Saturday 27 October 2012

वाघोबा वाघोबा किती वाजले ?

रक्त सांडायला बहुजन अन पदे भूषवायला ब्राह्मण !
 प्रा. रवींद्र तहकिक

 
त्यादिवशी अवघा महाराष्ट्र हळहळला.......प्रत्येक शिवसैनिक रडला....अगदी बाळासाहेबांनी ज्यांच्यावर कुठलेही विधिनिषेध न बाळगता अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन ( ठाकरी भाषा ) जहरी टीका केली, त्या विरोधकांच्या काळजातही बाळासाहेबांची असहायता पाहून चर्र sss झाले ..... बाळासाहेबांची साथ सोडून गेलेले भुजबळ -राणे -गणेश नाईक सारख्या एकेकाळच्या निष्ठावंत शिवसैनिकांनाही साहेबाची ती अवस्था पाहून रडू कोसळले असेल... जिथे निखील वागळे सारखा शिवसेना आणि बाळासाहेबांचा कट्टर द्वेषी ( मी विरोधी हा शब्द कटाक्षाने टाळलाय ) पत्रकार( ज्याला औरंगाबाद मध्ये १९९३ साली जिवंत जाळण्याचा प्रयत्न शिवसैनिकांनी केला होता, त्याचे आदेश मातोश्री वरून निघाले होते असे म्हणतात ) तो देखील दसरा मेळाव्यातील बाळासाहेबांची ध्वनीचित्र फीत आणि त्यातील त्यांचेअसहाय वक्तव्य ऐकून '' गलबलला तिथे इतरांची अवस्था मी म्हणतो तशी नक्कीच झाली असणार .

ज्याला खरे रूप कळले ते सोडून गेले
'वाघ कितीही म्हातारा झाला, गलितगात्र झाला तरी एकवेळ उपाशी मरेल परंतु गवत खाणार नाही ' ''शंभर वर्ष शेळी सारखे जगण्या पेक्षा एक दिवस वाघ सारखे जगा' असे स्वत; बाळासाहेबच म्हणत असत. मग आता असे काय झाले की हा स्वतःला ढाण्या वाघ समजणारा स्वयंघोषित '' हिंदुहृदय सम्राट '' एखाद्या मंदिरा समोरील भिकाऱ्या सारखा गयावया करीत याचना करू लागला ? कुणी म्हणेल बाळासाहेब शरीराने थकले ...मनाने खचले...आजारांनी खंगले म्हणून असे बोलले. परंतु हे साफ खोटे आहे . सत्य असे आहे कि बाळासाहेब ठाकरे यांना आता हे स्पष्ट कळून चुकले आहे कि आपल्या नंतर शिवसेना एकतर संपणार किंवा राज ठाकरे ती हायजैक करणार. कुठल्याही परीस्थित उद्धव ठाकरे शिवसेनेच्या नेतृत्वाची धुरा वाहण्यास सक्षम नाही. बाळासाहेबांचे नेमके दु;ख्ख हेच आहे कि आंधळ्या पुत्र प्रेमापोटी आपण आधी नारायण राणे आणि नंतर राज ठाकरे यांना बाहेरचा रस्ता दाखवला आणि केवळ आपल्या शब्दखातर तमाम शिवसैनिक उद्धवच्या मागे राहील असा गैरसमज करून घेतला . परंतु असे घडले नाही. अनेक जण बाळासाहेबांच्या भावनेचा विचार न करता सोडून गेले, जे शिल्लक आहेत ते केवळ बाळासाहेब जिवंत आहेत तोवर केवळ शरीराने शिवसेनेत आहेत .

गारदयांशी कसली गद्दारी ?
सत्य कटू असले तरी सांगावे लागेल, कट्टर शिवसैनिकांना ते पटणार नाही किंवा माझ्या म्हणण्याचा त्यांना राग देखील येयील, परंतु अगदी पहिल्या दिवसा पासून बाळासाहेबांची शिवसेना म्हणजे प्रा. ली. कंपनी होती. फक्त आणि फक्त स्वतःच्या फायद्यांचा विचार करणारी. त्यातही पुन्ह्या खास ब्राम्हणी वृत्ति अशी कि शिवसेना वाढण्यासाठी बहुजनातील भोळ्या भाबड्या तरुणांना भावनिक आवाहने करायची ...त्यांची माथी भडकवायची त्यांच्या शक्तीचा वापर करून स्वतःची दहशत निर्माण करायची आणि त्या दहशतीच्या आधारे खंडण्या, मांडवल्या करीत सत्ता देखील मिळवायची. रक्त बहुजनांना सांडायला लावायचे .... मुगुट स्वतः मिरवायचे आणि संधी द्याचीच झाली तर ती ब्राम्हणाला द्यायची हे बाळासाहेबांचे धोरण होते आणि आहे . हे ज्यांना ज्यांना कळले ते शिवसेना सोडून गेले . बाळासाहेब त्यांना उडाले ते कावळे आणि राहिले ते मावळे असे म्हणत या बंडखोरीला गद्दार असे संबोधतात ...परंतु आमचे स्पष्ट म्हणणे आहे कि गारदयांशी कसली आली आली गद्दारी?

Wednesday 24 October 2012

निर्लज्जम सदा सुखी

निलाजरे हसू : अंगात संघाने शिकविलेला निलाजरेपणा मुरलेला
असेल तर पापे करूनही असे दिलखुलास हसता येते!


गडकरी : पैसे खाण्याचा नवा पॅटर्न 
निर्माण करणारा महाभष्टाचारी!
प्रा. रवींद्र तहकिक 

निर्लज्जम सदा सुखी असे का म्हणतात हे ज्यांना समजून घ्यायचे असेल त्यांनी सध्या विविध वाहिन्यावर नितीन गडकरी यांनी जो स्वतःचा बचाव चालवला आहे तो पहावा ! एखाद्या छीनाल रांडेने आपल्या व्याभिचाराचे आणि अनैतिक धंद्याचे जसे जाहीर आणि निर्लज्ज पणे समर्थन करावे. आणि पुन्हा वरतून पानाची पिंक टाकत हा धंदा मी खूप आनंदाने करतेय असे नाही तर मजबुरी आहे, हि पण एक एक जन जनसेवाच आहे. असे म्हवावे अगदी त्याच प्रकारे गडकरी त्यांच्यावरील आरोपाना साळसुद उत्तरे देत आहेत. त्यांचा हा साळसूदपणा त्यांना संघाने दिलेली देणगी आहे कारण संघातला माणूस बाकी काही नाही तरी निदान खोटे अतिशय बेमालूम पणे आणि दडपून बोलू शकतो. खोट्या अफवा पसरवण्यात आणि कंड्या पिकवण्यात तर संघोट्याच्या तोंडाला कोणी हात लाऊ शकत नाही. गडकरी हे अस्सल नागपुरी संघोटे आहेत. भरा -भरा भाराभर खाणे , सकाळी ढरा-ढरा ढीगभर xxx करणे आणि बका-बका बोगस बाता मारण्यात गडकरी सर्वात '' अग्रेसर'' असल्यामुळेच त्यांना भा ज प चे अध्यक्ष पद मिळाले.   

संघाचा कलेक्शन एजंट   
आर्थात गडकरीचे कॉलीफिकेशन एवढेच नाही . प्रमोद महाजनानंतर संघ-भाजपचा कलेक्शन एजंट कोण असेल तर तो गडकरी आहे. सगळ्या प्रकारच्या मांडव्ल्या करण्यातही गडकरी पटाईत आहेत. या शिवाय पैसा कसा आडवावा , कसा वळवावा आणि कसा जिरवावा यातही ते माष्टर माईड आहेत. या बकासुराने सेनाभाजाप मान्रीमंडळात मंत्री असताना भ्रष्टाचाराचा एक नवा फार्मुला शोधून काढला. पूर्वी मंत्री आपल्या खात्य अंतर्गत असणारे काम ज्या कुणा ठेकेदाराला द्यायाचे त्याच्या कडून काही रक्कम घ्यायचे. गडकारिने मात्र आपल्याच खात्याचे काम बोगस नावाने आपण ठेकेदार म्हणून घेण्याचा आणि त्या साठी अमाप रकमा मंजूर करण्याचा नवाच फंडा आणला. इतरांना काम दिलेच तर त्यात चक्क मंजूर रकमीवर टक्केवारी पद्धतीने कमिशन घेण्याचा प्रकार आणून भ्रष्टाचार जणूकाही लीगल प्रोसेजर असल्या सारखेच केले. गडकरीचा हा फंडा आता महाराष्ट्रातच नाही तर केंद्र सह संपूर्ण देशातील सर्व राज्यात सर्रास चालू आहे ( गडकरी त्यातही रॉयल्टी मागत असेल ) 

हा माणूस बलात्काराचे  समर्थन करील 
मागे कोळसा प्रकरणात काळे तोंड झाले असताना हि हा बकासुर सगळ्याशी उद्दामपणे आणि मग्रुरीत बोलत होता. आताही ती जमीन पडीक होती, नाहीतरी शेतकर्यांना त्याचा काही उपयोगच नव्हता. मी तिथे उद्योग उभे केले त्याचा लोकांना फायदाच झाला अशी भाषा करत आहे. म्हणजे एखाद्या नराधमाने घरात एकटी असलेली बाई पाहून आत घुसावे. तिच्यावर बलात्कार करावा आनि वरतून पुन्हा म्हणावे की,  ''नाही तरी ती एकटीच होती, तिचा नवरा घरी येणार नव्हताच. आणि या बलात्कारात तिचे असे काय नुकसान झाले. शेवटी तिलाही त्या रात्री शरीर सुखाचा आनद मिळण्याची शक्यता नसताना माझ्या मुळे तो आनद मिळाला. यात तुम्ही अनैतिकता शोधात असाल तर खुशाल बोम्बलत बसा मी असल्या '' चिल्लर'' आरोपाना भिक घालत नाही...........''

वरील उदाहरणात जो निलाजरेपणाचा कळस आहे ...गडकरींचा निलाजरेपण त्या कळसावर बसलेल्या कावळ्याच्या उंचीचा आहे ! 

Sunday 7 October 2012

भुईमुगाच्या शेंगा आणि रात्रभर सोडवलेल्या गणिताची खोटी गोष्ट

 - प्रा. रवींद्र तहकिक
--------------------------------------------------------------------------------------
 टिळक किती स्वाभिमानी होते आणि हा स्वाभिमान त्यांच्यात लहानपणा पासूनच
कसा रुजलेला होता हें पटवून देण्यासाठी कोणीतरी टिळकभक्ताने रचलेली भुईमुगाच्या
शेंगाची गोष्ट आपण थोडीजरी अक्कल आणि तर्क बुद्धी जागी ठेवून वाचली तरी ती
एक निव्वळ लोणकढी थाप आहे हें आपल्या लक्षात येयील.
  मुळात टिळकांच्या काळात आजच्या प्रमाणे शाळेत टिफिन घेऊन जाण्याची पद्धत
नव्हती. किंवा शाळेच्या बाहेर आजच्या प्रमाणे चणे-फुटाणे, पेरू, भुईमुगाच्या शेंगा ,
पाणीपुरी-चाट , इत्यादीच्या गाड्याही लागत नसायच्या . बरे काही मुलांनी दप्तराच्या
पिशवीत शेंगा लपवून आणल्या असे मानले तरी , त्या काळात इतकी कडक शिस्त
असे की पोरे वर्गात शेंगा खावूच शकत नाहीत .
   असे असताना समजा मुलांनी शेंगा खावून वर्गात टरफले  टाकली असतील आणि
मास्तरांनी त्याची शिक्षा म्हणून सर्वाना वर्ग साफ करायला सांगितला असेल तर
टिळकांनी ते काम करायला हवे होते ' ' मी शेंगा खाल्या नाहीत ,मी टरफले वेचणार नाही ' '
असे मास्तरला म्हणणे म्हणजे स्वाभिमान नव्हे तर उद्दाम पणा झाला. असे म्हणून
त्यांनी वर्गातल्या इतर मुलांना देखील गुरूंची आज्ञा भंग करण्यासाठी उधुक्त केले ,
दुसर्यांचा असा जाहीर पाणउतारा किंवा उपमर्द करण्यात टिळकांना मोठा आनंद
वाटत असे, हें त्यांच्या पुढील जीवनात देखील अनेकदा दिसून आले.

 रात्रभर सोडवलेले गणित

    टिळकांनी लहान पनी एकदा वडिलांनी सुपार्या विकायला पाठवले असताना
    २ आण्याचा हिशोब लागत नव्हता म्हणून रात्र भर जागून जेव्हा २ आण्याची
 खोट सापडली तेव्हाच अंथूरनाला पाठ टेकवली असा एक किस्सा सांगितला जातो
 हाच किस्सा थोडेफार तपशिलाचे फेरफार करून तेनालीरामा/ सावरकर /आर्या चाणक्य
रामदास / एकनाथ इत्यादी बाबतीत सांगितला जातो. मी तर एका पुस्तकात असा
किस्सा गोळवलकर गुरुजी संदर्भात देखील वाचला आहे
मुळात असे लहानपणीचे म्हणून सांगितले जाणारे मोठ्या माणसांचे किस्से
सत्यातेच्या बाबतीत विश्वासाहार्य नसतात .

Friday 5 October 2012

टिळकांची दलित विरोधी पत्रकारिता

 प्रा.रवींद्र  तहकिक

केशव उर्फ बाळ गंगाधर टिळक....या माणसाला नेमकी काय उपमा द्यावी ? सावरकराना प्र के अत्रे यांनी एकदा " काचेच्या कपाटातील सिंह " असे म्हटले होते स्वतः हस्तिदंती मनोर्यात सुरक्षित राहून समजा मध्ये असंतोष निर्माण होयील विशेषतः तरुणाची डोकी भडकतील अशी विधाने करणे, लिखाण करणे आणि त्यांना
भरीस पाडून त्यांच्या हातून विध्वंसक घटना घडवून आणणे ही एक विशेष पद्धत असते. टिळक , सावरकर आणि त्या नंतर बाळ ठाकरे ही या अशा समाजात असंतोषाचे विष पसरवणाऱ्या प्रवृत्तीची ठळक उदाहरणे.  हें स्वतः पुढे होऊन कधीच काही करत नाहीत. यांचा जो काही दम असतो तो सगळा तोंडात. त्या जोरावर हें आपल्या मनातील विध्वंसक प्रवृत्तीला वाट देतात. आपल्या या समाजविघातक विचारला राष्ट्रवादाचे/ धर्माभिमानाचे/ संस्कृती रक्षणाचे गोंडस नाव देतात आणि यावर घाला होत आहे अशी ओरड करीत आपल्या अतिरंजित व भडकाऊ भाषणे आणि लिखाणातून तरुण पिढीची दिशाभूल करून त्यांच्या हातून हत्या / जाळपोळ /दंगली इत्यादी विध्वंसक कृत्य घडवून आणतात भारताच्या राजकीय इतिहासातील या प्रवृत्तीचा जनक कोण असेल तर ते म्हणजे बाळ गंगाधर टिळक !

रँडची हत्यापुण्यात प्लेग ची साथ थेमान घालत होती . हजारो लोक मृत्यूमुखी पडले होते. रोज ही संख्या वाढत होती.
प्लेगची साथ ज्या पिसवा मुळे पसरत होती त्यावर नियंत्रण करण्यासाठी जे बाधित आहेत त्यांना औषध उपचार करण्याची आणि घर घरात औषध फवारणी करण्याची गरज होती. परंतु पुण्यातील सनातनी ब्राम्हण सरकारच्या तपासणी आणि फवारणीला विरोध करत होते. आमच्या घरात आणि देवघरात इंग्रज मुद्दाम महार शिपायांना ( महार रेजिमेंट ) घुसवत आहेत आणि आमची घरे भ्रष्ट करीत आहेत आसा कांगावा पुण्यातल्या ब्राम्हणांनी सुरु केला. बाळ गंगाधर टिळक यांनी या आगीत आपल्या भडक आणि चिथावणीखोर अग्रलेखांनी आणखीनच तेल ओतले. " सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय ? " हा अग्रलेख टिळकांनी राष्ट्रवादी भूमिकेतून लिहिलेला नाही. प्लेगचा उंदिर परवडला, पण महार सोल्जर नको, अशी अत्यंत जातीय भूमिका ब्राह्मणांनी घेतली. या ब्राह्मणांचे नेतृत्व त्याकाळी टिळकांनी आणि त्यांच्या केसरीने केले. केसरीमधून रँडविरोधात ज्वल:जहाल अग्रलेख येऊ लागले. ‘सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय?' हा त्यातलाच एक अग्रलेख होय. या अग्रलेखाचा हा काळा इतिहास दडवून ठेवला जातो. कारण त्यातून ब्राह्मणांचे अडाणीपण आणि जातीयवाद उघड होतो. प्लेग निवारणासाठी झटणा-या रँडच्या विरोधात टिळकांनी इतके वातावरण तापविले की, शेवटी त्यात रँडचा बळी गेला. रँड आणि त्याच्या प्लेगला आळा घालण्या साठीच्या उपाय योजना विरुद्ध टिळकांनी विरोधी बातम्या आणि अग्रलेखांची मोहीमच उघडली होती त्या पैकी हें काही नमुने पहा

प्लेगचे उंदीर बायकांच्या लुगडी-चोळ्यात आहेत काय ?
रँड साहेब आणि त्याच्या सरकारने प्लेगच्या उंदरांची एवढी धास्ती घेतली आहे की
     ते शोधण्यासाठी रँड साहेबाचे आवडते महारसोल्जर आमच्या लेकी बाळींची लुगडी
    फेडून बघत आहेत. चोळ्या काढायला लाऊन बगलेत गाठ आहे किंवा काय हें चाचपत
    आहेत. कुणाला ताप असेल तर लगेच त्यांना पालथे निजवून नितंब उघडे करून त्यावर
    सुया टोचत आहेत. जी आमची ग्रहलक्ष्मी  आपल्या पतीच्या शेजेवर देखील शरीरलज्जा
    संभाळते तिचे असे रस्तोरस्ती होणारे जाहीर वस्रहरण पाहून कुणातरी भीमाचे
   बाहू स्फुरण पावणार आहेत की नाही ? कुणी तरी या रँड रुपी दुशासानाची
   छाती फोडून त्या रक्ताने या विटंबित द्रोपादींच्या अवहेलनेचा सूड घेणार आहे की नाही ?
   इथे एक तरी नर अर्जुन आहे काय ? की सर्व शिखंडी आहेत असे आम्ही समजायचे ?

उंदरा बरोबर गणेशावरही फवारणी
रँडसाहेबांच्या फवारणीचा मोर्चा आता आमच्या घरात माजघरात पोहचला
     आहे , रँडसाहेबाचे लाडके महार सोल्जर पायातल्या खेटरा सगट फवारणीचे
     धोटे घेवून आमच्या घरात घुसतात. घरातले समान रस्त्यावर फेकून देतात
     हें कमी म्हणून की काय आमच्या देवघरात घुसून उंदरा बरोबर आमच्या
     विघ्नहर्त्या गणेशावरही फवारणी करण्या पर्यंत यांची मजल गेली आहे

वरील अग्रलेख कुणी सुज्ञ आणि विचारी माणसाने लिहिला असेल असे वाटते काय ?
प्लेग सारख्या भयानक साथीला आटोक्यात आणण्यासाठी सरकारच्या उपाय योजना
आणि प्रयत्नांना सहकार्य म्हणून लोकजागृती करण्याचे काम करण्या एवजी टिळकांनी
आपल्या लेखणी आणि वृत्तपत्राचा वापर लोकात गैरसमज पसरवन्यासाठी केला
यातूनच पुढे चाफेकर बंधूनी रँडची हत्या केली. तापलेल्या वाळूवर ज्या प्रमाणे लाह्या भाजून
घेतल्या जातात त्या प्रमाणे तापलेल्या वातावरणात आपला मतलब साध्य करण्यात  टिळकांचा
हातखंडा होता

     

वाचा पुढील लेख :
१ )  भुईमुग शेंगाच्या आणि  रात्र भर जागून सोडवलेल्या गणिताच्या खोट्या गोष्टी 
२ ) शिवजयंती सुरुवात निव्वळ थाप
३ ) आगरकराना वापरले आणि कोपर्यात फेकले
४ ) शाहू महाराजांच्या सुधारणा कामात खोडा

Wednesday 3 October 2012

टिळकांच्या आवाजाचे 'भाग भांडवल'!

पोथ्या पुराणे पुरेनात आता इतिहासाची तोतयेगिरी !!

- प्रा.रवींद्र तहकिक
संपादक, अनिता पाटील विचार मंच

जवळपास पंधरवडा उलटला असेल.  महाराष्ट्रात गणेशोत्सवाची धामधूम सुरु होण्यास थोडा अवकाश होता अशा वातावरणात अचानक एके दिवशी एका दूरदर्शन चॅनलवर '' ऐका बाळ गंगाधर टिळकांचा अस्सल आवाज'' अशी जाहिरात सुरु झाली. आम्हीहि उस्तुकतेपोटी संबधित चॅनलने प्रसारित केलेला तो भाग पहिला. त्यात टिळकांचा म्हणून ऐकविण्यात आलेला तो आवाज , त्यातील टिळकांचे वक्तव्य आणि २२ सप्टेंबर १९१५ रोजी झालेल्या संगीत मैफिलीचा संदर्भ हे सर्वच संशयास्पद होते. दुसरया दिवशी काही वर्तमानपत्रातूनही या संबंधात बातम्या छापून आल्या. मायबोली नावाच्या एका वेबसाईटवरही यासंबंधी माहिती आणि पुरावे सादर करण्यात आले (या लेखाची लिन्क अशी आहे : http://www.maayboli.com/node/38013) हे सर्व पहिल्या वाचल्यानंतर आमच्या मनात अनेक प्रश्न उपस्थित झाले. 

१) टिळकांचे म्हणून जे ७२ सेकंदांचे वक्तव्य ऐकविण्यात आले तो आवाज टिळकांचाच आहे याला पुरावा  काय?

२) संबधित वक्तव्य एकल्या-वाचल्यानंतर हे स्पष्ट होते कि या वक्तव्याला कोणताही राजकीय किंवा सामाजिक संदर्भ नाही .कुण्या एका गाण्याच्या मैफलीत श्रोते गडबड करतात आणि तेथील कुणी एक व्यक्ती या लोकांना शांत राहण्यासाठी समज देतो हि घटना अतिशय सामन्यातील सामान्य असताना काहीतरी मोठा ऐतिहासिक ठेवा हाती लागल्या प्रमाणे या किरकोळ ध्वनिफितीचा एवढा गवगवा कशासाठी ? 

३) २२ सप्टेंबर १९१५ रोजी गायकवाड वाड्यात हा आवाज टेप झाला, असा दावा ब्राह्मण करीत आहेत. ब्राह्मण यासाठी म्हणायचे की, हा दावा करणारे आणि त्याला प्रसिद्धी देऊन डमके वाजविणारे सगळे ब्राह्मणच आहेत. हा आवाज १९१५ खरोखरच असेल, तर त्याला ९७ वर्षे झाली आहेत, असे म्हणावे लागते. सोपा प्रश्न असा आहे की, या संपूर्ण ९७ वर्षांच्या काळात एकदाही कधी टिळकांच्या कथित आवाजाबाबत कोणीही काहीच बोलले नाही. मग आता अचानक हा आवाज टिळकांचा आहे, याचा साक्षात्कार कसा झाला? हा आवाज टिळकांचाच आहे, यावर लोकांनी विश्वास तरी कसा ठेवायचा?

४) २२ सप्टेंबर १९१५ रोजी गायकवाड वाड्यात भास्करबुवा बखले यांचे गायन झाले होते. त्यावेळी टिळकांचा हा आवाज कराचीहून आलेल्या एका माणसाने टेप केला असा दावा संबंधित लोक करीत आहेत. कराचीसारख्या इतक्या दूरवरून केवळ टिळकांचा आवाज टेप करण्यासाठी कोणी येईल हे म्हणणेच मुर्खपणाचे नाही का? बरे संबंधित टेपवर काहीही उल्लेख नाही. तरीही हा आवाज टिळकांचाच आहे, असे हे लोक म्हणतात. याला काय म्हणावे? 

५) राजद्रोहाची शिक्षा भोगून टिळक १७ जून १९१४ गायकवाड वाड्यात आले. शिक्षा झाली तेव्हा टिळक ५२ वर्षांचे होते. मंडालेला ते ६ वर्षे राहिले. मंडालेहून परत आल्यानंतर एक वर्षाने गायकवाड वाड्यात हा कार्यक्रम झाला, असे हे लोक म्हणताहेत. म्हणजेच तेव्हा त्यांचे वय ५९ ते ६० वर्षांचे असणार. मंडालेमध्ये टिळकांची तब्येत ढासळली होती. त्यांची पत्नी वारली होती. ते आजारी होते. इंग्रज सरकारने अनके अटी घालून टिळकांची मुदतीआधी सुटका केलेली होती. त्यामुळे सार्वजनिक जीवनात जवळपास नव्हतेच. खरे म्हणजे त्यांच्यात तेवढे त्राणही नव्हते. मग त्यांनी हा कार्यक्रम कसा ठरविला?

६) सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न असा आहे की, ही ध्वनी फित २२ सप्टेंबर १९९५ चीच आहे, हे ठरवायचे कशाच्या आधारे. कशालाच काही आधार नसताना, हा टिळकांचा आवाज आहे, असे हे लोक खोटेच सांगत आहेत. हा आवाज टिळकांचा नसून एका तोतयाचा आहे. टिळकांच्या नावे फसवणूक करणा-यांवर खरे तर कारवाई करायला हवी, पण आपला मीडिया त्यांचा उदो उदो करीत आहे. 

एक डाव भटाचा 
मुळात टिळकांच्या तथाकथित आवाजाच्या ध्वनिफितीचे हे कारस्थान मुकेश नारंग ( ज्याने हि ध्वनिफीत मुद्रित केली असा दावा करण्यात आला आहे त्या तत्कालीन काराचीस्थित सेठ लाखिमचंद इसरदास नारंगचा नातू ) माधव गोरे ( पुण्यातील एक संगणकीय ध्वनिमुद्रण क्षेत्रातील सोफ्टवेअर तज्ञ ) मंदार वैद्य ( दुर्मिळ ध्वनिमुद्रिकांचा विक्रेता/ व्हेंडर ) , शैला दातार ( भास्कर बुआ बखालेची नातसून ) या सर्वांनी मिळून केले आहे. 

उंदराला मांजर साक्ष 
या सर्वांनी आपापली भूमिका योग्य प्रकारे बजावत संबंधित बनावट ध्वनिमुद्रिका खरी असल्याचा आभास निर्माण केला आहे . यातील प्रत्येकाने 'उंदराला मांजर साक्ष' या न्यायाने कराचीचा व्यापारी नारंग ; त्याची श्रीमंती ; त्याचे संगीतप्रेम ; २२ सप्टेंबरची मैफिल ; टिळकांची हजेरी ; बाखालेबुआंचे गायन आणि टिळकांनी श्रोत्यांना दिलेली तंबी या सर्व गोष्टींचा बादरायण संबंध जोडत ध्वनिफितीचा खरेपणा पटविण्याचा प्रयत्न केला आहे.  ही  ध्वनिफित म्हणजे चार भटांच्या चांडाळ चोकाडीने गोपाळ विनायक भोंडे नावाच्या एका नकलाकार तोतयाच्या टिळकाच्या आवाजातील साधर्म्याचा फायदा घेत केलेली सायबर गुन्हेगारी आहे. अर्थात हा गुन्हा फक्त पायरसी किंवा सायबर गुन्हेगारी पुरताच मर्यादित नसून खोटे एतेहासिक दस्तऐवज तयार करणे, त्याला ते खरे असल्याचे भासवून प्रसिध्धी देणे आणि त्या पासून आर्थिक किंवा तत्सम लाभ मिळवणे अशी त्याची व्याप्ती आहे.  हा गुन्हा दखलपात्र आहे. 

हे सर्व कशा साठी ?
शेवटी या मंडळीनी हा सर्व उपद्व्याप का आणि कशासाठी केला, हा प्रश्न उरतोच! त्याचे सरळ उत्तर असे कि अलीकडे पुण्यात आणि अगदी देश-विदेशातही सर्वाना असे वाटू लागले आहे की,  पुण्यातील गणेशोत्सवाची सुरुवात श्रीमंत दगडूशेठ हलवाई यांनी केली !!! नव्या पिढीतील लहान मुलांना तर गणेशोत्सवाचे उद्गाते टिळक होते हे सांगूनही आणि पुस्तकात वाचूनही खरे वाटेनासे झाले आहे. पूर्वी किमान पुण्यात का होयीना गणेश मंडळे टिळकांचे निदान नाव तरी घेत. आता कलमाडी हेच पुण्याचे टिळक असल्या सारखे वावरतात ( हा कलमाडी देखील पुण्यातल्या भटानीच मोठा केला ) हे असे चित्र पाहून पुण्यातल्या भटांची तंतरली आणि मग काहीतरी धमाकेदार करून टिळकांचे नाव आणि त्यांचा गणेशोत्सवाशी असलेला संबंध पुन्हा अधोरेखित करण्याच्या नादात या मंडळीनी हि आवाजाची तोतयेगिरी केली .

Monday 1 October 2012

आता लोकांना ठरवू द्या !!

प्रा. रवींद्र तहकिक
खरे तर आम्ही अजित दादा पवार आणि त्यांचा राजीनामा या  विषयावर 
आमचे जे मत मांडले ते केवळ महाराष्ट्राच्या राजकारणातील एक महत्वाची
घटना म्हणून ; अनिता पाटील विचारमंचचा  अजित पवार आणि त्यांचे राजकीय
अस्तित्व किंवा भवितव्य याच्याशी कुठलाही भूमिकात्मक अथवा धोरणात्मक
संबंध नाही.
       परंतु बऱ्याच वाचकांनी आमच्या ' असे धाडस फक्त पवारच करू शकतात "
या लेखावर फेसबुक आणि ब्लोग वर शंकास्पद प्रतिक्रिया दिल्या आहेत. म्हणूनच
या विषयावर आम्हाला पुन्हा एकदा लिहिणे आवश्यक आहे .
       अजित पवार यांनी सिंचन प्रकल्पात किंवा त्या आधीच्या विविध खात्यात
मंत्री म्हणून काम करताना तसेच अर्थ आणि नियोजन मंत्री व उपमुख्यमंत्री म्हणून
काम करताना अमर्याद भ्रष्टाचार केला असे आपण गृहीत धरू ! त्याची एखाद्या समिती द्वारे
सीबीआय द्वारे किंवा आणखी कुठल्या कायदेशीर प्रक्रीये द्वारे चौकशी व्हावी; श्वेतपात्रिका
काढावी; दोषी ठरल्यास वाटेल ती सजा भोगण्यास मी तयार आहे ! असे खुद्द अजित पवार म्हणत
आहेत. आणि हे काम निष्पक्षपाती पणे व्हावे म्हणूनच आपण मंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे
असेही त्यांनी स्पष्ट सांगितले आहे.
         आम्ही फक्त त्यांच्या या धाडसी निर्णयाचे स्वागत केले. आम्ही असेही म्हटले की
असे धाडस खुद्द मोठे पवार ( शरद पवार देखील कधी करू शकले नाहीत ) आम्ही आमच्या
लेखात अजित पवार निष्कलंकच  आहेत असे कुठेही म्हटलेले नाही. कदाचित ते दोषी असुशकतात
किंवा असतीलही परंतु ते निश्चित करण्याची जबाबदारी आता या बाबत आरोप करणाऱ्या
मंडळींची आहे. त्यांना त्यांचे काम विना अटकाव करता यावे म्हणून अजित पवार यांनी आपला
अडथळा स्वतःहून दूर केला; त्यांचा हा निर्णय अतिशय योग्य आहे, भ्रष्टाचाराचे आरोप
होणार्या अन्य मंत्र्या साठी अनुकरणीय आहे ; म्हणूनच स्वागतार्ह आहे. एवढेच आमचे म्हणणे आहे .या निमित्ताने त्यांनी एक चांगला पायंडा पाडला आहे. आणि आम्ही त्यांच्या या धाडसी
निर्णयाचे या मुद्या पुरते स्वागत केले आहे; समर्थन नव्हे !!
        अनेक मंत्री हातात बेड्या पडे पर्यंत सत्तेच्या वळचणीला राहून आपला बचाव करण्या साठी
वाटा पळवाटा शोधण्याचा प्रयत्न करतात आणि पक्षाने हकालपट्टी करे  पर्यंत खुर्चीला चिकटून
राहतात. अजित पवार यांनी मात्र थेट मैदानात उतरून दोनहात करण्याचा निर्णय घेतला आहे .
अजित पवार खरोखर दोषी असतील तर त्यांच्यावरचे आरोप सिद्ध करण्याची आणि त्यांना रॉबीन हूड ठरू न देण्याची जबाबदारी आता अर्थातच आरोप करणाऱ्यांची आहे.
          यात कोण यशस्वी ठरतो हे आता कालच ठरवेल