५५ कोटीं हा तर निव्वळ बहाणा
- राजा मइंद, कार्यकारी संपादक, अपाविमं.
३० जानेवारी १९४८ रोजी दिल्लीतील बिर्ला हाऊस समोर राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. पुण्यातील ब्राह्मण अतिरेकी नथुराम गोडसे याने महात्मा गांधी यांच्यावर हाताच्या अंतरावरून तीन गोळ्या झाडल्या. गांधी हत्येच्या खटल्यात शंकर किस्तैैया आणि मदनलाल पहावा हे दोन आरोपी वगळता सर्व आरोपी महाराष्टराष्ट्रातील होते. तसेच सर्वच्या सर्व जण ब्राह्मण होते. गांधी हत्येच्या आरोपींमध्ये विनायक दामोदर सावरकर, दिगंबर बडगे (हा नंतर माफीचा साक्षीदार बनला.), नारायण आपटे, विष्णू करकरे यांचा सामवेश होता. नथुराम गोडसे आणि नारायण आपटे यांना बेरेट्टा जातीचे पिस्तुल खरेदी करण्यासाठी दत्त्तात्रय परचुरे आणि गंगाधर दंडवते यांनी मदत केली. हे दोघेही ब्राह्मणच होते.
येथे प्रश्न असा निर्माण होतो की, महाराष्ट्रातील ब्राह्मणांनी महात्मा गांधी याना का मारले? ब्राह्मणांच्या मनात गांधीजींबद्दल असा कोणता राग होता?
या खटल्यातील एक आरोपी आणि नथुराम गोडसे याचा भाऊ गोपाळ गोडसे याने गांधी हत्येवर "५५ कोटींचे बळी" हे पुस्तक लिहिले आहे. या पुस्तकात केलेल्या दाव्याचा थोडक्यात तपशील असा : "भारताच्या फाळणीच्या वेळी भारत सरकारच्या कोषात जी शिल्लक होती, त्यातील ५५ कोटी रुपये पाकिस्तानच्या वाट्याला गेले होते. पाकिस्तानने काश्मिरात सैन्य घुसविल्यामुळे भारत सरकारने हे ५५ कोटी रुपये देण्याचे नाकारले. मात्र महात्मा गांधी यांनी अशा प्रकारे वचन मोडणे चुकीचे असल्याचे सांगून पाकिस्तानला ठरल्या प्रमाणे ५५ कोटी रुपये देण्यास सांगितले. इतकेच नव्हे, तर आठवड्यात उपोषणही केले. त्यामुळे १३ जानेवारी १९४८ रोजी केंद्रीय मंत्रिमंडळाने एक पाकिस्तानला हा पैसा देण्याचा निर्णय घेतला. या निर्णयामुळे प्रक्षुब्ध झालेल्या गोडसे आणि त्याच्या मित्रांनी महात्मा गांधी यांची हत्या केली..."
गोपाळ गोडसे याने केलेला हा दावा बिलकूल खोटा आहे. पहिला मुद्दा असा की, फाळणीच्या वेळी पाकिस्तानला एकूण ७५ कोटी रुपये देण्याचे मान्य करण्यात आले होते. त्यातील २० कोटी रुपयांचा पहिला हप्ता पाकिस्तानला देण्यातही आला होता. उरलेले ५५ कोटी रुपये देण्याचे भारत सरकारने रद्द केले नव्हते. या पैशाचे हस्तांतरण केवळ तात्पुरत्या स्वरूपात रोखण्यात आले होते.
दुसरा मुद्दा असा की, १३ जानेवारी १९४८ रोजी भारत सरकारने पाकिस्तानला ५५ कोटी रुपये देण्याचा निर्णय घेतला त्या आधी महात्मा गांधी यांना मारण्याचे एकूण ५ प्रयत्न झाले होते. १९३४ मध्येच गांधींना मारण्याचा पहिला प्रयत्न झाला होता. म्हणजेच ५५ कोटींच्या घटनेच्या तब्बल १४ वर्षे आधीपासून गांधींना मारण्याचे प्रयत्न ब्राह्मण करीत होते. त्यामुळे ५५ कोटींचे बळी हा गोपाळ गोडसे याचा दावाच खोटा ठरतो.
१. महात्मा गांधी हे भारताचे निर्विवाद नेते होते. इतकेच नव्हे, तर जगाच्या राजकारणावर त्यांच्या विचार-आचारांचा प्रभाव होता. असे असले तरी गांधी हे जातीने ब्राह्मण नव्हते. ते बहुजन समाजातून आले होते.ब्राह्मणेतर माणसाचा एवढा गाजावाजा होणे हे ब्राह्मण श्रेष्ठत्वाच्या गंडाने पछडलेल्या ब्राह्मणवाद्यांच्या पचनी पडत नव्हते.
२. महात्मा गांधी यांच्या व्यक्तिमत्वाचा प्रभाव इतका विलक्षण होता की, बहुजन समाजातीलच नव्हे, त्याकाळातील अनेक बडे ब्राह्मण नेते महात्मा गांधी यांची अनुयायी होते. पंडीत जवाहरलाल नेहरू हे यातील सर्वांत मोठे नाव. काश्मिरी ब्राह्मण असूनही नेहंनी गांधी यांचे अनुयायीत्व पत्करणे, ब्राह्मणवाद्यांना पसंत नव्हते. महाराष्टड्ढातूनही अनेक ब्राह्मण गांधीजींचे अनुयायी बनले होते. साने गुरुजी आणि विनोबा भावे ही त्यातील काही ठळक नावे. यामुळे महाराष्ट्रातील ब्राह्मणवादी खवळून उठले होते.
३. महात्मा गांधी यांनी जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांना आपले अध्यात्मिक गुरू मानले होते. तुकाराम महाराज हे महाराष्टड्ढातील ब्राह्मणवाद्यांच्या दृष्टसीने क्रमांक एकचे शत्रू होते. आणि नेमके त्यांनाच गांधीजींनी गुरुस्थानी मानल्याने ब्राह्मणवाद्यांचे पित्त न खवळते तरच नवल.
महात्या गांधी ब्राह्मण कुळात जन्मले असते आणि त्यांनी तुकोबांऐवजी रामदासांना गुरू मानले असते, तर महाराष्ट्रातील ब्राह्मणांनी त्यांची हत्या केली नसती. त्याऐवजी त्यांचे मंदीर बांधून नित्यपुजा चालविली असती.
Excellent interpretation !
ReplyDeleteAbsolute brilliant, The most brilliant interpretation I have ever seen.
ReplyDeleteमस्तच
ReplyDeleteआपण जे तिन मुद्दे दिलेत त्याला आधार म्हणजे पूरावे दिले नाहीत
ReplyDeleteजसे की संत तूकाराम यांना गुरू मानणे....
पुरावे लेखातच आहेत. नीट वाचा म्हणजे कळेल. महात्मा गांधी यांनी तुकाराम महाराजांच्या १६ अभंगांचा इंग्रजी अनुवाद केला आहे. याच ब्लॉगवर यासंबंधी एक लेख आहे. शोधून वाचा.
Delete