Thursday 12 September 2013

गांधीजीची जात सांगायची काय ?


आमच्या कडे फक्त शब्दाचीच नाही 
तर मुस्काट फोडण्याची ताकद आहे !  
----------------------------------------रवींद्र तहकिक 
 
या ब्लोग वर कुणी प्रतिक्रिया द्यावी व कुणी देऊ नये याला काही 
बंधन नाही ; ब्लोग मुक्त आणि सार्वजनिक आहे . रेल्वेस्टेशन वर ज्या प्रमाणे सभ्य नागरिक आणि प्रवाशी येतात तसे फुकटेहि येतातच ! 
चोर आणि खिसेकापू देखील येतात ! त्यामुळे कुणी आमच्यावर काय 
मल्लीनाथी करावी हा ज्याच्या त्याच्या वकूब आणि संस्कृतीचा प्रश्न आहे ; झाले असेकी आम्ही प्रज्ञा खांडेकर या आमच्या वाचक भगिनीच्या प्रतिक्रियेला अनुलक्षून प्रज्ञाताईना एक अनावृत्त पत्र लिहिले. आम्ही लिहिलेल्या आसारामायण या कवितेवर प्रतिक्रिया देताना प्रज्ञाताईनी 
एकीकडे कवितेला दाद देत आपण ब्राम्हण विरोधी लिहिता असे विधान केले होते , आम्ही त्यांचा हा गैरसमज दूर करण्यासाठी आमची भूमिका मांडली . ( पहा ; विरोध ब्राम्हण जातीला नाहीच ;प्रज्ञा खांडेकर यांना पत्र ) या पत्रात आम्ही महात्मा गांधीयांच्या नावाचा चुकूनही उल्लेख केलेला नाही . किंवा ते ब्राम्हण होते आसा उल्लेखही केलेला नाही ; असे असताना संबधित पत्रावर प्रतिक्रिया देताना प्रणव जोशी नामक एका '' गांधी आभ्यासकाने '' आम्हाला ''तहकिक बुवा''असे संबोधून '' गांधी ब्राम्हण होते , असे तुम्हाला कोणी सांगितले ? ''असा   सवाल करीत , आभ्यास करून लिहित जा ! असा अनाहूत सल्ला आम्हाला दिला आहे . आम्ही 
विनाकारण सभ्यतेच्या मर्यादा ओलांडत नाही . म्हणून जोशींना सन्मान पूर्वक सांगतो कि आम्ही कोणतेच विधान आभ्यास केल्याशिवाय करत नाही , आणि नेहमी आपले पाय किती खोलात आहेत याची जाणीव ठेवूनच ; दुसर्या बद्दल बोलतो ! ( आर्थात हि आपली पहिली चूक आहे म्हणून ; या नंतर असभ्य भाषा वा हकनाक पंगा घेतलात तर आपले मुस्काट फोडण्या साठी आमच्या कडे फक्त शब्दाचीच नाही तर मनगटाची देखील ताकद आहे हे ध्यानात घ्या ! ) आसो ; तर आम्ही 
गांधी ब्राम्हण होते असे लिहिलेले नसताना आपण कुठल्या डोळ्यांनी ते वाचले ? हे एकदा कळू द्या ! आम्हाला आभ्यास करायला सांगताना आपण निदान वाचन  तरी डोळे उघडे ठेवून करत जा ; आणखी एक ; 
आपण आम्हाला बुवा म्हणालात ते कोणत्या अर्थाने ? आम्ही कीर्तन कार किंवा प्रवचन कार वगैरे तर नाही आहोत, नाही आम्ही कुणाला उदि -विभूती किंवा गंडे दोरे ताईत इत्यादी देतो ; हं आणखी एका नात्यात 
रांडपोरे आधुन मधून घरी येणाऱ्या ग्रहस्थास " आला आमच्या … चा बुवा '' असे म्हणतात , परंतु आपले असे काही नातेही असल्याचे मला आठवत नाही , असो ! क्रोध नसावा … 
तर आपणास गांधीची जात हवी आहे ; तर महात्मा गांधीची जात तशी 
गोंधळाची आहे , म्हणजे असे की मोहनदास ( म गांधी ) चे वडील करमचंदयांची जात हिंदू - मोघि ( गुजराती ) होती या जातीत त्यांनी तीन बायका केल्या तिन्हीहि बाळंत आजारात अपत्यहीन मरण पावल्या ; मोहनदास यांच्या माता पुतळाबाई मात्र जगल्या . या करमचंद यांच्या 
चतुर्थ पत्नी मुळात या बालविधवा होत्या आणि जातीने ब्राम्हण होत्या 
म्हणजेच म. गांधीचे वडील मोघी तर आई ब्राम्हण होत्या आणि हा दोघांचाहि पहिला विवाह नव्हता , त्या मूळे दुर्दैव असे कि गांधीना ब्राम्हण मानायचे कि मोघी हा प्रश्नच आहे ! असो … परंतु हा काही नवा प्रश्न नाही. ब्राम्हण मुली आंतरजातीय / आंतरधर्मीय / आंतरदेशीय विवाह करण्यात पटाईत आणि आघाडीवर असल्यामुळे आगदी पुरातन कला पासून हि समस्या आहेच ! अगदी ययाती -देवयानी , दुष्यत - शकुंतला पासून ते डॉ . आंबेडकर -सविता आंबेडकर पर्यंत आणि अगदी काल परवा 
ममता कुलकर्णीने एका अंडरवर्ड गुन्हेगाराशी लग्न करण्या साठी जात बदलण्याचा प्रकार असेल यांच्या मुलांची जात कोणती मानायची ? ते आपण सांगू शकता ? फार कशाला ?  रामदास आठवले , सुशील कुमार शिंदे , नरेंद्र जाधव , गंगाधर पानतावणे , शरद पवार या सर्वांच्या पत्नी ब्राम्हणच आहेत कि ! असि किती तरी उदाहरणे सांगता येतील प्रणवजी ! 
ज्याने त्याने आपल्या नाकाला किती शेंबूड लोंबतोय हे पाहून इतरांच्या नाकाची लांबी मोजली पाहिजे , ते सर्वा साठीच इष्ट असते , नाही काय ? 


3 comments:

  1. श्री. तहकीक बुवा,

    महात्मा गांधी यांना ब्राह्मण ठरविण्याची बुवाबाजी आपण केली, म्हणून मी आपणास बुवा संबोधले. "..महात्मा गांधी हे ब्राह्मण असूनही आम्हास प्रिय आहेत..", असे वाक्य आपल्या उपरोलेखित लेखात होते. आपण हा लेख एडिट करून ते वाक्य काढून टाकलेले दिसते. या लेखात महात्मा गांधी यांच्या मातोश्री ब्राह्मण होत्या असे लिहून दुसरी चूक केलेली आहे. (आता किमान हा उल्लेख तरी एडिट करून मला खोटे पाडू नका.) गांधीजींच्या मातोश्री ब्राह्मण नव्हत्या. त्याही मोधच होत्या. त्या वैष्णव पंथाच्या होत्या एवढेच. वैष्णव म्हणजे ब्राह्मण असे आपण म्हणत असाल, तर तो अज्ञानीपणा आहे, हे मी नम्रपणे निदर्शनास आणून देऊ इच्छितो.

    ReplyDelete
  2. शरद पवार यांच्या पत्नी ब्राम्हण आहेत हे आपणास कोणी सांगितले.
    शरद पवार यांच्या पत्नी चे पूर्वाश्रमीचे नाव प्रतिभा शिंदे होय.
    त्यांच्या वडिलांचे नाव सदाशिव उर्फ सदू शिंदे होय. ते प्रसिद्ध क्रिकेटपटू होते.
    http://mdramteke.blogspot.com/search/label/%E0%A4%B6%E0%A4%B0%E0%A4%A6%20%E0%A4%AA%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B0

    ReplyDelete
  3. I agree with Pranav. I have also read the original article. There was indeed a statement which said Mahatma Gandhi was brahmin. This new article is edited to remove it. Mr. Tahkik earlier also you have done such things. I remember you have written that one editorial in Loksatta regarding Mr. Mane was blocked by Loksatta. But it was not blocked. It was available on Loksatta site. I have replied you at that time that stop false propaganda. And now this time you have editd your article. This shows what kind of person you are.

    ReplyDelete