Friday 5 October 2012

टिळकांची दलित विरोधी पत्रकारिता

 प्रा.रवींद्र  तहकिक

केशव उर्फ बाळ गंगाधर टिळक....या माणसाला नेमकी काय उपमा द्यावी ? सावरकराना प्र के अत्रे यांनी एकदा " काचेच्या कपाटातील सिंह " असे म्हटले होते स्वतः हस्तिदंती मनोर्यात सुरक्षित राहून समजा मध्ये असंतोष निर्माण होयील विशेषतः तरुणाची डोकी भडकतील अशी विधाने करणे, लिखाण करणे आणि त्यांना
भरीस पाडून त्यांच्या हातून विध्वंसक घटना घडवून आणणे ही एक विशेष पद्धत असते. टिळक , सावरकर आणि त्या नंतर बाळ ठाकरे ही या अशा समाजात असंतोषाचे विष पसरवणाऱ्या प्रवृत्तीची ठळक उदाहरणे.  हें स्वतः पुढे होऊन कधीच काही करत नाहीत. यांचा जो काही दम असतो तो सगळा तोंडात. त्या जोरावर हें आपल्या मनातील विध्वंसक प्रवृत्तीला वाट देतात. आपल्या या समाजविघातक विचारला राष्ट्रवादाचे/ धर्माभिमानाचे/ संस्कृती रक्षणाचे गोंडस नाव देतात आणि यावर घाला होत आहे अशी ओरड करीत आपल्या अतिरंजित व भडकाऊ भाषणे आणि लिखाणातून तरुण पिढीची दिशाभूल करून त्यांच्या हातून हत्या / जाळपोळ /दंगली इत्यादी विध्वंसक कृत्य घडवून आणतात भारताच्या राजकीय इतिहासातील या प्रवृत्तीचा जनक कोण असेल तर ते म्हणजे बाळ गंगाधर टिळक !

रँडची हत्यापुण्यात प्लेग ची साथ थेमान घालत होती . हजारो लोक मृत्यूमुखी पडले होते. रोज ही संख्या वाढत होती.
प्लेगची साथ ज्या पिसवा मुळे पसरत होती त्यावर नियंत्रण करण्यासाठी जे बाधित आहेत त्यांना औषध उपचार करण्याची आणि घर घरात औषध फवारणी करण्याची गरज होती. परंतु पुण्यातील सनातनी ब्राम्हण सरकारच्या तपासणी आणि फवारणीला विरोध करत होते. आमच्या घरात आणि देवघरात इंग्रज मुद्दाम महार शिपायांना ( महार रेजिमेंट ) घुसवत आहेत आणि आमची घरे भ्रष्ट करीत आहेत आसा कांगावा पुण्यातल्या ब्राम्हणांनी सुरु केला. बाळ गंगाधर टिळक यांनी या आगीत आपल्या भडक आणि चिथावणीखोर अग्रलेखांनी आणखीनच तेल ओतले. " सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय ? " हा अग्रलेख टिळकांनी राष्ट्रवादी भूमिकेतून लिहिलेला नाही. प्लेगचा उंदिर परवडला, पण महार सोल्जर नको, अशी अत्यंत जातीय भूमिका ब्राह्मणांनी घेतली. या ब्राह्मणांचे नेतृत्व त्याकाळी टिळकांनी आणि त्यांच्या केसरीने केले. केसरीमधून रँडविरोधात ज्वल:जहाल अग्रलेख येऊ लागले. ‘सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय?' हा त्यातलाच एक अग्रलेख होय. या अग्रलेखाचा हा काळा इतिहास दडवून ठेवला जातो. कारण त्यातून ब्राह्मणांचे अडाणीपण आणि जातीयवाद उघड होतो. प्लेग निवारणासाठी झटणा-या रँडच्या विरोधात टिळकांनी इतके वातावरण तापविले की, शेवटी त्यात रँडचा बळी गेला. रँड आणि त्याच्या प्लेगला आळा घालण्या साठीच्या उपाय योजना विरुद्ध टिळकांनी विरोधी बातम्या आणि अग्रलेखांची मोहीमच उघडली होती त्या पैकी हें काही नमुने पहा

प्लेगचे उंदीर बायकांच्या लुगडी-चोळ्यात आहेत काय ?
रँड साहेब आणि त्याच्या सरकारने प्लेगच्या उंदरांची एवढी धास्ती घेतली आहे की
     ते शोधण्यासाठी रँड साहेबाचे आवडते महारसोल्जर आमच्या लेकी बाळींची लुगडी
    फेडून बघत आहेत. चोळ्या काढायला लाऊन बगलेत गाठ आहे किंवा काय हें चाचपत
    आहेत. कुणाला ताप असेल तर लगेच त्यांना पालथे निजवून नितंब उघडे करून त्यावर
    सुया टोचत आहेत. जी आमची ग्रहलक्ष्मी  आपल्या पतीच्या शेजेवर देखील शरीरलज्जा
    संभाळते तिचे असे रस्तोरस्ती होणारे जाहीर वस्रहरण पाहून कुणातरी भीमाचे
   बाहू स्फुरण पावणार आहेत की नाही ? कुणी तरी या रँड रुपी दुशासानाची
   छाती फोडून त्या रक्ताने या विटंबित द्रोपादींच्या अवहेलनेचा सूड घेणार आहे की नाही ?
   इथे एक तरी नर अर्जुन आहे काय ? की सर्व शिखंडी आहेत असे आम्ही समजायचे ?

उंदरा बरोबर गणेशावरही फवारणी
रँडसाहेबांच्या फवारणीचा मोर्चा आता आमच्या घरात माजघरात पोहचला
     आहे , रँडसाहेबाचे लाडके महार सोल्जर पायातल्या खेटरा सगट फवारणीचे
     धोटे घेवून आमच्या घरात घुसतात. घरातले समान रस्त्यावर फेकून देतात
     हें कमी म्हणून की काय आमच्या देवघरात घुसून उंदरा बरोबर आमच्या
     विघ्नहर्त्या गणेशावरही फवारणी करण्या पर्यंत यांची मजल गेली आहे

वरील अग्रलेख कुणी सुज्ञ आणि विचारी माणसाने लिहिला असेल असे वाटते काय ?
प्लेग सारख्या भयानक साथीला आटोक्यात आणण्यासाठी सरकारच्या उपाय योजना
आणि प्रयत्नांना सहकार्य म्हणून लोकजागृती करण्याचे काम करण्या एवजी टिळकांनी
आपल्या लेखणी आणि वृत्तपत्राचा वापर लोकात गैरसमज पसरवन्यासाठी केला
यातूनच पुढे चाफेकर बंधूनी रँडची हत्या केली. तापलेल्या वाळूवर ज्या प्रमाणे लाह्या भाजून
घेतल्या जातात त्या प्रमाणे तापलेल्या वातावरणात आपला मतलब साध्य करण्यात  टिळकांचा
हातखंडा होता

     

वाचा पुढील लेख :
१ )  भुईमुग शेंगाच्या आणि  रात्र भर जागून सोडवलेल्या गणिताच्या खोट्या गोष्टी 
२ ) शिवजयंती सुरुवात निव्वळ थाप
३ ) आगरकराना वापरले आणि कोपर्यात फेकले
४ ) शाहू महाराजांच्या सुधारणा कामात खोडा

No comments:

Post a Comment