Sunday 20 November 2011

विकास गोडसे यांचे झणझणीत अंजन


सत्य लिहिले की, बी-ग्रेडींचे म्हणजेच ब्राह्मण गे्रडवाल्यांचे पित्त खवळते. विचारांचा विरोध करण्याऐवजी बाष्कळ बडबड हे लोक करतात. पूर्वी ब्राह्मण यात आघाडीवर होते. आता त्यांची बडबड कमी झाली आहे. परंतु बिगर जानव्यांच्या ब्राह्मणांची एक फौज अजून या देशात आहे. ब्राह्मणवादाने डोके फिरविलेले हे बहुजन फार विचित्र वागतात. विचित्र लिहितात. त्याला कोणत्याही मुद्यांना कशाचाही आधार नसतो. मी अशा पोस्टवर कॉमेंट देण्याचे टाळते.

अशा या प्रतिकूल वातावरणात मी लिखाण करीत असते. मात्र काही वेळा सुखद अनुभवही येतो. काही विचारी लोक संयमीपणे आपले म्हणणे मांडतात. काही समर्थकांच्या प्रतिक्रिया सुखद असतात. विकास गोडसे यांची प्रतिक्रिया अशीच सुखद होती. त्यांनी मला पाठींबा  तर दिलाच. शिवाय असंबद्ध बडबड करणारांचे कानही उपटले. कान उपटताना त्यांनी संयम मात्र ढळू दिला नाही.
विकास भैय्याची प्रतिक्रिया ब्लॉगच्या तमाम वाचकांसाठी देत येथे आहे :

" ... ब्लॉग वर कृपया विषयाला अनुसरून प्रतिक्रिया मांडाव्यात. आमच्या सारखे वाचक संभ्रमात पडतात. अशा प्रतिक्रिया फेसबुक किंवा ऑर्कुट वर बघायला मिळतात. येथे विषय श्यामच्या आईचा आहे. मी तो वाचला. अनिता पाटील ह्यांच्या विचारांशी मी १०० % सहमत आहे. श्यामची आई ही फक्त ब्राम्हण असल्यामुळे तिचा उदो उदो केला जातोय. जे शिळे अन्न आपण खात नाही ते कोणत्याही मनुष्य प्राण्यास देऊ नये. शिळे अन्न देणे काय किंवा मोळी विकत  घेणे काय शुद्ध व्यवहारीपणा दिसतो. सध्या आपले "top १०" लेख वाचतोय. पहिल्या लेखातच अनिता पाटील ह्यांचे अभ्यासपूर्ण विश्लेषण पूर्वग्रह दुषित नसल्याचे जाणवले. त्यांच्या निर्भीडपणाला आणि आत्मविश्वासाला सलाम. 


....ब्राम्हणांनी भीक मागून स्वतःचा उत्कर्ष केला आहे. तरीही समाज ह्या भिकाऱ्यांना भीक का घालतो हे कळत नाही. ब्राम्हणांच्या विचारांना खतपाणी घालणे बंद केले पाहिजे. ..."

विकास गोडसे यांच्या प्रमाणेच विरोधकही संयमीपणा दाखवितात. अशा विरोधकांबद्दल मला नेहमीच आदर वाटत आला आहे. या लोकांनी खरोखरच काही तरी वाचलेले असते. त्या बळावर ते युक्तिवाद करीत असतात. त्यांची मते मला पटली पाहिजेत असा काही नियम नाही. पण त्यांच्या मतांचा मी आदर करते. कारण मला माझी मते मांडण्याचा जसा अधिकार आहे, तसाच त्यांनाही तो आहे.

विकास भैय्या थँक्स. तुमच्या मनाच्या मोठेपणाला सलाम. 


अनिता पाटील, औरंगाबाद.

No comments:

Post a Comment