Monday, 16 April 2012

गडकरींचा ‘कोळसे'वाला

झारखंडमध्ये १ हजार कोटींचा कोळसा खाणारे अजय संचेती आणि नितीन गडकरी.
एका कार्यक्रमात संचेती यांचा गडकरींच्या हस्ते सत्कार करण्यात
आला होता, तेव्हाचे हे छायाचित्र आहे. नवभारत टाईम्सने ते नुकतेच प्रसिद्ध केले आहे.


आरएसएसच्या शाखेत नितीन गडकरी
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ अर्थात आरएसएसने आपले मोहरे म्हणून ज्यांना ज्यांना राजकारणात पुढे केले आहे, त्या सगळ्यांचा संबंध एनकेन प्रकारे भ्रष्टाचार आणि भ्रष्टाचाराशी कसा काय येतो? आरएसएसचा आशीर्वाद असल्याशिवाय भाजपात कोणीही सत्तेच्या पदापर्यंत पोहोचू शकत नाही. आरएसएसची मर्जी ज्याच्यावर खप्पा होते, त्याचा लालकृष्ण अडवाणी होतो. भाजपाशासित राज्यांतील बहुतांश मुख्यमंत्री आरएसएसचा आशीर्वाद घेऊनच पदावर चढले आहेत. आरएसएसचे सत्तेतील मोहरे म्हणून हे लोक वावरतात. आरएसएसचे सत्तेतील हे मोहरे भ्रष्टाचाराच्या आरोपांनी सतत का घेरलेले असतात, हा या देशातील सर्वसामान्य जनतेला पडलेला प्रश्न आहे. भ्रष्टाचाराच्या मार्गांनी पैसा उभा करू शकणाèयांना किन्वा किमान भ्रष्टाचाèयांना अभय देऊ शकणाèयांना आपला मोहरा म्हणून राजकारणात पाठवायचे, असे काहीसे आरएसएसचे धोरण दिसते. 

नागपूरकरांच्या प्रश्नाला उत्तर द्या

आरएसएसचा आणखी एक मोठा मोहरा म्हणजे भाजपाध्यक्ष नितीन गडकरी.  परीट घडीचे पांढरे स्वच्छ कपडे घालून गडकरी मिस्टर क्लिन म्हणून राजकारणात मिरवत असतात. तथापि, त्यांच्या कपड्यांनाही झारखंडमधील कोळशाचा काळा रंग लागला आहे. गडकरी यांचे मित्र अजय संचेती यांनी झारखंडमध्ये १ हजार कोटींपेक्षाही जास्त रुपयांचा घोटाळा घडवून आणला आहे. कॅगच्या अहवालातच ही माहिती समोर आली आहे. आरएसएसचा आणखी एक मोहरा आणि झारखंडचे मुख्यमंत्री रमण qसग यांच्यावरही कॅगच्या रिपोर्टची गाज कोसळली आहे. रमनसिंग सरकारनेच झारखंडमधला कोळसा घोटाळ्याचे नेतृत्व केले, असा स्पष्ट ठपका कॅगने ठेवला आहे. सोमरवार दि. ९ एप्रिल २०१२ रोजी कॅगचा हा अहवाल सभागृहात ठेवण्यात आला. गडकरीच्या मित्राने १ हजार कोटींचा कोळसा खाल्ला. या कोळशाने गडकरींचेही हात काळे झाले आहेत का? महाराष्ट्रातील विशेषत: नागपूरच्या लोकांच्या मनातला हा प्रश्न आहे. गडकरी नागपूरचे आहेत. आरएसएसचे मुख्यालयही नागपुरातच आहे. दोघांपैकी कोणी तरी लोकांच्या मनातील संभ्रम दूर करायला हवा.
आरएसएसचे प्रमुख मोहन भागवत यांच्यासह नितीन गडकरी

येडुरप्पा आणि मोदी

कर्नाटकात बी. एस. येडुरप्पा हे संघाचा मोहरा म्हणून वावरतात. त्यांच्या एवढे भ्रष्टाचाराचे आरोप संपूर्ण भरतखंडात कोणावरही झालेले नाहीत. कर्नाटकातील लोखंडाच्या खाणीतून रेड्डी बंधूंनी अब्जावधी रुपये बेकायदेशीररित्या काढले. रेड्डी बंधूंना येडुरप्पा मुख्यमंत्री असतानाच मुक्तहस्त मिळाला. गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी हे आरएसएसचा सर्वांत मोठा मोहरा आहेत. आरएसएसचे मुखपत्र पांचजन्यने त्यांना भाजपाचा पंतप्रधानपदाचा उमेदवार म्हणून घोषित करून टाकले आहे. मोदी सरकारवर कॅगने गंभीर स्वरूपाचे ताशेरे आपल्या ताज्या अहवालात ओढले आहेत. गुजरातमधील ३ हजार पेक्षा जास्त मुस्लिमांच्या कत्तीचे पाप मोदी सरकारच्या माथ्यावर आहे ते वेगळेच. ‘राजधर्माचे पालन कराङ्क असा इशारा तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी मोदींना दिला होता. याचा विसर पांचजन्यला पडला आहे. 

मीडिया संघाला धार्जिण

या प्रकरणी सर्वाधिक आश्चर्यकारक भूमिका देशातील मीडियाने घेतल्याचे दिसून आले. १ हजार कोटींचा कोळसा खाणारे अजय संचेती आणि त्यांचे घनिष्ठ मित्र नागपूरकर गडकरी यांच्याबाबत मीडिया चकार शब्द काढायला तयार नाही. भारतीय वृत्तपत्रे आणि न्यूज चॅनल चालविणारा वर्ग आरएसएससाठी काम करतो, हे सिद्ध करायला दुसरा पुरावा कोणता हवा. 
अजय संचेती यांनी १ हजार कोटींचा कोळसा खाल्ला, त्यासंबंधी दैनिक भास्करच्या वेबसाईटवरील बातमीची ही लिन्क - 
http://daily.bhaskar.com/article/NAT-TOP-coal-scam-cag-reports-involvement-of-gadkaris-close-aide-3091587.html


गडकरींना आरएसएसने का निवडले याचे विश्लेषण आऊटलूक साप्ताहिकाने केले आहे. त्याची लिन्क -
http://www.outlookindia.com/article.aspx?277753

अनिता पाटील

Monday, 9 April 2012

सदाशिव भाऊंचा मृत्यू कसा झाला?


सदाशिवराव भाऊ


पानिपतावरील सदाशिवराव भाऊंच्या मृत्यूबाबत अनेक आख्यायिका आहेत. भाऊ मेलेच नाही, असे मानणाराही एक गट आहे. हरियाणात भाऊंचे एक मंदिर आहे. तेथे भाऊंनी आपले शेवटचे दिवस काढल्याची आख्यायिका आहे. स्वत:ला सदाशिवराव भाऊ म्हणविणारा एक व्यक्ती पुण्यातही त्याकाळी आला होता. विशेष म्हणजे भाऊंच्या पत्नीनेही हेच भाऊ आहेत, असे म्हटले होते. तथापि, नानासाहेब पेशव्यांनी ते मान्य केले नाही. या व्यक्तीला घाशिराम कोतवालाच्या हस्ते देहदंड ठोठावण्यात आला. भाऊंचे काय झाले, हा प्रश्न इतिहासकारांना अजूनही छळतोच आहे. पानिपतच्या लढाईला १४ जानेवारी २०१२ मध्ये दीडशे वर्षे झाली. त्यानिमित्त झालेल्या सोहळ्याच्या वेळी मी हरियाणात गेले होते. तेथे मी भाऊंचे काय झाले, याबाबत लोकांत काय आख्यायिका आहेत, याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. एक वेगळीच आख्यायिका तेव्हा माझ्या हाती आली. या विषयी लिहिण्याचा किती तरी दिवसांचा मानस होता. परंतु, या ना त्या कारणाने शक्य होत नव्हते. शेवटी विशेष वेळ काढून हा लेख आज लिहिला. तो ब्लॉगच्या वाचकांसाठी देत आहे. 

आधी भाऊ आणि पानिपत युद्धाची थोडीशी पाश्र्वभूमी पाहू या. सदाशिवराव भाऊ यांचा जन्म पुण्याजवळील सासवड येथे झाला. पहिला बाजीरावाचा भाऊ चिमाजी अप्पा हे भाऊंचे वडील. त्यांच्या आईचे नाव रखमाबाई होते. रखमाबाईचा बाळंतपणातील आजाराने मृत्यू झाला. तसेच भाऊ सुमारे १० वर्षांचे असताना चिमाजी अप्पांचाही मृत्यू झाला. आजी राधाबाई यांनी भाऊंचा पुढे सांभाळ केला. भाऊ प्रारंभी नागपूरच्या भोसल्यांच्या सेवेत होते. नंतर ते नानासाहेब पेशव्यांचे दिवाण बनले. पानिपतावर मराठा सैन्याचे नेतृत्व करण्यास भाऊ असमर्थ होते, असे अनेक इतिहासकार मानतात. तथापि, मला हे पटत नाही. भाऊंनी मराठा साम्राज्याची उत्तम सेवा केली. १७४६ मध्ये भाऊंनी कर्नाटकात मुलुखगिरी केली. त्यांनी उदगीर घेऊन निजामाची कंबर तोडली. अलाऊद्दीन खिलजीने दौलताबादचा देवगिरी किल्ला घेतल्यानंतर मराठ्यांना तो कधीच परत घेता आला नव्हता. सदाशिव भाऊने देवगिरी जिंकून  इतिहास घडविला. तेच भाऊ पानपतावर यश मिळवू शकले नाही. त्याला अनेक कारणे होती. 

तिस-या पानिपत युद्धाची पाश्र्वभूमी

अहमदशाह अब्दाली
अहमदशाह अब्दाली दिल्लीवर चालून आला तेव्हा दिल्लीचे संरक्षण करण्याची जबाबदारी मराठ्यांवर होती. मराठ्यांनी मोगलांशी अहमदिया करार केलेला होता. या करारानुसार दिल्लीला संरक्षणाची जबाबदारी मराठ्यांनी घेतली होती. या काळात मराठा साम्राज्य यशाच्या शिखरावर होते. दिल्ली परीसरातील काही भाग वगळता बहुतांश भारतावर मराठ्यांचा ताबा होता. मराठ्यांच्या नजरा आता वायव्येकडे वळल्या होत्या. मराठ्यांना वेळीच रोखले पाहिजे हे ओळखून अफगाणिस्तानचा शाह अहमदशाह दुर्राणी (यालाच अब्दाली म्हणतात) दिल्लीवर चालून आला. त्याने पंजाब घेतले. दत्ताजी qशदे तेव्हा उत्तरेत होते. यमुनेच्या बुरारी घाटावर झालेल्या लढाईत दत्ताजी शिन्दे मारले गेले. या दोन्ही बातम्या महाराष्ट्रात पोहोचल्या. अब्दालीचा बंदोबस्त करण्याची जबाबदारी सदाशिव भाऊंवर सोपविण्यात आली. त्यासाठी भाऊंना उदगीरच्या लढाईतून परत बोलावून घेण्यात आले. मोठा लवाजमा घेऊन भाऊंनी दिल्लीला कूच केली. 

उत्तरेतील हिंदू  म्हणविणारे राजे अब्दालीला मिळाले

अब्दाली मुत्सद्देगिरीच्या बाबतीत मराठ्यांच्या पुढे होता. त्याने उत्तरेतील सर्व नवाब आणि राजांना आपल्या बाजूने वळविण्यात यश मिळविले. काही जण अलिप्त राहिले, तर काही जण थेट अब्दालीच्या बाजूने लढले. जोधपूरचा राणा बिजय qसग आणि अंबरचा कछवाह राजा माधोqसग हे अलिप्त राहिले. रोहिल्यांचा प्रमुख नजीबुद्दौला आधीचाच अब्दालीसोबत होता. अवधचा नवाब शुजाऊद्दौला इस्लामच्या नावावर त्यांना जाऊन मिळाला. भरतपूरचा जाट राजा सुरजमल जाट, राजपूत आणि शीखांची मदत मिळावी म्हणून सदाशिव भाऊंनी प्रयत्न केले. तथापि, त्यात त्यांना यश आले नाही. उत्तरेतील राजपूत, जाट, शीख यापैकी कोणालाच मराठ्यांचा वाढता प्रभाव नको होता. अकबराच्या काळापासून दिल्लीच्या सत्तेत महत्त्वाची भूमिका बजावणारे राजपूत दुय्यम स्थानावर फेकले गेले होते. त्यांची जागा मराठ्यांनी घेतली होती. मराठे राजपुतान्यात उतरून राजपुतांकडूनही खंडण्या वसूल करीत असत. त्यामुळे राजपुतांनी अब्दालीला मदत केली. हीच स्थिती जाट आणि शीखांचीही होती. मराठे आपल्यावर हल्ला करून आपली राज्ये ताब्यात घेतील, अशी भीती त्यांना वाटे. मल्हारराव होळकरांची मदतही भाऊंना वेळेत मिळू शकली नाही. 

भाऊंच्या चुका

उत्तरेतून मदत मिळाली नाही, तरी मराठे पानिपताची लढाई सहज qजकले असते. परंत तसे झाले नाही. भाऊंच्या काही चुका त्याला कारणीभूत होत्या. या लढाईत भाऊंनी मराठ्यांचे प्रसिद्ध गनिमी कावा हे युद्धतंत्र बाजूला ठेवले. तसेच भाऊंनी बिगरसैनिक लवाजमा सोबत घेतला होता. कुटुंब कबिलाही होताच. मराठा सैन्याबद्दल त्याकाळी महाराष्ट्रात इतका विश्वास होता की, मराठे हरतील असा विचारसुद्धा कोणी करीत नसे. त्यामुळे लोक बिनधास्तपणे सैन्यासोबत जात. उत्तरेत जाऊन तीर्थ यात्रा करीत. मुलुख पाहत qहडत. भाऊंच्या सैन्यासोबतही असे लोक होते. त्यांची संख्या प्रचंड होती. न. र. फाटक यांनी या लव्याजम्याला बाजारबुणगे म्हटले आहे. मराठा सैन्याची अध्र्यापेक्षा जास्त रसद या बाजारबुणग्यांनीच फस्त केली. भाऊंच्या सैन्याला पानपतावर उपासमारीचा सामना करावा लागला. महाराष्ट्र खूप दूर होता. उपासमारीने मरणे qकवा लढणे हे दोनच पर्याय भाऊंसमोर होते. त्यांनी लढण्याचा पर्याय निवडला. त्या आधी बाजारबुणग्यांना महाराष्ट्रात सुरक्षित परत पाठविण्यासाठी मराठा सैन्याची बरीच शक्ती खर्च झाली. 

असे लढले मराठे 

भाऊंच्यासोबत जनकोजी शिन्दे आणि इब्राहीम खान गारदी होते. १४ जानेवारी १७६१ रोजी लढाईला तोंड फुटले. दुपारपर्यंत मराठे वरचढ होते. अब्दालीची ४५ हजारांची फौज पाठीला पाय लावून पळाली. दुपार ढळल्यानंतर सूर्य मराठ्यांच्या तोंडावर आला. तसेच अब्दालीने स्वत:च्या संरक्षणासाठी राखीव ठेवलेले सैन्य अचानक मैदान उतरविले. अब्दालीने हा शेवटचा डाव खेळला होता. तो फसला असता तर त्याचा मृत्यू अटळ होता. परंतु, त्याचे नशीब चांगले होते. यश मिळत आहे, असे पाहून मराठे जल्लोषाच्या तयारीत असतानाच अब्दालीच्या ५०० वेगवान घोडेस्वारांनी विद्यूत वेगाने हल्ला चढविला. मराठ्यांची दाणादाण उडाली. 



जानव्या चा फास देऊन भाऊंना मारले 

पानिपतावरील भाऊंच्या मृत्यूबाबत अनेक आख्यायिका आहेत. भाऊ युद्धात मेलेच नाही, असे मानणारे लोक हरियाणात आहेत. हरियाणातच भाऊंचे एक मंदिर आहे. तेथे भाऊंनी आपले शेवटचे दिवस काढल्याची आख्यायिका आहे. पानिपतच्या लढाईला १४ जानेवारी २०१२ मध्ये दीडशे वर्षे झाली. हरियाणाच्या दौèयात मी अशा आख्यायिकांच्या शोधात होते. योगायोग पाहा एक वेगळीच आख्यायिका माझ्या हाती आली. ही आख्यायिका अशी : अचानक उडलेल्या या हलकल्लोळात भाऊ गडबडले. त्यांनी स्वत:ला युद्धाच्या गर्दीत झोकून दिले. त्यातच त्यांचा मृत्यू झाला. अब्दालीच्या एका घोडेस्वार तुकडीने भाऊंना अलगद उचलले. भाऊंना घेऊन ही तुकडी युद्धाच्या गर्दीपासून बाजूला झाली. मराठ्यांचा सेनापती पकडला म्हणून आपणास इनाम मिळेल, असे या तुकडीला वाटले. अशी बक्षिसी देण्याची त्याकाळी रीत होती. युद्ध संपल्यानंतर सायंकाळी भाऊंना अब्दालीच्या राहुटीत नेण्यात आले. अब्दालीसमोर भाऊंचे वर्तन सेनापतीला साजेसेच होते. दत्ताजी qशदे यांनी ज्या बाणेदारपणाने ‘बचेंगे तो और भी लडेंगेङ्क असे उद्गार काढले, तोच बाणा भाऊंनीही दाखविला. मला मुजरा केल्यास तुला जीवदान देतो, असे अब्दालीने भाऊंना सांगितले. त्यावर भाऊ उद्गारले : ‘तू मला मुजरा केल्यास, आमच्या छत्रपतींच्या दरबारात मी तुझा सन्मान घडवून आणतो.ङ्क भाऊंच्या उदगाराने अब्दाली संतापला. त्याचे शीर कलम करण्याचा आदेश त्याने सैनिकांना दिला. यावेळी भाऊंनी झटापट केली. त्यात त्यांच्या गळ्यातील जानवे खाली पडले. ते घेण्यासाठी भाऊ धडपडू लागले. तेव्हा अब्दालीने विचारले : ‘ हा धागा कशाचा आहे.ङ्क त्यावर भाऊ म्हणाले : ‘ही माझ्या धर्माची निशाणी आहे.ङ्क अब्दाली हसला. त्याने जमिनीवर लोळणारे जानवे उचलले. याच धाग्याने याचा मृत्यू होऊ दे, असा आदेश त्याने सैनिकांना दिला. सैनिकांनी भाऊंचे जानवे भाऊंच्या गळ्याभोवती आवळले आणि त्यांचा जीव घेतला. 

भाऊंची धीन्ड

अब्दालीचे बहुतांश सैन्य खलास झाले होते. अगदी थोडेसे लोक उरले होते. युद्ध qजकूनही त्याला काहीच उपयोग नव्हता. कारण ज्या सैन्याच्या बळावर त्याने अफगाण साम्राज्य उभे केले होते. ते सर्व नामशेष झाले होते. त्यामुळे तो प्रचंड निराश झाला. संतापला. त्याने मेलेल्या भाऊंचे शिर कलम करून धीन्ड काढण्याचे आदेश दिले. भाऊंचे शीर कापण्यात आले. ज्या जानव्याने त्यांचा गळा आवळण्यात आला होता, त्यालाच त्यांचे शिर बांधून एका भाल्याला लटकावण्यात आले. सर्व शिबिरभर फिरवून नंतर ते मृतदेहांच्या ढिगाèयांत फेकून देण्यात आले. तिसèया दिवशी भाऊंचा बिनमुंडक्याचा मृतदेह देहांच्या ढिगाèयात सापडला. चौथ्या दिवशी मुंडके सापडले. 

अफगाणी साम्राज्याचा खातमा

पानितपत युद्धाने नुसती अब्दालीचीच नव्हे, तर अफगाणी साम्राज्याची कंबर मोडली. अब्दालीचे साम्राज्य हे अफगाणचे शेवटचे साम्राज्य ठरले. पानिपतचे युद्ध qजकल्यानंतर अब्दाली दिल्लीवर चालून येण्याऐवजी परत निघून गेला. कारण त्याच्याजवळ पुढे लढायला सैन्यच उरले नव्हते. पानिपत युद्धाची मध्यपूर्वेतील आक्रमक टोळ्यांनी प्रचंड धसका घेतला. त्यानंतर वायव्येच्या बाजूने भारतावर एकही आक्रमण झाले नाही. सुमारे पावणे दोनशे वर्षांनतर इंग्रजांनी व्यापाराच्या नावाखाली भारत ताब्यात घेतला. 

अनिता पाटील 


Sunday, 1 April 2012

हा पहा सेना-भाजपचा काळाकुट्ट ब्राह्मणी चेहरा


दिवेआगर येथील सोन्याचा गणपती चोरीला गेल्यावर शिवसेनेने जे ब्राह्मणी चाळे केले, ते पाहिल्यावर असे ठामपणे म्हणता येते की, इकडची दुनिया तिकडे झाली तरी आपण सुधारायचे नाही, असा ठाम निर्धार शिवसेनेने केला आहे. शिवसेना स्वत:ला हिन्दुत्वादी संघटना म्हणते. हिन्दुत्ववाद नावाची कोणतीही गोष्ट या भूतलावर अस्तित्वात नाही. हिन्दुत्वाच्या नावावर जे काही चालू असते तो केवळ ब्राह्मणवाद असतो, असा माझा ठाम सिद्धांत आहे. अनेक लेखांतून मी तो मांडला आहे. मी हिन्दुत्ववादाला ब्राह्मणवाद म्हणते तेव्हा लोक मला जातीयवादी म्हणतात. तथापि, माझे म्हणणे सिद्ध करणारे वर्तन शिवसेना, तसेच संघप्रणित संघटना वारंवार करीत असतात. स्वत:च हिन्दुत्वाचा बुरखा फाडून आपला केसाळ काळा ब्राह्मणवादी चेहरा दाखवित असतात. दिवेआगर गणपती चोरी प्रकरणातही हेच घडले. शिवसेने आणि भाजपाने आपला हिन्दुत्वाचा बुरखा बाजूला सारून ब्राह्मणवादाचा केसाळ, काळा चेहरा जगाला दाखविला.  

सेना आमदारांच्या डोक्यावर ब्राह्मणी टोप्या

दिवेआगर गणपती मूर्तीची चोरी झाल्यानंतर शिवसेना-भाजपाने  विधानसभेत थयथयाट केला. युतीचे आमदार ब्राह्मणी टोप्या घालून सभागृहात गेले. या टोप्या घालून सेनेचे आमदार विधानभवन परिसरात मिरवत असल्याचे दृश्य वृत्तवाहिन्यांवरून संपूर्ण महाराष्ट्राने पाहिले. तसेच दुस-या दिवशीच्या वृत्तपत्रांनीही ब्राह्मणी टोप्या घातलेल्या आमदारांची छायाचित्रे छापली. गोल टोप्यांनी शिवसेनेचा काळा-केसाळ ब्राह्मणी चेहरा जगाला दाखविला. शिवसेनेच्या आमदारांच्या डोक्यावरील एकजात ब्राह्मणी टोप्यांनी शिवसेनेचे मुळचे  खलनायकी रूप आणखी लखलखून उठले होते. बहुजन समाजाला या ना त्या कारणाने लुटणारे पुजारी, पुरोहितादि ब्राह्मण या गोल टोप्या घालून वावरत असतात. ब्राह्मणवाद्यांचे गोलमाल झाकले जावे, यासाठी या टोप्यांचा आकार बहुधा गोल ठेवलेला असावा. 

आम्ही ब्राह्मणवाद्यांच्या हिताचे काम करतो!

याच गोलमाल टोप्या शिवसेना आमदारांना का घालाव्याशा वाटल्या? शिवसेनेचा नेहमीचा भगवा फेटा त्यांनी का घातला नाही? आम्ही ब्राह्मणांच्या हितासाठी काम करतो, असा संदेश शिवसेना नेत्यांना महाराष्ट्रात पाठवायचा होता, म्हणून भगवे फेटे न घालता ते शोषणाचे प्रतिक असलेल्या बदनाम ब्राह्मणी टोप्या घालून सभागृहात आले. या आमदारांनी सभागृहातच महाआरती केली. महाआरतीच्या नावाखाली शिवसेनेने सभागृहात तमाशाच उभा केला. त्यामुळे १४ सेना-भाजपा  आमदारांना वर्षभरासाठी निलंबित करण्यात आले. माझे तर मत असे आहे की, सेनेच्या सर्वच आमदारांना निलंबित केले असते, तरी सेनेच्या पापाचे क्षाळण झाले नसते. 

अरेरे, क्षुद्र राजकीय लाभासाठी देव्हा-यातले देव रस्त्यावर उतरवले

शिवसेनेचे ब्राह्मणाळलेले हे आमदार नुसत्याच ब्राहणी टोप्या घालून आले नव्हते. त्यांनी सोबत एक गणतीची मूर्तीही आणली होती. गणतीला देव मानता ना? मग त्याच्या मूर्तीची जागा देव्हाèयात असायला हवी. क्षुद्र राजकीय लाभासाठी शिवसेने आपले देव्हा-यातले देव रस्त्यावर उतरविले. याला काय म्हणावे? देव्हा-यातील देवाचा वापर आपल्या क्षुद्र राजकीय लाभासाठी करणे पाप आहे, हे शिवसेनेचे कार्यप्रमुख उद्धव ठाकरे आणि शरपंजरी शिवसेना प्रमुख बाळ ठाकरे यांना कोणी तरी सूज्ञाने सांगायला हवे. अर्थात शिवसेनेत असा सूज्ञ तूर्त तरी कोणी दिसत नाही. त्यामुळे त्यांचे हे क्षुद्र ब्राह्मणी ब्राहणी चाळे चालूच राहतील, यात शंकाच नाही. 

अनिता पाटील, पुणे.

.................................................................................................................


शिवसेनेचा ब्राह्मणवादी चेहरा दाखविणारे हे पाहा आणखी काही फोटो






Saturday, 31 March 2012

रशियामधील वैदिक मंदिर तोडण्याचा आदेश



वैदिक धर्म विषमतेवर आधारित आहे हे आता जगातील इतर देशांनाही कळू लागले आहे. रशियातील एका न्यायालाने तेथील वैदिक धर्म पुरस्कृत मंदिर पडण्याचे आदेश दिले आहेत. आपल्या देशातील बहुजन समाजाने या निर्णयातून काही तरी बोध घ्यायला हवा.  


महाराष्ट्र टाईम्स मध्ये प्रसिद्ध झालेली बातमी खाली देत आहे. 
.......................................................

रशियामधील मंदिर तोडण्याचा आदेश
मटा ऑनलाइन वृत्त । मॉस्को



श्रीमद्भगवद्गीता या हिंदूच्या पवित्र धर्मग्रंथाला दहशतवादी साहित्य ठरवण्याचा रशियातील काही कडव्या कॅथलिक ख्रिश्चन पंथीयांचा डाव फसल्यानंतर आता एक नवे संकट हिंदू मंदिरासमोर उभे राहिले आहे. रशियातील सर्वात मोठे वैदिक, सांस्कृतिक केंद्राला हटवण्याचे आणि त्यामध्ये असलेले मंदिर तोडण्याचे आदेश रशियातील एका कोर्टाने दिले आहे. 

नुकतेच राष्ट्रपतीपदावर निवडून आलेल्या ब्लादिमीर पुतिन यांचे घर असलेल्या सेंट पीटर्सबर्ग या शहरात हे वैदिक सांस्कृतिक केंद्र आहे. ज्यामध्ये एक हिंदू धर्मियांचे मंदिर आहे. हे केंद्र १९९२पासून ४९ वर्षाच्या करारानुसार हिंदू धर्मियांना वैदिक परंपरा जतन करण्यासाठी देण्यात आले आहे. त्या कराराला अचनाक रद्द करण्यात आले असून कोर्टाने हिंदूंना हा परिसर सोडण्याचे आदेश दिले आहेत. 

रशियातील काही कडव्या कॅथलिक पंथीयांच्या हिंदू विरोधी मोहिमेचा हा एक भाग असल्याची शंका येते, असे वैदिक केंद्राचे अध्यक्ष सुरेन कारापेटियन यांनी सांगितले. आर्बिट्रेशन कोर्टाने दिलेल्या आदेशानंतर आता येथील मंदिर तोडण्यात येईल, असेही ते म्हणाले. हे मंदिर आणि वैदिक अभ्यास केंद्र वाचवण्यासाठी त्यांनी भारत आणि रशियाचे राष्ट्रपती यांना विनंती केली आहे. भारत सरकार या सर्व प्रकाराची गंभीर दखल घेऊन भारतीय सांस्कृतिक परंपरांचे रक्षण आणि संवर्धानासाठी कार्यरत असलेल्या या संस्थेला वाचवण्यासाठी हस्तक्षेप करतील अशी आम्हाला अपेक्षा आहे, असेही ते म्हणाले. 

आम्हला येथे न्याय मिळत नाही. म्हणून आम्ही भारत सरकारला विनंती करतो आहोत. आम्हाला अनधिकृतरित्या हटवण्याचे काम सुरू आहे. ४९ वर्षांचा हा करार १९९२मध्ये संघीय शोध संस्थानसोबत करण्यात आला होता. आता जॉइंट स्टॉक कंपनी गॉसनिखिमनालितमध्ये बदलण्यात आले आहे, असेही त्यांनी सांगितले. 

सेंट पीटर्सबर्गच्या संघीय आर्बिट्रेशन कोर्टाने स्थानीय हिंदू धार्मिक संगटना वैदिक सोसाइटी ऑफ स्पिरिचुअल डिवेलपमेंट आणि गॉसनिखिमनालित यांच्यातील लीज करार रद्द करण्याच्या आदेशाला कायम ठेवले आहे. कोर्टाने त्यात असलेले मंदिर वाचवण्यालाही विरोध दर्शवला आहे. आठ मलजले असलेल्या या इमारतीत मंदिराशिवाय वैदिक परंपरांचा अभ्यास करण्याची जागा, पुस्तकं आहेत. तसेच तिथे संस्कृत आणि योग यांचेही शिक्षण देण्यात येते.


या बातमीची लिंक :
http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/12477894.cms

Thursday, 29 March 2012

रामदासांच्या वधूचे पुढे काय झाले?



मित्रहो, आज आपण रामदास स्वामी यांनी बोहल्यावरून पलायन केल्यानंतर त्यांच्या वधूचे काय झाले, याची माहिती घेणार आहोत. अनंत गोपाल कुडाळकर-वाकेणीस यांनी लिहिलेल्या ‘वाकेनिशी’त रामदासांच्या न झालेल्या लग्नाची कहाणी आली आहे. तीच मी आज तुम्हाला येथे सांगणार आहे. रामदासांचे मूळ नाव नारायण सूर्याजी ठोसर. जांब (तालुका-अंबड ,जि. जालना) हे त्यांचे गाव. नारायण हा मुळात एक उनाड, आडदांड होता . महिना-महिना तो घरातून-गावातून गायब राहत असे. रात्री बेरात्री भटकत असे. त्याची ही लक्षणे पाहूनच त्याच्या आईने त्याचे लग्न करायचे ठरवले. लग्न झाल्यानंतर हा सुधारेल असे त्याच्या आईला वाटले. परंतु हा लग्नाला तयारच नव्हता. तरीही त्यांच्या आई ने हट्टाने त्याचे लग्न ठरवले. आपल्या भावाची म्हणजेच नारायणाच्या मामाची मुलगी त्यासाठी पक्की केली. या मुलीचे नाव काशीबाई. ती  नागुजी बदनापुरकर यांची मुलगी होती. नागुजी हा नारायणाचा सख्खा मामा होय. विवाह ठरला.

लग्नाच्या आदल्या रात्रीच नारायण पळाला

हा विवाह गाव - गोंदी (ता. अंबड ,जि.जालना ) इथे सकाळच्या अभिजित मुहुर्तावर होणार होता. सर्व मंडळी लग्नाच्या तयारीत असतानाच लग्नाच्या आदल्या दिवशी रात्री अंधाराचा फायदा घेवून नारायण पळाला. नवरदेवच  पळाल्यानंतर अर्धी हळद लागलेल्या काशीबाईचे लग्न कुणाबरोबर  लावावे, हा प्रश्न निर्माण झाला. कुणीही ब्राम्हण तरुण तिच्याशी विवाह करण्यास तयार होईना. अंगावरची हळद तर साडेतीन दिवसात फिटली पाहिजे. नागुजी बदनापूरकर हतबल झाले. त्यांनी पंचक्रोशीतील सर्व गावांतील ब्राह्मण कुटुंबांशी संपर्क साधला. तथापि, काशीबाईशी लग्न करण्यास कोणीही तयार होईना.

मराठा गड्याने केले काशीबाईशी लग्न 

अशावेळी गाव सोमवाडी, ता. अंबड ,  जि. जालना येथील साखाजी मिन्धर हा एक मराठा गडी नागुजी बदनापूरकर यांच्या मदतीला धावून आला. साखाजीचे घराण्यात देशमुखी होती.  निधड्या छातीचा हा तरूण म्हणाला- "मी देतो काशीला आधार. तिचा पत्नी म्हणून स्वीकार करण्यास मी तयार आहे." नारायण सूर्याजी ठोसर यांचा मोठा भाऊ गंगाधरपंत सूर्याजी ठोसर यांनीच मग पुढाकार घेतला. नारायणाची नियोजित वधू काशीबाई हिचे वडील नागुजी बदनापूरकर यांच्याशी त्यांनी संपर्क साधला. नागुजींची अनुमती घेऊन काशीबाईचा विवाह साखाजी मिन्धर याच्याशी लावून देण्यात आला. कन्यादान स्वत: नारायणाचा भाऊ गंगाधरपंतांनी केले. काशीबाई साखाजीची धर्मपत्नी झाली. अडल्या-नडल्याच्या मदतीला धावून जाणे, हा मराठ्यांचा धर्मच आहे. साखाजीने या धर्माचे पालन केले.

मृतदेह सापडला अंबड येथील बारवेत

अरेरे आता सगळे कसे मंगल कुशल झाले, असे वाटत असतानाच धर्ममार्तंडांनी पुन्हा एकदा बिब्बा घातला. साखाजी-काशीबाईचा विवाह होऊ नये, यासाठी पंचक्रोशीतील धर्ममार्तंड आधीपासूनच प्रयत्न करीत  होते. ब्राह्मण सोडून इतर जातीतील पुरुषाशी विवाह करणे हे पाप आहे, असे काशीबाईच्या मनात भरविणयाचे महापाप धर्ममार्तंड मंडळी करीत होती. पापभिरू काशीबाई गांगरून गेली. साखाजी याच्यासोबत सुखाचा संसार सुरू असतानाच एके दिवशी काशीबाईने आत्महत्या केली. तिचा मृतदेह अंबड येथील एका बारवेत सापडला. अंबड येथे ही बारव आजही आहे. +सती काशीची बारव+ म्हणून ही बारव ओळखली जाते.

अनंत गोपाळ कुडाळकरांची वाकेनिशीतले पुरावे

अनंत गोपाल कुडाळकर-वाकेणीस यांनी लिहिलेल्या ‘वाकेनिशी'त  काशीबाईची कथा आली आहे. काशीबाईला साखाजीसोबतचा विवाह मान्य नव्हता, त्यामुळे तिने बारवेत आत्महत्या केली, असे वाकेनिशीत म्हटले आहे. साखाजी-काशीबाईच्या विवाहाची कथाही वाकेनिशीत विस्ताराने आली आहे.

-अनिता पाटील 


Wednesday, 28 March 2012

बालाजीचा पैसा चोरांच्या खिशात


भ्रष्टाचाराने पोखरलेय तिरुपतीचे संस्थान


भारतातील सर्वांत श्रीमंत देव म्हणून ओळखल्या जाणा-या तिरुपती बालाजीला वर्षाकाठी २ हजार कोटींपेक्षाही जास्त दान भक्तांकडून मिळते. एखाद्या स्वतंत्र राज्यासारखा कारभार करणारे बालाजी संस्थानचे अधिकारी आणि पुजारी यातील कोट्यवधी रुपये मध्येच खाऊन टाकतात. आंध्र प्रदेश सरकारने केलेल्या एका चौकशीत ही माहिती समोर आली आहे. 

कापलेल्या केसातही खाल्ले जातात पैसे

बालाजीला केस कापणे, लाडू खरेदी, राहण्याची व्यवस्था, पुस्तके, दर्शन तिकिट, बस प्रवास, अधिकारी पुजाèयांच्या गाड्यांसाठी वापरले जाणारे पेट्रोल-डिझेल अशा सर्वच ठिकाणी करोडो रुपयांचा भ्रष्टाचार दरवर्षी होतो. किमान ५०० कोटी रुपये भ्रष्टाचारी मध्येच खाऊन टाकतात. आपण देवाला म्हणून दिलेला पैसा अशा प्रकारे बदमाश लोकांच्या हातात पडतो. वाईट कामांवर खर्च होतो. 

देवांचा पैसा खाण्यात ब्राह्मणच आघाडीवर

भारतात देवाच्या नावावर मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार चालतो. भोळ्या भाबड्या लोकांना फसविले जाते. हे वारंवार स्पष्ट होत असताना लोक फसतातच. देवाच्या नावावर फसणाèयांत बहुजन समाजाच्या लोकांची संख्या मोठी असते. तर देवाचे पैसे खाणाèयांत ब्राह्मणच आघाडीवर असतात. 

आता तरी हिन्दू धर्म सोडा

हिन्दू धर्माची आजची अवस्था ही अशी आहे. हा धर्म खरोखरच अरबी समुद्रात बुडविण्याच्या लायकीचा आहे. बहुजन समाजाने आता तरी सुधारावे. लूट करणाèया ब्राह्मणांना थारा देणार नाही, अशी शपथ घ्यावी. मराठा समाजाने धर्मांतर करावे 

...........................
टाईम्स ऑफ इंडियाने दिलेली बालाजी देवस्थानातील भ्रष्ट्राचाराची बातमी दिली आहे.  मूळ बातमी वाचण्यासाठी टाईम्स ऑफ इंडियाची लिन्क :

अनिता पाटील


Sunday, 25 March 2012

या पहा पु ल देशपांडेच्या अश्लील कोट्या

   
पु ल देशपांडेला लोक फारच सभ्य व सुसंकृत विनोद करणारा
लेखक मानतात परंतु हा मनुष्य स्त्रीयांच्या संदर्भात अत्यंत
हीन मनोव्रत्ती ने लेखन करीत होता हें सोदाहरण स्पष्ट
करता येयील

बाकी काही घालूच नये...?

१) "ती फुलराणी"च्या एका बाहेरगावच्या प्रयोगाच्या वेळी
भक्ती बर्वेने तिथल्या सराफा बाजारातून एक सुन्दर
नेकलेस आणला. त्याचे कौतुक करताना ती सहज
बोलून गेली " हा नेकलेस इतका सुंदर आहे की हा गळ्यात
घातलाकी बाकी काही घालूच नये असे वाटते .
यावर तिथे असलेल्या पु ल ला चोम्बडे पनाची खाज न
येयील तर नवल ? तो लगेच म्हणाला " अरे वा खरेच की काय ?"
या वर तेथील सगळे भट-नटमोगरे खिदाळून हसले. बिचाऱ्या
भक्ती बर्वेला मात्र जमीन पोटात घेयील तर बरे असे वाटले.
या प्रसंगाला " पु ल चा हजरजवाबी पणा " म्हणून गोंजारले जाते
परंतु ही एका सभ्य स्त्री ची हीन आणि विकृत कुचेष्टा आहे असे
आमचे मत आहे .

जयश्रीबाईंची पाश्वर्भूमी 

२ ) मराठीतील जेष्ठ अभिनेत्री जयश्री गडकर यांच्या संदर्भातील एक किस्सा
तर आणखीनच हीन मनोवृत्तीची पातळी गाठणारा आहे.
पुण्यातील एका समारंभात जयश्री गडकर यांचा सत्कार ठेवण्यात आला
होता आणि त्याला प्रमुख वक्ते म्हणून पु ल ना बोलावले होते
निवेदक पु ल ना भाषणाला बोलवण्या पूर्वी सहज पणे बोलून गेला की
" आता या नंतर भाई ( म्हणजे पु ल ) जयश्रीबाईंची पाश्वर्भूमी आपल्याला
उलगडून दाखवतील " यावर भाषणाला उभा राहिलेल्या पु ल ने अत्यंत निर्ल्लज्ज पणे
" जयश्रीबाईंची पाश्वर्भूमी मी देखील आपल्या प्रमाणेच दुरूनच
पाहिलेली आहे . ती चांगली आहे या पेक्षा त्या बद्दल अधिक
उलगडा करण्यास मी असमर्थ आहे " असे विधान केले.
शाब्दिक कोट्या आणि आपली हजरजवाबी प्रतिमा
टिकवण्य साठी हा "पन्नालाल "कोणत्या थराला
जात होता हेच यातून स्पष्ट होते.

मुका घेऊ का? 

३) एकदा एक नवोदित लेखिका एका कार्यक्रमात पु ल
ला भेटली आणि आपल्या मुलाला समोर करत म्हणाली
"भाई हा माझा मुका" ( तिच्या मुलाचे नाव मुकुल होते आणि
ती लाडाने त्याला "मुका" म्हणायची )
यावर हा भाई निर्ल्लज्ज पणे तोंड वेंगाडत (ही त्याची स्टाईलच होती )
म्हणाला " अरे वा गोड आहे ! मी घेतला तर चालेल ना ? "
नातीच्या वयाच्या मुलीशी या "पन्नालाल " ची ही भाषा !

वडारी समाजाच्या बायकांचा अपमान 

४) या पन्नालाल ने अगदी सीता, द्रोपदी आणि कृष्ण पत्नीनाही
सोडले नाही . कर्नाटकातील हुबळी येथे तेथील मराठी भाषिकांनी
मोठ्या हौसेने पन्नालाल (पु ल ) ला बोलावले होते. हा तेथे
कार्यक्रमाच्या आदल्या दिवशीच पोहचला. बरे पोटाला तडस
लगे पर्यंत श्रीखंड-पुऱ्या चापून झाल्यावर गुमान पालथे किंवा
उताणे पडून राहावे की नाही? पण च्छ्या ! पन्नालाल निघाला
उकिरडे फुंकायला ! बरे आला तो आला किमान जिथे खाल्ले
तिथे ओकू तरी नये ! परंतु ही सभ्यता पाळेल तो पन्नालाल
कसला दुसऱ्या दिवशी भाषणात " मला हुबळीतील वडारी
समाजाच्या बायकांचे खूप अप्रूप वाटले, त्या चोळ्या घालत
नाहीत...मी जरा जवळ जाऊन चौकशी केली तेंव्हा त्यांनी
निसंकोच पणे जि कहाणी सांगितली ( आणि याने निलाजरे पणाने
ती ऐकली) ती मनोरंजकच नाही तर आदर्श घेण्या सारखी आहे.
रामायण सीतेच्या चोळीच्या हट्टा मुळे घडले म्हणून आम्ही
चोळीच घालीत नाही असे मला त्या स्त्रीयांनी सांगितले.
खरे म्हणजे हा आदर्श तमाम स्त्री वर्गाने घ्यायला हरकत
नसावी म्हणजे रामायण तर घडणार नाहीच महाभारतही
पेटणार नाही ...दुशासन काय ओढणार ? कपाळ !
मला सांगा या किस्स्यात तुम्हाला पु ल चा नर्म विनोद
दिसतो की पान्नालालच्या दुगाण्या ?

मातृत्वाचा  अपमान करणारा पु. ल. 

5 ) पूर्व रंग या प्रवास वर्णनात "जपानी खानावळ नावाचे
एक प्रकरण आहे यात पन्नालाल जेव्हा एका खानावळीत
जातो तेंव्हा तेथील अगत्य पाहून भारावून (की हुरळून ?)
जातो. त्याचे वर्णन कसे केले आहे पहा " आत जाताच
तेथील वातावरण पाहून आपण स्वर्गातील एखाद्या
दालनात आल्या सारखे वाटले . तेथील गाद्या गिरद्या पाहून
थोडे हात पाय ताणून बसावे म्हटले तर तितक्यात चार पाच
ललनांनी माझा ताबा घेतला आणि माझे खांदे , हात पाय
चेपू लागल्या .एकीने माझी पाठ रगडायला घेतली ,आणि एकीने
तर चक्क टाळू माखायला सुरुवात केली. आता त्यांनी मातृत्वाचा
पुढचा टप्पा गाठला तर कसे ? म्हणून मी जरा बावरलोच.
+कृष्णाच्या अंतःपुरात कृष्ण सख्यांनी सुदाम्याचे काय हाल
केले असतील याचा प्रत्यक्ष अनुभव मला तेथे आला+
या प्रसंगात पन्नालाल ने जपानी आतिथ्य , आणि कृष्ण सख्या
या दोन्ही वरही दुगाण्या झाडल्या आहेत .

असे कितीतरी उदाहरणे आहेत; सगळेच इथे सांगण्याची आवश्यकता नाही
परंतु " शीत " किती वास मारतेय यावरून " भात'' किती विटलेला आहे
याची परीक्षा होते.

-रवींद्र तहकिक, औरंगाबाद.