Friday, 6 December 2019

पुनश्च ‘भीमनिर्धार’! आम्ही परतलो आहोत!!

४ डिसेंबर २0१४ रोजी लेखणी पाच वर्षांसाठी म्यान करण्याचा निर्णय ‘अनिता पाटील विचार मंच’च्या संपादकांनी जाहीर केला होता. राज्य जातीयवाद्यांनी बळकावल्यामुळे व्यथित होऊन अत्यंत जड अंत:करणाने हा निर्णय आम्हाला तेव्हा घ्यावा लागला होता. महाराष्ट्राच्या पवित्र भूमीवरील जातीयवाद्यांचे हे काळे ढग आता दूर झाले असून आम्ही पुन्हा लेखनी हातात घेत आहोत. आज बहुजनांचे कैवारी, विश्ववंद्य, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन आहे. बाबासाहेबांच्या पवित्र आणि पावन स्मृतींना अभिवादन करून आम्ही लेखनाचा पुनश्च ‘भीमनिर्धार’ करीत आहोत.

वाचकांचे प्रेम आमच्यासोबत आहेच. मागील संपूर्ण पाच वर्षांत एकही नवा लेख ब्लॉगवर टाकला गेला नाही, तरीही वाचकांचा ओघ ब्लॉगवर कायम होता. आम्ही लेखनी बंद केली तेव्हा ब्लॉगने पाच लाख वाचनांचा टप्पा नुकताच (१६ सप्टेंबर २0१४ रोजी) पूर्ण केलेला होता. मागील पाच वर्षांत आणखी पाच लाख वाचनांची भर पडली आहे. ब्लॉग आता १0 लाख वाचने पूर्ण करण्याच्या उंबरठ्यावर आहे. आज ६ डिसेंबर २0१९ रोजी ब्लॉगची वाचन संख्या ९ लाख ९२ हजारांचा टप्पा ओलांडून पुढे गेली आहे.

असो. आपले प्रेम असेच मिळत राहील, या खात्रीसह आपल्या सेवेस पुन्हा एकदा नव्या उत्साहाने सुरूवात करीत आहोत.

-संपादक मंडळ, अपाविमं.

No comments:

Post a Comment