-राजा मइंद, कार्यकारी संपादक, अपाविमं.
"तुका सप्तशती" या ग्रंथालाच "वैकुंठ गाथा" असेही नाव आहे. या ग्रंथातच ते नमूद आहे. ग्रंथाचा कर्ता आधूत कोळी नामक कवी आहे. आधूत हा तुकोबांवर घालण्यात आलेल्या मारेक-यांचा म्होरक्या होता. आधूत हा शब्द अवधूतचा अपभ्रंश असावा, असे दिसते. आधूतने आपली कहाणी या ग्रंथात थोडक्यात कथन केली आहे. मारेकरी तुकोबांना मारायला गेले खरे; पण समाधी अवस्थेत असलेल्या तुकोबांच्या चेह-यावरील तेज पाहून ते घाबरले. त्यांच्या हातातील तरवारी आणि पलिते गळून पडले. तुकोबांना मारण्याऐवजी त्यांना मनोभावे वंदन करून मारेकरी परतले. नंतर आधूतला तुकोबांचा अनुग्रह झाला. त्याला अचानक काव्यस्फुर्ती झाली. त्याचे फलित म्हणजे हा ग्रंथ होय. स्वत: मारेक-यांपैकीच एकाने हा ग्रंथ लिहिलेला असल्यामुळे त्याचे ऐतिहासिक मोल प्रचंड मोठे आहे. "अपाविमं"चा संशोधक संघ त्यावर काम करीत आहे. हा ग्रंथ जेवढा उपलब्ध आहे, तेवढ्या स्वरूपात लवकरात लवकर प्रसिद्ध करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.
या ग्रंथाची भाषाही अद्वितीय आहे. यातील अनेक शब्द त्या काळातील बोलीभाषेतून उचलले आहेत, असे दिसते. त्यामुळे त्यांचा अर्थ लावणे हे जिकिरीचे काम आहे. मारेक-यांसाठी "वधियंते" असा शब्द त्यात वापरण्यात आला आहे. वधियंते हे अनेकवचनी रूप असून मूळ एकवचनी शब्द वधियंता असा आहे, असे दिसते. या ग्रंथात हुताशनी पौर्णिमा म्हणजेच होळीच्या दिवशीचा घटनाक्रम आठ ते दहा ओव्यांत आला आहे. हा घटनाक्रम असा :
तुकोबांना ठार मारण्यासाठी पाच मारेक-यांना उक्ते देण्यात आले होते. आधूत कोळी हा या पाचांचा म्होरक्या होता. उक्ते देणारे लोक वधियंत्यांना म्हणजेच मारेक-यांना घेऊन तुकोबांचे वास्तव्य असलेल्या भंडारा डोंगरावर जातात. वधियंत्याच्या हातात पेटते पलिते आणि नंग्या तलवारी असतात. तुकोबांच्या जवळ आल्यानंतर वधियंत्यांचा म्होरक्या आधूत हा वधियंत्यांना इशारा करतो. वधियंते पुढे सरसावतात. पण, समाधी अवस्थेतील तुकोबांच्या चेह-यावरील प्रचंड तेज पाहून ते घाबरतात. त्यांच्या सर्वांगाला कंप सुटतो. त्यांच्या हातातील पेलिते आणि तलवारी गळून पडतात. घाबरलेले वधियंते तुकोबांना विनम्रपणे वंदन करतात. तलवारी आणि पलिते तेथेच सोडून वधियंते निघून जातात. मारेकरी घालणारे टोळके मग पुढे होते. पलिते आणि तलवारी उचलून हे लोक तुकोबांवर वार करतात. तुकोबांना ठार मारून ते पळून जातात. या मारेक-यांना ग्रंथकत्र्याने वोखटे अशी उपाधी वापरली आहे. वोखटे म्हणजे ओंगळ, अमंगळ, वाईट.
तुकोबांची हत्या झाल्यानंतरच्या क्षणाचे भयकारी चित्र ग्रंथकत्र्याने उभे केले आहे. आधूत लिहितो की, तुकोबांची हत्या झाल्यानंतर संपूर्ण धरणी डळमळली, पृथ्वीला आपल्या मस्तकावर धारण करणारा शेष नारायणही मनात भयकंपित झाला. आकाशात अग्निकल्लोळ होऊन अनेक तारे कोसळले. अवघ्या काही क्षणांत हा सर्व प्रकार घडून आला.
वैकुंठ गाथा या ग्रंथातील तुकोबारायांच्या हत्येशी संबंधित मूळ ओव्या पाहा (वाचकांच्या सोयीसाठी ओव्यांना क्रमांक देण्यात आले आहेत.) :
तव तो कोलियांचा धुरी । पांचाशी इशारा करी ।
घाला म्हणे घाव झडकरी । तरवारीशी ।।१।।
घाला म्हणे घाव झडकरी । तरवारीशी ।।१।।
पुढे जाले वधियंते । परी आंगा कांपाचे भरिते ।
हातीयेचे तरवार पलिते । गळोनि पडती ।।२।।
हातीयेचे तरवार पलिते । गळोनि पडती ।।२।।
स्वामी समाधीशी तपोनिधी । तेज पसरले चहुविधी ।
वधियंते चरणा आधी । वंदोनी निघती ।।३।।
वधियंते चरणा आधी । वंदोनी निघती ।।३।।
सावध बाघण आवटे । उचलिती तरवार दिवटे ।
घाव घालुनि वोखटे । वेगळाले पळाले ।।४।।
घाव घालुनि वोखटे । वेगळाले पळाले ।।४।।
डळमळिली धरणी । शेष भय कंपिला मनी ।
अग्नि कल्लोळ तारांगणी । देखत खेवो ।।५।।
अग्नि कल्लोळ तारांगणी । देखत खेवो ।।५।।
ओव्यांतील कठीण शब्दांचे अर्थ :
कोलियांचा - कोळ्यांचा.
धुरी - प्रमुख, म्होरक्या.
पांचाशी - पाच जणांना.
तरवार - तलवार
झडकरी - लवकर.
वधियंते - मारेकरी. ठार मारण्यासाठी आलेले लोक.
आंगा - अंगाला.
कांपाचे भरिते - थरकापाचे भरते
हातीयेचे - हातातील.
पलिते - दिवट्या, मशाली.
चहुविधी - चहुकडे
दिवटे - पलिते. मशाली.
देखत खेवो - देखता क्षणी
ओव्यांचा क्रमश: अर्थ :
तेव्हा तो कोळ्यांचा म्होरक्या पाचांना इशारा करतो. तलवारीने लवकर घाव घाला असे त्यांना सांगतो. ।।१।।
मारेकरी पुढे झाले, परंतु त्यांच्या अंगाला कापरे भरले. हातातील तलवारी आणि पलिते गळून पडले. ।।२।।
तपोनिधी असलेले स्वामी (तुकोबाराय) समाधीत होते. त्यांचे तेज चहुकडे पसरले होते. मारेक-यांनी आधी चरणांना वंदन केले आणि मग ते निघून गेले. ।।३।।
तेव्हा सावध असलेले बाघण आवटे तलवारी आणि दिवट्या उचलतात. हे अमंगळ लोक तुकोबांवर घाव घालतात. मग वेगवेगळे होऊन पळून जातात. ।।४।।
(त्यानंतर) धरणी डळमळित होते. शेष मनात भयकंपित होतो. आकाशात अग्निकल्लोळ होतो. (तारे कोसळतात.) ही सर्व चिन्हे पाहता पाहता घडून येतात. ।।५।।
अर्थ न लागलेले शब्द
या ओव्यांतील बाघण आणि आवटे या दोन शब्दांचे अर्थ नीट लागत नाहीत. बाघण हा शब्द मूळचा ब्राह्मण असावा. ग्रंथाचे हस्तलिखित प्रत तयार करताना चुकून ह्मचा घ झाला असावा. qकवा हेतूत:ही असे केले गेले असावे. बाघण या शब्दाच्या अचूक अर्थ निदानासाठी आम्ही अनेक पर्याय तपासून पाहिले. हा शब्द बावन्न असावा, अशी एक शक्यता वाटते. ती गृहीत धरल्यास मारणारे लोक एकूण ५२ जण होते, असा अर्थ काढता येतो. तिसरी एक शक्यता अशी की, बाघण हाच मूळ शब्द असावा. ते मारेकèयांपैकी कोणाचे आडनाव असावे. आवटे या शब्दाचा काहीच उलगडा होत नाही. तुकोबांना मारणारे हे लोक आवटे आडनावाचे असावेत, अशी एक शक्यता असू शकते. पण त्याबाबत ठोस काहीच सांगता येत नाही.
संबंधित लेख
तुकोबांचा खून झाला आणि ते सदेह वैकुंठगालाही गेले!
अशी झाली तुकोबांची हत्या
ब्राह्मण तुकोबांवर का चवताळले? भाग-१
ब्राह्मण तुकोबांवर का चवताळले? भाग- २
संबंधित लेख
तुकोबांचा खून झाला आणि ते सदेह वैकुंठगालाही गेले!
अशी झाली तुकोबांची हत्या
ब्राह्मण तुकोबांवर का चवताळले? भाग-१
ब्राह्मण तुकोबांवर का चवताळले? भाग- २