Tuesday 29 November 2011

बिनडोक बहुजनांचा ब्राम्हणवाद

सौजन्य : महावीर सांगलीकर


महावीर सांगलीकर हे मराठी ब्लॉग विश्वातील एक मोठे नाव. बहुजाजन समाजाला जागविण्याचे काम ते गेले वर्षभर नेटाने करीत आहेत. तथापि, बहुजन समाजाकडून त्यांना आलेला अनुभव फारच वाईट आणि निराश करणारा आहे. त्यावर महावीर भाई यांनी लिहिलेला हा लेख माझ्या वाचकांसाठी देत  आहे. 

................................................................................................

महावीर सांगलीकर लिहितात :


अलीकडील कांही घटनांवरून मी बहुजनांतील भटाळलेल्या टाळक्यांना वैतागलेलो आहे. बहुजनांचे प्रबोधन करणे ही फारच अवघड गोष्ट आहे. बहुतेक बहुजन हे स्वत:चे डोके वापरत नसल्याने त्यांचे प्रबोधन होवू शकत नाही. केवळ यामुळेच बहुजनांवर गेली हजारो वर्षे ब्राह्मणांचे धार्मिक आणि सांस्कृतिक राज्य आहे.

ब्राम्हणवाद पसरवण्यासाठी ब्राम्हणांची कांहीच गरज नाही. भटाळलेले बहुजन ते काम ब्राम्हनांपेक्षा हिरीरीने आणि इमाने-इतबारे करत आहेत, तेही फुकट. त्यांना या कामासाठी कसल्या मोबदल्याची गरज नाही. ब्राम्हण लोक ब्राम्हणवाद त्यांच्या स्वार्थासाठी आणि बहुजनांचे धार्मिक शोषण करून करत आहेत, वर त्यासाठी बहुजनांच्या खिश्यातूनच दक्षिणा घेत आहेत. भटाळलेले बहुजन मात्र हे काम धर्मकार्य म्हणून तन-मन-धनाने करत आहेत.

हे बिनडोक बहुजन शाहू महाराज, महात्मा गांधी, महिला, 'हिंदू' उर्फ ब्राम्हण धर्म सोडून इतर धर्म यांच्यावर विकृत बुद्धीने अचकट विचकट विनोद करत असतात. अर्थात हे विनोद ही त्यांचीनिर्मिती नसते (त्यांना कोठे एवढे डोके असते?), तर ते ओरिजिनल ब्राम्हणवाद्यांनी तयार करून समाजात सोडलेले असतात. बिनडोक बहुजन असे विनोद पसरवण्याचे काम करत असतात. अगदी आवडीने, कारण त्यांना असल्याच प्रकारचे विनोद कळत असतात. या भटाळलेल्या बहुजनांना राणी लक्ष्मी बाई बद्दल भरपूर माहिती असते, पण ताराराणी कोण हे देखील नीट माहीत नसते. त्यांचे आदर्श पळपुटे माफीवीर असतात, पण नाना पाटील कोण हे माहीत नसते. ब्राम्हण जो इतिहास सांगतील आणि लिहितील तोच इतिहास त्यांना खरा वाटत असतो. 

भटाळलेले बहुजन हे बहुजनातील बहुजन असल्यामुळे ब्राम्हणविरोधी अल्पसंख्य बहुजन हे ब्राम्हणवादाविरुद्धच्या लढाईत कधीच यशस्वी होवू शकणार नाही.

ब्राम्हणवादी ब्राम्हण खाजगीत म्हणत असतातच की,
असे कित्येक फुले 
आले आणि गेले
 
आमचे कांही 

वाकडे नाही झाले......

आणि ते खरेच आहे, म्हणून तर मूठभर ब्राम्हण पोतेभर बहुजनांना हजारो वर्षे मूर्ख बनवू शकतात. बहुजन केवळ बहुजन आहेत म्हणून ही लढाई जिंकू शकत नाहीत. संख्याबळाने लढाई जिंकता आली असती तर शेकडो हरणांच्या कळपाने त्यांच्यावर हल्ला करणा-या २-४ लांडग्यांचा सहज पराभव केला असता.

ब्राम्हण का जिंकतात हे त्यांना अजूनही कळलेले नाही, ज्या कांही थोड्या लोकांना कळले आहे त्यांना समाजाची साथ नाही. त्यामुळे भटाळलेल्या बहुजनांचे प्रबोधन करणे म्हणजे दगडावर डोके आपटून घेण्यासारखे आहे.  

1 comment:

  1. ब्राम्हण जिंकतात त्यांच्या शिक्षणा मूळ

    बहुजन शिक्षाणात माघे आहेत आणि
    ढाब्या वर पार्ट्या करण्यात पुढे

    आपले दुर्गुण पहा ज़रा

    ReplyDelete