Sunday 8 September 2013

विरोध ब्राह्मण जातीला नाहीच

आम्ही ब्राह्मणवादाला ठेचतो

प्रज्ञा खांडेकर यांना …. 
रविन्द्र तहकिक यांचा सनविवि, 

आपली आसाराम बापूवर मी लिहिलेल्या कविते वरील प्रतिक्रिया 
वाचली . आपण कवितेला मन पासून दाद दिली त्या बद्दल आभार . 
कवितेत असभ्य भाषा आहे हे मान्यच ! परंतु ती विषय आणि आशयाची गरज होती . आपण लिहा वाचा च्या सदस्य आहात . आमच्या ब्लोग च्याही वाचक आहात , आपण प्रतिक्रिया खुल्या मनाने दिली आहे . बापू च्या कृत्या मुळे आपण हि व्यथित आणि संतप्त आहात ; एक स्त्री म्हणूनच नव्हे तर मानवी मूल्याची चाड असणाऱ्या कुणालाही बापू सारख्या छीनाल आणि महाबिलंदर बोक्याचे मुस्काट खेटरा ने बडवण्याची इच्छया होईल.    परंतु प्रज्ञाजी आपण पत्राच्या प्रारंभी मी ब्राम्हण विरोधी लेखन करतो आसा उल्लेख केला तो काही सत्यास धरून नाही ; आमचा ब्लॉग  किंवा आमचे संपादक मंडळ ; मी स्वत : अथवा आदरणीय अनिताजी आजीबात ब्राम्हण विरोधी नाहीत , एखादी जात कधीच वाईट नसते; आमचा विरोध ब्राम्हण जातीला नाही; प्रवृत्तीला आहे. आम्ही ब्राह्मणवादाला ठेचतो.  तुम्ही याला शब्दच्छल म्हणाल परंतु हेच सत्य आहे. 

 डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांच्या सोबत मनुस्मृती ची होळी करणारा एक ब्राम्हणच होता . संस्कृतातील ज्ञान मराठीत आणून बहुजनांना ज्ञानाचे अमृत देणारा एक ब्राम्हणच होता. नुकतीच हत्या झालेले नरेंद्र दाभोलकर देखील ब्राम्हणच होते, असि किती तरी नवे सांगता येतील कि जे ब्राम्हण असूनही मानवता मुल्यांची जपवणूक करण्या साठी ब्राम्हणत्वचा त्याग करून बहुजनाच्या कल्याणासाठी आणि उत्थानासाठी झटले आहेत; असे सर्व ब्राम्हण आमच्या साठी आदरणीयच आहेत. आम्ही ब्राम्हण विरोधी नाही आहोत, वाळवंटात पाय पोळत धावणाऱ्या महाराच्या पोराला उचलून घेणारे संत एकनाथ आम्हाला संत तुकाराम इतकेच वंदनीय आहेत. 

परंतु जो कोणी ब्राम्हण तो केवळ ब्राम्हण आहे म्हणून स्वतःला शुद्ध, पवित्र, श्रेष्ठ, उच्च, ज्ञानी आणि विशेष समजत असेल; आणि धर्म किंवा परंपरांचा आधार सांगत किंवा आधार घेवून बहुजनांना कमी लेखत असेल , गटबाजी आणि षड्यंत्र करून बहुजनांना संधी नाकारत असेल , त्यांची अवहेलना किंवा टिंगल टवाळी करत असेल त्या भट -बोक्यांना पोत्यात घालून बुकलुन काढण्यास आम्ही कधीही मागे पुढे पाहणार नाही. त्याच बरोबर ब्राम्हण लेखक, कवी, विचारवंत, राजकारणी, समाजसेवक (?), कलावंत, धार्मिक पंडित-महंत वगैरे लोक ज्या प्रकारे गटबाजी करून बहुजन समाजाला विकास आणि प्रगती पासून वंचित ठेवतात त्यांचा समाचार आम्ही घेणारच ! आधुनिक काळातीलच नव्हे तर पुरातन काला  पासून आजतागायत ज्यांनी ज्यांनी हे पाप केले आहे; करत आहेत त्या बद्दल आम्ही लिहिणार; बहुजनांना सत्याची जाणीव करून देणे हे आमचे व्रतच आहे. 

असो आपण आमचा ब्लोग वाचा, आपल्या प्रतीक्रीयांचेही स्वागत आहे. चर्चा तर झालीच पाहिजे. संवाद व्हावा, सुसंवाद झाला तर उत्तमच ! वाद असू नये हि अपेक्षा. किमान गैरसमज तरी नसावेत हि इच्छा, 
                                                                           कळावे ,आपला 
                                                                           रवींद्र तहकीक




 

3 comments:

  1. हॅलो, तहकीक बुवा,

    महात्मा गांधी हे जातीने ब्राह्मण होते, असा शोध आपल्याला कोठे लागला? नीट अभ्यास करून लेख लिहित जा.

    ReplyDelete
    Replies
    1. अहो जोशी बुवा "म. गांधी जातीने ब्राह्मण होते" हे जरी खरे नसले तरी ते विचाराने नक्कीच ब्राह्मण होते, यात दुमत असू नये. थोडक्यात त्यांना आपण ब्राह्मणाळलेले राष्तापिता जरूर म्हणू!

      Delete
  2. नमस्कार सर,
    ब-याच दिवसांनी ह्या ब्लॉग वर आलोय.ते ही माझ्या मित्रांनी मला तुमच्या ह्या वरील पत्रा बद्दल सांगितले म्हणुन.तुमचे काही शब्द खटकले."आमचा विरोध ब्राम्हण जातीला नाही; प्रवृत्तीला आहे". हेच का तुम्ही ज्यांनी ह्या तथाकथित अनिता ने जेव्हा श्यामच्या आईला नावे ठेवली होती तेव्हा तिचा प्रखर विरोध केला होता कारण ’त्याने’ साने गुरुजींना केवळ ते एक ब्राहमण आहेत म्हणुन नावे ठेवली होती? दुसरे वाक्य "मी स्वत : अथवा ॥आदरणीय अनिताजी ॥ "अनिता आदरणीय?मला चांगलं आठवतय तुम्हीच ह्या अनिता चा पर्दाफ़ाश केला होता की ही एक बया नसुन बाप्या आहे म्हणुन.तुमचे सर्व जुने कॉमेंट्स delete केले आहेत.तुम्ही का बदललात ह्याची सुद्धा कहिशी कल्पना तुमच्या जवळ च्या लोकां कडुन एका कम्युनिटी मध्ये वाचली आहे.असो त्यात तुमचा दोष नाही. पण एक लक्षात ठेवा ब्राहमणवाद असो अथवा बहुजनवाद असो.ह्या दोन्ही वादांचा अंत झाला पाहिजे व केवळ भारतीयवादच उरला पाहिजे.तरच आपल्या देशाची प्रगती होईल.

    ReplyDelete