Friday, 12 May 2017

शिवद्रोही पुरंदरेला विठ्ठलाने नाकारली भेट, महाद्वारातून जावे लागले परत

छत्रपती शिवाजी महाराज आणि जिजाऊ मासाहेब यांची बदनामी करणार्या बाबा पुरंदरे याला ९ मे २०१७ रोजी पंढरपूरच्या विठ्ठल मंदिर सुरक्षेसाठी असलेल्या कर्मचाऱ्यांच्या कठोर भूमिकेमुळे दर्शनाविनाच परतावे लागले. बाबा पुरंदरे विठुरायाच्या दर्शनासाठी ९ मे २०१७ रोजी दुपारी पंढरपूरला आला होता. मात्र मंदिर सुरक्षेला असलेल्या पोलिसांकडून त्यांना मंदिरात न सोडण्यात आल्याने पुरंदरेंला दर्शनाशिवाय परत फिरावे लागले. पोलिसांच्या रुपाने साक्षात विठ्ठलानेच पुरंदेला भेट नाकारली असल्याची प्रतिक्रिया पंढरपूरमध्ये उमटली आहे.

बाबा पुरंदरे येणार असल्याची माहिती मिळताच मंदिराचा एक कर्मचारी त्याच्यासोबत त्याला घ्यायला बाहेर आला. मात्र थेरड्या बाबाला वयोमानानुसार सारखीच धाप लागू लागल्याने त्याने जवळ असलेल्या पश्चिम दरवाजाने मंदिरात जायची इच्छा व्यक्त केली. मंदिराचे कर्मचारी आणि पुरंदरे याच्या सोबत असलेल्या त्याच्या स्वीय सहाय्यकाने त्यापद्धतीने तेथील पोलीस कर्मचाऱ्यांना विनंती केली. मात्र या दरवाजातून कोणालाही सोडता येणार नसल्याची ठाम भूमिका घेऊन पोलिसांनी पुरंदरेला दया दाखविण्यास नकार दिला. बाबा पुरंदरेला रुक्मिणी दरवाजापर्यंत चालत जाणे अशक्य बनल्याने त्याने अखेर फार नखरे ना करता दर्शनाविनाच परत जाणं पसंत केलं. विशेष म्हणजे बाबा पुरंदरे याने या प्रकरणी कोणाच्याही विरोधात तक्रार करण्याचे धाडसही दाखविले नाही. तो तोंड लपवीत आल्या पावली परत गेला. 

विठ्ठल मंदिरात तैनात असलेल्या पोलिसांचे शिव प्रेमी नागरिकांतून अभिनंदन केले जात आहे. पोलिसांच्या रुपाने साक्षात विठ्ठलानेच पुरंदेला भेट नाकारली असल्याची प्रतिक्रिया पंढरपूरमध्ये उमटली आहे.

2 comments:

  1. अरेरे! तीनचार महिन्यात कोणी इथे काहीच वाचलेलं दिसत नाही. नाहीतर आतापर्यंत उयटसुलट प्रतिक्रियांचा खच पडला असता. मंच ओस पडला वाटतं!!

    ReplyDelete
    Replies
    1. vijay bhate,
      ब्लॉग कसा वाचावा, याचेही तुम्हाला ज्ञान नाही. अहो, पेज व्ह्यूजकडे पाहा जरा. 834,510 आकडा पार करीत आहे ब्लॉग. वैचारिक लेखन करणा-या कोणत्याही मराठी ब्लॉगला एवढे पेज व्ह्यूज नाहीत. हा ‘नंबर वन’ ब्लॉग आहे. धड प्रतिक्रिया लिहिता येत नाही तुम्हाला. ब्लॉगची समीक्षा काय करता?

      जीवाला त्रास करून घेऊ नका. सत्य लगेच पचत नाही. हळूहळू पचेल.

      Delete