वाचकांच्या चरणी विनम्र लोटांगण
प्रिय भावांनो आणि बहिणींनो,
बहुजन समाजाच्या प्रबोधनाचा वसा घेतल्यानंतर मी ब्लॉग सुरू केला. सप्टेंबर २०११ च्या पहिल्या तारखेला मी माझी पहिली पोस्ट ब्लॉगवर टाकली. १ डिसेंबर २०११ रोजी सकाळी माझ्या ब्लॉगने वाचकांचा २० हजारांचा आकडा पार केला. आज १ जानेवारी २०१२ बरोबर एक महिना झाला आहे. आज सायंकाळी ६.०० वा. ब्लॉग व्ह्यूजचा ३० हजारांचा टप्पा गाठला गेला. याचाच अर्थ गेल्या ४ महिन्यांत ३० हजार वेळा माझा ब्लॉग उघडला/वाचला गेला. याबरोबरच माझ्या पाठिराख्यांची संख्याही 140 झाली आहे.
या काळात माझ्या लेखांना बहुजन समाजातील तरुण वर्गाने सर्वाधिक पसंती दिली. ही माझी सर्वांत महत्त्वाची बाब समजते. तरुण वर्गात आता जागृती येत आहे. ब्राह्मणी धर्मातील भेदभावाबाबत जाणीव निर्माण होत आहे. ही खरोखरच आनंददायक बाब आहे.
मी आपणा सर्वांची ऋणी आहे. माझ्या ब्लॉगला एवढा उदंड प्रतिसाद दिल्याबद्दल मी आपणा सर्व भावा-बहिणींसमोर नतमस्तक आहे. मी आपल्या चरणी लोटांगण घेऊन पुन्हा एकदा आपणा सर्वांचे ऋण व्यक्त करते.
आपली बहीण
अनिता पाटील.
No comments:
Post a Comment