Monday, 30 December 2013

व्हिएतनाममध्ये छत्रपती शिवाजी महाराज!

प्रसिद्ध पत्रकार मुजफ्फर हुसैन यांनी छत्रपती शिवरायांवर लिहिलेला हा लेख दै. पुण्यनगरीच्या १७ डिसेंबर रोजीच्या अंकात प्रसिद्ध झाला आहे. अपाविमंच्या वाचकांसाठी तो देत आहोत.
वाचकांना आठवत असेल की व्हिएतनाम आणि अमेरिका यांच्यामध्ये सलग २0 वर्षे युद्ध सुरू होते. सुरुवातीला अमेरिकेला वाटले होते की या देशाला नष्ट करणे म्हणजे जेमतेम काही तासांचे काम! परंतु प्रत्यक्षात अमेरिकेला व्हिएतनामशी युद्ध करणे जडच गेले. त्याला अनेक कारणे आहेत. मात्र, त्यातील सर्वात महत्त्वाचे कारण असे आहे की व्हिएतनामी जनतेच्या नायकपदी विराजमान होते प्रत्यक्ष छत्रपती शिवाजी महाराज! व्हिएतनाममधून अमेरिका बाहेर पडली आणि व्हिएतनामचा विजय झाला. त्या वेळी व्हिएतनामच्या राष्ट्रपतींना पत्रकारांनी विचारले की, अमेरिकेसारख्या बलाढय़ शक्तीला नामोहरम करण्यात तुम्ही कसे सफल झालात? त्या वेळी राष्ट्रपतींनी म्हटले होते की, अमेरिकेला हरवणे हे नि:संशयपणे आमच्या कुवतीबाहेरचे होते; परंतु आम्ही हिंमत सोडली नाही. राष्ट्रपती सांगतात, 'त्याच वेळी भारतातील एका शूरवीर राजाचे चरित्र माझ्या हाती आले. त्यावरून प्रेरणा घेऊन मी आमची युद्धनीती आखली आणि ती कसोशीने अंमलात आणली. त्याचा सुपरिणाम काहीच दिवसांत आम्हाला दिसला.' पत्रकारांनी त्या राजाचे नाव विचारताच राष्ट्रपती सहजपणे पटकन बोलून गेले. अर्थात छत्रपती शिवाजी महाराज. ते जर आमच्या भूमीवर जन्माला आले असते तर आम्ही जगावर राज्य केले असते. काही काळानंतर व्हिएतनामचे राष्ट्रपती मरण पावले. त्यांच्या मृत्युपत्रात त्यांनी लिहून ठेवले होते की, माझ्या समाधीवर एक वाक्य अवश्य लिहा - 'छत्रपती शिवाजी महाराजांचा एक सैनिक समाधिस्त झाला!' आजही त्यांच्या समाधीवर हे वाक्य वाचायला मिळते.

काही काळानंतर व्हिएतनामच्या परराष्ट्रमंत्री भारताच्या दौर्‍यावर आल्या. आपल्या राजकीय रिवाजानुसार त्यांना लाल किल्ला आणि महात्मा गांधी समाधी दाखवण्यात आली. त्यावर त्यांनी विचारले की, शिवाजी महाराजांची समाधी कुठे आहे? बरोबरचे भारत सरकारचे अधिकारी गप्पच झाले. आजपर्यंत असा प्रश्न त्यांना कोणी विचारला नव्हता. व्हिएतनामच्या परराष्ट्रमंत्र्यांबरोबर जे त्यांचे इतर अधिकारी आलेले होते त्यांनीच सांगितले की, छत्रपतींची समाधी महाराष्ट्रात रायगड येथे आहे. व्हिएतनामी परराष्ट्रमंत्री महोदया इतकं ऐकून थांबल्या नाहीत. त्यांनी छत्रपतींच्या समाधीला वंदन करण्याची इच्छा व्यक्त केली. 'ज्या व्यक्तीपासून प्रेरणा घेऊन आम्ही अमेरिकेसारख्या देशाला नमवले, त्यांना वंदन केल्याशिवाय मी स्वदेशी परत जाऊ शकत नाही!' असे म्हणून त्या रायगडला गेल्या. महाराजांच्या समाधीचे डोळे भरून दर्शन घेतले. ओल्या डोळ्यांनी त्यांनी तिथली माती उचलली. आपल्या बॅगेमध्ये ठेवली आणि कपाळाला लावली. परराष्ट्र मंत्रालयाचे अधिकारी आश्‍चर्यचकित झाले होते. शिवाजी महाराजांवरील त्यांची श्रद्धा पाहून त्यांना वाटले. एखादा भक्त जणू या मंदिरात आपल्या देवतेची पूजा करण्यासाठी खास आला आहे! पत्रकारांनी त्यांना याबद्दल छेडले असता, मंत्री महोदया म्हणाल्या की, 'ही माती शूरवीरांची माती आहे. या मातीत शिवाजीसारख्या महान चारित्र्यवान, शूर लढवय्याचा जन्म झाला. ही माती मी माझ्या देशात नेऊन तिथल्या मातीत मिसळेन. म्हणजे व्हिएतनामच्या भूमीवरही छत्रपतींसारखा राजा जन्माला येईल.' बर्‍याच काळानंतर 'सशक्त भारत' नावाच्या मासिकाने नोव्हेंबर २0१३च्या अंकात वरील घटना प्रसिद्ध केली. वाचून सगळेच आश्‍चर्यात पडले आणि छत्रपतींपासून प्रेरणा घेऊन अनेक देशांनी आपला इतिहास घडवला. या गोष्टीचा प्रत्येक भारतीयाला अभिमानही वाटला.

भारत सरकार या अत्यंत गौरवशाली घटनेवर पोस्टाचे तिकीट प्रकाशित करू शकणार नाही का? महाराष्ट्रासह सर्व भारतातील शिवाजीभक्तांनी जर मागणी केली तर आपण निश्‍चितच आपले हे राष्ट्रीय कर्तव्य पूर्ण करू शकू. व्हिएतनामच्या राष्ट्राध्यक्षांच्या समाधीचे आणि त्यावरील वाक्याचे तिकीट पोस्ट खात्यातर्फे प्रकाशित झाले तर नक्कीच आपल्या मातृभूमीची मान अभिमानाने उंचावेल.

व्हिएतनामसारख्या अगदी छोट्या-नगण्य देशाने अमेरिकेला धूळ चारावी, हा खरोखरच एक चमत्कारच आहे. दक्षिण-पूर्व आशियातील हा लहानसा देश आपल्या स्वतंत्र अस्तित्वासाठी वर्षानुवर्षे लढत राहिला. अमेरिका अण्वस्त्रधारी देश. अक्षरश: काही मिनिटांत व्हिएतनामला भस्मीभूत करणे अमेरिकेच्या डाव्या हातचा खेळ होता; परंतु असे घडले नाही. पहिल्या आणि दुसर्‍या महायुद्धातील विजयी देश व्हिएतनामसमोर टिकू शकला नाही. अमेरिकेच्या शक्तिसंपन्न राष्ट्रपतींना व्हिएतनामसमोर गुडघे टेकावे लागले. अमेरिकेने हल्ला करताच व्हिएतनामी गोरिल्ला सैनिक नक्की कुठे लपून बसतात हे शोधून काढणे अमेरिकेच्या सैन्याला जमले नाही. व्हिएलनामी गोरिल्लांना शोधून काढण्यासाठी अमेरिकेजवळ अत्यंत प्रभावी यंत्रसामग्री होती; पण या अत्यंत संवेदनशील यंत्रांनाही व्हिएतनामी गोरिल्लांनी भीक घातली नाही. व्हिएतनाम युद्धावर अनेक पुस्तके प्रकाशित झाली आहेत. त्यातून मूठभर व्हिएतनामींनी बलाढय़ अमेरिकेच्या नाकात कसा दम आणला याच्या कथा वाचायला मिळतात. अखेर व्हिएतनामचे विभाजन करणे अमेरिकेला अशक्यच झाले. या छोट्याशा देशापुढे नमते घ्यावे लागले. व्हिएतनामींची स्वातंत्र्याची ऊर्मी अणुबॉम्बही नष्ट करू शकत नाही, हे अमेरिकेला कळून चुकले. यातील योगायोगाची गोष्ट अशी की, छत्रपती शिवाजी महाराज मोगलांना ज्या पद्धतीने सतत फसवत आले तेच धोरण व्हिएतनामी सैनिकांनी अवलंबले होते. त्याबद्दलची काही उदाहरणे तर अत्यंत रोमहर्षक आहेत. अमेरिकेची सर्वात मोठी डोकेदुखी ही होती की, व्हिएतनामी गोरिल्ला जंगलात कुठे लपून बसले आहेत, हेच त्यांना समजत नसे. त्यांची यंत्रसामग्रीही उपयोगी ठरत नव्हती. अखेर अमेरिकेच्या सीआयएने आपल्या शास्त्रज्ञांना असे एखादे जबरदस्त यंत्र बनवण्याचे आवाहन केले ज्यामुळे व्हिएतनामी सैनिकांचा पत्ता लागेल. अमेरिकेच्या लष्कराशी संबंधित शास्त्रज्ञांनी विचार करायला सुरुवात केली. त्यांच्या मनात विचार आला की, सैनिक भलेही कुठेही लपून बसू देत; परंतु मल-मूत्र उत्सर्जनाची भावना प्रत्येक माणसाला असतेच. म्हणून त्यांनी मूत्रामधील रासायनिक तत्त्वांवर आधारित असे सिग्नल तयार केले. ज्यामुळे मूत्रविसर्जनाची जागा सापडेल. त्या क्षेत्रात दिवे उजळल्याबरोबर अमेरिकन सैनिक तेथे पोहोचत आणि बॉम्ब टाकून हल्ला करत. अशा पद्धतीने अनेक गोरिल्लांना ठार करण्यात अमेरिकेला यश आले. काही काळातच गोरिल्लांना ही गोष्ट लक्षात आली. या प्रकारच्या हल्ल्याला प्रत्युत्तर देण्यासाठी व्हिएतनामी सैनिकांनी नामी युक्ती शोधून काढली. साधीच पण प्रभावी. आता हे सैनिक एका मातीच्या मोठय़ा हंड्यात मूत्र विसर्जन करायला लागले आणि तो हंडा झाडावर टांगून ठेवू लागले. त्याचा परिणाम म्हणजे अमेरिकन सैनिकांना अनेक ठिकाणांहून एकाच वेळी सततच सिग्नल यायला लागले. अमेरिका अक्षरश: भांबावून गेली आणि काही दिवसांतच ही कारवाई बंद पडली.

व्हिएतनामींना खेळवण्यासाठी अमेरिका सतत काही ना काही युक्त्या करत असे. वरील प्रकारानंतर अमेरिकेने गोरिल्लांना पकडण्यासाठी चक्क ढेकणांचा उपयोग केला. असे म्हणतात की भुकेला ढेकूण नेहमी माणसांच्या वासाच्या दिशेने जात असतो. व्हिएतनामी गोरिल्ला जिथे असावेत, असा अमेरिकेचा अंदाज होता तेथे त्यांनी भुकेलेले असे लाखो-करोडो ढेकूण सोडले; पण या ढेकणांची फौज बघताच व्हिएतनामी सैनिकांनी तत्काळ त्यांच्यावर विषारी वायू सोडून त्यांचा पूर्ण बंदोबस्त केला. अखेर अमेरिकेला हार मानण्यावाचून गत्यंतर राहिले नाही. शेपूट घालून अमेरिका व्हिएतनाममधून चालती झाली. अशाच प्रकारच्या अनेक रोमांचक कथा स्व. पत्रकार मिलिंद गाडगीळ यांनी आपल्या पुस्तकात दिल्या आहेत. त्या काळात मिलिंद गाडगीळ व्हिएतनाम युद्धावर नियमितपणे लिहीत असत.

छत्रपती आपल्या शत्रूला चकवण्यात अत्यंत हुशार होते. त्यामुळे मोगलांचे त्यांच्यापुढे काही चालले नाही. छत्रपतींसारखेच धोरण व्हिएतनामींनीही अवलंबले. त्यांनी अमेरिकेसारख्या समृद्ध, सबळ देशाशी अशीच आंधळी कोशिंबीर खेळत, मोगलांप्रमाणेच अमेरिकेला उखडून फेकले. व्हिएतनामींची हुशारी, त्यांची छत्रपतींवरील भक्तीने प्रभावित होणार्‍या आपण भारतीयांनी भारताच्या या सुपुत्राला वंदन करूया!

-मुझफ्फर हुसेन 
(शब्दांकन : अवंती महाजन)

Tuesday, 24 December 2013

आज सावरकर हयात असते तर पुन्हा तुरुंगात गेले असते!

राहुल पगारे

परवा भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने अभूत पूर्व पुन्हा एकदा निर्णय दिला. या पुढे समलिंगी संबध ठेवता येणार नाहीत, ठेवलेच  तर जन्मठेपेची शिक्षा  मिळेल. आता आधुनिक स्वतंत्र आणि त्या बद्दल वयक्तिक मत जरी माझे भिन्न असले तरी काल मला बातमी वाचल्या वाचल्या चटकन लक्षात आले कि अरे " नशीब" त्या तात्याचे कि येथेही ते सलामत सुटले ! हा निकाल सर्वोच्च न्यायालाने सावरकर हयात असताना दिला असता तर त्या नशीबवान ब्रम्हपुत्राला पुन्हा जन्मठेप झाली असती. आमच्या बऱ्याच विद्वानांनी पुराव्या सहित हे सिद्द केले आहे कि सावरकर तात्याचे गोडसे सोबत गोड संबध होते … गणपतीची कृपा कि बरे त्या काळी म्हणजे सावरकर असताना ह्या केस ची सुनावणी झाली नाही किंव्हा सावरकर आज जिवंत नाहीत. नाही तर संजय दत्तच्या बाजूला येरवड्या मध्ये बसले असते काथ्या कुटत .

बिचाऱ्या त्या जेल भूमीला सावरकर यांचा चरणः स्पर्शाचा अलभ्य लाभ होऊ शकला नाही …तो अलभ्य लाभ होऊ शकला नाही म्हणून तेही बरे झाले नाही तर कुणास कसे ठाऊक त्या कटा मध्ये हि मुसलमान असल्याचे पुरावे त्यांनी "निर्माण" केले असते, माफ करा त्यांनी शोधून काढले असते.


सावकर हे समलिंगी होते, याचा उल्लेख फ्रिडम अ‍ॅट मीडनाईट या पुस्तकात आहे. भारतीय स्वातंत्र्यावर आधारित असलेले हे पुस्तक  जे. बॉयर बेल आणि आयर्विंग लुईस हॉरोविट्झ या दोन लेखकांनी लिहिले आहे.

सावरकरांच्या समलिंगीपणाविषयीची चर्चा विकिपीडियावरील सावरकरांच्या लेखासोबत जोडलेली आहे. भारतीय विकीपीडियावर ब्राह्मणवाद्यांनी कब्जा केला आहे. त्यामुळे मुख्य लेखात ही चर्चा नाही. जिज्ञासूंसाठी या चर्चेची लिंक खाली देत आहोत.



Thursday, 19 December 2013

शिवाजीराजांचे खरे शत्रू कोण?


प्रख्यात इतिहास संशोधक आणि शिवचरित्राचे अभ्यासक श्रीमंत कोकाटे यांनी लिहिलेला ‘शिवाजीराजांचे खरे शत्रू कोण?' हा ग्रंथ प्रचंड गाजतो आहे. जातीयवादी इतिहासकारांनी प्रचलित केलेला शिवरायांविषयीचा खोटा इतिहास श्री. कोकाटे यांनी पुराव्यानिशी खोडून काढला आहे. श्री. कोकाटे यांचा ग्रंथ "अनिता पाटील विचार मंच"च्या वाचकांसाठी येथे उपलब्ध करून देत आहोत. जिज्ञासूंनी त्यावर प्रतिक्रिया जरूर द्याव्यात.

ग्रंथ प्रवेश 


भाग-१

भाग-४

लेखकाचे मनोगत


शिवाजीराजे हे विश्ववंद्य राजे आहेत. राजांचे कर्तृत्व हे सुवर्णाक्षरांनी घराघरात कोरुन ठेवावे
असे आहे. राजांनी फक्त ५० वर्षाच्या आयुष्यात अशक्य कार्य शक्य करुन दाखविले. समाजव्यवस्थेत
आमुलाग्र परिवर्तन करण्यासाठी राजांनी निर्भिडपणे झुंज दिली. यासाठी राजांना हातात शस्त्र धरावे
लागले. पण राजांनी शस्त्राचे युद्ध कमीतकमी केले. चातुर्याचा वापर करुन राजांनी परचक्र निर्दाळले.
याप्रसंगी त्यांना खुप विरोध झाला. ज्यांना विरोध होत नाही ते परिवर्तन करु शकत नसतात. प्रसंगी
राजांवर प्राणघातक हल्ले झाले, नाउमेद करण्याचा प्रयत्न झाला. पण राजांनी या सर्व संकटावर मात
केली. अफजलखान, शाहिस्तेखान, सिद्धीजौहर, दिलेरखान, औरंगजेब या शत्रूंना शिवरायांनी पराभूत
केले. कारण ते उघड शत्रू होते.  उघड शत्रूविरुद्ध लढणे फार सोपे असते. त्यांच्याविरुद्ध डावपेच आखता
येतात. पण गुप्तशत्रूविरुद्ध डावपेच आखता येत नाहीत. त्यामुळे उघड शत्रूपेक्षा गुप्त शत्रू फार
खतरनाक असतो. औरंगजेब ते अफजलखान हे राजांचे उघड शत्रू होते. ते राजांचे कट्टर विरोधक होते.
याबाबत दुमत नाही. पण राजांच्या आश्रयाला राहणारे मित्रत्वाचे सोंग करणारे आणि संकटसमयी
शिवरायांना ठार मारण्यासाठी उघड शत्रुंच्या कळपात सहभागी होणारे राजांचे खरे शत्रू आहेत. पण
पक्षपाती इतिहास लेखकांनी या शत्रूचा जाणीवपूर्वक उल्लेख टाळलेला आहे. समकालीन कागदपत्र,
वस्तुनिष्ठ पुरावे असतानादेखील राजांच्या शत्रूंचे उदात्तीकरण करण्याचे पातक काही शिवशाहिरांनी आणि
कादंबरीकारांनी केलेली आहे. परंतू इतिहासात कविकल्पना, रंजकता, व्यक्तिगतमत, लालित्य, व्देष,
पुर्वग्रहदूषितवृत्ती या बाबींना अजिबात स्थान नसते.

शिवाजी राजांच्या इतिहासाचे तटस्थपणे आणि पारदर्शक वृत्तीने लेखन केले तर शिवाजी
राजांचे खरे शत्रू दादोजी कोंडदेव, कृष्णाजी कुलकर्णी, रायबाघीण देशमुख, मुरगुडनांदगांव येथील जोशी,
मोरोपंत पिंगळे, आण्णाजी दत्तो, उमाजी पंडित, राहुजी सोमनाथ, गागाभट्ट, हणूमंते, रामदास इ. आहेत.
वरील सर्वांनी राजांना कसा व किती त्रास दिला. स्वराज्यनिर्मितीच्या कामात कसे अडथळे आणले.
प्रसंगी राजांच्या अंगावर वार केले. अखेर शिवरायांचा खून देखील राहुजी सोमनाथाने कसा केला. हे
आपणाला प्रस्तुत पुस्तकात वाचण्यास मिळेलच परंतु आपणाला काही बाबी अप्रिय वाटतील आणि
खटकतीलसुद्धा. पण मित्रहो एक खोटे हजारो वेळा सांगितलं की खरे वाटत असते, आणि एक खरे
सुरुवातीला सांगितले की खटकत असते. पण हे खरे सांगण्याचे धाडस आणि आणि ऐकून, वाचून,
समजून घेण्याचे धाडस आत्ता आपण करावे, ही नम्र विनंती करतो. काही बाबी खटकल्या तर विचार
नावाची खूप मोठी शक्ती आपल्या पाठीशी आहे. किमान आपण विचार तरी करावा. प्रस्तुत पुस्तकातील
एकही शब्द निराधार लिहिलेला नाही, प्रत्येक ठिकाणी संदंर्भ दिलेला आहेच. तसेच पाठीमागे संदर्भ
सूची देखील दिलेली आहे. घडलेल्या घटनेमागे तार्किक, मानसशास्त्रीय, तात्विक आधार आहे.
राजांचे शत्रू त्यांच्या खुनाबरोबर संपले नाहीत, त्यांची संख्या पुढे झपाट्याने वाढली.

भुमिपूत्रांचे स्वराज्य गिळंकृत करणा-या पेशव्यांनी राजांनी स्वकर्तृत्वावर सुरु केलेला शिवशक बंद केला.
टिळकांनी शिवजयंती बंद पाडण्यासाठी गणेशोत्सव सुरु केला. अत्रे, सावरकर, पुरंदरे, बेडेकर,
फडके यांनी शिवरायांना बदनाम केले. या उलट  विश्वभुषण भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी
शिवाजीराजांचे चिकित्सक लेखन केले. राष्ट्रपिता ज्योतिराव फुले यांनी शिवजयंती सुरु केली. कर्मवीर
भाऊराव पाटील यांनी आजन्म महाराजांचा जयजयकार करत भूमिपुत्रांना शिक्षण दिले. साहित्यरत्न थोर
समाजसुधारक अण्णाभाऊ साठे यांच्यामुळेच शिवाजीमहाराज रशियाला समजले. डॉ.पंजाबराव
देशमुख, प्रबोधनकार केशव ठाकरे, कर्मवीर डॉ.मामासाहेब जगदाळे, नेताजी सुभाषचंद्र बोस, भगतसिंग
हे शिवाजी राजांचे निस्सीम भक्त होते.  यासाठी अनेक वस्तुनिष्ठ संदर्भ प्रस्तुत पुस्तकात आहेत. या
लेखनामागे जातीयव्देष किंवा व्यक्तीदोष नसून फक्त सत्यसंशोधन आहे. सत्यलेखन, सत्यभाषा म्हणजे लेखन होय. लेखन, म्हणजे शिव्या नव्हेत.

भारतीय समाजावर हजारो वर्षापासून कथा, कादंबरी, चित्रपटांचा प्रभाव असल्यामुळे
ख-या इतिहासापासून समाज वंचित राहिला.
वास्तव इतिहास संशोधनास व लेखनात आलिकडे महाराष्ट्रात मोठी क्रांती झालेली आहे.
इतिहासाचार्य प्रा. मा. म. देशमुख हे ख-या इतिहासाचे जनक आहेत. गतवर्षी "विश्ववंद्य राजा शिवाजी"
या माझ्या पुस्तक प्रकाशनाने मला अधिक लेखनासाठी महाराष्ट्रातील वाचकांनी प्रेरित केले. महाराष्ट्रातून
प्रतिक्रियात्मक हजारो पत्रे मला मिळाली. त्या पुस्तकानंतर "शिवाजीराजांचे खरे शत्रू कोण?" हे
पुस्तक आपल्या हाती देताना आनंद होत आहे. माझे मित्र प्रवीण गायकवाड व शांताराम कुंजीर
यांच्यामुळे हे पुस्तक वाचकांच्या हाती देता आले. प्रस्तुत पुस्तक हे अभिरुचिपेक्षा देशाच्या
आवश्यकतेसेसेसाठी आहे. कारण खरा इतिहास समजल्याशिवाय खरा इतिहास घडत नसतो. देशातील
दंगली, जातीयता, अंधश्रद्धा संपावी यासाठीच हे पुस्तक आपल्या हाती देत आहे. या पुस्तकाचे आपण
एकाग्रतेने वाचन करावे व इतरांना वाचण्यास प्रवृत्त करावे ही विनंती. आपल्या अभिप्रायाची प्रतिक्षा!


श्रीमंत कोकाटे

(शिवाजी राजांचे खरे शत्रू कोण? या पुस्तकातून)


प्रख्यात इतिहास संशोधक आणि शिवचरित्राचे अभ्यासक श्रीमंत कोकाटे यांनी लिहिलेले ‘शिवाजीराजांचे खरे शत्रू कोण?' हा ग्रंथ "अनिता पाटील विचार मंच"च्या वाचकांसाठी येथे उपलब्ध करून देत आहोत. जिज्ञासूंनी त्यावर प्रतिक्रिया जरूर द्याव्यात.

ग्रंथ प्रवेश 

भाग-१
भाग-४
  1. नेताजी पालकरांच्या धर्मांतराला विरोध, गंगाधर कुलकर्णीच्या धर्मांतराला मात्र समर्थन
  2. संभाजीराजांना मोगलांच्या ताब्यात देणारा विश्वासघातकी कवि कुलेश
  3. औरगजेबाने संभाजी राजांना मनुस्मृती संहितेप्रमाणे ठार मारले
  4. शिवशक बंद करुन मोगलांचा फसलीशक सुरु करणारे पेशवे
  5. शिवजयंती बंद पाडण्यासाठी टिळकाने गणेशोत्सव सुरु केला
  6. शिवरायांना मर्यादित करणारे अत्रे

प्रस्तावना

छत्रपती शिवाजी महाराज हे जागतिक किर्तीचे, आणि कर्तुत्वाचे राजे आहेत. भूमिपुत्रांच्या
सहकार्याने राजांनी स्वराज्य निर्माण केले. पण राजांचे निर्विवाद चरित्र उपलब्ध नाही हे कटूसत्य आहे.
कल्पितकथा, रंजकता हे शिवचरित्रातील अडथळे आहेत. शिवचरित्र हे पुस्तकात न मावणारे जीवनकार्य
आहे. शिवचरित्रावर अनेक अंगानी लिहिणे गरजेचे आहे. शिवचरित्र हे केवळ डोक्यावर घेऊन
मिरवण्याचा विषय नाही, तर डोक्यात घालण्याचा विषय आहे. शिवचरित्रावर मालिका, नाटके, चित्रपट,
महानाट्य निर्माण करणे आणि व्याख्याने देणे हा अनेकांनी धंदा केला आहे. अशा काळात कटुतेचा
विचार न करता श्रीमंत कोकाटे यांनी अत्यंत संशोधनपूर्ण असे ‘‘शिवाजीराजांचे खरे शत्रू कोण?" हे
राजांच्या जीवनातील अपरिचित बाबींवर प्रकाश टाकणारे पुस्तक लिहिले आहे. राजांना जातीय-
धार्मिक चौकटीत अडकवणे, रायरेशराच्या मंदिरात शपथ घेतली की नाही, महाराणी पुतळाबाईचे सती
जाणे, भवानी तलवार, बहुजनप्रतिपालक म्हणण्याऐवजी गा ब्राह्मणप्रतिपालक म्हणणे यापाठीमागचे
षडयंत्र, जिजाऊमॉसाहेबांचे निधन कसे झाले? राजांचा खून कशा प्रकारे करण्यात आला? मनुवादी
शिवजयंतीच्या तारखेला विरोध का करतात? याबाबत श्रीमंतचे संशोधन नाविन्यपुर्ण आहे. यासाठी
श्रीमंत कोकाटे यांनी बरेच श्रम घेतले आहेत.

राजांनी सर्व जातीधर्माच्या भूमिपुत्रांना सोबत घेऊन स्वराज्य निर्मिती केली. त्यामध्ये बाजी
पासलकर, कान्होजी जेधे, शिवाजी काशिद, जिवा महाला, बहिर्जी नाईक, हिरोजी फर्जंद, नुरखाण बेग,
काझी हैदर, लाय पाटील, येसाजी कंक, फिरंगोजी, प्रतापराव, कोंडाजी फर्जंद, सुर्यराव काकडे, नेताजी
पालकर, सिद्धि हिलाल, सिद्धि इब्राहिम, फकिराचा खापर पणजोबा, मुरारजी व बाजीप्रभू, हे प्रभू इ.
सर्व जाती धर्माचे सहकारी राजांसाठी प्राणपणाने लढले.
या प्रसंगी दादोजी कोंडदेव, कृष्णाजी कुलकर्णी, रामदास, मोरोपंत इ. अनेक भटजी आडवे
आले. आडवे आलेल्यांना राजांनी पराभूत केले. अफजलखान भेटीच्या प्रसंगी राजांवर वार करणा-या
कृष्णाजी भास्कर कुलकर्णीला राजांनी  ठार मारले. राजांना आजन्म त्रास देणा-या शत्रूची माहिती तर
श्रीमंतने प्रस्तुत पुस्तकात दिलीच, पण आजच्या तारखेपर्यंत शिवचरित्र, शिवसूत्र आणि शिवनीतीला
जाणीवपूर्वक बदनाम करणा-या टिळक, सावरकर, पुरंदरे, बेडेकर आणि य.दि. फडकेंचा देखील पर्दाफाश
केला आहे.

महाराजांना जिवंतपणी त्रास देणारे जसे शत्रू आहेत, तसेच त्यांचा बदनामीकारक इतिहास
लिहिणारे फडके, माटे, इ. कंटक देखील शत्रू आहेत. त्यांनी राजांचा व मराठा स्त्रियांचा
बदनामीकारक इतिहास पहिल्या खंडात लिहिला. श्रीमंतने या बाबतीत लिहिले आहे. पण प्रतिक्रिया
देण्यात शक्ती खर्च करण्योक्षा नवनिर्मितीची गरज आहे. भावनिक पातळीवर लेखन कालबाह्य ठरते.
यासाठी शत्रूंचा उल्लेख करुन त्यांना मोठे करण्यापेक्षा शिवाजीराजांच्या मित्रांवर देखील लिहावे.
शिवचरित्रातील अनेक बाबी अनभिज्ञच आहेत. त्यांचा शोध घ्यावा.

श्रीमंत हा सृजनशिल अभ्यासू आणि परखड विचारांचा प्रभावी वक्ता आहे. त्यामुळे विनंतीवजा
सूचना आहे की, संभाजीराजांवर देखील लिहावे.

पुरुषोत्तम खेडेकर
(राष्ट्रीय अध्यक्ष, मराठा सेवा संघ)

(शिवाजी राजांचे खरे शत्रू कोण? या पुस्तकातून)


प्रख्यात इतिहास संशोधक आणि शिवचरित्राचे अभ्यासक श्रीमंत कोकाटे यांनी लिहिलेले ‘शिवाजीराजांचे खरे शत्रू कोण?' हा ग्रंथ "अनिता पाटील विचार मंच"च्या वाचकांसाठी येथे उपलब्ध करून देत आहोत. जिज्ञासूंनी त्यावर प्रतिक्रिया जरूर द्याव्यात.

ग्रंथ प्रवेश 
भाग-१
भाग-४
  1. नेताजी पालकरांच्या धर्मांतराला विरोध, गंगाधर कुलकर्णीच्या धर्मांतराला मात्र समर्थन
  2. संभाजीराजांना मोगलांच्या ताब्यात देणारा विश्वासघातकी कवि कुलेश
  3. औरगजेबाने संभाजी राजांना मनुस्मृती संहितेप्रमाणे ठार मारले
  4. शिवशक बंद करुन मोगलांचा फसलीशक सुरु करणारे पेशवे
  5. शिवजयंती बंद पाडण्यासाठी टिळकाने गणेशोत्सव सुरु केला
  6. शिवरायांना मर्यादित करणारे अत्रे

Sunday, 15 December 2013

शिवाजीराजांचे खरे शत्रू कोण?


प्रख्यात इतिहास संशोधक आणि शिवचरित्राचे अभ्यासक श्रीमंत कोकाटे यांनी लिहिलेला ‘शिवाजीराजांचे खरे शत्रू कोण?' हा ग्रंथ प्रचंड गाजतो आहे. जातीयवादी इतिहासकारांनी प्रचलित केलेला शिवरायांविषयीचा खोटा इतिहास श्री. कोकाटे यांनी पुराव्यानिशी खोडून काढला आहे. श्री. कोकाटे यांचा ग्रंथ अनिता पाटील विचार मंच]च्या वाचकांसाठी येथे उपलब्ध करून देत आहोत. जिज्ञासूंनी त्यावर प्रतिक्रिया जरूर द्याव्यात.

लेखकाचे मनोगत
प्रस्तावना

भाग-१
रामदास संत नव्हे; तर स्वराज्यातील जंत होता
आदिलशहाचा मोकाशी दादू कोंडदेव कुलकर्णी

भाग-४
नेताजी पालकरांच्या धर्मांतराला विरोध, गंगाधर कुलकर्णीच्या धर्मांतराला मात्र समर्थन
संभाजीराजांना मोगलांच्या ताब्यात देणारा विश्वासघातकी कवि कुलेश
औरगजेबाने संभाजीराजांना मनुस्मृती संहितेप्रमाणे ठार मारले
शिवशक बंद करुन मोगलांचा फसलीशक सुरु करणारे पेशवे
शिवरायांना मर्यादित करणारे अत्रे

शिवरायांना मर्यादित करणारे अत्रे

 -श्रीमंत कोकाटे (शिवचरित्र अभ्यासक, संशोधक)


लाला लजपतरायांनी "सिवोजी" नावाचे उर्दूमधून शिवचरित्र लिहिले. त्यामुळे शिवचरित्र राजे पंजाब-सिंध 
(आताचे पाकिस्तान) पर्यंत गेले. . रवींद्रनाथ टागोर, नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे शिवाजीराजे हे
आराध्य दैवत होते. कर्मवीर भाऊराव पाटील म्हणाले होते कि,  प्रसंगी जन्मदात्या बापाचे नाव बदलेन पण
कॉलेजला दिलेले शिवाजीराजांचचे नाव मी कधीच बदलणार नाही. ते भाऊराव पाटील जैन होते.
त्यांच्यामुळे शिवाजीराजांच्या रयतेला शिक्षण मिळाले. कर्मवीर डॉ.मामासाहेब जगदाळे, डॉ.पंजाबराव
देशमुख, राजर्षी शाहू महाराज, क्रांतीसिंह नाना पाटील, संत गाडगेबाबा, प्रबोधनकार केशव सी. ठाकरे इ.
समाजसुधारकाची शिवरायांवर अनन्यनिष्ठा होती. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार विश्वभूषण भारतरत्न
डॉ.बाबासाहेब यांचा शिवचरित्राचा सखोल अभ्यास होता. त्यांनी "शुद्र कोण होते?" या ग्रंथात
शिवाजीराजांबाबत खूप सखोल माहिली लिहिलेली आहे. शिवाजीराजांच्या त्रिशताब्दी उत्सवाच्या
निमित्ताने बदलापुर येथे आयोजित केलेल्या समारंभाच्या अध्यक्षस्थानी डॉ.बाबासाहेब आंबेडकर होते.
या प्रसंगी राजांच्या जीवनावर अभ्यासपुर्ण आणि प्रभावी भाषण केले. त्यामुळे राजांचे अपरिचित रुप
जनतेला समजले. शिवाजीराजांच्या राज्याभिषेकाला ब्राह्मणांनी केलेल्या विरोधाचा बदला
डॉ.आंबेडकरांनी घेतला. डॉ.आंबेडकरांनी बहुजन समाजाला राजा होण्याचे स्वतंत्र दिले, तुम्ही शूद्र
आहात त्यामुळे मुख्यमंत्री होता येणार नाही. असे आज कोणीही ब्राह्मण म्हणणार नाही. हा अधिकार
सर्व बहुजन समाजाला डॉ.आंबेडकरांनी दिला. राष्ट्रपिता ज्योतिराव फुले यांनी शिवजयंती सुरु केली.
म्हणजे फुले, आंबेडकर या गुरु शिष्यांना शिवाजीराजांचा सार्थ अभिमान होता. त्यांचे राजांवर डोळस
प्रेम होते. आंधळे प्रेम नव्हते.

शिवाजीराजांचे भांडवल करुन फुले-आंबेडकरांनी समाजामध्ये धार्मिक व जातीय दंगे निर्माण
केले नाहीत.  किंवा शिवाजीराजांच्याव्दारे त्यांनी बहुजन समाजाचे वैदिकीकरण केले नाही. फुले-
आंबेडकरांनी शिवाजीराजांचा खरा इतिहास देशाला सांगितला. डॉ.आंबेडकर लेटरहेडवर जय शिवराजय लिहायचे. साहित्यरत्न थोर देशभक्त आणि समाजसुधारक अण्णाभाऊ साठे यांनी गणपतीला वंदन
असणारा पारंपारिक गण बदलला. गणाचा आरंभ शिवछत्रपतींना वंदन करुनच सुरु केला. अण्णाभाऊंनी
शिवरायांवर "महाराष्ट्राची परंपरा" हा पोवाडा लिहिला आण्णाभाऊ रशियात गेल्यानंतर त्याठिकाणी
शिवचरित्रावर अभ्यास करणारे रशियन संशोधक  प्रा.चेलिशिव आण्णाभाऊ यांना भेटले. आण्णाभाऊ यांनी  त्यांना शिवरायांच्याबाबत खूप दुर्मिळ माहिती सांगितली. म्हणजेच आण्णाभाऊंमुळुळेचेच रशियन जनतेलेला शिवरायांचचे कार्य माहित झाले. शिवरायांचे कार्य राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय  स्तरावर पोहचविण्यासाठी बहुजन समाजातील विचारवंतांनी मोलाचे कार्य केले आहे. 

शिवरायांना मर्यादित करणारे अत्रे 
याउलट ब्राह्मण लेखकांनी शिवरायांना बदनाम करण्याचे पाप केले. 
स्वातंत्र्यप्राप्तीनंतर शिवाजीराजांचे जीवन व कार्य राज्यस्तरावर व जातीस्तरावर ठेवण्यासाठी ब्राह्मण
नेत्यांनी जाणीवपुर्वक प्रयत्न केले. संयुक्त महाराष्टड्ढाच्या आंदोलनप्रसंगी प्र.के. अत्रे यांनी इतर राज्यावर
टिका करताना शिवाजीराजांचा वापर केला. "इतर राज्यांना फक्त भूगोल आहे. पण महाराष्ट्राला 
 इतिहास आहे", असे टोमणे मारत अत्र्यांनी राजांचे नाव घेतले. त्यामुळे शिवरायांच्या प्रतिमेला
मर्यादा पडल्या जातीय राजकारणात शिवरायांचा वापर सुरु झाला. राजकीय पक्षांची बांधणी शिवरायांच्या
नावाने झाली. परंतु प्रबोधनकारांचा शिवाजी जनतेला सांगितलाच नाही. प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे हे
थोर इतिहास संशोधक व समाजसुधारक होते. त्यांनी शिवरायांचा खरा इतिहास जनतेला सांगितला.
प्रबोधेधनकार ठाकरे म्हणत की, शिवाजीराजे ३३ कोटेटी देवेवांपपेक्षा महान आहेतेत. डोक्यातून दैवैववाद काढूनच शिवरायांचा अभ्यास करावा.

(शिवाजी राजांचे खरे शत्रू कोण? या पुस्तकातून)


प्रख्यात इतिहास संशोधक आणि शिवचरित्राचे अभ्यासक श्रीमंत कोकाटे यांनी लिहिलेले ‘शिवाजीराजांचे खरे शत्रू कोण?' हा ग्रंथ "अनिता पाटील विचार मंच"च्या वाचकांसाठी येथे उपलब्ध करून देत आहोत. जिज्ञासूंनी त्यावर प्रतिक्रिया जरूर द्याव्यात.

ग्रंथ प्रवेश 
भाग-१
भाग-४
  1. नेताजी पालकरांच्या धर्मांतराला विरोध, गंगाधर कुलकर्णीच्या धर्मांतराला मात्र समर्थन
  2. संभाजीराजांना मोगलांच्या ताब्यात देणारा विश्वासघातकी कवि कुलेश
  3. औरगजेबाने संभाजी राजांना मनुस्मृती संहितेप्रमाणे ठार मारले
  4. शिवशक बंद करुन मोगलांचा फसलीशक सुरु करणारे पेशवे
  5. शिवजयंती बंद पाडण्यासाठी टिळकाने गणेशोत्सव सुरु केला
  6. शिवरायांना मर्यादित करणारे अत्रे