Monday 1 October 2012

आता लोकांना ठरवू द्या !!

प्रा. रवींद्र तहकिक
खरे तर आम्ही अजित दादा पवार आणि त्यांचा राजीनामा या  विषयावर 
आमचे जे मत मांडले ते केवळ महाराष्ट्राच्या राजकारणातील एक महत्वाची
घटना म्हणून ; अनिता पाटील विचारमंचचा  अजित पवार आणि त्यांचे राजकीय
अस्तित्व किंवा भवितव्य याच्याशी कुठलाही भूमिकात्मक अथवा धोरणात्मक
संबंध नाही.
       परंतु बऱ्याच वाचकांनी आमच्या ' असे धाडस फक्त पवारच करू शकतात "
या लेखावर फेसबुक आणि ब्लोग वर शंकास्पद प्रतिक्रिया दिल्या आहेत. म्हणूनच
या विषयावर आम्हाला पुन्हा एकदा लिहिणे आवश्यक आहे .
       अजित पवार यांनी सिंचन प्रकल्पात किंवा त्या आधीच्या विविध खात्यात
मंत्री म्हणून काम करताना तसेच अर्थ आणि नियोजन मंत्री व उपमुख्यमंत्री म्हणून
काम करताना अमर्याद भ्रष्टाचार केला असे आपण गृहीत धरू ! त्याची एखाद्या समिती द्वारे
सीबीआय द्वारे किंवा आणखी कुठल्या कायदेशीर प्रक्रीये द्वारे चौकशी व्हावी; श्वेतपात्रिका
काढावी; दोषी ठरल्यास वाटेल ती सजा भोगण्यास मी तयार आहे ! असे खुद्द अजित पवार म्हणत
आहेत. आणि हे काम निष्पक्षपाती पणे व्हावे म्हणूनच आपण मंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे
असेही त्यांनी स्पष्ट सांगितले आहे.
         आम्ही फक्त त्यांच्या या धाडसी निर्णयाचे स्वागत केले. आम्ही असेही म्हटले की
असे धाडस खुद्द मोठे पवार ( शरद पवार देखील कधी करू शकले नाहीत ) आम्ही आमच्या
लेखात अजित पवार निष्कलंकच  आहेत असे कुठेही म्हटलेले नाही. कदाचित ते दोषी असुशकतात
किंवा असतीलही परंतु ते निश्चित करण्याची जबाबदारी आता या बाबत आरोप करणाऱ्या
मंडळींची आहे. त्यांना त्यांचे काम विना अटकाव करता यावे म्हणून अजित पवार यांनी आपला
अडथळा स्वतःहून दूर केला; त्यांचा हा निर्णय अतिशय योग्य आहे, भ्रष्टाचाराचे आरोप
होणार्या अन्य मंत्र्या साठी अनुकरणीय आहे ; म्हणूनच स्वागतार्ह आहे. एवढेच आमचे म्हणणे आहे .या निमित्ताने त्यांनी एक चांगला पायंडा पाडला आहे. आणि आम्ही त्यांच्या या धाडसी
निर्णयाचे या मुद्या पुरते स्वागत केले आहे; समर्थन नव्हे !!
        अनेक मंत्री हातात बेड्या पडे पर्यंत सत्तेच्या वळचणीला राहून आपला बचाव करण्या साठी
वाटा पळवाटा शोधण्याचा प्रयत्न करतात आणि पक्षाने हकालपट्टी करे  पर्यंत खुर्चीला चिकटून
राहतात. अजित पवार यांनी मात्र थेट मैदानात उतरून दोनहात करण्याचा निर्णय घेतला आहे .
अजित पवार खरोखर दोषी असतील तर त्यांच्यावरचे आरोप सिद्ध करण्याची आणि त्यांना रॉबीन हूड ठरू न देण्याची जबाबदारी आता अर्थातच आरोप करणाऱ्यांची आहे.
          यात कोण यशस्वी ठरतो हे आता कालच ठरवेल


No comments:

Post a Comment