Wednesday, 10 April 2013

‘ऐसी अक्षरे'वरील ‘भयंकर एक लेख'!


‘अपाविमं'ला ब्राह्मणवादी एवढे का घाबरतात? कारण ‘अपाविमं'वर ब्राह्मणी ग्रंथातील पापे पुराव्यासह जगजाहीर केली गेली आहेत. ‘मिसळपाव' या ब्राह्मणी संकेत स्थळावरील 'अपाविमं'विरोधातील गरळ मागच्या लेखात दिली होती. आता ‘ऐसी अक्षरे' या दुस-या ब्राह्मणी संकेत स्थळावरील मळमळ वाचकांच्या निदर्शनास आणून देत आहोत. सप्टेंबर २०१२ मध्ये ‘ऐसी अक्षरे'वर सुप्रिया जोशी नामक बाईंनी अपाविमं विरोधात एक लेख लिहिला. त्याचे शीर्षक आहे - मी वाचलेला भयंकर एक ब्लॉग! 

ऋग्वेदी ब्राह्मण हे मूळचे कसे गोमांस भक्षक आहेत, याचा पर्दाफाश आदरणीय अनिताताईंनी एका लेखमालेत केला होता. आश्वलायन गृह्य सूत्रातील पुरावे ताईंनी त्यासाठी दिले आहेत. हा लेख वाचून ‘ऐसी अक्षरे'वरील ब्राह्मणवाद्यांना भोवळच आली. त्यातून सुप्रिया बाईंचा वरील लेख आला आहे. अपाविमंच्या वाचकांनी हा लेख वाचावा. तसेच मूळ संकेत स्थळवर जाऊन लेखावरील प्रतिक्रियाही वाचाव्यात. आश्वलायनाचे गृह्य सूत्र काय आहे, याची प्राथमिक माहितीही ‘ऐसी अक्षरे'वरील विद्वानांना नाही, हे या प्रतिक्रियांवरून दिसून येते.
-संपादक मंडळ, अपाविमं.


मी वाचलेला भयंकर एक ब्लॉग

लेखक/लेखिका: सुप्रिया जोशी (गुरुवार, 06/09/2012 - 07:47)
अनिता पाटील नावाच्या एक महिलेचा ब्लॉग मी वाचला. ब्लॉग अभ्यासपूर्ण वाटला. म्हणजे किमान लेखन अभ्यासपूर्ण आहे, हे दिसेल याची खबरदारी लेखिकेने घेतलेली दिसली. या ब्लॉगवरील मजकूर धक्कादायक आहे. गोमांस भक्षक ब्राह्मण या विषयावरीलच लेख तर भयंकरच आहेत. या विषयावर एकूण चार-पाच लेख ब्लॉगवर आहेत. हे लेख वाचून मला भोवळच आली. प्राचीन काळी ब्राह्मण गोमांस खात असत, असे ह्याच्यातील प्रत्येक लेखात वारंवार सांगितले गेले आहे. तसा दावा करण्यात आला, असे म्हणणे अधिक योग्य राहील. प्राचीन काळातील ब्राह्मणांचे गोमांस भक्षण सिद्ध करण्यासाठी पाटील बार्इंनी संस्कृत भाषेतील असंख्य श्लोक लेखात दिले आहेत. हे श्लोक खरे आहेत का, याबाबत मला तरी संशयच वाटतो. कारण मी असे या पूर्वी कधीही ऐकलेले नाही. कुठे वाचलेले सुद्धा नाही.

अनिता पाटील यांनी गोमांसा विषयाच्या लेखानमध्ये अश्वलायन गृह्य सूत्र या नावाच्या ग्रंथाचा आधार घेतला आहे. या ग्रंथातील अनेक श्लोक लेखासाठी मोठ्या प्रमाणात घेण्यात आल्याचे दिसून येत होते. असा काही ग्रंथ आहे, हे माझ्या वाचनात आलेले नाही. तज्ज्ञांनी यावर प्रकाश टाकायला हवा. असा ग्रंथ नसेल, तर तसे स्पष्टपणे समोर यायला हवे. आणखीन, असेल तर या ग्रंथात नेमके काय म्हटले आहे, हे तपासून पाहायला पाहिजे आहे. असा ग्रंथ कोणाला माहिती आहे का? असल्यास कृपया सांगावे.

आणखीन एक गोष्ट अशी की, अनिता बाइंच्या लेखांत मनुस्मृतीमधील काही श्लोक सुद्धा मला दिसले. इतकेच काय ऋगवेदातले श्लोक सुद्धा आहेत. माझा यापैकी कोणत्याच ग्रंथाचा अभ्यास नाही. जाणकार लोकांनी या ब्लॉगला भेट देऊन सत्यता तपासून पाहायला पाहिजे हवी. मनुस्मृती आणखीन ऋगवेदातील श्लोकांचा खरा अर्थ लोकांच्या पुढे यायला पाहिजे आहे, असे माझे स्वत:चे मत आहे.

माझ्या अल्पमती प्रमाणे मी माझे मत या येथे उकलून मांडले आहे. गोड मानून घ्यावे, ही सर्वांना नम्रतेची हात जोडून विनंती तसेच हा माझा पहिलाच लेख आहे. हे सुद्धा मी नमूद करून ठेवते.

मी नवीनच ब्लॉग काढला आहे, याची कृपया सर्वांनी नोंद घ्यावी.

...........................................................................
नवा जोड
..........................................................................

प्रश्नांची उत्तरे मिळायला पाहिजे आहे
या विषयावर दोन दिवस चर्चा झाली. पण मी ज्या हेतूसाठी हा लेख लिहिला होता, तो आणखीन साध्य झालाच नाही. कारण मी जे काही प्रश्न येथे विचारून ठेवले होते, त्यांची नेमकी उत्तरे मिळालेली नाहीत.
माझे प्र्श्न असे आहे -


१. अनिता पाटील यांनी अश्वलायन गृह्यसूत्र नावाच्या कोणत्या तरी ग्रंथाचा आधार घेऊन गोमांस
भक्षणाचे लेख लिहिले आहेत. असा खरेच काही ग्रंथ आहे का?
२.असलाच आहे, तर तो कोठे उपलब्ध होईल?
यांची उत्तरे मला मिळायला पाहिजे आहे.
.......................
अनिता पाटील यांच्या लेखात आलेल्या पुस्तकांच्या नावाची खात्री करून घेता यावी म्हणून त्यांच्या ब्लॉगचा धागा खाली देऊन ठेवते आहे :
खलील प्रमाने सुद्द्दा हा ब्लोग उघड्तो.







या लेख मालेतील इतर लेख :

‘मिसळपाव'वर अनिता पाटील यांच्यावर आगपाखड

Thursday, 4 April 2013

‘मिसळपाव'वर अनिता पाटील यांच्यावर आगपाखड


आदरणीय अनिता तार्इंनी २०११ मध्ये हा ब्लॉग सुरू केला. ब्लॉगवरील अभ्यासपूर्ण लेखांनी जातीयवाद्यांच्या तंबूत घबराट पसरली. ब्लॉगच्या विरोधात मोठ्या प्रमाणात लिखाण होऊ लागले. काही ब्लॉग तर केवळ अनिता ताई यांना विरोध एवढ्या एकाच उद्देशाने काढले गेले. लोकशाहीत विरोध नोंदविण्याचा हक्क सर्वांनाच आहे. ‘अनिता पाटील विचार मंच'चे (अपाविम) संपादक मंडळ विरोधकांचा तिरस्कार करीत नाही. उलट विरोधकांची दखल घेण्याचा निर्णय मंडळाने घेतला आहे. आमच्या ब्लॉगच्या विरोधातील लिखाण या पुढे टप्प्याने वाचकांना उपलब्ध करून दिले जाईल. ‘आमचे विरोधक' या सदरात हे लेख प्रसिद्ध होतील. ‘मिसळ पाव' या संकेत स्थळावरील लेखाने या सदराची सुरुवात करीत आहोत. ब्राह्मणांनी ब्राह्मणांसाठी चालविलेले संकेत स्थळ अशी ‘मिसळ पाव'ची ओळख आहे, हे वेगळे सांगण्याची गरज नाही. ‘मिसळ पाव'वर प्रसिद्ध झालेल्या लेखावरील प्रतिक्रिया वाचकांनी अवश्य वाचाव्यात.

-संपादक मंडळ, अपाविम.

Published on मिसळपाव (http://www.misalpav.com)

Tuesday, 2 April 2013

पांडुरंगशास्त्री आठवल्यांकडून तुकोबांविषयी खोटारडा प्रचार

...म्हणे तुकाराम महाराजांपासून इश्वर दूरच राहिला

राजा मइंद


पांडुरंगशास्त्री आठवल्यांनी दशावतारावर अनेक प्रवचने दिली. त्याचे संकलन ‘दशावतार' या नावाच्या पुस्तकात स्वाध्याय परिवारातर्फे करण्यात आले आहे. माझ्याकडे या पुस्तकाची ऑगस्ट १९८९ मध्ये प्रसिद्ध करण्यात आलेली दुसरी आवृत्ती आहे. स्वाध्याय परिवारातर्फे चालविल्या जाणा-या सद्विचार दर्शन ट्रस्टतर्फे हे पुस्तक प्रकाशित करण्यात आले आहे. या पुस्तकातील प्रत्येक पान जातीय ब्राह्मणवादी विचारांनी भरलेले आहे. या पुस्तकात जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांची कुत्सित शब्दांत हेटाळणी करण्यात आली आहे. ही हेटाळणी कुटाळकीच्या पातळीवरची आहे.  तुकोबांनी आठ-आठ जन्म घेऊनही ईश्वर त्यांच्यापासून दूरच राहिला, असा खोटा प्रचार आठवले करतात.

पुस्तकातील ‘अवतार मीमांसा' नावाच्या पहिल्याच प्रकरणात हा प्रकार आठवल्यांनी केला आहे.  या विवेचनातील आठवल्यांचे शब्द पुढील प्रमाणे आहेत : 

...ट्रान्समायझेशन म्हणजे म्हणजे उत्क्रांतीवादाच्या पद्धतीने विकास करीत दिव्यमानव बनून मनुष्याने वर येणे. उदाहरणार्थ, तुकाराम महाराज आठ आठ जन्म घेऊन स्वत:चा विकास करीत राहिले, परंतु ईश-चैतन्य मात्र स्वत: दूरच उभे राहिले.१

किती ही थापेबाजी? तुकोबांना इश्वराचे दर्शनच झाले नाही, असे विवेचन करून आठवले तुकोबांचा घोर अपमानच करतात. तुकोबांना इश्वराचा साक्षात्कार झाला होता. त्या विषयीचे शेकडो अभंग त्यांच्या गाथ्यात आहेत. ‘अणुरणीया थोकडा तुका आकाशा एवढा' अशी तुकोबांची अवस्था झाली होती. पण, त्याकडे आठवलेबुवा सोयीस्कर दुर्लक्ष करतात. 

वारकरी धर्माविरोधात ‘स्वाध्याया'चे कारस्थान
जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या विषयी, असा अवमानकारक अपप्रचार करून पांडुरंगबुवांना आठवल्यांना काय साध्य करायचे होते? वारकरी सांप्रदायाने महाराष्ट्रात वैदिक धर्मातील विषमते विरुद्ध बंड पुकारले. धार्मिक क्षेत्रात समतेचा झेंडा रोवला. आज वारकरी सांप्रदाय महाराष्ट्राचा मुख्य धर्म आहे. वारकरी धर्माचा थेट फटका ब्राह्मणांना बसला. धर्मक्षेत्रातील ब्राह्मणांच्या एकाधिकारच वारकरी संतांनी प्रहार केले. त्यामुळे विषमतावादी ब्राह्मणी विचारांचा पुरस्कार करणा-यांचा वारकरी सांप्रदायावर विशेष राग आहे. वारकरी धर्मातील प्रत्येक संताला ब्राह्मणांनी छळले. ज्ञानेश्वरापासून तुकोबापर्यंत सर्वच संतांना ब्राह्मणांच्या या छळाला तोंड द्यावे लागले. वारकरी संत मात्र ब्राह्मणांपुढे झुकले नाही. वारक-यांचा समतेचा विचार मारला जाऊ शकला नाही. त्यामुळेच वारकरी धर्म हा महाराष्ट्राचा मुख्य धर्म बनू शकला. 

थेट विरोध करून वारक-यांचा विचार संपविला जाऊ शकत नाही, हे लक्षात आल्यानंतर विषमतावादी ब्राह्मणी विचारांच्या पुरस्कत्र्यांनी आता छुप्या पद्धतीचा अवलंब सुरू केला आहे. पांडुरंग शास्त्री आठवले यांनी उभा केलेला स्वाध्याय परीवार याच मार्गाने चालला आहे. महाराष्ट्रातील समतावादी वारकरी विचार संपवून विषमतावादी जातीय विचार रुजविणे हेच स्वाध्याय परिवाराचे मुख्य लक्ष्य आहे. पांडुरंगशास्त्री आठवल्यांच्या पुस्तकातील उतारे पाहिले की, स्वाध्याय परिवाराचा छुपा अजेंडा लक्षात येतो. 


संदर्भ : 
१. दशावतार, दुसरी आवृत्ती, ऑगस्ट १९८९, पान क्र. ६ 
प्रकाशक : सद्विचार दर्शन ट्रस्ट, मुंबई.




Wednesday, 6 March 2013

पंचांगवाल्या दात्यांना पावसानेच पाडले दातावर!

सोलापुरी पंचांगात भविष्याची बोगसगिरी !!

राजा मइंद

सोलापूरचे दाते कुटुंब पंचांगाच्या नावाखाली सुमारे १०० वर्षांपासून महाराष्ट्राला बनवित आले आहे. या पंचांगकर त्यांनी महाराष्ट्रात अंधश्रद्धांचा डोंगर उभा करून ठेवला आहे. खेड्यांमध्ये गाय हरवली तरी, लोक पंचागवाल्या बामनाकडे जाऊन विचारतात. शुभ-अशुभाच्या असंख्य भाकड गोष्टी पुरोगामी महाराष्ट्राच्या मातीत रुजविण्याचे पाप दात्यांनी केले आहे. दात्यांच्या शुभ-अशुभाच्या कल्पित कथांना तूर्तास आम्ही बाजूला ठेवीत आहोत. त्यावर पुढच्या लेखात केव्हा तरी लिहू. आजच्या लेखाचा विषय दात्यांच्या पंचांगातील वर्षफल हा आहे. दात्यांचे २०१२-१३ या वर्षाचे पंचांग आम्ही त्यासाठी वाचकांसमोर ठेवीत आहोत. दात्यांच्या पंचांगाचे वर्ष आता संपत आले आहे. वर्षाच्या आरंभी दात्यांनी जी काही भाकिते वर्तविली होती, ती खरी ठरली का, हे तपासून पाहण्याचा हा योग्य काळ आहे.

यंदा महाराष्ट्रात ‘न भुतो न भविष्यती' असा भयंकर दुष्काळ पडला आहे. रानच्या पाखराला चोच भिजवायलाही पाणी नाही. या महाभयंकर दुष्काळाचा अंदाज सोलापुरी दात्यांच्या पंचांगातील ग्रहतारयांना आलेला नव्हता. उलट यंदा महाराष्ट्रात मुबलक पाऊस पडून धनधान्याची आबादाणी राहील, जनावरे आनंदी राहतील, असे अजब भविष्य दात्यांनी या वर्षाच्या सुरूवातीला आपल्या पंचांगात लिहून ठेवले होते.

पावसासंबंधी दात्यांनी काय काय म्हणून ठेवले होते ते आता दात्यांच्या शब्दांतच पाहू या :

  • राजा शुक्र असल्याने पाणी मुबलक मिळेल.
  • मंत्री शुक्र असल्याने जनावरे भरपूर दूध देतील.. पाऊस चांगला पडून धनधान्य वृद्धी होईल.
  • खरीपाचा स्वामी चंद्र असल्याने पर्जन्यमान चांगले राहील. दूध दुभते व धान्य मुबलक मिळेल.
  • आद्रा नक्षत्राचे फळ : पिके चांगली येऊन धान्य व कापड पुष्कळ मिळेल.
  • या वर्षी आवर्त नावाचा मेघ असल्यामुळे वादळासह पाऊस होईल.
  • पशुपालक श्रीकृष्ण आहे म्हणून जनावरांना आनंद होईल. धन धान्य दुभते वाढेल.
  • मेघ निवास कुंभाराचे घरी असून रोहिणी नक्षत्र पर्वतावर पडले आहे. त्यामुळे खंडीत वृष्टी होईल.
  • या वर्षी चार आढक म्हणजे पर्जन्यमान उत्तम राहील.
  • हे शुभकारक वर्षफल संवत्सरारंभाच्या दिवशी जे भक्तीने श्रवण करतील ते वर्षभर सुखी होतील.


दाते पंचांगात सुरूवातीला छापण्यात आलेल्या वर्षफलात वरील ओळी आल्या आहेत. (पंचांगातील या पानाची फोटो कॉपी लेखाच्या शेवटी दिली आहे. वाचकांनी ती अवश्य पाहावी.) पाणी मुबलक मिळेल, वादळासह पाऊस येईल, पर्जन्यमान चांगले राहील, अशी भाकिते दात्यांनी त्यात मांडली आहेत. प्रत्यक्षात मात्र महाराष्ट्र दुष्काळाने होरपळत आहे. महाराष्ट्रात भीषण दुष्काळ पडेल, असे एकही वाक्य दात्यांच्या या भाकितात नाही. अनंत दाते, वीणा दाते, विनय दाते, प्रिया दाते, ओंकार दाते, मुग्धा दाते अशा एकूण ६ दात्यांनी हे वर्षफल लिहिले आहे. असे खोटे भविष्य तुम्ही कसे काय वर्तविले, असा जाब दात्यांना महाराष्ट्र विचारीत आहे. त्याचे उत्तर त्यांनी द्यायला हवे.

खोटे भविष्य वाचा आणि वर्षभर सुखी राहा!
पाऊस काही दात्यांना विचारून पडण्याचा निर्णय घेत नाही. दात्यांनी पंचांगात लिहिले आहे, म्हणून धो धो कोसळणे आपले कर्तव्य आहे, असे पावसाला वाटत नाही. पण दात्यांना तसे वाटत असावे. आपण पंचांगात लिहिले आहे, तर पाऊस पडेलच, अशी अंधश्रद्धा ही मंडळी त्यामुळेच बाळगून आहेत. पर्जन्यराजाने ती दूर केली. दात्यांना पावसाने दातावर पाडले! यातली गंमत अशी की, + हे शुभकारक वर्षफल संवत्सरारंभाच्या दिवशी जे भक्तीने श्रवण करतील ते वर्षभर सुखी होतील.+ असे मखलाशी करणारे एक वाक्य शेवटी दात्यांनी या भाकिताला जोडले आहे. खोटी भविष्ये वाचून माणूस वर्षभर सुखी कसा राहू शकतो, हे दातेच जाणोत. पंचांग वाचणारे लोक सुखी राहो न राहो, पंचांगाच्या विक्रीतून लक्षावधी रुपये कमावून सोलापुरी दाते मात्र सुखी आहेत.

हात वर करायला जागा!
अनंत दाते, वीणा दाते, विनय दाते, प्रिया दाते, ओंकार दाते, मुग्धा दाते या मंडळींनी वर्षफल लिहिताना काही पळवाटा त्यात ठेवल्या आहेत. वर दिलेल्या ८ वाक्यांत दात्यांनी उत्तम पाऊस पडेल, असे म्हटले आहे. त्याच्या जोडीला दोन वाक्ये मात्र पाऊस पडणार नाही, असे सांगणारी दोन वाक्ये न विसरता लिहिलेली आहेत. ही दोन वाक्ये अशी :

  • रब्बीचा स्वामी शनि असल्याने पाऊस कमी पडेल आणि धनधान्य कमी प्रमाणात मिळेल.
  • या वर्षी पृथुश्रवण नावाचा नाग आहे म्हणून पाऊस कमी पडेल.

दोन्ही हातांनी ढोलकी वाजविण्याचा दात्यांचा हा प्रयत्न अत्यंत केविलवाणा आहे. त्यातून दात्यांची जबाबदारी अजिबात संपत नाही. पावसासंबंधीची एकूण १० वाक्ये दात्यांच्या वर्षफलात आहेत. त्यातली ८ वाक्ये म्हणतात पाऊस चांगला पडेल, तर दोन वाक्ये म्हणतात पाऊस पडणार नाही. येथे सरासरी काढली तर दात्यांच्या पंचांगातील ८० टक्के अंदाज मुबलक पावसाच्या बाजून आहे. २० टक्के अंदाज 'कमी पावसा'च्या बाजूने आहे. म्हणजेच दाते खोटे पडले आहेत.

९८ व्या वर्षी तरी बदला!
ल. गो. दाते यांनी दाते पंचांगांची स्थापना केली. २०१२-१३ चे पंचांग दात्यांचे ९७ वे पंचांग होते. या ९७ वर्षांत सर्व काही बदलून गेले आहे. दाते मात्र तसेच आहेत. ते बदलायला तयार नाहीत. २०१३-१४ या वर्षाचे पंचांग दाते मंडळी तयार करीत असतील. त्यांना आमचा प्रेमाचा सल्ला आहे की, येणारया पंचांगात तरी अशी खोटी-नाटी भाकिते देऊन दिशाभूल करू नका. ९८ व्या वर्षी का असेना, पण स्वत:त काळानुरूप थोडा बदल करून घ्या.


सोलापुरी दात्यांच्या पंचांगातील
पावसाविषयीचे भाकित असलेले पान 

Monday, 18 February 2013

मग काय, गाणे-बजावणे करणा-या श्रीकांत ठाक-यांचे स्मारक अरबी समुद्रात उभारायचे?

--राजा मइंद


अरबी समुद्रात उभारण्यात येणार असलेल्या शिवरायांच्या स्मारकास राज ठाकरे यांनी विरोध करून आपली जात दाखवून दिली आहे. अरबी समुद्रात शिवाजी महाराजांचे स्मारक उभारायचे नाही तर मग कोणाचे उभारायचे? श्रीकांत केशव ठाकरे यांचे?  स्मारके ही महापुरुषांची होत असतात. पेटी, तुणतुणे आणि सारंग्या वाजविणा-यांची नाही, एवढे साधे ज्ञान राज ठाकरे यांना दिसत नाही. श्रीकांत ठाकरे यांनी गाणे-बजावणे करण्याऐवजी समाज हिताचे काही महान कार्य केले असते, तर लोकांनी त्यांचेही स्मारक उभारले असते. 

ठाक-यांनी शिवाजी महाराजांची जेवढी बदनामी केली आहे. तेवढी बदनामी कोणीही केलेली नाही. ठाक-यांनी शिवाजी महाराजांचे नाव दंगलीसाठी वापरले. +जय भवानी जय शिवाजी+ म्हणायचे आणि दंगली घडवायच्या हे ठाक-यांचे धंदे आहेत. इतकेच नव्हे तर जेम्स लेनचे खरे मायबापही ठाकरेच आहेत. जेम्स लेनच्या पुस्तकावरून वाद सुरू झाला तेव्हा शिवसैनिकांनी पुण्यात श्रीकांत बहुलकर आणि इतर शिवद्रोह्यांच्या घरावर हल्ला केला होता. तेव्हा हेच राज ठाकरे बहुलकरांच्या घरी जाऊन त्यांची माफी मागून आले होते. राज ठाकरे तेव्हा शिवसेनेत होते. सगळी शिवसेना तेव्हा शिवाजी महाराजांची बदनामी करणा-या लेन आणि त्याच्या पुण्यातील पाठिराख्यांच्या पाठीशी उभी राहिली होती. या पाश्र्वभूमीवर राज यांनी अरबी समुद्रातील शिवरायांच्या स्मारकाला केलेला विरोध सुसंगतच आहे. ठाक-यांना शिवाजी महाराज फक्त मतदान मिळविण्यापुरते हवे आहेत.  शिवाजी महाराजांचे नाव घेतले की, मराठा तरुणांसह तमाम बहुजन समाज मागे येतो, म्हणून ते +जय भवानी जय शिवाजी+ म्हणत असतात. 

राज ठाकरे यांनी फक्त शिवरायांच्या स्मारकाला विरोध केलेला नाही. त्यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, छत्रपती शाहू महाराज या सर्वच बहुजन महापुरुषांच्या स्मारकांना विरोध केला आहे. यावरून राज यांना केवळ ब्राह्मणांसाठी संघटना आणि सत्ता राबवायची आहे, हे स्पष्ट होते. अशा जातीयवादी माणसाच्या मागे धावायचे का, याचा फेरविचार बहुजन समाजातील तरुणांनी करायला हवा. 


या विषयाशी संबंधित इतर लेख :

Thursday, 14 February 2013

ब्राह्मण तरुण ड्रग्जच्या आहारी गेले आहेत काय?

‘आपण सगळे ब्राह्मण'वर ‘गर्द'भरी कहाणी!

--राजा मइंद

आदरणीय अनिता ताई यांनी फेसबुकवरील +आपण सगळे ब्राह्मण+ या गोपनीय ग्रुपमध्ये काय कारवाया चालतात याचा पर्दाफाश केला होता. त्याला आता सहा महिन्यांपेक्षा जास्त काळ उलटून गेला आहे. या ग्रुपवाल्यांनी अनिता तार्इंच्या नावाचा एवढा धसका घेतलेला आहे की, +अनिता पाटील+ यांच्या विषयी कोणतीही पोस्ट टाकू नये, अशी लेखी सूचना ग्रुपच्या नियमावलीत टाकण्यात आलेली आहे. तार्इंनी ग्रुपचा पर्दाफाश केला होता, त्यानंतर काही काळ ही सूचना गायब झाली होती. ती आता पुन्हा अवतरली आहे. अनिता तार्इंच्या लेखांनंतर या ग्रुपच्या अ‍ॅडमीनची नावे गायब झाली होती. तीही आता अवतरली आहेत. 

पूर्वी ब्राह्मण पोथ्या बिथ्या वाचायचे आता
गर्दुल्याच्या कहाण्या वाचत आहेत

अनिता ताई करीत असलेल्या समाज प्रबोधनावर लेखी बंदी घालणा-या या ग्रुपवर काय चर्चा चालते, हे पाहण्यासाठी आम्ही येथे एक गुप्त फेरफटका मारला. त्यातून हाती आलेली माहिती विस्मयकारी आहे. या ग्रुपवर सध्या एका ड्रग अ‍ॅडिक्टची लेखमाला सुरू आहे. आपण कसे ड्रग घेत होतो. त्यासाठी कशा चो-या-चपाट्या करीत होतो, याचा कहाण्या रंगवून सांगत आहे. अरेबियन नाईट्समधील सुरस आणि चमत्कारिक कहाण्याही या गर्दुल्याच्या कहाण्यांपुढे फिक्या पडतील. गेल्या अनेक महिन्यांपासून या  ‘गर्द'भ-या कहाण्यांचा रतिब येथे सुरू आहे. +आपण सगळे+वाले या कहाण्या चवीन वाचित आहेत. या इसमाचे वडील आजारी असतानाही तो ड्रगचे व्यसन सोडत नव्हता, इतकी ही कहाणी गर्दभरी आहे. पूर्वी ब्राह्मण पोथ्या बिथ्या वाचायचे आता गर्दुल्याच्या कहाण्या वाचत आहेत. घोर कलियुग म्हणतात ते हेच.

'गर्द'भरी कहाणी प्रसिद्ध करण्यामागील हेतू काय?
ब्राह्मणांनी काय वाचावे अथवा काय वाचू नये, हे सांगण्याचा आमचा हेतू नाही. आम्हाला प्रश्न एवढाच पडला आहे की, गर्दुल्याची ही गर्दभरी कहाणी +आपण सगळे ब्राह्मण+वर का प्रसिद्ध होत आहे? ब्राह्मण तरुण गर्दच्या आहारी गेले आहेत आणि त्यांना त्यातून सोडविण्यासाठी अशा कहाण्या देणे आवश्यक आहे, असे ग्रुपच्या अ‍ॅडमीनला वाटते की काय? की गर्द ओढण्यासाठी किती कष्ट उपसावे लागतात, किती निलाजरेपणा करावा लागतो, याचे प्रशिक्षण ब्राह्मण तरुणांना मिळावे, असा अ‍ॅडमीनचा हेतू आहे? 

अनिता पाटील विचार मंचाच्या वाचकांसाठी या 'गर्द'भ-या 
कहाण्यामधील काही अंश आम्ही येथे घेऊन आलो आहोत :


नोकरी ..व्यवसाय ..व्यसन !
( भाग ९४ वा )

आयुर्वेदिक हॉस्पिटल मध्ये वडील सुमारे २ महिने होते ..मात्र फारसा फरक पडला नाही त्यांच्या तब्येतीत ..दरम्यान आईची फार दगदग होई ..माझ्या पुतण्या लहान असल्याने वहिनीना घरकामात जास्त वेळ देणे कठीण होते . शिवाय त्यांनी गाण्याचे क्लास घेण्यास सुरवात केलेली होती .रोज सायंकाळी चार ते आठ त्या गाण्याचे क्लास घेत असत ..काही दिवस मी देखील कौतुकाने वाहिनीकडे पेटी शिकलो ..फक्त ' सावन आया आज सुहावन ..सखिया मंगल गावत गाना ' इतकीच प्रगती केली ...आईला घरातली कामे आटोपून दिवसा दवाखान्यात काही वेळ बसावे लागे ..भाऊ वेळ मिळेल तसा दिवसा किवा रात्री दवाखान्यात येतच होता .. मी रिकामा होतो मात्र ..व्यसने पुन्हा सुरु आल्याने सगळ्यात जास्त ' बिझी ' झालो होतो ...म्हणजे दिवसभर पैसे कोठून मिळतील ? ..काय लोचा करायचा ? ..कसे जमवायचे ?या विचारात व्यस्त राहू लागलो होतो ...रात्री काही नाही तर निदान गांजा पिण्याची सोय करतच होतो .हॉस्पिटल मध्ये माझा ट्रान्झीस्टर नेला होता .. मग रात्री झोप येईपर्यंत वेगवेगळ्या ठिकाणी लागलेली विरहगीते ऐकत बसे ..शेवटी वडिलांना घरी आणण्याचे ठरले ..घरीच औषधे घेऊन ..फिजीयोथेरपी करत रहावी असे ठरले .

वडील घरी आल्यावर ..एका परिचितांच्या ओळखीने मला ' नवदुर्गा इंडस्ट्रीज ' , अंबड येथे पर्चेस विभागात नोकरी मिळाली ..कंपनी ला लागणारे साहित्य नाशिक मधूनच खरेदी करायचे काम माझ्याकडे होते ..कंपनीने ऐक स्कुटर देखील दिली होती मला फिरायला ..सुरतीला काही दिवस मी नोकरी नीट केली .. व्यसने अगदी रोज नाही तरी संधी मिळेल तेव्हा सुरूच होती ..एकदा मी कंपनीचे महत्वाचे काम असतांना स्कुटर घेऊन दिवसभर गायब राहिलो ..आणि मालकाचे डोके फिरले ..त्याने मला नोकरी वरून काढून टाकले ..घरी मात्र मी खरी परिस्थिती न सांगता ..काहीतरी समर्थने देऊन वेळ निभावून नेली ..मग आमच्या वाहिनीच्या वडिलांचे स्नेही श्री . वसंतराव नातू यांच्या ' मायबोली ' या वाचनालयात मला वाहिनीच्या वडिलांनी शब्द टाकला म्हणून नोकरी मिळाली ..अशोक स्तंभ येथून रविवार कारंजा कडे येणाऱ्या रस्त्यावर वाहिनीच्या वडिलांच्या मालकीचे ऐक छोटेसे दुकान होते ..ते वसंतराव नातू यांनी भाड्याने घेतले होते ..व तेथे त्यांनी त्यांच्या ' लायब्ररी ' ची ऐक शाखा सुरु केली होती ..मला ही छोटीशी लायब्ररी सांभाळण्याचे काम मिळाले .. .. सकाळी ९ ते रात्री साधारण साडेआठ पर्यंत मी तेथे थांबत असे ..नवीन सभासद करून घेणे ..त्यांना पुस्तके बदलून देणे ..अश्या स्वरूपाचे काम होते .. वसंतराव नातू हे परिवहन मंडळातून सेवानिवृत्त झाल्यानंतर त्यांनी हा वाचनालयाचा व्यवसाय सुरु केला होता ..त्यानाही वाचनाची खूप आवड होती व पाहता पाहता त्यांनी हा खाजगी वाचनालयाचा व्यवसाय खूप वाढवला होता ..त्या वेळी त्यांच्याकडे अंदाजे सुमारे दोन हजार सभासद असावेत..वसंतरावाना तीन मुली होत्या तिघींचे लग्न झालेले होते .. नाशिक शहरातील परशुराम सायखेडकर नाट्यगृहाच्या शेजारी असलेले ' सार्वजनिक वाचनालय 'आणि हे दुसरे खाजगी ' मायबोली ' वाचनालय प्रसिद्ध होते . खरेतर मला देखील वाचनाची आवड असल्याने ही नोकरी अगदी चांगलीच होती पण .. माझ्या मनातील व्यसनाचे आकर्षण काही कमी होत नव्हते ..!

अकोल्याला अनघाला पत्र पाठविताना मी सलील च्या नावावर पाकिटात पत्र पाठवीत होतो ..मलाही ती सलीलच्याच नावाने पत्र पाठवीत असे ..त्या काळी मोबाईल ही भानगड अस्तित्वातच नव्हती तसेच सर्वत्र टेलिफोन पण नव्हते त्यामूळे आमचा संपर्क महिन्यातून फार तर दोन वेळा आणि तो देखील पत्राद्वारे होऊ लागला .. ' लायब्ररी ' चे काम अजून वाढावे म्हणून नातू काकांनी मला नवीन कल्पना सुचविली ..त्यांनी पेपर मध्ये घरपोच लायब्ररी च जाहिरात दिली आणि जे लोक संपर्क करतील त्यांच्या कडून महिना थोडे जास्त पैसे वर्गणी म्हणून आकारून त्यांना घरपोच पुस्तक बदलून देण्याचे काम मला सोपवले ..तसेच मी देखील वेगवेगळ्या वसाहतीत सायकलने फिरून घरोघरी जाऊन घरपोच वाचनालयाची माहिती देवून सभासद बनविणे सुरु केले .सोबत मी दोन मोठ्या पिशव्यात दिवाळी अंक , कादंबऱ्या ..धार्मिक ..आत्मचरित्रे अशी वेगवेगळ्या प्रकारची मिळून चाळीस ऐक पुस्तके नेत होतो ..अनेकदा मी पावती न बनवता सभासद बनवून त्यांचे वर्गणीचे पैसे हडप करू लागलो ..तुलनेत हे पैसे हडपण्याचे प्रमाण कमी असल्याने नातुकाकांच्या लक्षात येत नव्हते . काही दिवसांनी रविवार कारंजावरचे भाड्याचे दुकान बंद करून ' मायबोली ' वाचनालय एम .जी रोडवर नव्याने झालेल्या ' अभ्यंकर प्लाझा ' या ठिकाणी मालकीच्या जागेत गेले तेथे सकाळी व संध्याकाळी पुस्तक वगैरे बदलून देण्यासाठी दोन मुली होत्या ..त्या वेळात मी घरपोच लायब्ररी चे काम करत असे व दुपारच्या वेळात वाचनालयात थांबत असे ..नातू काका खूप उत्साही होते ..त्यांना माझ्या पूर्वीच्या जीवनाबद्दल माहिती असूनही माझ्यावर विश्वास ठेवत होते ..ते मला व्यवसायाच्या नवीन नवीन कल्पना सांगत असत ..दुपारच्या वेळी वाचनालयात जास्त गर्दी नसते म्हणून त्यांनी मला दुपारी पार्ट टाईम तेथे वाचनालयाच्या बाजूलाच असलेल्या ' साहिल ' वॉच क. या घडयाळे व त्यांचे स्पेअर पार्टस असलेल्या दुकानात श्री . खरे यांच्या कडे काम करण्यास सुचविले ..त्यानुसार मी ' साहिल ' वॉच मध्ये देखील काम करू लागलो .. माझी लवकरात लवकर भरभराट करावी ही नातुकाकांची इच्छा होतील ..परंतु स्वतच्या भल्याची मला समज यायची असल्याने ..मिळणारे सर्व पैसे मी व्यसनात उडवत होतो ..कष्टदेखील भरपूर करत होतो पण शेवटी ' देणाऱ्याचे हात हजारो ..दुबळी माझी झोळी ' असे झाले होते .. साहिल वॉच कंपनी चे मालक खरे देखील खूप कल्पक होते ..रक्षाबंधनाच्या वेळी त्यांनी मुंबईहून घाऊक भावाने राख्या मागवल्या होत्या त्या विकण्यासाठी देखील मी रक्षा बंधनाच्या चार दिवस आधीपासून समोरच्या फुटपाथ वर स्टुल घेऊन बसलो ..रक्षा बंधनाच्या आदल्या दिवशी बऱ्याच राख्या उरल्या .. सगळ्या खपाव्यात म्हणून मेनरोड ला देखील हातगाडी वर राख्या मांडून विकल्या .. या विक्रीत माझे वेगळे कमिशन असे ..सगळे पैसे शेवटी गांजाच्या ..दारूच्या ..ब्राऊन शुगरच्या वर खर्च होत .

राखीचा सिझन संपल्यावर नातुकाकानी नवीन कल्पना मांडली ' तुषार उद्योग ' नावाने व्यवसाय सुरु करण्याची ..माझ्या नावाने हा व्यवसाय असणार होता ..काही खाण्याचे पदार्थ आणि इतर वस्तू ' मायबोली ' वाचनालयाच्या जागेतच विक्रीला ठेवायचे आणि ते काम मी सांभाळायचे अशी त्यांची कल्पना होती ..जर मी नीट लक्ष घालून व्यवसाय वाढविला असता तर मग वेगळी जागा व जास्तीचे भांडवल देण्यासाठी देखील ते मदत करणार होते . मी देखील उत्साहाने एके दिवशी स्वतच्या हाताने ऐक पत्र्याचा बोर्ड बनवून त्यावर पेंट ने ' तुषार उद्योग ' हे नाव रंगविले ..अर्थात त्या दिवशी मस्त डोस झाला होता ब्राऊन शुगरचा म्हणून हा अतिरिक्त उत्साह होता .. तो बोर्ड वाचनालयाच्या बाहेर लावला ..काकांनी सांगली , कोल्हापूर वगैरे ठिकाणी प्रसिध्द असलेले ' भडंग ' मागवले होते ते विक्रीस ठेवले ..तसेच बिस्किटाचे पुडे .. वेफर्स असे पदार्थ विक्रीस ठेवले ..नंतर दोन दिवसात त्यांनी पाठ वगैरे शेकण्यासाठी मिळणारी इलेक्ट्रिकची पिशवी देखील मला विक्रीसाठी आणून दिली .. या निमित्ताने माझ्या खिश्यात जसे जास्त पैसे येऊ लागले तसे व्यसन वाढू लागले ..इतके सगळे पैसे व्यसनात उडवून देखील कधी कधी घरी देखील पैसे मागत होतो ..वडील पूर्वी माझ्या बाबतीत ऐक वाक्य नेहमी म्हणायचे की हा ' कुबेराला देखील भीक मागायला लावेल ' ते खरेच होते ... शेवटी तब्येतीवर सगळ्याचा परिणाम दिसू लागला मी पुन्हा खंगत चाललो होतो ..भावाच्या लक्षात सगळे आलेले होते फक्त जो पर्यंत घरी जास्त त्रास देत नाही तो पर्यंत तो कटकटी नकोत म्हणून बोलला नव्हता ..अधून मधून आमचे खटके उडत असत पण आई पटकन मध्यस्ती करत होती .. तब्येतीवर परिणाम होत असल्याने मग मी कामावर दांड्या मारू लागलो ..हळू हळू नातुकाका माझ्याबाबत निराश होऊ लागले !



Tuesday, 5 February 2013

अण्णासाहेब जावळे यांचे निधन


महाराष्ट्राचा छावा हरपला


मराठा आरक्षणासाठी गेली १० वर्षे लढा देणारे नेते आणि अखिल छावा संघटनेचे अध्यक्ष अण्णासाहेब जावळे पाटील यांचे पुण्यातील रुबी हॉस्पिटलमध्ये निधन झाले.  त्यांना कावीळ झाल्याचे सांगण्यात येत आहे. 
अण्णासाहेबांचे वय अवघे ३५ वर्षांचे होते. त्यांच्या निधनामुळे महाराष्ट्राचे जनमानस सुन्न झाले आहे. 

त्यांच्यावर आधी सोलापुरातील अश्विनी रुग्णालयात उपचार करण्यात आले होते. तेथे प्रकृतीत उतार पडत नसल्याचे पाहून ३ फेब्रुवारी रोजी सकाळी त्यांना पुण्यातील रुबी रुग्णालयात हलविण्यात आले होते. तेथेही त्यांची प्रकृती सुधारली नाही. गेल्या काही दिवसांपासून सततचे दौरे आणि बिघडलेल्या प्रकृतीकडे दुर्लक्ष यामुळे त्यांची प्रकृती आणखी खालावत गेली. त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे समजल्यानंतर छावाच्या शेकडो कार्यकत्र्यांनी सोलातुरात गर्दी केली होती. पुण्यातही कार्यकर्ते मोठ्या संख्येने होते. 

''अनिता पाटील विचार मंच''च्या वतीने आम्ही त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करीत आहोत. अण्णासाहेबांनी हाती घेतलेले मराठा समाजात चेतना निर्माण करण्याचे कार्य खंडणार नाही, अशी आशा व्यक्त करतो.