Thursday 12 December 2019

फाळणीला सावरकरच जबाबदार

अनिता ताईंचा फाळणीविषयीचा विचार सर्वमान्य होतो तेव्हा..!

या देशाच्या फाळणीला हिंदू महासभेचे नेते विनायक दामोदर सावरकर आणि मुस्लिम लीगचे नेते बॅ. मोहंमद अली जीना हे जबाबदार असल्याचे सत्य या ब्लॉगच्या संस्थापिका आदरणीय अनिता ताई पाटील यांनी २0११ मध्ये पहिल्यांदा समोर आणले होते. प्लँचेट करण्यासाठी लोक सावरकरांच्या आत्म्याला का बोलावतात, यासंबंधीचा एक लेख अनिता ताईंनी लिहिला होता. या लेखात अनिता ताईंनी फाळणीचा सत्य इतिहास उजेडात आणला होता. गेल्या आठ वर्षांत अनिता ताईंनी दिलेला हा विचार समाजात चांगला रुजला आहे. ९ डिसेंबर २0१९ रोजी सिटिजनशीप अमेंडमेंट बिलावर लोकसभेत झालेल्या चर्चेत सहभागी होताना काँग्रेस नेते मनीष तिवारी यांनी देशाच्या फाळणीचे बीज सावरकरांच्या द्विराष्ट्रवादाच्या सिद्धांताने रोवले होते, असे स्पष्ट वक्तव्य केले. त्यानंतर १0 ऑक्टोबर रोजी काँग्रेसचे दुसरे नेते शशि थरूर यांनी हाच मुद्दा सभागृहाबाहेर मांडला. फाळणीला सावरकर आणि जीना कारणीभूत असल्याचे थरूर यांनी म्हटले.  हाच मुद्दा अनिता ताईंनी आठ वर्षांपूर्वी मांडला होता.
अनिता ताई यांच्या लेखातील हा उतारा :

"... फाळणीचे गुन्हेगार सावरकर हेच आहेत, हे त्रिवार सत्य आहे. सावरकरांच्या मुर्खपणामुळेच या देशाची फाळणी झाली. सावरकरांनी द्विराष्ट्रवादाचा सिद्धांत मांडला. भारतात हिंदू आणि मुसलमान असे दोन समाज राहत नसून हे दोन स्वतंत्र देशच आहेत, असा सावरकरांच्या सिद्धांताचा थोडक्यात सारांश. सावरकरांनी हा सिद्धांत मांडला. त्याचा फायदा मोहंमद आली जीना आणि त्यांच्या मुस्लिम लीगला झाला. याच सिद्धांतानुसार भारताचे भारत आणि पाकिस्तान असे दोन तुकडे झाले. भारताच्या फाळणीला सर्वांत प्रथम जर कोणी जबाबदार असेल, तर ते सावरकर होत. जीनांचा नंबर सावरकरांच्या नंतर येतो.
महात्मा गांधी आणि काँग्रेसचा
फाळणीला विरोधच होता
महात्मा गांधी आणि काँग्रेसने फाळणीला शेवटपर्यंत विरोध केला होता. महात्मा गांधींनी तर +आधी माझ्या देहाचे दोन तुकडे होतील, मगच या देशाचे दोन तुकडे होतील+ अशी टोकाची भूमिका मांडली होती. मात्र सावरकर आणि त्यांचे इतर ब्राह्मणवादी अतिरेकी सहकारी तसेच बॅ। मोहंमद अली जीनांसारखे कट्टरवादी यांनी देशातील वातावरण एवढे खराब करून टाकले की, फाळणी स्वीकारल्याशिवाय गत्यंतरच राहिले नाही. देशात दंगलींचा आगडोंब उसळला होता. फाळणी स्वीकारली नसती, तर हा देश कित्येक वर्षे जळत राहिला असता, इतके वातावरण या लोकांनी तापविले होते. शेवटी देशाचे भले लक्षात घेऊन काँग्रेसने फाळणीला मान्यता दिली. दिली म्हणण्यापेक्षा द्यावी लागली, असे म्हणणे अधिक संयुक्तिक ठरेल...."  

अनिता ताईंनी समोर आणलेला लुप्त इतिहास सर्वमान्य होत असल्याचे पाहून आम्हाला खरोखर आनंद होत आहे. अनिता ताई यांच्या लेखाची लिंक येथे देत आहोत. तसेच मनीष तिवारी यांच्या भाषणाचे एनडीटीव्हीने दिलेल्या वृत्ताची लिंक आणि थरूर यांच्या भाषणाचे 'टाइम्स ऑफ इंडिया'ने दिलेल्या वृत्ताची लिंक देत आहोत.

-राजा मइंद, कार्यकारी संपादक, अपाविमं.

सावरकरांचा आत्मा अशांत का?
Savarkar Laid Foundation For Two-Nation Theory: Congress's Manish Tewari
Was not paying attention in history classes: Shashi Tharoor's dig at Amit Shah over partition remark

4 comments:

  1. २७ डिसेंबर १९२३ रोजी सहीनिशी केलेल्या या निवेदनात तात्यांनी म्हटले," माझ्यावर योग्य तऱ्हेने खटला भरला गेला आणि मला दिलेली शिक्षाही न्याय्य होती हे मला मान्य आहे. पूर्वायुष्यात अवलंबिलेल्या हिंसक मार्गाचा मी मनापासून निषेध करतो. माझ्या शक्तीनुसार प्रचलित (ब्रिटिश) कायदा व राज्यघटना उचलून धरणे हे माझे कर्तव्य आहे असे मला वाटते. भविष्यकाळात मला कार्य करण्याची मुभा देण्यात आली तर नव्या सुधारणा यशस्वी करण्यासाठी आवश्यक ते सारे करण्यास मी तयार आहे. सरकारने मला नाशिकला राहू द्यावे अशी माझी विनंती आहे." - य.दि.फडके [शोध सावरकरांचा (१९८४) पृ ७१]

    सुटका व्हावी म्हणून त्यांनी (सावरकरांनी) ज्या अटी कबूल केल्या, दोनच नव्हत्या. याची त्या काळातील वृत्तपत्रांनीही माहिती होती. त्याबद्दल `इंदुप्रकाश' या मुंबईच्या मवाळ पक्षाच्या मुखपत्राने टीका केलीच . पूर्वीच्या अत्याचारी मार्गाबद्दल सावरकरांनी तिरस्कार व्यक्त केला असून कायद्यानुसार (ब्रिटिश) घटना पाळणे हे कर्तव्य असल्याचे मान्य केल्याची माहिती `केसरी'नेही वाचकांना कळवली होती आणि ती वस्तुस्थितीला धरूनच होती. - य.दि.फडके [शोध सावरकरांचा (१९८४) पृ ७४]

    १५ जानेवारी १९२४ रोजी मुंबईच्या गृहसचिवांनी हिंदुस्थान सरकारच्या गृहसचिवांना याबाबत माहिती देण्यासाठी पाठवलेल्या पत्रात खटला व शिक्षा न्याय्य असल्याचे सावरकरांनी मान्य केले आहे असा स्पष्ट उल्लेख केलेला आहेच. याशिवाय अशा अटी कबूल केल्यामुळे जहाल विचारसरणींची वृत्तपत्रे `धक्कादायक कबुली' असे वर्णन करून आपला राग व्यक्त करीत आहेत असेही मुंबईच्या गृहसचिवांनी म्हटले आहे. - य.दि.फडके [शोध सावरकरांचा (१९८४) पृ ७५]

    ReplyDelete
  2. ४ जुलै १९११ रोजी तात्या (सावरकर) अंदमानमधील सेल्यूलर जेलमध्ये दाखल झाले. ३० ऑगस्टला त्यांना सहा महिन्यांसाठी एकलकोंडीत ठेवण्यात आले. त्याच दिवशी त्यांनी दया दाखवावी असा अर्ज केला तो अर्थातच ताबडतोब फेटाळण्यात आला आणि तसे त्यांना ३ सेप्टेंबर रोजी तत्परतेने कळवण्यात आले. सुटका व्हावी म्हणून २९ ऑक्टोबर १९१२ रोजी तात्यांनी आणखी एक अर्ज पाठवला. तोपर्यंत अंदमानात येऊन त्यांना सोळा महिने झाले होते. आपले वर्तन सुधारले असल्याची ग्वाहीही त्यांनी या अर्जात दिली होती. - य.दि.फडके [शोध सावरकरांचा (१९८४) पृ ५९]
    १४ सेप्टेंबर १९१४च्या त्यांच्या (सावरकरांच्या) अर्जाबाबत औपचारिकरीत्या आदेश काढण्याचा सरकारपुढे कोणताही प्रस्ताव नाही आणि सद्य:परिस्थितीत सरकारला तात्यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांबद्दल विचार करणेही शक्य नाही असे डिसेंबर १९१४च्या पत्रातून गृहमंत्र्यांनी तात्यांना कळवले. तात्यांनी हा अर्ज ऑगस्टमध्ये पहिले महायुद्ध सुरू झाल्यानंतर केला होता.- य.दि.फडके [शोध सावरकरांचा (१९८४) पृ ६०]
    ९ फेब्रुवारी १९१५ रोजी बाबांच्या (बाबाराव सावरकर) वतीने येसू वहिनींनी अर्ज पाठवलेला आढळतो. १९१३च्या नोव्हेंबरमध्ये गृहमंत्री रेजिनाल्ड क्रॅडॉक यांना बाबांनीही हिंदुस्थानातल्या एखाद्या कारागृहात आपल्याला ठेवावे म्हणजे चांगल्या वर्तनाबद्दल शिक्षेत सूट देण्याच्या सवलतीचा फायदा मिळेल अशी विनंती केली होती. ते शक्य नसेल तर अंदमानातच पाच वर्षे कारावास भोगल्यानंतर कैद्याला जे सापेक्ष स्वातंत्र्य देण्यात येत असे, ते मिळावे असेही बाबांनी म्हटले होते. पण यापैकी काहीच न झाल्याने येसू वहिनींनी बाबांच्या वतीने अर्ज केला होता. ९ फेब्रुवारी १९१५ या दिवशीच येसू वहिनींप्रमाणे माईंनीही (यमुनाबाई विनायक सावरकर) तात्यांच्या वतीने अर्ज केला होता. त्या अर्जातही गृहमंत्री रेजिनाल्ड क्रॅडॉक यांच्याबरोबर तात्यांचे जे बोलणे झाले होते त्याचा निर्देश करण्यात आला होता.- य.दि.फडके [शोध सावरकरांचा (१९८४) पृ ६०]
    आपले बंधू डॉ नारायणराव सावरकर यांना अंदमानातून पाठवलेल्या बहुतेक पत्रांत तात्यांनी आपल्या सुटकेसंबंधी सरकारकडे अर्ज करण्यास सांगितले आहे. युद्ध संपताच लोकांच्या सहीचा अर्ज पाठवावा असे ९ मार्च १९१५ रोजी तात्यांनी नारायणरावांना लिहिले होते. - य.दि.फडके [शोध सावरकरांचा (१९८४) पृ ६१]
    २ एप्रिल १९२० रोजी तात्यांनी आपली व बाबांची सुटका व्हावी यासाठी हिंदुस्थान सरकारला अर्ज केला. - य.दि.फडके [शोध सावरकरांचा (१९८४) पृ ६२]

    ReplyDelete
  3. falani n hota evDI MOTHI SHANTIPRIYA SAMAJACHI SANKHESOBAT APAN RAHU SHAKALO ASTO KA??

    ReplyDelete
  4. अतिशय उथळ आणि अपुऱ्या माहितीने केलीली मांडणी!
    दुर्लक्ष करण्यायोग्य!

    ReplyDelete