Wednesday 9 May 2012

अनिता पाटील यांचे विचार आता पुस्तकरूपात


भावांनो आणि बहिणींनो,

गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात मी हा ब्लॉग सुरू केला. गेल्या आठ महिन्यांच्या काळात १३० लेख ब्लॉगवर टाकण्यात आले आहेत. जवळपास ८० हजार वेळा हा ब्लॉग वाचला गेला आहे. दीड हजार प्रतिक्रिया नोंदल्या गेल्या आहेत. हा ब्लॉग सुरू करण्यामागे ‘बुडताहे जन न पाहवे डोळाङ्क ही संत तुकारामांच्या अभंगपंक्तीची प्रेरणा होती तसेच बहुजन समाजाला आपले हीत कशात आहे, हे समजावे हा उद्देश होता. आपले विचार लोकांना पचतील का, असे प्रारंभी वाटले होते. तथापि, ब्लॉगला मिळालेला प्रतिसाद पाहता, या विचारांची महाराष्ट्राला गरज आहे, हेच सिद्ध होते. या लेखांतील विचार पुस्तक रूपाने यावेत, अशी मागणी अनेक भावा-बहिणींकडून होत होती. काही जाणकार मंडळीही यासाठी आग्रही होती. मी ब्लॉगच्या कामातच एवढी व्यस्त होते की, पुस्तकाकडे लक्ष द्यायला वेळच नव्हता. तथापि, आता चळवळीतील काही मंडळींनी पुढाकार घेऊन अनिता पाटील संघ (एपीएस) नावाने स्वतंत्र संस्थाच काढली आहे. या संस्थेच्या माध्यमातून या ब्लॉगवरील लेखन पुस्तक रूपाने प्रसिद्ध करण्यात येणार आहे. येत्या दिवाळीपर्यंत पहिला खंड वाचकांना उपलब्ध होऊ शकेल, या हिशेबाने एपीएसने नियोजन चालविले आहे. एपीएसचे काम ना नफा ना तोटा या तत्वावर चालणार आहे. त्यामुळे ही पुस्तके अगदीच नाममात्र किमतींत वाचकांना उपलब्ध होतील.

या नव्या उपक्रमाला तुमचे आशीर्वाद हवे आहेत.

आपली लाडकी बहीण
अनिता पाटील

No comments:

Post a Comment