जगातला आजपर्यंतचा सर्वांत ढोंगी आणि दांभिक राजकारणी कोण? या प्रश्नाचे उत्तर नि:संशय अटलबिहारी वाजपेयी असे द्यावे लागेल. या पूर्वीच्या लेखांत मी वाजपेयी यांच्या ढोंगीपणाचे काही नमुने वाचकांच्या निदर्शनास आणून दिले होते. जसे. बहुमत नसताना राष्ट्रपतींकडे जाऊन सत्तेचा दावा दाखल करणे. पंतप्रधान म्हणून शपथ घेणे. बहुमत सिद्ध करण्यासाठी लोकसभेचे अधिवेशन बोलावणे आणि बहुमताचा ठराव मतदानाला टाकण्याआधी पंतप्रधानपदाचा राजीनामा देण्याची घोषणा करणे इ. इ. या
नाटकीपणा हायलाईट
घटनेतील आणखी मर्म सांगते. आपल्याकडे बहुमत नाही, हे वाजपेयींनी शेवटच्या क्षणापर्यंत देशाला आणि लोकसभेला सांगितले नाही. हा संसदेचा घोर अवमान नव्हे का? वाजपेयींनी लोकशाहीची थट्टा करण्याचे घोर पाप केले. वाजपेयींनी उभा केलेला हा तमाशा त्यावेळी टिव्ही वरून साèया देशाने पाहिला. तथापि, त्यावेळच्या कोणत्याच प्रसार माध्यमाने यासाठी वाजपेयी यांना दोष दिला नाही. की त्यांच्या विरुद्ध एक ओळ लिहिली नाही. असाच प्रकार काँग्रेसने केला असता तर मीडियाने किती गहजब केला असता. बहुमताच्या ठरावाला उत्तर देताना वाजपेयींनी पॉज घेत घेत जे भाषण केले, त्याचे कौतुक करणारे मथळे दुसèया दिवशीच्या वृत्तपत्रांत झळकले. +कहॉ से शुरूवात करू? आरंभ से या अंत से? क्यूँ की समय की सुई फिर वही आके रूक गयी है...+ अशा प्रकारे नाटकी सुरूवात करून वाजपेयींनी लोकसभेत वेळ मारून नेली. मीडियाने या नाटकीपणाला हायलाईट करून वाजपेयींचे ढोंग लपवून ठेवले. आपल्या देशातील मीडिया नि:पक्ष नाही. ब्राह्मणी हीत जोपासणारा आहे, हे सिद्ध करायला यापेक्षा आणखी दुसरा कोणता पुरावा हवा?
वाईट पक्षात ढोंगी माणूस
वाजपेयींचे वर्णन करताना मीडिया +वाईट पक्षात चांगला माणूस+ असे विशेषण वापरतो. पण ते बिलकूल खरे नाही. अगदी साफ खोटे आहे. वाजपेयी यांचे योग्य वर्णन करायचे झाल्यास +वाईट पक्षात ढोंगी माणूस+ असे करावे लागेल. त्यांच्या ढोंगीपणाचे आणखी काही नमुने मी आज पेश करणार आहे.
अयोध्या प्रकरण
भाजपाचा कथिल पुरुष लालकृष्ण अडवाणी यांनी १९९० साली अयोध्येतील बाबरी मशिद पाडण्यासाठी आंदोलन सुरू केले, तेव्हा वाजपेयी या आंदोलनापासून दूर राहिले. या आंदोलनाला वाजपेयींचा विरोध आहे, असा संदेश देशात जावा यासाठी हे नाटक करण्यात आले. या आंदालनाची परीणती अयोध्येतील मशिद पडण्यात झाली. या संपूर्ण प्रकरणात वाजपेयी यांनी अडवाणी यांच्या विरोधात एकही शब्द काढला नाही. बाबरी मशीदविराधी आंदोलनाला वाजपेयींचा खरेच विरोध होता, तर वाजपेयींनी या आंदोलनाला जाहीर विरोध करायला हवा होता. तसेच अडवाणींनासुद्धा जाहीर समज द्यायला हवी होती. पण तसे काहीही झाले नाही. उलट वाजपेयी हे अडवाणींच्या रथावर स्वार झाले. अयोध्या आंदोलनाच्या लाटेवर स्वार होऊन पुढे वाजपेयी या देशाचे पंतप्रधानही बनले.
लालू इज रिअल हिरो!
टाईम्स ऑफ इंडियाचे तत्कालीन वार्ताहर कृष्णकुमार सिंग |
गुजरात दंगल
वाजपेयींचे मोठेपण सांगण्यासाठी मीडियावाले दुसरे उदाहरण गुजरात दंगलीचे देतात. गोध्रा कांडानंतर उसळलेल्या मुस्लिमविरोधी दंगलीत ३ हजारांपेक्षाही जास्त मुस्लिमांना ठार मारण्यात आले. ही दंगल गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्या सरकारनेच पुरस्कृत केली होती. तेव्हा देशाचे पंतप्रधान होते अटलबिहारी वाजपेयी! जनाच्या लाजं काजं वाजपेयी यांनी गुजरातच्या दंगलग्रस्त भागाचा दौरा केला. ४ एप्रिल २००० रोजी त्यांनी अहमदाबादेतील शाह आलम भागातील निर्वासितांच्या छावणीला भेट दिली. या छावणीत दंगलीमुळे घरदार सोडावे लागलेल्या मुस्लिमांना ठेवण्यात आलेले होते. या छावणीला भेट दिली तेव्हा वाजपेयी म्हणाले : +माझी मान शरमेने खाली झुकली आहे. हजारो लोकांना आपल्याच देशात निर्वासित व्हावे लागले आहे. मी लवकरच काही मुस्लिम देशांचा दौरा करणार आहे. तेथे गेल्यानंतर मला कोणत्या गोष्टींचा सामना करावा लागणार आहे, हे मला माहीत नाही.+
वाजपेयींनी राजधर्माचे पालन केले का?
याच दौèयात वाजपेयी हे नरेंद्र मोदी यांना उद्देशून म्हणाले, +राजधर्म का पालन करो. राजा के लिए प्रजा-प्रजा मे कोई भेदभाव नही होना चाहीए.+ वाजपेयींचे हे वाक्य फारच गाजले. वाजपेयी कसे चांगले आहेत, हे सांगण्याची मीडियामध्ये जोरदार स्पर्धा लागली. पण प्रश्न असा आहे की, स्वत: वाजपेयी यांनी राजधर्माचे पालन केले का? गुजरातमधील दंगलग्रस्त मुस्लिमांना न्याय दिला का? दुर्दैवाने या दोन्ही प्रश्नाचे उत्तर नकारार्थीच आहे. ठार मारण्यात आलेल्या मुस्लिमांबद्दल वाजपेयींना खरेच कळवळा होता, तर वाजपेयी यांनी सर्वप्रथम मोदींना मुख्यमंत्रीपदावरून हाकलायला पाहिजे होते. इतकेच नव्हे, तर गुजरातेत राष्ट्रपती राजवट लागू करायला हवी होती. पण यातले काहीही त्यांनी केले नाही. गुजराती मुस्लिमांना आजही न्याय मिळाला नाही. वाजपेयींनी ठरविले असते, तर मुस्लिमांना न्याय नक्की मिळाला असता. पण वाजपेयी नेहमीप्रमाणे ढोंगीपणाने वागले. नुसतेच बोलले. केले काही नाही.
वाजपेयींना भाजपा का सोडला नाही?
वाजपेयींचा बाबरी मशीद पाडण्यास विरोध होता. वाजपेयींचा गुजरात दंगलीला विरोध होता, हे एक वेळ खरे मानून चालू या! हे खरे मानले, तर मग प्रश्न असा पडतो की, वाजपेयी आयुष्यभर भाजपात का राहिले? बाबरी मशीद पाडल्यामुळे देशाची मानसिक फाळणी झाली. दंगलींचा आगडोंब उसळला. दहशतवादाला वाढावा मिळाला. गुजरात दंगलींनी देशाच्या कपाळावर अमानुषतेचा कलंक लागला. या घटनांनी कोणताही सुहृदय माणूस हेलावून गेला असता. वाजपेयी हेलावले असते, तर त्यांनी त्याचक्षणी भाजपाला राम राम ठोकला असता. पण वाजपेयी बुडाला डिन्क लावल्याप्रमाणे खुर्चीला घट्ट चिकटून राहिले.
आचार्य प्रल्हाद केशव अत्रे आपल्या परखडपणासाठी फारच प्रसिद्ध होते. वाजपेयी यांचा हा सर्व दांभिकपणा सुरू असताना अत्रे असते तर काय झाले असते? अत्रे म्हणाले असते : अरे हा कसला अटल बिहारी हा तर अट्टल ढोंगी आहे. याच्यासारखा ढोंगी माणूस गेल्या १० हजार वर्षांत झाला नाही आणि पुढील १० हजार वर्षांत होणार नाही.
http://www.tehelka.com/story_main4.asp?filename=op071004the_unbearable.asp
अडवाणी यांच्या अटकेचे वार्तांकन करणारे टाईम्स ऑफ इंडियाचे तत्कालीन वार्ताहर कृष्णकुमार सिंग उर्फ के. के. सिन्ग यांनी नितीश कुमार यांच्या भूमिकेवर टाकलेला प्रकाश वाचा खालील लिन्कवर :
http://kksingh1.blogspot.com/2011/10/down-memory-lane-advanis-rathyatra-o-f.html
अनिता पाटील, औरंगाबाद.
.........................................................................................................
वाजपेयी यांनी आपली वक्तव्ये कशी फिरवली याचा तेहाकाने घेतलेला आढावा वाचा पुढील लिंकवर :http://www.tehelka.com/story_main4.asp?filename=op071004the_unbearable.asp
अडवाणी यांच्या अटकेचे वार्तांकन करणारे टाईम्स ऑफ इंडियाचे तत्कालीन वार्ताहर कृष्णकुमार सिंग उर्फ के. के. सिन्ग यांनी नितीश कुमार यांच्या भूमिकेवर टाकलेला प्रकाश वाचा खालील लिन्कवर :
http://kksingh1.blogspot.com/2011/10/down-memory-lane-advanis-rathyatra-o-f.html
इतकी विस्तृत माहिती कशी काय लोकं कडून पसरत नाही की दाबली जाते खरे खोट जनता ठरवेल
ReplyDeleteकारगिल युध्द हे भारत भुमी वर लढले गेले , पाकिस्तानी सैन्य भारतात का घुसून दिले, आणि कारगिल युद्धा नंतर सहाच महिन्यात निवडणूक झालेल्या ,हा केवळ योगायोग होता का. आज पर्येत झालेल्या युद्धात कारगिल युद्धाच्या पराक्रमाचाच ढोल वाजवले जातात, आणि अगोदर च्या काँग्रेस च्या काळातील युद्धात मिळवलेले विजय अनुउल्लेखा ने मारले जातात , हे योगायोगाने घडत आहे का सुनियोजित पद्धतीने होत आहे .
ReplyDeleteछान
ReplyDeleteदूषित दृष्टी आणि द्वेष दिसतोय...
ReplyDelete