Tuesday 13 November 2012

मा. गो. वैद्य अस्वस्थ का झाले?

मा. गो. वैद्य
दिवाळीसाठी सुटी घेतली आहे. थोडासा निवांत वेळ आहे. म्हणून नेटवर भारतीय राजकारणाच्या बातम्या चाळत बसलीये. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी प्रवक्ते मा. गो. वैद्य यांनी गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्यावर केलेल्या शरसंधानांनी लक्ष वेधून घेतले. वैद्यबुवा नागपूर तरुण भारतमध्ये +भाष्य+ नावाचा कॉलम लिहित असत. काही वर्षांपूर्वी त्यांचे तरुण भारतशी वाजले. अलीकडे वैद्यबुवांनी नेटावर ब्लॉग लेखन सुरू केले आहे. वैद्यबुवांनी मोदी आणि जेठमलानी यांच्यावर जे काही नथीतून तीर सोडले आहेत, ते याच ब्लॉगवरून. वृत्तपत्रांतून आलेल्या बातम्यांत वैद्यबुवांच्या एकाच लेखाचा उल्लेख आला आहे. वस्तुत: वैद्यांच्या ब्लॉगवर याच विषयावरचे तीन लेख आहेत. तिन्ही लेखांचा सूर आणि ताल एकच आहे. भाजपाचे अध्यक्ष नितीन गडकरी यांचा भ्रष्टाचार उघडकीस आल्यामुळे संघातील ब्राह्मण लॉबी विद्ध झाली आहे. या जखमांचे हुंकार म्हणजेच वैद्यबुवांचे हे लेख होत.
वैद्यबुवांच्या ब्लॉगवरील लेख कोणते ते आधी पाहू -
१. नीतीन गडकरी, रॉबर्ट वढेरा आणि भारत सरकार (२८ ऑक्टोबर २०१२),
२. माहितीचा अधिकार आणि सरकारची लटपट (४ नोव्हेंबर २०१२)
३. भाजपाची अ-स्वस्थता (११ नोव्हेंबर २०१२) 

+भाजपाची अस्वस्थता+ हे सर्वांत ताज्या लेखाचे शीर्षक चुकीचे आहे. ते +रा. स्व. संघाची अस्वस्थता+ असे असायला हवे होते. किंबहुना हे तिन्ही लेख याच एका शीर्षकाखाली टाकले असते, तरी चालले असते. भाजपाध्यक्ष नितीन गडकरी यांचा भ्रष्टाचार उघडकीस आल्यामुळे रा. स्व. संघ अस्वस्थ आहे. संघाची ही अस्वस्थता वैद्यबुवांच्या तिन्ही लेखांतून व्यक्त झालेली दिसून येते. नितीन गडकरी यांचा कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार दडवताना वैद्यबुवांची भयंकर त्रेधातिरपीट झालेली आहे. त्यासाठी ‘संघोट्यां'चे सर्व हातखंडे वैद्यबुवांनी वापरले आहेत. पण अडचण अशी आहे की, कितीही झाकण्याचा प्रयत्न केला, तरी गडकरींचा भ्रष्टाचार झाकलाच जात नाहीय. मग त्यातून कमालीची अस्वस्थता येते. तगमग होते. काही अंशी जळफळाटही होतो. शेवटी होते असे की, आपण काय युक्तिवाद करीत आहोत, याचे भानही वैद्यबुवांना राहत नाही. काँग्रेसच्या नेत्यांवर जे काही आरोप झाले ते म्हणजे भ्रष्टाचार, पण गडकरींवरील आरोप म्हणजे भ्रष्टाचार नव्हेत, असा विचित्र निष्कर्ष वैद्यबुवा काढून मोकळे होतात. हा युक्तिवाद संघोट्यांना साजेसाच आहे. गडकरींचा भ्रष्टाचार झाकण्यासाठी वैद्यबुवा रॉबर्ट वधेरा यांच्यावरील आरोप पुढे करतात. वैद्यबुवांचे सर्वांत गमतीशीर वाक्य पाहा : + वढेरांचा मामला, तसे म्हटले तर कॉंग्रेसचाही मामला नाही. एका खाजगी व्यक्तीचा मामला आहे. त्यांच्यासाठी कॉंग्रेस प्रवक्ते मनीष तिवारी व राजीव शुक्ला यांनी स्पष्टीकरणे देण्याचे कारण काय? गडकरींचा पूर्ती उद्योग काय सरकारी उद्योग आहे? की भाजपाचा तो उद्योग आहे? की त्या उद्योगांचे जे भागधारक आहेत, त्यांनी सरकारकडे तक्रार करून चौकशीची मागणी केली आहे? +

गडकरी यांना सात भ्रष्टाचार माफ आहेत का?
रॉबर्ट वधेरांच्या कथित गैरव्यवहारांबाबत काँग्रेसच्या प्रवक्त्यांनी स्पष्टिकरण देण्याचे कारण काय, असा प्रश्न वैद्यबुवा येथे उपस्थित करीत आहेत. माझ्याही मनात असाच प्रश्न निर्माण झाला आहे. नितीन गडकरी यांच्या भ्रष्टाचाराबाबत मा. गो वैद्य यांनी स्पष्टिकरणे देण्याचे कारण काय? वैद्यबुवांचा पुढचे प्रश्न पूर्ती उद्योगाच्या चौकशीला विरोध दर्शविणारे आहेत. गडकरींचा पूर्ती उद्योग हा सरकारी उद्योग नाही, त्यामुळे त्याची चौकशी करता येणार नाही, अशी अजब भूमिका वैद्यबुवांनी घेतली आहे. कोळसा घोटाळ्यातल्या सर्व कंपन्या खाजगीच होत्या. त्यांचीही चौकशी केली जात आहे. मग नितीन गडकरी यांच्या कंपनीची चौकशी का नको? हॉलीवूडच्या जेम्स बॉन्डला सात खून माफ आहेत, तसे गडकरी यांना सात भ्रष्टाचार माफ आहेत का? या प्रश्नांची उत्तरे नितीन गडकरी देऊ शकणार नाहीतच, पण त्यांचे वकीलपत्र घेऊन लढणारे मा. गो. वैद्यही देऊ शकणार नाहीत. 

भ्रष्टाचाराची पाळेमुळे थेट रेशिम बागेपर्यंत!
नितीन गडकरी यांचा भ्रष्टाचार उघडकीस आल्यामुळे मा. गो. वैद्य आणि रा. स्व. संघ यांना अस्वस्थ होण्याचे कारण काय? कारण असे की, गडकरी यांच्या भ्रष्टाचाराची पाळेमुळे थेट रेशिम बागेपर्यंत रुतलेली आहेत. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी याचा पर्दाफाश केला आहे. संघाचे मुख्यालय बांधायला गडकरी यांनी पैसा पुरविला आहे, असे माणिकरावांनी जाहीररित्या सांगितले आहे. त्यातून ही अस्वस्थता आली असणार, हे उघडच दिसते. 

संघाचा गेम प्लॅन फसला म्हणून तडफडात 
रा. स्व. संघ ही महाराष्ट्रातील ब्राह्मणांमार्फत ब्राह्मणांसाठी चालविली जाणारी संघटना आहे. तिचे भाजपावर नियंत्रण असते, हे सर्वश्रूत आहेच. भाजपावर ब्राह्मणांचे पूर्ण नियंत्रण कसे राहील, याबाबत संघ नेहमीच दक्ष असतो. त्यासाठी संघाने नितीन गडकरी यांना राजकारणात डेप्युटेशनवर पाठविलेले आहे. २०१४ च्या निवडणुकीनंतर देशात पुन्हा भाजपाच्या नेतृत्वाखालील सरकार आलेच तर पंतप्रधान ब्राह्मणच असावा, असा संघाचा मूळ गेमप्लन आहे. नितीन गडकरी यांनाच पंतप्रधान करण्याचा संघाचा अंतस्थ हेतू आहे. पण गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी या प्लॅनला सुरुंग लावला आहे. मोदींना स्वत:च पंतप्रधान व्हायचे आहे. मोदी हे संघाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार कधीच नव्हते. कारण मोदी ब्राह्मण नाहीत. मोदी यांना संघ कधीही पंतप्रधान करणार नाही, असे विश्लेषण मी या आधी एका लेखात केले होते. ते आता जवळपास खरे ठरले आहे. संघाच्या लेखी मोदींचे महत्त्व बुद्धिबळाच्या पटावरील प्याद्याएवढेच आहे. गुजरातेत मुस्लिमविरोधी दंगल घडवून मोदींचा संघाकडून वापर करून घेण्यात आला आहे. पण मोदी हे चलाख आहेत. संघाचा गेमप्लॅन हाणून पाडण्यासाठी त्यांनी संघाच्या माणसांचा गेम सुरू केला. आधी त्यांनी संजय जोशी यांना खड्यासारखे दूर सारले. आता गडकरींना आणि त्यांच्या बरोबर संघाला भ्रष्टाचाराच्या गाळात रुतवले आहे. एका बदमाशाने दुसऱ्या बदमाशावर केलेली ही कडी आहे. मोदीविरुद्ध संघ या झगड्याबाबत मा. गो. वैद्य यांनी काही गोष्टी उघडपणे लेखात लिहिल्या आहेत. वैद्यबुवा लिहितात : +नरेंद्र मोदींना हे वाटत असावे की गडकरी पक्षाध्यक्ष असतील, तर आपली प्रधान मंत्री बनण्याची महत्त्वाकांक्षा पूर्ण होऊ शकणार नाही. त्यांना हेही दाखवायचे असू शकते की, संजय जोशी प्रकरणात जसे आपण गडकरींना वाकवू शकलो, त्याचप्रमाणे याही बाबतीत आपण त्यांना हतप्रभ करू शकतो. त्यासाठीच ते जेठमलानींचा उपयोग करून घेत असतील.+ 

असो. नरेंद्र मोदी यांनी संघाच्या तंगड्या सध्या संघाच्याच गळ्यात घातल्या आहेत. मोदी हे संघाला छळणार असे स्पष्टपणे दिसून येत आहे. 

-अनिता पाटील


दिवाळीनंतर वाचा -    भाजपात ब्राह्मणविरुद्ध बहुजन संघर्ष

No comments:

Post a Comment