त्यांनी भागवत पुराण प्रवचन सांगताना केले. त्याचा व्हायचा तो परिणाम झाला. दुसऱ्याच दिवशी त्यांना अटक झाली. घराची झडती झाली त्यातही आणीबाणी विरोधातील काही पत्रके , मराठवाडा दैनिकाचे काही अंक सापडले . परिणामी पोलिसांनी दुर्गादास बुवांच्या घरातील सामान आणि घर सुद्धा सील केले.
दुर्गादास बुवांची ३५-३६ वर्ष वयाची पत्नी ( सिंधू काकी ) , ८-९ वर्ष वयाची मुलगी आणि ३-४ वर्ष वयाचा मुलगा यांना कुठे जावे हें कळेना . गावातील इतर ब्राम्हण कुटुंब आपल्यावरही काही बलामात येयील म्हणून त्यांना ओळख दाखविनात ; पाहुणे तसेच गावातील इतर समाजाचे लोकही अटक व जप्तीच्या भीतीने त्यांना साधी चहापाण्याची देखील मदत करायला तयार होईनात ; पोलिसांनी अंगावरच्या कपड्यावर बाहेर काढलेले ; नवरा अटकेत ; मुले भूकेने व्याकूळ होऊन " आई बाबा ना पोलीस कुठे घेवून गेले ? आपले घर पोलिसांनी कसे काय घेतले ? आम्हाला खूप भूक लागलीय ग ...........कुणी आपल्याशी बोलत का नाही ग ? असे प्रश्न विचारीत होते . काळजाला घरे पाडणाऱ्या त्या बालकांच्या प्रश्नाची त्या माउली कडे उत्तरं नव्हती; तिला आश्रय द्यायला एकही दरवाजा उघडत नव्हता; अशा बिकट प्रसंगात एका हृदयात मात्र करुणेचा पाझर फुटला .... हा करुणेचा निर्झर वाहत त्या कुटुंबा पर्यंत आला . आणि त्यांना कवेत घेवून त्यांचे अश्रू पुसता झाला ; कोण होता हा दयार्णव नरपुंगव ? दुसरा तिसरा कुणी नाही ; गिरजाजी एकनाथ तहकिक ! माझे आजोबा ! !
माझ्या आजोबांनी दुर्गादास बुवांच्या पत्नी आणि मुलांना स्वतःच्या वाड्यात आश्रय दिला. पोलिसांच्या कारवाईची तमा न बाळगता ऐक नव्हे दोन नव्हे १८ महिने ; आणिबाणी उठून आणि दुर्गादास बुवा सुटून येई पर्यंत त्यांच्या पत्नी सिंधुकाकी आणि त्यांच्या दोन मुलांना आश्रय दिला. त्यांचे जेवणखाण कपडे लत्ते इत्यादीची सोय केली. पण आणिबाणी उठल्यावर सुटून आल्या नंतर मात्र दुर्गादास बुवांनी आजोबांचे थोडे सुध्धा उपकार मानले नाहीत. उपकार मानाने तर सोडाच, काही दिवसांनी झालेल्या ( पाच - सहा महिन्यांनी ) झेड पी निवडणुकीत या दुर्गादास बुवाने कॉंग्रेस च्या तिकिटावर उभ्या असलेल्या माझ्या आजोबाच्या विरोधात प्रचार करून माझ्या आजोबाना पाडले आणि त्यांच्या विरोधात जनसंघाच्या एका मारवाड्याला निवडून आणले. वरतून पुन्हा " कोन्ग्रेस कडून भीष्म पितामह जरी समोर आले तरी त्यांना शरपंजरी निजवणे हाच धर्म आहे " ही प्रवचन बाजी ! काय म्हणावे या कृतघ्न पणाला ?
लेखक : दादा हरी
Buwaanna kadachit upkarkarta hee conceptach maahit nasaavi, tyanna vatale asel hee madat mhanje dakshinach aahe...!
ReplyDeleteBuwaanna kadachit upkarkarta hee conceptach maahit nasaavi, tyanna vatale asel hee madat mhanje dakshinach aahe...!
ReplyDelete