पतिव्रता ही उपाशी मरते तिला मिळेना सावली ।
चंचल नार बांधित असे नवे घर एक दरसाली ।।
पेशवाईतील प्रख्यात शाहीर अनंत फंदी यांचा हा फटका. अस्सल पतिव्रतांच्या नशिबी नेहमीच उपेक्षा येत असते. चंचल बायका मानाचे बाशिन्ग मिरवून घेत असतात. समाजातले हे वास्तव मराठी साहित्य क्षेत्रालाही पुरेपूर लागू पडते. परशय्येवर लाजेची फुले उधळणाèया अशा अनेक चंचल नारी मराठी साहित्यक्षेत्रात मानाचे पान घेऊन मिरवत आहेत. या चंचलांमुळे मातीतले अस्सल साहित्यिक उपेक्षेच्या गर्तेत खितपत पडले आहेत.
अशा चंचलापैकी एक नाव आहे कुसुमाग्रज उपाख्य वि. वा. शिरवाडकर. कुसुमाग्रजांना महान नाटककार, महाकवी, कथाकार, कादंबरीकार अशी झाडून सगळी सर्वोच्च बिरुदे लावली जातात. शिरवाडकरांना ज्ञानपीठ पुरस्काराने गौरविण्यात आले. त्यांच्या नावे जनस्थान पुरस्कारही दिला जातो. त्यांचा जन्मदिन मराठी राजभाषा दिन म्हणून साजरा केला जातो. हे थोडे म्हणून की काय, कुसुमाग्रजांना देवत्व बहाल करून पावित्र्याच्या मखरात बसविण्यात आले आहसे. या सर्व गोष्टींचा इतका अतिरेक झालाय की, त्यांच्या साहित्याची खरी समीक्षा करणे हे मराठी सारस्वताच्या दरबारातले सर्वांत मोठे पाप होऊन बसले आहे. कोणत्याही प्रकारची समीक्षा न होता, एका व्यक्तीला अशा प्रकारे देवत्व बहाल करण्याचे उदाहरण जगातील कोणत्याही भाषेच्या इतिहासात सापडणार नाही. तथापि, बुद्धी शाबूत असलेल्या कोणत्याही व्यक्तीला अशा प्रकारे वागून चालत नसते. योग्य समीक्षा करूनच माणसाची महत्ता ठरायला हवी. कुसुमाग्रज या नियमाला अपवाद ठरू शकत नाहीत. त्यामुळेच मी कुसुमाग्रजांच्या महानपणाची समीक्षा करण्याचा निर्णय घेऊन त्यांच्या साहित्याचा धांडोळा घेतला. तेव्हा या माणसाच्या महानपणाची सारीच वस्त्रे उसणी असल्याचे दिसून आले. ही उसनी वस्त्रे बाजूला सारून खरे कुसुमाग्रज महाराष्ट्राला कळायला हवेत. उद्या २७ फेब्रुवारी रोजी कुसुमाग्रजांच्या जन्म शताब्दी वर्षाचा शेवट होत आहे. या मूहुर्तावर त्यांची यथायोग्य समीक्षा करण्यासाठी मी बसले आहे. या लेखामुळे अनेकांचे हितसंबंध दुखावणार आहेत. तथापि, सत्य जगासमोर येणे आवश्यक आहे. त्यासाठी प्रसंगी हितसंबंधी संधीसाधूंचा वाईटपण कोणाला तरी घ्यावा लागणार आहे.
माझी ही अल्पशब्दांतील प्रस्तावना वाचून कुसुमाग्रजांसाठी बोलबच्चनगिरी करणाèया मुखंडांना धक्का बसला असेल. तथापि, अनिता पाटील पुराव्यांशिवाय काहीही बोलत नाही, हे या बोलबच्चनांनी लक्षात ठेवावे. अशा प्रकारे पावित्र्याच्या मखरात बसविलेली +श्यामची आई+ कशी जातीयवादी आहे, हे मी पुराव्यानिशी दाखवून दिलेले आहे. आज नंबर आहे. कुसुमाग्रज उर्फ वि. वा. शिरवाडकर. (विष्णू वामन शिरवाडकर हे कवितेसाठी कुसमाग्रज हे नाव वापरीत तसेच नाटके व इतर लेखनासाठी वि. वा. शिरवाडकर हे नाव वापरीत.)
कुसुमाग्रजांच्या बोगसपणाचे बिन्ग फोडण्यासाठी त्यांची महत्ता कोणत्या कलाकृतींच्या आणि निकषांच्या आधारे ठरविली गेली, हे आपण आधी पाहू. कुसुमाग्रजांची सर्वश्रेष्ठ कलाकृती कोणती? नि:संशय नटसम्राट. नटसम्राट ही मराठीतील अजरामर कलाकृती असल्याची टिमकी वाजवली जाते. त्यासाठी कुसुमाग्रजांना नाट्य लेखन क्षेत्रातील चक्रवर्ती सम्राट अशी उपाधी त्यांचे भाविक भक्त लावतात. परंतु नटसम्राट हे नाटक स्वतंत्र अनुभवांवर उभे नाही. ते शेक्सपिअरच्या किंग लिअर या नाटकाचे रूपांतर आहे. शिरवाडकरांनी qकग लिअर मराठी पेहरावात उभे केले एवढेच त्यांचे कर्तत्व. किंग लिअरच्या जागी त्यांनी अप्पासाहेब बेलवलकर उभा केला. तथापि, अप्पासाहेब बेलवकर भाषा बोलतो ती किंग लिअरचीच. मूळ कथेत अनेक फेरबदल नटसम्राटमध्ये करण्यात आले आहेत. तसेच शेक्सपिअरच्या इतरही अनेक नाटकांमधून संवादांची उचल शिरवाडकरांनी केली आहे. अप्पासाहेब बेलवलकरांचा ‘जगावं की मरावं हा एकच सवालङ्क हा अत्यंत प्रसिद्ध संवाद शिरवाडकरांनी शेक्सपिअरच्या हॅम्लेट या नाटकातून अगदी जशाच्या तसा उचलला आहे. शेक्सपिअरच्या +To be, or not to be, that is the question+ या संवादाचे हे शब्दश: भाषांतर आहे.
शेक्सपिअरच्या लेखनीतून उतरलेला हा मूळचा
संपूर्ण संवाद वाचकांसाठी खाली देत आहे :
To be, or not to be, that is the question:
Whether 'tis Nobler in the mind to suffer
The Slings and Arrows of outrageous Fortune,
Or to take Arms against a Sea of troubles,
And by opposing end them: to die, to sleep
No more; and by a sleep, to say we end
The heart-ache, and the thousand Natural shocks
That Flesh is heir to? 'Tis a consummation
Devoutly to be wished. To die to sleep,
To sleep, perchance to Dream; Ay, there's the rub,
For in that sleep of death, what dreams may come,
When we have shuffled off this mortal coil,
Must give us pause. There's the respect
That makes Calamity of so long life:
For who would bear the Whips and Scorns of time,
The Oppressor's wrong, the proud man's Contumely, [poor]
The pangs of despised Love, the Law’s delay, [disprized]
The insolence of Office, and the Spurns
That patient merit of the unworthy takes,
When he himself might his Quietus make
With a bare Bodkin? Who would Fardels bear,
To grunt and sweat under a weary life,
But that the dread of something after death,
The undiscovered Country, from whose bourn
No Traveller returns, Puzzles the will,
And makes us rather bear those ills we have,
Than fly to others that we know not of.
Thus Conscience does make Cowards of us all,
And thus the Native hue of Resolution
Is sicklied o'er, with the pale cast of Thought,
And enterprises of great pitch and moment, [pith]
With this regard their Currents turn awry, [away]
And lose the name of Action. Soft you now,
The fair Ophelia? Nymph, in thy Orisons
Be all my sins remembered.
वरील संवाद हॅम्लेटच्या तिसèया अंकातील पहिल्या दृश्याचा पहिलाच संवाद आहे. हॅम्लेट आपल्या मनातले भाव या संवादातून व्यक्त करतो. तिसèया अंकातले हे दृश्य +ननसी सीन+ म्हणून ओळखले जाते. शिरवाडकर महाशयांनी या संवादाचे शब्दश: भाषांतर करून आपल्या नाटकात घेतले.
प्रतिभावंत नव्हे उचल्या!
भाषांतर करण्यात काय आले आहे कौतुक? ही शुद्ध उचलेगिरी आहे. मराठीच्या वाङ्मय व्यवहारात दुहेरी उचलेगिरी चालते.एखाद्याने शेक्सपिअर qकवा अन्य पाश्चात्य लोकांच्या कलाकृती जशाच्या तशा उचलून प्रसिद्ध करायच्या आणि जातीय प्रसारमाध्यमांनी ही उचलेगिरी उचलून धरायची! उचलेगिरीलाच प्रतिभा ठरवून उदो उदो करायचा. शिरवाडकरांचे हेच झाले आहे. त्यांनी शेक्सपिअरच्या नाटकांतून उचलेल्या कलाकृतींना असेच उचलून धरण्यात आले. तथापि, सत्य हे कधी ना कधी बाहेर येतच असते. आज ते आले. वि. वा. शिरवाडकर ही व्यक्ती नाटककार या नाात्याने प्रतिवंत नव्हतीच. ती होती केवळ एक उचल्या! कटू असले तरी हेच सत्य आहे.
शिरवाडकरांनी शेक्सपिअरच्या मॅकबेथ या नाटकाचे राजमुकूट या नावाने रूपांतर केले. ऑथेल्ले त्यांचे रुपांतर ऑथेल्लो या नावानेच प्रसिद्ध आहे. ही सगळी नाटके मराठीत गाजली. याचे कारण मूळच्या शेक्सपिअरच्या संहिताच मजबूत आहेत.
इंग्रजी शिकल्याचा असाही गैरफायदा
वि. वा. शिरवाडकर शाळेत असताना शिरवाडकर नाशकात त्यांच्या मामांकडे राहत. मामांना शेक्सपिअरच्या नाटकांचा नाद होता. त्यांच्याकडे शेक्सपिअरच्या नाटकांचा संग्रह होता. ही नाटके शिरवाडकरांच्या हाती पडली. इंग्रजीत शिक्षण झाले असल्यामुळे त्यांना ही नाटके वाचणे शक्य झाले. त्याकाळी शिक्षणाचा प्रसार कमी होता. त्यातल्या त्यात इंग्रजी जाणणारे तर विरळाच. +वासरांत लंगडी गाय शहाणी+ अशी एक म्हण मराठीत आहे. आजूबाजूला सगळीच वासरे असतील, तर लंगडी असली तरी गाय भाव खाणारच. कुसुमाग्रजांच्या काळातील साहित्यिक मंडळींत इंग्रजी जाणणारे असे जवळपास कोणी नव्हतेच. त्याचा फायदा कुसुमाग्रजांना झाला. इंग्रजी जाणारे कुसुमाग्रज भाव खाऊन गेले. कारण वासरांच्या गर्दीत ते एकटेच गाय होते.
येथे युक्तिवाद असा केला जाऊ शकतो की, भाषांतरे qकवा रूपांतरे साहित्यक्षेत्रासाठी आवश्यकच असतात. त्यामुळे शिरवाडकरांना अगदीच क्षुल्लक ठरविणे चूक आहे. हा युक्तिवाद योग्य वाटत असला तरी, तो चूक आहे. भाषांतरे, रूपांतरे आवश्यक असली तरी त्यांच्या बळावर कोणाला महान ठरविता येऊ शकत नाही. महत्ता ही अस्सल कलाकृतींच्या आधारावरच ठरत असते. इतकेच काय या कलाकृतींमधील प्रतिमा आणि प्रतिकेची देशीच असतात. टॉलस्टॉय हा आधुनिक जगातील सर्वोच्च पातळीवरील महाकवी म्हणून नावाजिला जातो. त्याची +युद्ध आणि शांती+ ही ३०० पात्रे असलेली कादंबरी महाकाव्य समजली जाते. ती रशियन युद्धावर अधारित आहे. त्यातील सर्व पात्र अस्सल रशियन आहेत. कलाकृती साकारताना त्याने अस्सल रशियन पेहराव सोडला नाही. जगातील दुसरे महाकाव्य म्हणून मॅक्झिम गॉर्कीच्या +द मदर+ या कादंबरीचे नाव घेतले जाते. ही कादंबरीही अस्सल रशियन आहे. रशियातील बोल्शेविक क्रांतीचा इतिहास गॉर्कीने या कादंबरीत मांडला आहे. एर्नेस्ट हेqमग्वे, चार्लस् डिकन्स, डोस्टायवस्की, खलिल जिब्रान आणखी काही नावे वानगीदाखल येथे देते. हे सर्व लेखक महान या बिरुदाचे मानकरी ठरले ते केवळ त्यांच्या अस्सल कलाकृतींमुळे. रूपांतरीत कलाकृतींमुळे नव्हे. अलिकडचे अनेक मोठे qहदी सिनेमावाले इंग्रजी सिनेमांतून कल्पना आणि दृश्ये जशीच्या तशी उचलतात. हे लोक निर्माते म्हणून मोठे असतीलही परंतु महान ठरत नाहीत. पथेर पांचाली सारखे अस्सल बंगाली सिनेमे देणारे सत्यजित राय हेच महान ठरतात. ऑस्करवाल्यांनाही भारतात येऊन त्यांचा गौरव करावा लागतो. मराठीत मात्र उचल्यांनाच महत्ता देण्याचा अजब प्रकार घडत आला आहे.
खरया महान लेखकांना समोर आणा
मराठीत आंतराष्ट्रीय तोडीच्या कलाकृती निर्माण होत नाहीत, असे म्हटले जाते. परंतु हे खरे नाही. मराठीत महान म्हणता येतील, अशा कलाकृती आहेत. तथापि, त्यांना उपेक्षेच्या गर्तेत ढकलून कुसुमाग्रज उर्फ शिरवाडकरांसारख्या बोगस लोकांचाच उदो उदो केला जातो. त्यांनाच ज्ञानपीठ पुरस्कार दिले जातात. मग खरे टॅलेंट जगासमोर येणार कसे. मराठी प्रसारमाध्यमांनी आता तरी आपली जातीय भूमिका सोडून खरे टॅलेंट समोर आणले पाहिजे. अन्यथा स्वातंत्र्यानंतरचा आपला वाङ्मयीन इतिहास काळ्याकुट्ट पर्वाचा इतिहास ठरेल.
अनिता पाटील, औरंगाबाद.
या मालेतील इतर लेख
1. अस्पृश्यता पाळणारी ‘श्यामची आई' आदर्श कशी?
2. ब्राह्मणांनाच का मिळतात ज्ञानपीठ पुरस्कार?
3. पुढील ५० वर्षे बहुजन लेखकानांच ज्ञानपीठ मिळावे!
4. ब्राह्मणांच्या साहित्याची समीक्षा करणे गुन्हा आहे का?
5. कुसुमाग्रज : प्रतिभावंत नव्हे उचल्या !
1. अस्पृश्यता पाळणारी ‘श्यामची आई' आदर्श कशी?
2. ब्राह्मणांनाच का मिळतात ज्ञानपीठ पुरस्कार?
3. पुढील ५० वर्षे बहुजन लेखकानांच ज्ञानपीठ मिळावे!
4. ब्राह्मणांच्या साहित्याची समीक्षा करणे गुन्हा आहे का?
5. कुसुमाग्रज : प्रतिभावंत नव्हे उचल्या !