Friday 27 September 2013

कविता महाजनांचे "बदलापुरी" उपद्व्याप!

-राजा मइंद, संपादक मंडळ सदस्य, अपाविमं.


"ब्र" या बहुचर्चित पुस्तकाच्या लेखिका श्रीमती कविता महाजन यांनी "बदलापूरची बखर" या नावाने नवीनच उपद्व्याप सुरू केला आहे. काल्पनिक पात्रे उभी करून बहुजन समाजाला बदनाम करायचे, असे एक षडयंत्र फार पूर्वीपासून मराठी साहित्यात सुरू आहे. कविता महाजन यांची "बदलापूरची बखर" याच षडयंत्राचा एक भाग आहे. पूर्वी कथा-कादंब-या आणि नाटकांमधून बदफैली पाटील उभा केला जायचा. अलिकडे हा प्रकार बंद झाला होता. कविताइंनी "सखूबाई सावळे" नावाचे पात्र निर्माण हा खंडीत प्रकार पुन्हा सुरू करून दिला आहे. 

"बदलापूरच्या बखर" या नावाचा नवा ब्लॉग कविताताइंनी सुरू केला आहे. या ब्लॉगवर "सुर्वात" नावाचा पहिला लेख त्यांनी ४ सप्टेंबर २०१३ रोजी पेस्ट केला. नंतर तो लगोलग फेसबुकवर टाकला. हा लेख शुक्रवारी (दि. २७ सप्टेंबर २०१३ रोजी) आता एका दैनिकांच्या महिलाविषयक पुरवणीत छापून आला. या लेखाचा तीन आठवड्यांचा हा प्रवास आहे. हा लेख इतक्या झटपट प्रसिद्धीस का पावला याचे कोडे आम्हाला पडले होते. लेख वाचला आणि हे कोडे उलगडले. बहुजन समाजाची जबरदस्त बदनामी या लेखात करण्यात आली आहे. ब्राह्मणी मीडिया बहुजनांची बदमानी करण्याची एकही संधी सोडत नाही. मग कविताताइंनी लिहिलेला लेख तरी तो कसा सोडेल?

कविताताई यांनी लिहिलेला हा संपूर्ण लेख अत्यंत आक्षेपार्ह आहे. ही कहाणी सांगणा-या काल्पनिक पात्राचे नाव कविताताइ यांनी मोठ्या खुबीने सखूबाई सावळे असे ठेवले आहे. सखूबाई सावळेच का? अपर्णा कुलकर्णी, फुलराणी जोशी असेही एखादे नाव कविताताई आपल्या मानसपात्राला देऊ शकल्या असत्या. पण त्यांनी तसे केले नाही. तसे केले असते, तर ब्राह्मण समाजाची बदनामी झाली असती. 

लेख मालेच्या पहिल्याच भागात सखूबाई सांगते की, तिला दोन सासूबाई आहेत. म्हणजेच, बहुजन समाजातील पुरूष मंडळी दोन-दोन बायका करतात, असा छुपा संदेश यातून कविताइंनी मोठ्या खुबीने दिला आहे. ब्राह्मण पुरूष दोन-दोन बायका करीत नाहीत, असे कविताताई यांना म्हणायचे आहे का? दोन बायकांचा दादला असलेल्या सास-यानंतर सखूबाईच्या लेखात दुसरे पात्र येते "ड्रिन्कर टेलर"चे. हा "ड्रिन्कर टेलर" बहुजन आहे की, ब्राह्मण कोणास ठाऊक? कविताताई यांच्या दृष्टीने तो बहुजनच असणार. ताइंच्या लेखी ब्राह्मण दारू पित नसणार बहुधा.

या लेखात कविताताई यांनी ग्रामीण म्हणून जी भाषा वापरली आहे, ती महाराष्ट्राच्या कोणत्याही भागात बोलली जात नाही. ही सखूबाई आपल्या नव-याचा उल्लेख "ध्यान" असा करते. ग्रामीण महाराष्ट्रातील कोणतीही स्त्री आपल्या नव-याचा उल्लेख "ध्यान" असा करीत नाही. हा शब्द कविता ताई ज्या अर्थाने वापरतात त्या अर्थाने तो ग्रामीण भागाला परिचितच नाही. "ध्यान" या शब्दाचा सदाशिवपेठी अर्थ कविता ताई ग्रामीण महिलेच्या तोंडी घालित आहेत. काय पण होते रंगीत ध्यान । इकडे तिकडे लुडबूड छान ।। अशा ओळी असलेली एक कविता पूर्वी शालेय अभ्यासक्रमात होती. 

कविता महाजन यांची ही सखूबाई एफवाय बीए अर्थशास्त्र शिकलेली आहे, असे स्वत:च सांगते. मग ती ग्रामीण कशी? या प्रश्नाचे उत्तर कविता ताईच जाणोत. 

सखूबाईच्या तोंडचे काही बोगस ग्रामीण शब्द  खाली देत आहोत.  कंसात प्रमाण शब्द दिले आहेत : 

येवड्यासाठी (एवढ्यासाठी)
टुकूरटुकूर (टकमका)
होवी (हवी)
होव्या (हव्या)
टेलराकडनं (टेलरकडून)
आदीच (आधीच)
हईत (आहेत)
शिकल्येय (शिकले आहे)
वरषं (वर्षे)

असे आणखी खूप शब्द आहेत. पण ते सारेच येथे देत बसत नाही. कविता महाजनांना आमची विनंती आहे की, त्यांनी बहुजनांच्या बदनामीचा हा उपद्व्याप थांबवावा. कविता महाजन फार पूर्वीपासून लिहित आहेत. तसेच २००९ पासून ब्लॉगलेखन करीत आहेत. त्यांच्या लेखनाला आम्ही या पूर्वी कधीही कसल्याही प्रकारे आक्षेप घेतलेला नाही. आताच तो का घेत आहोत, हे त्यांनी लक्षात घ्यावे. झटपट प्रसिद्धीसाठी असले उपद्व्याप करणे, एका मान्यताप्राप्त लेखिकेला शोभणारे नाही. 

आम्हीही उद्या अपर्णा कुलकर्णी-जोशी या नावाचे एखादे पात्र उभे करून लेखमाला सुरू केल्यास कविता ताइंना चालेल का? ताई सूज्ञ आहेत. आमच्या या लेखाला योग्य प्रतिसाद देतील, अशी अपेक्षा आहे. 

Tuesday 17 September 2013

विकिपीडियावर टिळकांची पोलखोल

-राजा मइंद, संपादक मंडळ सदस्य, अपाविमं.


बाळ गंगाधर टिळक हे लोकमान्य नसून भटमान्य होते, याची दखल विकिपीडियाने घेतली आहे. बाळ गंगाधर टिळक या नावाचे पान विकिपीडियावर असून त्यात टिळका चरित्रातील अनेक बहुतांश वादग्रस्त बाबींचा स्पष्टपणे उल्लेख करण्यात आला आहे. इतकेच नव्हे तर टिळक चरित्रात घुसडविण्यात आलेल्या खोट्या गोष्टींचा पर्दाफाशही या पानात दिसतो. 

विकिपीडियावरील पानाचा सारांश असा : 

लोकमान्य या उपाधीने त्यांचा उल्लेख केला जातो. तथापि, नव्या संशोधना नुसार त्यांची हि उपाधी वादग्रस्त ठरली आहे. अनेक संशोधक त्यांना "भटमान्य" ही उपाधी लवतात. विशेषत: बहुजनवादी लोक भटमान्य ही उपाधी टिळकांना लावतात. बाळ गंगाधर टिळक यांनी मराठी पत्रकारितेत मोठे योगदान दिले. तथापि, त्यांनी पुण्यातील प्लेगच्या साथीच्या काळात घेतलेली भूमिका वादग्रस्त ठरली होती. बाळ गंगाधर टिळक यांनी मराठी पत्रकारितेत मोठे योगदान दिले. तथापि, त्यांनी पुण्यातील प्लेगच्या साथीच्या काळात घेतलेली भूमिका वादग्रस्त ठरली होती. सक्तीच्या फवारणीसाठी ब्रिटिशांनी पुण्यात महार रेजिमेंटच्या सैनिकांची मदत घेतली म्हणून टिळकांनी केसरीतून सरकारवर टीकेची झोड उठविली. "रँड साहेबांचे सोल्जर आमची घरे बाटवित आहेत", अशी वादग्रस्त भूमिका टिळकांनी घेतली. या भूमिकेने टिळकांच्या देदिप्यमान पत्रकारितेला दलित विरोधाचा कलंक लागला. वेदोक्त प्रकरणात टिळकांनी कोल्हापूर संस्थानचे छत्रपती शाहू महाराज यांच्या विरोधात भूमिका घेऊन पुरोहितशाहीला समर्थन दिले. त्यामुळे त्यांच्यावर भटशाहीचे कट्टर पुरस्कर्ते असा शिक्का बसला. कुणबटांना पार्लमेंटात नांगर हाकायचा आहे काय? अशी भूमिका टिळकांनी केसरीतून मांडल्यामुळे ते बहुजन समाजाच्या विरोधात होते, असे आरोप त्यांच्यावर होतात. ब्राह्मण इतिहासकारांनी हे आरोप खोडून काढले आहेत.

Thursday 12 September 2013

गांधीजीची जात सांगायची काय ?


आमच्या कडे फक्त शब्दाचीच नाही 
तर मुस्काट फोडण्याची ताकद आहे !  
----------------------------------------रवींद्र तहकिक 
 
या ब्लोग वर कुणी प्रतिक्रिया द्यावी व कुणी देऊ नये याला काही 
बंधन नाही ; ब्लोग मुक्त आणि सार्वजनिक आहे . रेल्वेस्टेशन वर ज्या प्रमाणे सभ्य नागरिक आणि प्रवाशी येतात तसे फुकटेहि येतातच ! 
चोर आणि खिसेकापू देखील येतात ! त्यामुळे कुणी आमच्यावर काय 
मल्लीनाथी करावी हा ज्याच्या त्याच्या वकूब आणि संस्कृतीचा प्रश्न आहे ; झाले असेकी आम्ही प्रज्ञा खांडेकर या आमच्या वाचक भगिनीच्या प्रतिक्रियेला अनुलक्षून प्रज्ञाताईना एक अनावृत्त पत्र लिहिले. आम्ही लिहिलेल्या आसारामायण या कवितेवर प्रतिक्रिया देताना प्रज्ञाताईनी 
एकीकडे कवितेला दाद देत आपण ब्राम्हण विरोधी लिहिता असे विधान केले होते , आम्ही त्यांचा हा गैरसमज दूर करण्यासाठी आमची भूमिका मांडली . ( पहा ; विरोध ब्राम्हण जातीला नाहीच ;प्रज्ञा खांडेकर यांना पत्र ) या पत्रात आम्ही महात्मा गांधीयांच्या नावाचा चुकूनही उल्लेख केलेला नाही . किंवा ते ब्राम्हण होते आसा उल्लेखही केलेला नाही ; असे असताना संबधित पत्रावर प्रतिक्रिया देताना प्रणव जोशी नामक एका '' गांधी आभ्यासकाने '' आम्हाला ''तहकिक बुवा''असे संबोधून '' गांधी ब्राम्हण होते , असे तुम्हाला कोणी सांगितले ? ''असा   सवाल करीत , आभ्यास करून लिहित जा ! असा अनाहूत सल्ला आम्हाला दिला आहे . आम्ही 
विनाकारण सभ्यतेच्या मर्यादा ओलांडत नाही . म्हणून जोशींना सन्मान पूर्वक सांगतो कि आम्ही कोणतेच विधान आभ्यास केल्याशिवाय करत नाही , आणि नेहमी आपले पाय किती खोलात आहेत याची जाणीव ठेवूनच ; दुसर्या बद्दल बोलतो ! ( आर्थात हि आपली पहिली चूक आहे म्हणून ; या नंतर असभ्य भाषा वा हकनाक पंगा घेतलात तर आपले मुस्काट फोडण्या साठी आमच्या कडे फक्त शब्दाचीच नाही तर मनगटाची देखील ताकद आहे हे ध्यानात घ्या ! ) आसो ; तर आम्ही 
गांधी ब्राम्हण होते असे लिहिलेले नसताना आपण कुठल्या डोळ्यांनी ते वाचले ? हे एकदा कळू द्या ! आम्हाला आभ्यास करायला सांगताना आपण निदान वाचन  तरी डोळे उघडे ठेवून करत जा ; आणखी एक ; 
आपण आम्हाला बुवा म्हणालात ते कोणत्या अर्थाने ? आम्ही कीर्तन कार किंवा प्रवचन कार वगैरे तर नाही आहोत, नाही आम्ही कुणाला उदि -विभूती किंवा गंडे दोरे ताईत इत्यादी देतो ; हं आणखी एका नात्यात 
रांडपोरे आधुन मधून घरी येणाऱ्या ग्रहस्थास " आला आमच्या … चा बुवा '' असे म्हणतात , परंतु आपले असे काही नातेही असल्याचे मला आठवत नाही , असो ! क्रोध नसावा … 
तर आपणास गांधीची जात हवी आहे ; तर महात्मा गांधीची जात तशी 
गोंधळाची आहे , म्हणजे असे की मोहनदास ( म गांधी ) चे वडील करमचंदयांची जात हिंदू - मोघि ( गुजराती ) होती या जातीत त्यांनी तीन बायका केल्या तिन्हीहि बाळंत आजारात अपत्यहीन मरण पावल्या ; मोहनदास यांच्या माता पुतळाबाई मात्र जगल्या . या करमचंद यांच्या 
चतुर्थ पत्नी मुळात या बालविधवा होत्या आणि जातीने ब्राम्हण होत्या 
म्हणजेच म. गांधीचे वडील मोघी तर आई ब्राम्हण होत्या आणि हा दोघांचाहि पहिला विवाह नव्हता , त्या मूळे दुर्दैव असे कि गांधीना ब्राम्हण मानायचे कि मोघी हा प्रश्नच आहे ! असो … परंतु हा काही नवा प्रश्न नाही. ब्राम्हण मुली आंतरजातीय / आंतरधर्मीय / आंतरदेशीय विवाह करण्यात पटाईत आणि आघाडीवर असल्यामुळे आगदी पुरातन कला पासून हि समस्या आहेच ! अगदी ययाती -देवयानी , दुष्यत - शकुंतला पासून ते डॉ . आंबेडकर -सविता आंबेडकर पर्यंत आणि अगदी काल परवा 
ममता कुलकर्णीने एका अंडरवर्ड गुन्हेगाराशी लग्न करण्या साठी जात बदलण्याचा प्रकार असेल यांच्या मुलांची जात कोणती मानायची ? ते आपण सांगू शकता ? फार कशाला ?  रामदास आठवले , सुशील कुमार शिंदे , नरेंद्र जाधव , गंगाधर पानतावणे , शरद पवार या सर्वांच्या पत्नी ब्राम्हणच आहेत कि ! असि किती तरी उदाहरणे सांगता येतील प्रणवजी ! 
ज्याने त्याने आपल्या नाकाला किती शेंबूड लोंबतोय हे पाहून इतरांच्या नाकाची लांबी मोजली पाहिजे , ते सर्वा साठीच इष्ट असते , नाही काय ? 


Sunday 8 September 2013

विरोध ब्राह्मण जातीला नाहीच

आम्ही ब्राह्मणवादाला ठेचतो

प्रज्ञा खांडेकर यांना …. 
रविन्द्र तहकिक यांचा सनविवि, 

आपली आसाराम बापूवर मी लिहिलेल्या कविते वरील प्रतिक्रिया 
वाचली . आपण कवितेला मन पासून दाद दिली त्या बद्दल आभार . 
कवितेत असभ्य भाषा आहे हे मान्यच ! परंतु ती विषय आणि आशयाची गरज होती . आपण लिहा वाचा च्या सदस्य आहात . आमच्या ब्लोग च्याही वाचक आहात , आपण प्रतिक्रिया खुल्या मनाने दिली आहे . बापू च्या कृत्या मुळे आपण हि व्यथित आणि संतप्त आहात ; एक स्त्री म्हणूनच नव्हे तर मानवी मूल्याची चाड असणाऱ्या कुणालाही बापू सारख्या छीनाल आणि महाबिलंदर बोक्याचे मुस्काट खेटरा ने बडवण्याची इच्छया होईल.    परंतु प्रज्ञाजी आपण पत्राच्या प्रारंभी मी ब्राम्हण विरोधी लेखन करतो आसा उल्लेख केला तो काही सत्यास धरून नाही ; आमचा ब्लॉग  किंवा आमचे संपादक मंडळ ; मी स्वत : अथवा आदरणीय अनिताजी आजीबात ब्राम्हण विरोधी नाहीत , एखादी जात कधीच वाईट नसते; आमचा विरोध ब्राम्हण जातीला नाही; प्रवृत्तीला आहे. आम्ही ब्राह्मणवादाला ठेचतो.  तुम्ही याला शब्दच्छल म्हणाल परंतु हेच सत्य आहे. 

 डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांच्या सोबत मनुस्मृती ची होळी करणारा एक ब्राम्हणच होता . संस्कृतातील ज्ञान मराठीत आणून बहुजनांना ज्ञानाचे अमृत देणारा एक ब्राम्हणच होता. नुकतीच हत्या झालेले नरेंद्र दाभोलकर देखील ब्राम्हणच होते, असि किती तरी नवे सांगता येतील कि जे ब्राम्हण असूनही मानवता मुल्यांची जपवणूक करण्या साठी ब्राम्हणत्वचा त्याग करून बहुजनाच्या कल्याणासाठी आणि उत्थानासाठी झटले आहेत; असे सर्व ब्राम्हण आमच्या साठी आदरणीयच आहेत. आम्ही ब्राम्हण विरोधी नाही आहोत, वाळवंटात पाय पोळत धावणाऱ्या महाराच्या पोराला उचलून घेणारे संत एकनाथ आम्हाला संत तुकाराम इतकेच वंदनीय आहेत. 

परंतु जो कोणी ब्राम्हण तो केवळ ब्राम्हण आहे म्हणून स्वतःला शुद्ध, पवित्र, श्रेष्ठ, उच्च, ज्ञानी आणि विशेष समजत असेल; आणि धर्म किंवा परंपरांचा आधार सांगत किंवा आधार घेवून बहुजनांना कमी लेखत असेल , गटबाजी आणि षड्यंत्र करून बहुजनांना संधी नाकारत असेल , त्यांची अवहेलना किंवा टिंगल टवाळी करत असेल त्या भट -बोक्यांना पोत्यात घालून बुकलुन काढण्यास आम्ही कधीही मागे पुढे पाहणार नाही. त्याच बरोबर ब्राम्हण लेखक, कवी, विचारवंत, राजकारणी, समाजसेवक (?), कलावंत, धार्मिक पंडित-महंत वगैरे लोक ज्या प्रकारे गटबाजी करून बहुजन समाजाला विकास आणि प्रगती पासून वंचित ठेवतात त्यांचा समाचार आम्ही घेणारच ! आधुनिक काळातीलच नव्हे तर पुरातन काला  पासून आजतागायत ज्यांनी ज्यांनी हे पाप केले आहे; करत आहेत त्या बद्दल आम्ही लिहिणार; बहुजनांना सत्याची जाणीव करून देणे हे आमचे व्रतच आहे. 

असो आपण आमचा ब्लोग वाचा, आपल्या प्रतीक्रीयांचेही स्वागत आहे. चर्चा तर झालीच पाहिजे. संवाद व्हावा, सुसंवाद झाला तर उत्तमच ! वाद असू नये हि अपेक्षा. किमान गैरसमज तरी नसावेत हि इच्छा, 
                                                                           कळावे ,आपला 
                                                                           रवींद्र तहकीक




 

Thursday 5 September 2013

उदाहरणार्थ फमु, सोनवणी इत्यादी वगैरे !


---------------------------------------------------
                             प्रा. रवींद्र तहकिक , मुख्य संपादक 
                                                         ( अ.पा. वि . मं .) 
---------------------------------------------------------------------
सासवड येथे होऊ घातलेले आखिल मराठी साहित्य संमेलन 
आणि त्या साठी निवडणुकीला उभे असलेले उमेदवार ! विशेषतः 
फ मु शिंदे आणि संजय सोनवणी ; चित्र असे आहे की ,जणू हेच दोन उमेदवार मैदानात आहेत . प्रभा गणोरकर आणि   अरुण गोडबोले 
कुणाच्या खिज गिनतीतच नाहीत . एक चित्र असेही रंगवले जात आहे की फ मु कितीच्या फरकाने जिंकणार ? म्हणजे सोनवणी नक्की पडणार ! 
निवडणुका म्हटलं किसाहित्य  आश्या अफवा -वावड्या - उठणारच ,परंतु सोनवणी तेवढ्याने विचलित झाले ; त्यांना कुणीसं म्हटलं कि ते आजून लहान आहेत ; आता नाहीतर पुन्हा कधी अध्यक्ष होऊ शकतात वगैरे ! तर गडी जाम भडकलाच की ! साहित्य संमेलनाचा अध्यक्ष कुणी म्हातार बुआच आसावा असा काही नियम आहे का ? वगैरे ! असेल तर दाखवा मला वगैरे ! असं अद्वा -तद्वा बोलले म्हणतात ( म्हणजे असें नायगावकर परवा तेंडूलकराना अरुणा ढेरेंच्या घरी म्हणाल्याचं दवणे गोडबोलेंना सांगत होते म्हणे ) असो सोनवणी एवढ्यावरच थांबले नाहीत म्हणे ! तर त्यांनी थेट ज्ञानेश्वरांचीच साक्ष काढली ; म्हणाले वयाचा विचार केला असता तर ज्ञानेश्वरांना सुध्धा लोकांनी संत पद द्यायला वेटिंग वर ठेवलं असतं ! 
                 सोनवणी लेखक कमी विचारवंत जादा आहेत ; त्यात पुन्हा 
राजकारणाच्या खोप्यातही त्यांची मुशाफिरी सुरु असते ; धंदा पाणीही बघतात ; त्यामुळे त्यांना असे काही बाही सुचणे साहजिक आहे ,परंतू 
फ मु च्या बरोबरीत बसन्या साठी ज्ञानेश्वराशी तुलना करण्याचा सोनवनि चा हटयोग बरा नाही वाटला इतकेच ! 
   आर्थात फ मु अध्यक्ष होण्यास किती लायक आहेत हा वेगळा मुद्दा आहे . म्हणजे अध्यक्ष होऊन ते काय करणार ? वगैरे ! तर इतर तरी काय करतात ? किंवा आजवर कुणी काय दिवे लावले ? म्हणून फ मु कडून 
आमुक -ढमुक टेंभे पलिते उजळण्याची अपेक्षा करायची ? आणि सोनवणी म्हणतात तसे समेलन एक उत्सव झालाय ; तर ; समजा,  सोनवणी निवडून आले तर ते या उत्सवाचे कोणत्या जलश्यात रुपांतर करणार ?
   आणि त्यांनी आसा काही जलसा करू घातलाच तर लोक तो चालू देतील का ? हा खरा प्रश्न आहे . बाकी फ मु सोनवणी आम्हास एक समान आहेत ; ते बहुजनातील आहेत आणि आपल्या लेखन विचारातून बहुजन प्रबोधन करत आलेले आहेत ; चळवळीला बळ देत आलेले आहेत म्हणून हे दोघेही आम्हास योग्य उमेदवार वाटतात ; दोघानाही उदाहरणार्थ शुभेच्छा इत्यादी वगैरे !

Sunday 1 September 2013

अंधारात विवस्‍त्र होते आसाराम बापू

पीडित मुलीने FIR मध्‍ये सांगितली आपबिती

लैंगिक शोषणाचा आरोपात अडकलेले आसाराम बापू निर्दोष असल्‍याचा दावा करत आहेत. मॅडम आणि त्‍यांच्‍या पुत्राचे यामागे षडयंत्र असल्‍याचाही आरोप त्‍यांनी केला. परंतु, पीडित मुलीने आसाराम बापुंवर अतिशय गंभीर आरोप लावले आहेत. तिने दाखल केलेली तक्रार आणि एफआयआरमध्‍ये त्‍या दिवशी घडलेला वृत्तांत नोंदविण्‍यात आला आहे. हा प्रकार अतिशय विकृत आहे.

अल्‍पवयीन मुलीने आसाराम बापुंवर गंभीर आरोप केले आहेत. पोलिसांकडे दाखल करण्‍यात आलेल्‍या तक्रारीत तिने आपबिती सांगितली. 'त्‍यांनी (आसाराम) खोलीतील दिवे बंद केले आणि मला मागे बोलावले. त्‍यांनी दरवाजा बंद केला आणि माझ्यासोबत चाळे करण्‍यास सुरुवात केली. मी ओरडले तेव्‍हा माझ्या आईवडीलांना ठार मारण्‍याची धमकी देऊन माझे तोंड बंद केले. त्‍यांनी माझे चुंबन घेतले आणि आक्षेपार्ह पद्धतीने मला स्‍पर्श करु लागले. अंधारात ते संपूर्ण नग्‍नावस्‍थेत होते. त्‍यांनी माझे कपडे काढण्‍याचा प्रयत्‍न केला. तेव्‍हा मी रडू लागले. माझे तोंड त्‍यांनी पुन्‍हा बंद केले. हा प्रकार जवळपास तासभर सुरु होता. मी खोलीतून बाहेर जाऊ लालगे तेव्‍हा पुन्‍हा गप्‍प राहायला सांगून धमकी दिली.'

आसाराम बापुंनी दिलेल्‍या धमकीबद्दल पीडितेने तक्रारीत म्‍हटले आहे, की मी एक शक्तीशाली पुरुष आहे. स्‍वतःची तुलना त्‍यांनी इश्‍वरासोबत केली. खोलीत घडलेली कोणतीही गोष्‍ट बाहेर सांगितल्‍यास संपूर्ण कुटुंबाला उद्ध्‍वस्‍त करु टाकेन, अशी धमकी त्‍यांनी दिली होती.

त्‍यावेळी अतिशय घाबरल्‍याचे पीडितेने सांगितले. त्‍यावेळी कोणालाच काहीही सांगितले नाही. परंतु, आईवडीलांसोबत घरी परतल्‍यानंतर तिने सर्वप्रकार सांगितला. त्‍यानंतर दिल्‍लीतील कमला मार्केट पोलिस ठाण्‍यात तक्रार दाखल करण्‍यात आली.

पीडित मुलीने पोलिसांकडे नोंदविलेल्‍या जबाबात म्‍हटले आहे, की ती मुळची उत्तर प्रदेशच्‍या शाहजहापूर येथील रहिवासी आहे. मध्‍य प्रदेशच्‍या छिंदवाडा येथील आसाराम बापुंच्‍याच गुरुकुलमध्‍ये इयत्ता बारावीत शिकते. तिथेच वसतीगृहात राहते. एका दिवशी अचानक तिची प्रकृती खालावली. वॉर्डनने तिच्‍या आईवडीलांना उत्तर प्रदेश येथून बोलावून घेतले. मुलीला रुग्‍णालयात दाखल करण्‍यात आल्‍याचे त्‍यांना सांगण्‍यात आले. तिथे तिचे सीटी स्‍कॅन करण्‍यात आले. तिच्‍या प्रेतबाधा झाल्‍याचेही वॉर्डनने त्‍यांना सांगितले.

आईवडील जेव्‍हा आश्रमात पोहोचले तेव्‍हा तिची प्रकृती उत्तम होती. आसाराम बापुंनी एक मंत्र पाठविला होता, त्‍यामुळेच ती शुद्धीवर आल्‍याचे त्‍यांना सांगण्‍यात आले. वॉर्डनने त्‍यांना जोधपूर येथे आसाराम बापुंच्‍या आश्रमात नेण्‍यास सांगितले. स्‍वतः आसाराम बापू तिच्‍यावर धार्मिक विधीद्वारे उपचार करतील. तिला तत्‍काळ जोधपूरला न्‍यावे, असेही वॉर्डनने त्‍यांना सांगितले होते.

पीडितेला घेऊन तिचे आईवडील 14 ऑगस्‍टला जोधपूरला पोहोचले. तिथे त्‍यांना एक खोली राहण्‍यासाठी देण्‍यात आली. 15 ऑगस्‍टला सायंकाळी आसाराम बापुंना आश्रमात भेटल्‍याचे मुलीने सांगितले. त्‍यांनी तिला खोलीत बोलावले आणि कुटुंबियांना बाहेर प्रतिक्षा करण्‍यास सांगितले. आसाराम बापुंनी तिची विचारपूस केली. शिक्षणाबद्दल विचारले. ती संस्‍थेची प्रवक्ता बनू शकते, असेही तिला सांगितले. त्‍यानंतर तिच्‍या आईवडीला जाण्‍याची सूचना केली. धार्मिक विधीला वेळ लागेल, अशी बतावणी केली.

पीडित मुलीला कोणताही आजार नसल्‍याचे पोलिसांच्‍या तपासात निष्‍पन्‍न झाले आहे. तिला आसाराम बापुंसमोर समर्पण करण्‍यास बाध्‍य करण्‍याचा संपूर्ण कट होता.