पापाची बोच, गुन्ह्यांची भीती आणि अपयशाची टोचणी या तीन कारणांमुळे अत्यंतिक निराश व वैफल्यग्रस्त होऊन विनायक दामोदर सावरकर यांनी आत्महत्या केली. याबाबत थोडेसे विस्ताराने पाहू या.
पाप : सावरकरांच्या द्विराष्ट्रवादाच्या सिद्धांतामुळे भारताची फाळणी झाली. फाळणीमुळे लाखो लोक मृत्यूमुखी पडले. लाखो बेघर झाले. लाखो निर्वासित झाले. फाळणीचे पाप आपल्या डोक्यावर आहे, याची बोचणी सावरकरांना छळत होती.
अपयश : सावरकरांनी इंग्रजांविरुद्ध लढण्याचा प्रयत्न सुरुवातीला केला. पण, अंदमानात गेल्यावर त्यांचे धैर्य खचले आणि त्यांनी इंग्रजांची माफी मागून स्वत:ची सुटका करून घेतली. पुढे जीवनव्यापनासाठी त्यांना पुन्हा इंग्रजांचेच पाय धरावे लागले. इंग्रजांसाठी काम करण्याच्या अटीवर त्यांना महिना ६० रुपये पेन्शन मिळाली. हे त्यांच्या आयुष्यातील पहिले मोठे अपयश होते. त्यांचा हिंदुत्ववाद लोकांनी फेकून दिला, हे दुसरे अपयश होते. त्यांनी जो इतिहास लिहिला, त्याला मान्यता मिळू शकली नाही, हे तिसरे अपयश होते. भारताची अनेक शकले व्हावीत, यासाठी सावरकरांनी कटकारस्थाने केली. संस्थानिकांनी भारतात सहभागी होऊ नये, यासाठी आटोकाट प्रयत्न केले. पण काँग्रेसने ते हाणून पाडले. हे चौथे अपयश होते. त्यांच्या हिंदु महासभेला लोकांनी निवडणुकीत जबरदस्त आपटी दिली. हे सहावे अपयश होते. अशा एकामागून एक आलेल्या अपयशामुळे सावरकर खचले. या अपयशाची टोचणी त्यांना अगदी असह्य झाली होती.
अशा प्रकारे पापाची बोच, गुन्ह्यांची भीती आणि अपयशाची टोचणी यातून सावरकरांना अतिव नैराश्य व वैफल्यग्रस्तता आली. त्यांना जीवन नकोसे झाले. मात्र थेट गळफास लावून घेण्याचे अथवा विष प्राशन करण्यचे धाडसही या भित्र्या माणसाला झाले नाही. मग त्याने अन्नपाणी त्यागून आत्महत्या केली.